पहिल्या चार गोष्टी मी सगळ्यात शेवटी लिहिल्यात.
बाकीच्या जशा प्रकाशित झाल्या - तशा क्रमाने आहेत.
पहिली - मी पॅरिसमध्ये लिहिली, शेवटची बार्सिलोनामधुन मेल केली.
त्याच्या आधीची माद्रिद मधुन.
माद्रिदमध्ये काम करायला धमाल यायची.
तशी तर पॅरिसमध्ये आणि फ्लोरीडातल्या की वेस्ट मध्येही.
पण ते फक्त थंडीत.
बाकी मॉन्टाना, टोरोंटो, शिकागो आणि क्युबातलं हवाना - लिहावं तर अशा ठिकाणी...
आणखीही जागा होत्या - नाही असं नाही - पण त्या एवढ्या खास नव्हत्या.
आयदर तसं - किंवा जेव्हा तिथे होतो तेव्हा आम्ही तेवढे खास नव्हतो.
इथे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत - आय होप तुम्हाला त्यातल्या काही आवडतील.
कारण...कारण त्यातल्या काही मला आवडतात.
बाकीच्या म्हणजे...बाकीच्या अशा काही आहेत कि त्या उगीचंच काही लोकांना जरा जास्तच आवडतात.
आणि मग अशा गोष्टी आवडणाऱ्या त्या लोकांना भेटलं कि तुम्हाला ’आयची जय!’ फीलिंग येतं. धड हसता ही येत नाही ना रडता!
तर अशा आणखीही काही गोष्टी आहेत.
त्या कधीना कधी कुणाना कुणाला कोणत्या ना कोणत्या कारणाने आवडल्या असणारच.
हो - नाहीतर प्रकाशित कोण का करेल?
बर ते जाऊ दे.
तर त्याचं असं आहे ना - कि जिथ कुठं जाणं आवश्यक आहे तिथे जाताना, आणि जे करणं प्राप्त आहे ते सर्व करताना, आणि वर जसं जसं जे काही घडतंय ते तसं तसं बिनबोभाट बघताना - तुम्ही ज्याने कशाने लिहीता, मग ते काहीका असेना - पण बोथट होत जातं.
खरंय.
पण त्याचं असं आहे कि ते जे काही आहे - कि ज्याने मी लिहितो - मला असं वाटतं कि एकवेळ ते बोथट का होईना, कि त्याला थोडे चिरे का पडेनात, कि मला त्याला धार का लावायला लागेना - भेंडि धुसमटत चकचकीत रहाण्यापेक्षा ते लई परवडलं.
आता - धार लावायची वेळ आली.
अजुन तीन कादंबऱ्या आणि पंचवीसेक भन्नाट गोष्टी लिहुन होईतो जगायला आवडेल.
च्यायला - त्याचं आहे असं ना - कि मला एवढ्या गोष्टी माहितेत!
फुल टु माजात -
- अर्नेस्ट हेमिंग्वे.
----------------------------------------------------------
आय याम बाक!
हे वाक्य खरं तर अरनॉल्डी (किंवा श्वार्झनेगरी म्हणा हवं तर) उच्चारात ऐकायला जास्त बरं वाटतं, पण सांगायचा मुद्दा असा कि मी परत आलोय.
या वाक्याचं विश्लेषण करणं म्हणजे भंपकगिरी होईल, कारण मी कुठेच गेलो नव्हतो.
पण टेक माय वर्ड फ़ॉर इट - आय ऍम बॅक.
मागचे आठ दहा महिने - मुक्ता नावाची एक मुलगी आमच्या घरी रहायला येणार आहे - या वाक्याने सुरुवात करुन कैक पोस्ट्स लिहिली. एवढ्या वेळात मुक्ता येऊन जुनी पण झाली पण सुरु केलेली पोस्ट्स लिहुन संपेनात.
’मुक्ताने हुल दिली कि चाहुल’ - हे पोस्ट लिहुन होईपर्यंत माधुरीचं डोहाळजेवण पण उरकलं होतं.
डोहाळजेवण नावाच्या राडा प्रकाराबद्दल लिहीपर्यंत मी घाटात रस्ते बांधायला गेलो आणि माधुरी सिंगापुर, जपान वगैरे दौर्यावर. त्याच्याबद्दल लिहीपर्यंत ’डायपर’ नावाची दुपटी आणि ’गुलाब्बो की बैलगाडी’ नावाची बाबागाडी वगैरे वगैरेची खरेदी आली.
ती होईतो सासू आली.
आय मीन - आमच्या सासुबाई आल्या!
(माधुरीला असली मराठी वाक्य पर्फेक्ट समजतात).
त्या आल्या त्याबद्दल लिहिण्यासारखं काही नव्हतं, पण त्या आल्या त्या रात्रीच मुक्ता पण आली.
म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी आली...पण - अबे समझा करो यार!
मराठी ब्लॉग्जवर एक लिखित नियम केला पाहिजे.
जे लोक MBA वगैरे करुन(ही) लिहितात - त्यांनी आपापल्या ब्लॉगवर तसं डिक्लेअर करावं.
म्हणजे लोक (निदान मी तरी) ते वाचण्याच्या फंदात पडणार नाही. हे लोक डेटा घेतात (नाहीतर तो अशक्य प्रकारे निर्माण करतात), त्याचं मस्तपैकी ऍनॅलिसिस करतात आणि त्यावर दळभद्री कन्क्ल्युजन्स काढतात. मला ज्यावेळेस आयुष्यात काहीच करावंसं वाटत नव्हतं तेव्हा ’भविष्याचे काय प्लॅन?’ या प्रश्नावर मी सरळ MBA असं ठोकुन द्यायचो. मी खरच आयुष्याला मरणाचा कंटाळलो असतो तर MBA केलं असतं. (अमेरिकेत MBA केलेले लोक या नियमाला सरसकट अपवाद - विषय संपला).
एनीवे - बाबाने MBA चा विचार जाहीर केल्यावर त्याच्यावर उखडलो.
बाबा हा (म्हणजे माझ्यासारख्या नतद्रष्टा साठी तर फारच) द्रष्टा माणुस.
आयुष्यातल्या कुठल्याही परिस्थितीचं अचूक आकलन करुन, त्याचं बिनतोड विश्लेषण करुन, त्या परिस्थितीतली (खरं तर तशा परिस्थितीतलीही म्हणायला हवं) सौंदर्यस्थळं दाखवत तुमची त्या परिस्थितीसाठी तयारी करुन देणं - या बाबतीत बाबाचा हात कुणी धरु शकत नाही. असं असताना - why fix something which aint broken?
बाबाचं MBA करुन होणारं भावी वाटोळं वाचवण्याचं (बाबाने दिलेलं नसलं तरी) क्रेडिट मी घेतो.
Your life has changed forever mann… It will never be the same again!! It is an amazing change… you’ll see it in everything you do… The stores you go to, the aisles you frequent in your local super market, the things that worry you, the things that please you, the channels you watch, the time you spend at home, the reasons you call home, the things that you discuss with friends and colleagues, you name it!
----------------------------------------------------------
मुक्ताला पहिल्यांदा हातात घेतलं त्याला आता तीन आठवडे झाले.
ते अंधुक आठवताहेत.
फोटो काढणं, व्हिडिओ शूट करणं वगैरे वगैरे नेहमीचे उपचार झाले, पण त्या क्लिप्स आता पाहिल्या कि काय वाटतं हे मला सांगता येत नाहिए.
लई तहान लागल्यावर बदाबद थम्स-अप पिलंयत का कधी?
तसं पिल्यावर - डोक्याला - म्हणजे टाळुच्या लगेच वरच्या डोक्याला, म्हणजे टक्कल पडायला लोकांना जिथुन सुरुवात होते - डोक्याच्या त्या पार्टला जशा झिणझिण्या येतात, तशाच मी मुक्ताला हातात घेतल्याच्या आठवणी येताहेत.
मुक्ता येणार हे बरेच दिवस माहित होतं.
बऱ्याचदा
---------------------------------------------------
मुक्ताला पहिल्यांदा हातात घेतलं तो क्षण वगैरे अंधुक आठवतोय.
आय मीन दोन आठवड्यापुर्वीची तर गोष्ट. पण मागचे दोन आठवडे जग असलं ढवळुन निघतंय सगळं ब्लर होतंय.
---------------------------------------------------
भींचे हुए जबडे दर्द कर रहे है।
कितनी देर तक दबाया जा सकता है अंदर खौलतें हुए लावे को?
किसीभी पल खोपडी क्रेटरमें बदल जाए
उससे पेहले जानलेवा ऐठनको लोमडीकी पुंछसे बांधकर दाग देना होगा।
हमलेसे बढकर हिफाजतकी कोई रणनीती नहीं है।
बेकार है ये सवाल कि संगीन किस कारखानेमें ढली है।
फर्क पडता है सिर्फ इस बातसे कि कौनसा हाथ उथे थामें है और किसका सीना उसकी नोंक पर है।
फर्क तो पडता है केवल इस बातसे कि उस जादूनगरीपर किसका कब्जा है
जहां रात दिन पसीने कि बुंदोंसे मोतीयोंकी फसल उगाई जाती है।
मानवता के धर्मपिता न्याय और सत्य का मंत्रालय कंप्युटरको सोंप कर आश्वस्त है।
वहीं निर्णय देगा -
निहत्थी बस्तियोंपर गिराए गए टनों नापाम बम
या तानाशाहकी बुलेटप्रुफ कारपर फेंका गया एकलौता हथगोला -
इन्सानियतके खिलाफ कौनसा जुर्म संगीनतर है?
दरसल -
इन्साफ और सच्चाईमें इन्सानी दखलसे संगीन जुर्म कोई नहीं है।
ताकत -
ताकत बंदुककी फौलादी नलीसे निकलती है
या कविताकी कागजी कारतूससे?
जिसके कोषमें कहेनेका अर्थ है होना
और होनेकी शर्त लडना -
उसकेलिए शब्द किसीभी ब्रह्मसे बडा है
जो उसकेसाथ हर मोर्चेपर खडा है।
खतरनाक यात्राके अपने आकर्षण है
आकर्षक यात्रा के अपने खतरे।
इन्ही खतरोंकी सरगमसे दोस्त निर्मित करना है हमें दुधारी तलवार जैसा अपना संगीत।
भींचे हुए जबडें अब दर्द कर रहे है।
कबतक दबाओगे खौलते लावेको?
-----------------------------------
परावृत्त करण्याचा प्रयत्न करुन झालाय - आता शिस्तीत धमकी - पुढे वाचु नका. परिणामांना मी जबाबदार नाही.
--------------------------------------
मिरची!
मला हे लिहायला अजिबात वेळ नाहिए.
मला माझ्या XXXXXXXX कारण XXXXXXXXXX! ह्याच्या बद्दल मी XXXXXXXX यापैकी कुणालाही सांगितलं नाहिए - मुक्ताला सांगितलंय - पण ती वेगळीच स्टोरी आहे....
-------------------------------
बरं तर सांगायचा मुद्दा असा कि मे बी वर्षभरापुर्वी एका पुलाच्या कामासाठी एका साईटवर जायला लागायचं. त्यात सगळ्यात बोरिंग गोष्ट म्हणजे सकाळी सात वाजता तिथे पोचायला लागयचं. एके सकाळी साईटवर पोचायच्या आधीच्या शेवटच्या सिग्नलला लेफ्ट टर्नची वाट बघत उभा होतो. पाऊस पडत होता, आणि सकाळचे सात वाजलेले असुनही थोडं थोडं उकडत होतं. (त्याचं कारण गाडीतला हीटरही असेल कदाचित (!)) पण उकडत होतं. मी आपला खिडकीची काच खाली करुन, मोठमोठ्याने ’सारे जहांसे अच्छा...’ वगैरे गात झोप घालवण्याचा प्रयत्न करत होतो. लेफ्ट सिग्नल मिळत नव्हता म्हणुन बोर होऊन मी उजवीकडे पाह्यलं आणि माझी झोप उडाली. कारण उजवीकडच्या ड्राईव्ह थ्रु कॉफी शॉपच्या खिडकीत उभी राहुन एक पोरगी (बहुतेक) कॉफी चा कप कि ग्लास भरत होती. ती काय करत होती हे मला सपशेल आठवत नाहिए कारण तिने अत्यंत तोकडी टु पीस बिकिनी घातलेली. (इथे मी स्वत:ला ईमॅजिन करतो तेव्हा मी एक कार्टुन कॅरॅक्टर आहे असं मला दिसतं - ज्याचे डोळे स्प्रिंग लावल्यासारखे बाहेर लटकताहेत!).
माझं ’सारे जहां से ...’ वरच्यावर अडकलं! मागच्या गाडीचा हॉर्न ऐकुन मी भानावर आलो तेव्हा ती पोरगी माझ्याकडे बघुन खट्याळ हसत होती (अस ऍटलिस्ट मला वाटलं)!
अशा "dazed" कंडिशन मध्ये मी साईट्वर पोचलो तेव्हा टिम माझी वाटच बघत होता.
म्हणाला - काय झालं? ठीक आहेस ना?
मी म्हटलं - मी ठीक आहे रे, पण मे बी मी फारच झोपेत होतो, कारण मी जे काही पाहिलं ते रिअल लाईफ मध्ये दिसणं शक्यच नाही!
तो म्हणे - आयची जय, काय पाह्यलं?
मी म्हटलं - अरे, मी त्या सिग्नलला उभा होतो ना, तेव्हा मी - असं असं - पाहिलं.
तर तो म्हणे - असं असं म्हणजे काय? डिटेल मध्ये सांग ना!
म्हटलं - च्यायला पकवु नकोस - असं असं म्हणजे काय ते तुला पण माहितीए.
मग त्याने साईटवरच्या तमाम जनतेला बोलावुन ’अब्जित ने असं असं पाहिलं’ असं सांगितलं.
मग सगळेच हसायला लागले - म्हणाले, अरे इतके दिवस या साईटवर येत असुन तुला काहीच दिसलं नाही?
---------------------
आई शपत हे असं झालं कि चिडचिड होते.
रविवारी हजार कामातुनही लईच किडा डोक्यात गेला तेव्हा लिहायला लागलो. झोप आली तेव्हा १-२ paragraphs च झाले होते. आता काहीतरी लिहु म्हणुन इकडे आलो तर आठवत नाहिए काय लिहायचं होतं ते. नाही म्हणायला माझ्या नावाचं ’अब्जित’ पासुन ’अबेजे..?त? - am I right?’ पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे भजं होतं. माझं नाव उच्चारताना लोकांच्या चेहऱ्यावरच्या गटांगळ्या पाहुनपण मजा येते.
---------------------
तुम्ही इथपर्यंत वाचत आला असाल तर थोर आहात.
टिंब.
टिंब.
टिंब.
---------------------
आता अजुन वाचत असालच तर मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचं देणं लागतो (असं मला उगीचच वाटतंय).
कवितांची पुस्तकं विकत घेऊन वाचणं वगैरे प्रकार मी भारतात असताना कधी केला नव्हता (अमेरिकेत राहुनही केला नाहिए, पण असं अधुनमधुन ’मी परदेशात रहातो’ चे पुरावे टाकले कि (मग तरी) लोक मला सिरियसली घेतील असा माझा गोड गैरसमज). एकतर बिबवेवाडी बसस्टॉप मागच्या रद्दीच्या दुकानात मिळतील तेवढ्या कविता (किलोने) विकत घ्यायचो. मग त्यातल्या प्रेमभंगाच्या वगैरे कविता फाईल करुन ठेवायचो. कधी केलं नसेल तर करुन बघा - आठवणी उगाळायला यांचा लई उपयोग होतो.
आयची जय - परत एकदा १२.०१ - लगेच संपवायचं असल्याने पाल्हाळ बंद.
प्रश्न बिश्न पडण्याएवढा पेशन्स असेल तर विचारा. नाही विचारलेत तर माझी उत्तरां बित्तरांची मगझमारी वाचेल.
----------------------------------
इतकावेळ लिहिलंय ते म्हणजे absolute चुत्याप्स होतं, पण सलील वाघ ची ही कविता मी इथे ’उगीच’ टाकत नाहिए.
मी बरेच दिवस सलीलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण नंतर म्हटलं ’एवढा’ संपर्क रोज होत असताना - कशाला उगीच conventional संपर्कांच्या फंदात पडा! मला कुणी शोधत आलं तर मी किती embarrass होईल!
तर -
सव्वीस -
बारकावे समजतील असं धोरण ठेवलं
टिकाणी पोचेपर्यंत प्रतिकीकरण करत आणलं
षड्रिपुंचं अरण्यरुदन शब्दांच्या व्यासपीठावर
ठेवून
मनमुराद पडताळा घेत मी जमिनीत शिरलो
पुढं गेल्यावर एक अंधार भेटला तो खडक होता
साशंक भाषा शिलगावून
भुरूभुरू पुढे गेलो
रस्ते दिसले न दिसले तरी
ओळख झाली न झाली तरी
माती भिजली न भिजली तरी
स्वत:चा जीव
खुडुन तळहातावर ठेवला
दिवसेंदिवस टाळली
ती कविता आता ही
लिहिली
न लिहिली तरी
--------------------
आणि ही लिहिण्यापासुन मला स्वत:ला परावृत्त करता येत नाहिए -
अठ्ठावीस -
काव्याची एवढी ह्या
उलटी पाचर बसेल
असं वाटलं नव्हतं
आता नंतर लफडं नको
हे मी
आत्ताच सांगून ठेवतो आधी
माझे चुकीचे अर्थ निघतील
माजं मौलिक ढापलं जाईल जगात
मी नको तसा रुपांतरीत होईन
माझ्या नंतर माझ्या मागे
कवितेबाहेरच मी केवढातरी सापडतो
प्रयत्नांतीही कवितेत सगळा
संपूर्ण शिरु शकत नाही
पुरुनही उरतो
अपरिमेय
कवितेच्या आणि माझ्या
व्यतिरिक्तातच
मी माझ्या वर्माची साधना करु शकतो
माझा सडा पडलाय माझ्या आजुबाजूला
मी चालत येतो माझ्याकडे चहुबाजूंनी
माझ्या समुद्रावरुन
मी येतोय का जातोय
ते मला सांगता येणार नाही
ने आण होते माझ्यात कसलीतरी
ये जा चालू असते कसली ना कसली रहदारी
गोड लाडावलेलं आकाश
पावसोत्तर प्रकाशाला
दैदिप्य पुरवतं
दिवसरात्री उचंबळतात भरुन येतात
सूर्यास्तानंतर दोन अडीच
चकचकीत ढग आग्नेयेला
तब्बल कबूल झाले कह्यात
वस्तुत्वकेंद्राचे तरंग माझ्यात
- एकसंपाती
लागोपाठ उद्भवत
फेर धरणाऱ्या
अवधींचा वेढा
जोरदार मी परतवतो
एकामागोमाग एक
थांबायची बात नस्से
- सलील वाघ.
Congrats!
ReplyDeleteBTW- Alternate post title:"कात्रणं"
हे काही फार ग्रेट नाहीय. पण आकार नसलेल्या पाण्याच्या जबराट लोंढा पाहून छाती दडपते आणि त्यातली ताकद जाणवते, तसं काहीतरी होतंय. आलात, हुश्श वाटलं.
ReplyDelete"मुक्ता" बद्दल अभिनंदन. एकदम अनिल अवचट झाल्यासारखं वाटतं आहे का? :D
ReplyDeleteपण मध्येच हिंदीचं प्रयोजन कळलं नाही!
अगदीच वाचवेनासं झालं तेव्हा समजाऊन घेण्याचा नाद सोडून दिला.
तुझी पोस्टस वाचतांना वेगवान बाईक वर बसून सुसाट कुठेतरी माहिती नसलेल्या ठिकाणी निघाल्यासारखं का बरं वाटत असावं?
आनंद - टायटल चांगलं आहे, पण या पोस्टच्या बाबतीत मला टायटलमध्ये काही स्कोप नव्हता. मी आणखी कुठेतरी लिहितो. तिथे एका exercise मध्ये माझ्या आधीच्या व्यक्तिचं post - my nosense - 1 होतं - त्यामुळे मला भाग-२ करणं क्रमप्राप्त होतं.
ReplyDeleteमेघना - ताकद बिकद जाणवल्याबद्दल धन्यवाद.
अश्विनी - ये हुई ना बात! Analytical कमेंट्सपेक्षा अश्या ’वेगळा angle' देणाऱ्या कमेंट्स मला फार आवडतात. आता हेच बघ ना - मुक्ता नाव आवडलं होतं - पण का ते मलाही क्ळलं नव्हतं. त्याचा अवचटांशी बादरायण का होईना पण गारगार संदर्भ लावल्यामुळं भारी वाटलं.
पण अजुन अवचट झाल्यासारखं वाटत नाही, कारण मुक्ताचं नाव आम्ही तन्वी ठेवलं. (आम्ही असं फक्त म्हणायला - ते खरं तर बायकोने ठेवलं). मी अजुनही मुक्ताला मुक्ताच म्हणतोय (आणि तिला ते आवडतंय)! पुढे गोगोल गांगुली सारखं ती कुठलं उचलतिए ते बघु.
हिंदीचं प्रयोजन - काहीही नाही. निहलानीचा ’पार्टी’ पाहिला. त्याची सुरुवात या कवितेने झाली. कविता आवडली म्हणुन लिहुन ठेवली. धुमसत्या लाव्ह्या बद्दल लिहायचं होतं ते राहुन गेलं. महापुरात झाडं गेली - उरलेली लव्हाळी इथे टाकली.
बाईकवर बसुन सुसाट जाणे - आता मी तुझ्या प्रत्येक वाक्याचं विश्लेषण करतोय असं समजु नकोस, पण त्याचं आहे असं कि मी जबरा introvert आणि गप्पाळु असा एकदम आहे. Introvert म्हणजे आपण शिष्ठ म्हणुयात. जनतेला चार हात दूर ठेवायला याचा लई उपयोग होतो. पण गप्पा मारायला नेहमीच कुणी सापडतं असंही नाही. त्या गप्पा (बऱ्याचदा स्वत:शीच) मस्त जमल्या की पोस्टला फ्लो वगैरे लई भारी येतो. या पोस्टला तो नाहिए.
बाकी भरकटणे - बाईकवर बसुन किंवा त्याशिवाय - सुसाट बिसाट वगैरे ठीक आहे, पण वैशम्य म्हणजे मी किंवा मी जे लिहितो - ते कुठेच जात नाही. ते आत्ममग्न रहातं, आणि कुठेच पोचत नाही. दिशा द्यायचा प्रयत्न चालु आहे, पण ती शोधताना वेगाचा विसर पडायला नको ही जाणीवही. बाकी पुढचं पुढे. लिहायला उद्युक्त करायला लावणारी कमेंट लिहिल्याबद्दल - थँक्स!
Congracts!!!!!!
ReplyDeleteAbhinandan!!
ReplyDeletebaap jhaalaas tu aata, now atleast behave urself :-)
नेमाडे, अभिनंदन! मनःपुर्वक अभिनंदन
ReplyDeleteAbhijit,
ReplyDeleteheartiest congratulations :)
पोस्ट लिही अभिजित.
ReplyDeleteखूप दिवस झाले(नेहमीप्रमाणेच अर्थात).
शोध शोध शोध...
ReplyDelete...अभिजीत बाठे आणि सलिल वाघ या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत!
..बरयाच जणांच्या मनात असलेल्या शंकासुराचं मी अखेर निराकरण करतो.
..आजच्या मटात सलिल वाघांनी डरकाळी फोडली आहे, त्यावरुन पुराव्याआधारीत मी अभिजीत ला या आरोपातुन मुक्त करत आहे.
:) :):)
सदगृहस्था, बॅगा पॅक झाल्या असतील तर आता लिही
Dear Abhijit Bathe
ReplyDeletemy email ids are
saleelwagh@gmail.com
waghsalel@gmail.com
saleelwagh@rediffmail.com
this is first reading i shall read it afterward but the whole experiance is memorable
ReplyDelete