घर मोकळं.
मोकळं म्हणजे - कंप्लिट मोकळं!
काल दुपारी सामान हलवलं तेव्हा लक्षात नाही आलं, पण संध्याकाळी घरी आल्यावर 'उजेड' पडला कि घरात अंधार आहे.
स्वैपाकघरात आणि रेस्टरूममध्ये दिवे होते, पण इतर घराचं काय?
या दोन-तीन मोकळ्या दिवसांसाठी स्टीफन किंग चं 'थ्री सीझन्स' वाचायला ठेवलेलं, पण उजेडाअभावी ते शक्य नव्हतं. (शिवाय ते वाचत रेस्टरुम मध्ये तरी किती वेळ बसणार म्हणा....)
डायनिंग रूमचा बल्ब गेल्याला बरेच दिवस झालेले, पण तो बदलायला पुरेशी स्फुर्ती नव्हती.
आता बदलुया म्हटलं तर घरात एक खुर्चीही नाही.
पण आता स्फुर्ती तर भरपूर....
मग म्हटलं काहीही करुन हा बल्ब लावायचाच.
रिकामे कार्डबोर्ड बॉक्स एकमेकांवर रचून वानरपराक्रम करत त्या डुगडुगणाऱ्या बॉक्सेस वर चढलो आणि एकदाचा बल्ब लावला.
स्विच ऑन केल्यावर पुन्हा एकदा 'प्रकाश' पडला कि बल्ब पुर्वीच गेलेला.
च्यामारी.....
मग लाथा मारुन बॉक्सेस इकडे तिकडे फेकले.
मग ते पुन्हा एकत्र करून त्यांचं पिरॅमिड करुन बघत बसलो.
खामोशी का हासील भी इक लंबी सी खामोशी है....!
च्यायला - कशाला या फंदात पडा, वेड लागेल!
मग म्हटलं परवा सुरु केलेलं एक 'पिल्लू' कंप्लिट करु......
-----
गब्बर विस्कॉन्सिन चा.
त्याला या एरियामध्ये (मी आणि दाई सोडुन) एकही मित्र नाही - इनफ़ॅक्ट आम्हीही त्याला शक्य तितकं टाळतोच.
परवा त्याच्याशी गप्पा मारत होतो त्यावेळेस असाच विषय निघाला - मी त्याला म्हटलं कि माझा अगदी जवळचा मित्र डी.सी. मध्ये रहातो, पण त्याला भेटायला झालं नाही दोन वर्षात. तो म्हणाला कि - देन यु शुड मीट हिम बिफोर यु लीव्ह.
मग मनावर घेतलं कि काहीही करुन या वीकेंडला धन्याला भेटायचंच.
शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधुन निघताना त्याला मेसेज ठेवला कि अजुन डी.सी. मध्ये असशील तर भेटायचं का?
शनिवारी सकाळी त्याचा मेसेज कि भेटुयात.
शनिवारी संध्याकाळी भेटायचं ठरलं.
शुक्रवारची संध्याकाळ आणि आख्खा शनिवार पॅकिंग करत बसलो, पण मूव्हर्सनी टांग मारली. बहुतेक मंगळवारी किंवा बुधवारी सामान पाठवुन देईन. बरं झालं टी.व्ही. पॅक नव्हता केला, नाहीतर उगीच जनतेला फोन करून पीळ मारत बसलो असतो.
दोन वर्षांपुर्वी बाल्टिमोर ला आलो तेव्हा धन्या डी.सी. मध्ये आहे याचं लही भारी वाटलं होतं! मधे चार वर्षांच्या गॅप नंतर आम्हाला परत रेग्युलरली भेटता येणार होतं.
आल्याआल्या तिसऱ्याच आठवड्यात भेटलोही!
त्या दिवशी ऑफीस मधुन मला माझा भलाथोरला करकरीत फोर्ड एफ-१५० ट्रक मिळालेला.
इथे ट्रक म्हणजे मोठ्या जीप सारखा प्रकार असतो. भारतात माझ्या साईट वर डंपर वरती ड्रायव्हिंग शिकलेलो, पण ट्रक कधी चालवला नव्हता. रँडी म्हणाला या वीकेंड ला कुठेतरी फिरुन ये, म्हणजे प्रॅक्टिस होईल. म्हटलं चला, धन्याला इंप्रेस करू. मग आम्ही रीतसर 'गटारीचा' प्लॅन केला. त्याच्याकडे पोचलो तर तो खाली येऊन उभाच होता. पार्किंग कुठे करू म्हटलं तर तो म्हणे लाव रे कुठेही! पार्किंग लॉटच्या गर्दीत मुश्किलीने तो ट्रक बसवून आम्ही वर गेलो. मग हाइनिकेन बरोबर आमटी भात वगैरे खात त्याच्या गॅलरीत गप्पा रंगत गेल्या.
गप्पा आणि हाइनिकेन.
आणि करोना.
मग बडवायजर.....
त्याच्या घराशेजारी बहुतेक जंगल वगैरे असावं, कारण डोळे फाडुनही बाहेरचं काही दिसत नव्हतं. (ते कदाचित रात्र होती म्हणुनही असेल. किंवा दारु!). शेजारच्या बिल्डिंगमधल्या पोरांची गाणी त्या जंगलात घुमुन आम्हाला ऐकु येत होती. त्यांना टसल म्हणुन आम्हीही जोरजोरात गाणी म्हणायला लागलो.
मधे कधीतरी धन्याचा चिंकु रूममेट आला. त्याचं इंग्लिश कळण्यासारखं होतं, म्हणुन त्याचं कौतुक वाटलं. त्याला संदिपचं 'एवढंच ना....' भयंकर आवडलं - अगदी वन्स मोर मिळण्याएवढं!
हळुहळु शेजारच्या बिल्डिंग मधली पोरं दमली, तशाच आमच्या गप्पाही पेंगायला लागल्या.....
मागच्या चार वर्षांचा बॅकलॉग भरल्यावर आम्ही जुन्या जखमांच्या 'आय डोंट नो यु डोंट नो' गप्पांवर जायला लागलेलो.....
तेवढ्यात माझी अंगठी खाली पडली!
भें.....डी.
तीन मजले!
ते पण खालच्या झुडुपांत!!
धन्याला म्हटलं - 'चल खाली. शोधू.'
तो म्हणे - 'येडा ए का? इथुन बेडरुम पर्यंत जाता येईल का नाही माहीत नाही. खाली जरी पोचलो तरी वर कसे येणार?'
खाली अंधार.
त्याच्याकडे टॉर्च नाही.
एकतर बिड्या पण आम्ही काड्या पुरवुन पुरवुन ओढत होतो.
पण प्रॉब्लेम जसजसे वाढले तसतसं आम्हाला ती अंगठी शोधणं लही भारी वाटायला लागलं!
गेलो खाली.
वर नक्की त्याची गॅलरी कुठली, तिथुन मला किती झुडपं, किती मोठी, कुठे दिसली वगैरे 'ग्लोबल पोजीशनिंग' झाल्यावर शेवटच्या बिडीसाठी एक काडी 'रीजर्व्ह' करुन अंगठी शोधायला लागलो. चार वेळा 'मटके' मारल्यावर पाचव्या काडीवर अंगठी सापडली!
मग वर जाण्याआधी खालीच पार्कींग लॉटमध्ये शेवटचा झुरका मारायचं ठरलं.
धन्या बिडी पेटवेपर्यंत मी बळंच इकडेतिकडे बघायला लागलो.
'भेंडी - धन्या, ट्रक कुठंय?'
'असेल रे.'
'यडा हे का? अरे इथंच तर लावला होता!'
कितीही चढली तरी ट्रकची कार होत नाही हे (अनुभवावरुन) माहिती होतं.
रॅंडी, दशरथ, तीन आठवड्यापुर्वी सुरू केलेला जॉब, परवाच टाकलेलं एच-वन चं ऍप्लिकेशन पाव सेकंदात तरळून गेलं!
खचलोच!!
धन्या ढिम्म.
'धन्या - फोन आणलायस का? ९११ कॉल करू.'
धन्या आपला झुरके मारत - 'सापडेल. टेंशन नको घेउ.'
'अरे टेंशन नको घेउ म्हणजे काय? च्यायला कुणी ढापला असला तर?'
'टो झाला असेल. इथे करतात नेहमी.'
'नेहमी म्हणजे काय? घरी बोअर झालं कि लोकांचे ट्रक टो करतात काय इथे?'
'अरे इथे फक्त रेसीडंट्स पार्किंग आहे. कुणाला पार्किंग मिळालं नसेल, त्यानं फोन केला टोइंग सर्व्हिस ला. उद्या मिळेल. जाउ आपण आणायला.'
'अरे पण तुच म्हणालास ना - कुठेही लाव!'
'मला काय माहित टो करतील!'
'......!'
धन्या फुल कॉन्फ़िडन्सने असली वाक्य टाकतो तेव्हा समोरचा कुठलाही माणुस माझ्यापेक्षाही मोठा 'आ' वासतो हे मी लहानपणापासुन बघत आलेलो.
मग आम्ही पार्किंग लॉट मधल्या एका फलकावरुन टोइंग कंपनीचा फोन नंबर घेऊन त्यांना फोन केला. ट्रक त्यांनीच नेलेला.
दुसऱ्या दिवशी मग यथावकाश तो परत आणणे वगैरे.....
पण त्यानंतर दोन वर्ष धन्याला भेटायला झालं नव्हतं!
गब्बरला एअरपोर्टवर ड्रॉप करुन फोनवर धन्याला 'पार्क ऍंड राइड' मध्ये गाडी पार्क करायला सांगितली.
गळाभर भेटलो तर 'य़ु. एस. ला गेल्यावर लोकांनी म्हटलं पाहिजे - भारतातुन कुणी सांड आलाय' म्हणणाऱ्या धन्याची तब्येत दोन वर्षांत खराब झाल्यासारखी वाटली.
डायेटिंग करतोय म्हणाला.
तो हल्ली बिडीवरुन 'सिगार' वर घसरलाय (कि चढलाय)!
मग 'आय नो यु डोंट नो, यु नो आय डोंट नो' गोष्टी करत आम्ही माझ्या ऑफिस मध्ये गाडी पार्क करुन 'अकबर' ला गेलो. 'ताजमहल' बरोबर चिकन विंदालू आणि मटण बिर्यानीवर तुटुन पडलो.
जेऊन दमल्यावर 'लोवेनब्राऊ' चा सिक्स पॅक घेऊन इनर हार्बर ला फिरायला गेलो.
तिथे जातानाही धन्या जुन्याच कॉन्फिडन्स ने - लाव रे कुठेही, कोण बघतंय म्हणत होता, पण मी 'ब्लॉक' च्या मागे रीतसर पार्किंग मध्ये गाडी लावली.
इनर हार्बर मला भयानक आवडतं. ईएसपीएन झोन, हार्ड रॉक कॅफे, शेजारचं बॅंबू हाऊस, ऍक्वेरियम, मग कॅलिफोर्निया पिझ्झा किचन ने सुरू झालेली रांग आयमॅक्स पर्यंत चालू रहाते. माधुरी आणि मी वेळ मिळेल तेव्हा इथे यायचो. आणि तिथे पार्क केलेल्या हरतर्हेच्या 'याच' मधुन फिरायची स्वप्नं बघायचो. इथे रात्री उशिरापर्यंत 'लाईव्ह म्युजिक' चालू असतं.
परत आलो तर 'ईल्लिगल पार्किंग' साठी तिकिट मिळालेलं!
धन्या बरोबर असला कि काहीही शक्य असतं.
हा एक मित्र असा आहे कि त्याला इतर मित्रांएवढं कधी भेटलो नाही, पण त्याची प्रत्येक भेट लक्षात राहिली.
त्याचा तो 'एनिथिंग इज पॉसिबल' कॉन्फ़िडन्स.
नियतीने कितीही मारली तरी तिच्याच छाताडावर बसुन वर दोन रट्टे लावण्याची जिद्द....
खिशात पैसे नसताना, कुणाचाही वरदहस्त डोक्यावर नसताना त्याने सहा वर्षांपुर्वी 'अलका' जवळच्या दुचाकी पुलावर पान खात त्याचा भविष्याचा प्लॅन सागितला, तेव्हा धन्यावर भयंकर विश्वास असुनही - मला काळजी वाटली होती!
कशात काही नसताना, खिशात धमक नसताना - 'धन्या सांगतोय ना शक्य आहे, मग शक्य आहे' च्या विश्वासावर मी ही अमेरिका गाठलेली. तो २ ऑगस्ट ला निघालेला, म्हणुन पुढच्या २ ऑगस्ट ला.....
हल्ली धन्या 'व्हर्चुअल रिऍलिटी' मध्ये लही भारी काम करतो.
मला त्यातलं काही कळत नाही, पण २००२ चा 'बेस्ट रिसर्च पेपर इन यू.एस.', टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, सकाळ - यातल्या त्याच्या मुलाखती त्याचं काम सिद्ध करतात.
त्याच्या कडे पाहिलं कि त्याचा 'लॉ ऑफ ऍव्हरेजेस' सिद्धांत पटतो.
त्याचा सिद्धांत आणि तो.
आयुष्यातल्या प्रत्येक 'व्हर्चुअल' सिद्धांताला केवळ जिद्दीच्या जोरावर 'रिऍलिटी'त आणु शकणारा हा माणुस माझा मित्र आहे - हे जाणवुन माझं मलाच बरं वाटतं.
त्याच्याशी अशा अनेक भेटी वारंवार व्हाव्यात - दर वेळी पार्किंग साठी दंड झाला तरीही....
मामा, आय वॉज वण्डरिंग, व्हॉट विल बी मिस्टर धनंजय'ज कॉमेण्ट आफ़्टर रिडिंग धिस पोस्ट, वुईच यू हॅव रिटन ऑन हिम!
ReplyDeleteतुझ्या सभोवतलच्या जनतेत, खासकरून मित्रांत तू तुझे 'हीरो' शोधत आलायेस कायम. तुझ्या तशा करण्याचं कधी खूप प्रेशर येवू शकतं त्या त्या तुझ्या मित्रावर. देव ना करो, पण कधी मिस्टर धनंजय ला तू कधी उदास, 'डाऊन' पाहिलंस, तर समजून घे की तो ही आपल्यासारखाच एक साधा माणूस आहे! त्यालाही वेळ आली की उदास आणि हताश होण्याचा तितकाच हक्क आहे! वैतागून 'च्यायची जै' म्हणत, तो तुझ्या मनातल्या 'हीरो' च्या भूमिकेत फ़िट्ट बसेनासा झाला म्हणून त्याला मग तेव्हा अंतर नको देवूस..!
बाकी, ऍज युझुअल, झकास पोस्ट! चीअर्स! :-)
Good point Abhya!
ReplyDeleteBut about him, he is my hero for a long time - so the chance of that happening is less.
Also, I do understand that no one can be a hero in all the roles all the time.
A person can be down and out, but its the backbone that matters, there is no chance of my 'gods' going down....
मामा, तूझं लेखन दिवसेंदिवस एकदम तुझ्याच अशा "ओरिजिनल" स्टाईलमध्ये डेवलप होतंय! उद्या तू कूठल्या दूसर्याच ब्लॉगवर तूझी पोस्ट टाकलीस ना तरी मी "हे मामाने लिहिलंय!" ओळखू शकेन अशी खात्री वाटते आजकाल.
ReplyDeleteधन्याला एकदा भेटावं म्हणतो! कधी येतोयेस त्याला घेऊन यु. के. ला? एवढं 'रीअल' कराच तुम्ही दोघे मिळून! :-)
पण हो, अगदी गडबड करू नका... काय आहे की मी चाललोय भारतात ह्या शनिवारी! म्हणजे परवाच! म्हटलं दिवाळी-दसरा घरच्यांच्या सोबत साजरा करावा.
आणि हो, 'चष्मेबद्दूर' नाव सुरेख आहे पण मला तुझ्या गावातल्या घरी यायचा योग नाही आला अजून.