लहानपणी शाळेतल्या बाई ज्याला ’हुशार आहे, पण मनावर ताबा नाही’ म्हणायच्या त्याला आता ’हॉरिझॉंटल थिंकिंग’ म्हणतात.
हे असं आठवायचं कारण कि मन उड्यांवर उड्या मारत रहातं.
१९३१ ची कुठली गोष्ट वाचत असलो कि च्यायला त्या वेळेस डिप्रेशन कसं असेल, प्रोहिबिशन मध्ये लोक कसे जगत असतील, त्याचा भारतावर परिणाम काय झाला, तेव्हा आपण क्रिकेट खेळायचो का - असं बरंच काही.
कॉपर म्हणजे तांबं का?
तर एकेकाळी कॉपरची नाणी बनवत - कारण ते स्वस्त होतं.
आज दहा पैशाच्या नाण्याची किंमत ते वितळुन विकलं तर त्याला २० पैसे मिळतात, तर कुणी ते का करु नये?
मला आज काम करावंसं वाटत नाहिये, त्यामुळे माझं हॉरिझॉंटल थिंकिंग चाललंय.
रसिका कि स्वप्ना आंबोळे हे नाव काल कुठे ऐकलं?
इथे हॉरिझॉंटल थिंकिंग शक्य नाही.
कि स्वाती?
हां बरोबर.
ती कविता बिविता करते.
चला कविता लिहु.
तुम्हारी लौ को पकडके जीनेकी आरजुमें जब अपनेही आपसे लिपटकर सुलग रहा था
बता दो उस वक्त मैं कहां थां?
बता दो उस वक्त तु कहां थीं?
तुम्हारे जिस्मके साहिलसे दूर दूर कहीं
वो ढुंढती थी कि मिलेगा वो खुशबुओं का नूर कहीं
बडे हसीन थे जो राहमें गुनाह मिलें
तुम्ही से जनमुं तो शायद मुझे पनाह मिलें
लबोंसे चूम लो ऑंखोंसे थाम लो मुझको
तुम्ही से जनमुं तो शायद मुझे पनाह मिलें
आज मायकल म्हणाला कि एकदा त्याच्या बायको सोबत रस्त्याने जाताना त्याला त्याची जुनी छावी भेटली. त्याने त्याच्या छावीची ओळख बायकोला करुन दिली. आणि मग बायकोची ओळख करुन देताना त्याला त्याच्या बायकोचं नावच आठवेना!
यातला ऑबव्हियस विनोदाचा भाग सोडला तर - यावर त्याच्या छावीला काय वाटलं असेल असा प्रश्न अर्थात मला पडला.
हॉरिझॉंटल थिंकिंग कधी नीट हसु देत नाही.
आणि नको तिथं हसु आणतं.
म्हणजे आगरकर आवडायचा पण त्याने अॅडलेडच्या आधी आणि नंतर कधीच एका मॅचमध्ये तीन पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या नाहीत. हे वाचुन मला त्याची लॉर्ड्स ची सेंच्युरी आठवली. अॅक्च्युअली हा पी.जे. मला नीट सांगता आला नाही. अॅन्डी झॅल्ट्समन तो लई भारी सांगतो.
तर असं.
राज ठाकरे म्हणाले कि उड्डाणपुलाच्या बांधकामा आधी सगळ्या लोकांची मतं विचारात घ्या.
हे योग्य आहे.
आज कुणास ठाऊक का वीणा मलिक या व्यक्तीचा एका पाकिस्तानी चॅनलवरचा इंटरव्ह्यु पाहिला.
ऐकला नाही, कारण कॅप्शन्स होती.
त्यात ती रडत रडत बिग बॉस बद्दल बोलत होती.
हा काय प्रकार आहे ते एकदा पाहिलं पाहिजे.
ग्लास अर्धा सरला आहे म्हणायचं कि अर्धा भरला आहे म्हणायचं?
ग्लास व्हिस्कीचा असेल तर - आधी ग्लास संपवुन टाकायचा.
मग ग्लास आख्खा सरला आहे म्हणायचं.
एकदा एका कंपनीत कुठल्यातरी पोझिशनसाठी इंटरव्ह्यु चालु होते.
हा जोक सांगायचा होता, पण बरंच लिहायला लागेल असं वाटुन कंटाळा आला.
मध्यंतरी कुठलं तरी गाणं रोज ऐकत होतो.
आता ते आठवत नाही.
आठवायचा प्रयत्न केला कि डोक्यातली चाकं - लिव्हर पुलीज - सगळं यंत्र हळु हळु जागं होत असल्याचं दिसतं.
तर आठवुन बघु.
नेटवर न बघता.
गाणं गुलझार चं होत.
नासीर होता.
ती डर्टी पिक्चरची हिरोईन होती गाण्याच्या कव्हर वर
कोई तो रोके कोई तो टोके
इस उम्रमें अब खाओगे धोके
डर लगता है इश्क करनेमें जी
दिल तो बच्चा है जी
तर असं.
च्यायला आणखी लिहावं का?
कुणी बघत नाहिए - लिहुन टाक.
माझ्या ऑफिसमध्ये माझं स्वतंत्र ऑफिस आहे.
तिथे मी यायच्या आधीपासुन एका मोठ्या कुंडीत एक पाच सहा फूट उंच झाड रहातं.
आल्या आल्या मी त्याला आपलं काही जमणार नाही असं सांगुन टाकलं.
शमसा आपापल्या झाडांना पाणी घाला असा मेसेज पाठवते.
मग मी त्याला माझ्या ग्लासात उरलं वगैरे असेल तर पाणी घालतो.
एक दोनदा किचनमध्ये जाउन ग्लासभर पाणी आणल्याचं आठवतंय.
त्याला बहुतेक पानं येत रहातात लांब लांब.
मग त्यातली काही वाळतात.
म्हणजे पानाचा एखादाच मधला अधला भाग वाळतो.
मग मी तो कात्रीने कापुन टाकतो.
म्हणजे माझं त्याच्याशी वैर वगैरे नाही.
बऱ्याचदा ते तिथे आहे हे मला जाणवतही नाही.
जोपर्यंत ते स्वत:चं बघतं तोपर्यंत मला हरकत नाही.
त्याला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहित नाही.
त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल का हा प्रश्न मला आधीचं वाक्य लिही पर्यंत पडला नव्हता.
यालाच बहुतेक हॉरिझॉंटल थिंकिंग म्हणतात.
आणि हॉरिझॉंटल रायटिंग.
या झाडासारखा माझा एक रुममेट होता कॉलेजात असताना.
त्याला माझ्यासोबत रहायचं होतं.
मला कुणासोबत तरी रहाणं आवश्यक होतं, पण मला त्याच्या सोबत रहायचं नव्हतं.
मग त्याने मन्याकडे वशिला लावला.
मन्याने मला टिपिकल वाण्याच्या भाषेत समजावुन सांगितलं.
पुढचे सहा महिने आम्ही एकत्र राहिलो.
कि तीन?
असंच काहितरी.
त्या काळात मी त्याचं त्या रुम मधलं अस्तित्व मान्य केलं नाही.
त्याच्याशी काही जुजबी बोलल्याचंही आठवत नाही.
मग त्या तीन कि सहा महिन्यांनंतर मी त्याला सरावलो कदाचित.
मग मी रोज घरी यायचो, बॅग फेकायचो, बोल बोल बोलायचो.
तो ऐकुन घ्यायचा.
तु बोलत का नाहीस विचारलं तर तु बोल तुझं ऐकायला बरं वाटतं म्हणायचा.
बाकिच्यांशी बोलायचा.
माझ्याशीही.
क्वचित.
मग मी छावीला पत्र लिहायचो.
मग त्याला ते वाचुन दाखवायचो.
तो - मामा तु भारी लिहितो - म्हणायचा.
त्याच्या माझ्यात मैत्री होण्यासारखं काहीच नव्हतं असं मला वाटायचं.
तसं मी त्याला म्हणायचो.
त्याला हरकत नव्हती.
पॅऱ्या मग माझा खूप जवळचा मित्र झाला.
मलाही हरकत नव्हती.
तर झाड.
पानं कापुन बरेच दिवस झालेत.
पाणी घालुनही.
झाड आहे, पॅऱ्या आहे, मी आहे.
अजुन लिहायला काही नाही.
आता एवढं लिहिल्यावर झाडाच्या अपेक्षा वाढणार का?
च्यायल नसतं झेंगट.
काल चारच तास झोपलो.
आज कॉफिच्या दुकानात काहितरी घेणं आवश्यक असल्याने डबल शॉट एस्प्रेसो असा प्रकार मागितला. त्याने मुक्ताच्या बाहुल्यांच्या ग्लासाच्या आकाराच्या पेल्यात मला तो दिला.
तो कसा प्यायचा माहित नसल्याने मी तो ऑफिसात घेऊन आलो.
झोप येतिये असं वाटलं कि मी तो ओठावर टेकवल्यासारखं करतो.
मग भारतातली बिडी ओढल्यावर ओठांवर निकोटिनची जशी चव येते तशी कॉफिनची चव येते.
झोप जाते.
रे बाबा रे बाबा रे....
अभिजीत, मला तुमचे लेखन आवडते. मी नियमित पणे तुमच्या ब्लॉग ला भेट देत असतो.
ReplyDeleteआभार,
(आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी
धन्यवाद केपलरिअन!
ReplyDeleteसाउथ आफ्रिका I presume!
तिथला केपलर वेसल्स माहितिए फक्त - पण केपलर नावाचं गाव असल्याचं माहित नव्हतं.
अर्थात असं गाव कुठल्यातरी देशात असेल कदाचित, मी आपला साऊथ आफ्रिका assume करुन विचार करतो.
एनीवे - एकदा आफ्रिके बद्दल लिहायचंय. Snows of Kilimanjaro वाचलंयस?
Abhijit..
ReplyDeleteMast lihilays re....
Lai bhaari..
Majaa aali vachtana...
:)
तुमचा केपलर विषयी चा आडाखा ६०० वर्ष इतक्या अंतरांने चुकला. केपलर विषयीची माहिती इथे वाचा. (http://www.kepler.nasa.gov/)
ReplyDeleteपण हरकत नाही. त्यानिमित्ताने संवाद तर सुरु झाला.
अफ्रिकेत जाण्याचा अजुन योग नाही आला पण जर कदाचित गेलो तर हिर्याच्या आणि सोन्याच्या खाणी कशा असतात हे बघायला आवडेल.
पण त्या खाणी सुध्दा सिडने शेल्डन च्या "मास्टर ऑफ गेम" मधे वर्णन केल्याप्रमाणे असल्या तर मजा येईल. दुसरी अफिकेतील नाबाद गोष्ट म्हण़़जे तिकडचे वन्य जीव. अफ्रिकन सफारी नेहमीच प्रायोरीटी राहिन.असो.
तुमच्या पुढच्या लेखाची आम्हाला फार वाट पाहायला लावु नका.
(आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी
http://www.kepler.nasa.gov/
अभिजित,
ReplyDeleteमाणसाचे राग-लोभ-प्रेम-द्वेष- वयपरत्वे किंवा बरीच वर्षं उलटल्यावर तेव्हढेच आणि तसेच राहतात का? का कालांतराने त्याचे रंग उडतात, त्यांची तीव्रता कमी होते? तसं असेल तर ते पक्के असताना आपल्याला नेमकं काय वाटायचं हे आपण आता इतक्या छातीठोकपणे कसं सांगू शकतो? रुटीनची, दिवसेंदिवस तेचतेचते करकरुन बुद्धीला ग्लानी येते असं म्हणतात, त्यात नॉस्टॅल्जिया कसा काय परवडू शकतो? ’To hold on to' असा फ़क्त नॉस्टॅल्जियाच असेल तर मात्र असं होऊ शकतं-हं, खरंय.
तुला एकसंध विचार का येऊ नयेत याचा विचार करत होते. नंतर मात्र तू विचारांना हेतु:पुरस्पर विस्कळीत करतोस असा पक्का समज झाला. खरं खोटं माहीत नाही, तू सांगणं अपेक्षित नाही.
तुला एखाद्या गोष्टीबद्दल फ़िकीर नाही असं तुला वाटणं पण ते लिहून सांगण्याइतपत त्याला महत्व द्यावंसं वाटणं ह्याला लिहीण्यासाठीच्या विषयांची वानवा म्हणायची की denial/inconsideration च्या पाठी लपलेलं दुसरंच काहीतरी? यापैकी काही नसेलही-मान्य. मला काहीही विचारायला पैसे पडत नाहीत.
झाडाचा (एकमेव) विचार मला ओरिजिनल वाटला आणि भिडला. त्याबद्दल kudos!
कुठल्याही लिखाणाला तुलनेचा शाप असतोच. त्यामुळे पोस्टबद्दल जास्त काही नाही पण तू कुठल्या ट्रॅकवर आहेस हे कळलं आणि ’हं’ झालं.
माझं मत स्वागतार्ह आहे की नाही-या मला पडलेल्या प्रश्नासाठी माझ्याकडे माझ्यासाठीची ’माहित नाही’/’I don't care'/'I had to because I wanted to -' अशी उत्तरं आहेत त्यातलं साई सुट्ट्यो करुन एक उत्तर मला लागू केलंय, आतापुरता तरी तेव्हढं खरं. बाकी सगळं गेलं तेल लावत.
बाकी तू आणि तुझा कामूफ़्लाज ठिकठाक असालच.
-श्रद्धा
khup chhan vatala vachun, ajun lihit raha
ReplyDeleteगौरी - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteश्रद्धा - तुझ्या प्रतिक्रियेवर लिहीन म्हटलं, पण बहुतेक वेळ मिळाला नाही आणि नंतर विसरुन गेलो.
माणसाचे राग-लोभ-द्वेष: इतरांबद्दल माहित नाही, माझ्यासाठी ते जसेच्या तसे रहातात. का माहित नाही. कदाचित आजुबाजुला लोकं लिमिटेड ठेवल्यामुळे असेल, पण सहसा काही विसरलं जात नाही. दहा बारा पंधरा वर्षांपुर्वीचा जोक आठवुन अजुनही तसंच हसु येतं.
बुद्धी आणि स्मृती यात गल्लत होत नसल्याने असं होत असावं बहुतेक.
बुद्धीला धार करत, कल्हई लावत राहिलं कि ग्लानी येत नसावी.
स्मृती आपली साठत जाते - तिला फ़ार उगाळण्याचीही गरज नसते.
बरं यात ड्रॉबॅक असा कि वाईटही तंतोतंत आठवत रहातं.
होल्ड ऑन टु - मध्ये नॉस्टॅल्जिया शिवाय असतं काय?
मी तु विचारलेल्या प्रश्नांना फक्त प्रतिप्रश्न विचारतोय कारण हे प्रश्न मला पडले नाहीत.
पडत नाहीत.
एकसंध विचार - मी तसा प्रयत्न करुन पाहिलाय, पण असं काही नसतं. सगळ्यांचेच सगळेच विचार विस्कळीत असतात. मग लोक लिहायला बसतात. मग विषयाबाहेरच्या विचारांना डिलीट मारत लिहितात. मी तो मारत नाही. फरक इतकाच.
तसा मी ही तो मारतो, पण मग जे जमतं त्याला मी ड्राफ्ट किंवा फायनल डिझाईन रिपोर्ट वगैरे म्हणुन क्लायंटला पाठवतो.
डिनायल वगैरे - असलं काही विचारायला हरकत नाही, पण याच्यावर काही लिहायला मी मला स्वत:ला तेवढा ओळखत नाही.
बाकी सगळ्याच गोष्टी ओरिजिनल होत्या असं लिहिता लिहिता - च्यायला नक्की लिहिलंय तरी काय म्हणुन जाऊन वाचुन आलो तर असं वाटलं कि च्यायला झाडाचा विचार ओरिजिनल नव्हता, इन फॅक्ट तो एकच ’विचार’ होता. बाकी असंच जोक, गाणी, गप्पा असं लिहिता लिहिता आठवलेलं बरंच काही होतं.
ते लिहुन कंटाळा आल्यावर ’विचार’ सुचला.
मग त्याचाही कंटाळा आला.
म्हणजे पॅऱ्याबद्दल लिहायला अजुन बरंच काही होतं, पण लिहायचा कंटाळा आला.
मग पोस्ट करताना ह्याला टायटल काय द्यायचं ह्या विचाराचाही नको इतका कंटाळा आला
म्हणुन समोर असलेल्या पुस्तकाचं नाव टाकलं.
बाबा म्हणतो कि माझी (आहेत ती आणि होतील ती) मुलं मोठी झाली कि मी लिहिलेलं वाचुन त्यांना आपला बाबा कधी आणि काय आणि कसा विचार करायचा हे कळेल. पण मला तसं वाटत नाही. कारण मी बारा पंधरा वर्षांपुर्वी लिहिलेली पत्रं, डायऱ्या वगैरे वाचुन मला स्वत:बद्दलही काही नविन किंवा फॉर दॅट मॅटर काहिही कळत नाही. कारण कदाचित ते बारा पंधरा वर्षांपुर्वी इतकंच डोक्यात ताजं असतं.
आणि असं सगळ्यांचंच असतं.
नाय म्हणणारे फेकतात.
असं म्हणुन संपवणार होतो तेवढ्यात एक गोष्ट आठवली.
म्हणजे झालं असं कि एकदा कुंबळे आणि वॉर्न गप्पा मारत बसले होते.
तेव्हा कुंबळे थोडा उदासपणे वॉर्नला म्हणाला कि आय विश माझ्या बॉलिंग मध्ये आणखी वैविध्य असतं. म्हणजे त्याचं असं कि मला असं नेहमी वाटतं कि बॅट्समनला माहितिए कि मी कुठला बॉल टाकणार आहे ते.
त्यावर वॉर्न त्याला म्हणाला कि मेट - बॉल कसा पडणार आणि किती वळणार हे माहित असणं वेगळी गोष्ट झाली. तो खेळता येणं ही वेगळी.
ही गोष्ट वाचल्यावर मला वॉर्न म्हणजे प्रगल्भ विचारवंत वगैरे वाटला होता.
परवा तोच वॉर्न मॉंटी पनेसार बद्दल म्हणाला कि मॉंटी पंचेचाळीस टेस्ट खेळला नसुन एकच टेस्ट पंचेचाळीस वेळा खेळलाय.
वॉर्न यडा आहे.
पण मला माझ्याबद्दल तसं वाटतं.
म्हणजे असं कि मी चौतीस वर्ष जगलो नसुन एकच वर्ष चौतीस वेळा जगलोय. किंवा मागची दहा बारा वर्षं - किंवा असंच काहितरी.
पण मला त्याबद्दल काही वाटत नाही.
म्हणजे मी त्याच त्याच चुका परत करुन तसाच्या तसा वैतागतो, पण च्यायला रोजच शिकत गेलो तर मग आयुष्य कसलं रटाळ वगैरे होईल असं मला वाटतं.
मध्यंतरी इथेच ब्लॉगवर मला कुणीतरी म्हटलंपण होतं कि मी किती तेच ते लिहितो.
आणि ते अॅक्चुअली खरंही आहे.
म्हणजे - "आठवण आठवण विचार; आठवण आठवण विचार" अशी आपण आपली ओव्हर टाकत रहायची, आणि ’खेळा लेको’ म्हणायचं.
जो आऊट तो गंडला.
हा जर कॅमॉफ्लाज असेल तर मी तो इतरांपेक्षा माझ्यावरच फार फार यशस्वीपणे वापरलाय असं म्हणावं लागेल.
आणि आयदर वे - इट्स ओ.के. यार!
pahilyandach tumchya blog var aale aani maaz naav disal...swati...ha ha ha!!!
ReplyDeleteSwati - abhinandan!
ReplyDelete(asa lihiNyaapaasun mee swat:laa paraawrutt karu shakalo naahee) :))
(chook bhool dyaawee ghyaawee wagaire)
Aare aaj achanak majhya junya blogs chi athavan jhali ani te vachtana kalala ki me te lihit hote tenvha chi pan ek phase hoti. me lihayche, kunachya comments tyetil te pahayche. mag tyach kalat tu, ketan, tulop, etc lokanche blogs vachayche. ti phase ekdam manaat taji jhali. mhantle baghav tari ki kon kon ajun lihitay. Pan sagale 2011 chay aatach aahet. tari tujha baryapaiki latest aahe post. vachun parat tya junya phase madhe gele. :) Tu eka comment madhe lihilays te patala. Me ekach varsh 34 vela jagloy. Mhanje tujhe post vachun tujhya ajun junya posts athavlya. tyach sachyatlya. pan tarihi chaan vatla vachun. Khup ichha hot hoti lihaychi mhanun comment pan takunch detey aata even though the post is old. :)
ReplyDeleteVidya -
ReplyDeleteParawaach tujhee ek maitriN aaNi ek mitra ekaa birthday party madhye ekatrach bheTale. yaat yogaayogaachaa bhaag tasaa kaaheech nawhataa. kaaraN doghaanee ekamekaansheech lagn kelela! :))
Anyway - tujhee comment waachun chhaan waaTala!
- Abhijit.