तिथून पुढे
आज एका मीटिंग मधुन बाहेर बोलावुन आमच्या एच.आर. च्या बाईने मला घरी जायला सांगितलं!!!
सस्पेंशन!!!
माझ्या आयुष्यात नॉर्मल गोष्टी कधी होतच नाहीत का?
माधुरी ला मेसेज ठेवुन घरी आलोय, आणि दिवाळीसाठी शंकरपाळ्या करायच्या कि लाडू - यावर विचार करतोय.
आत्तातरी 'हाऊस हजबंड' ही कन्सेप्ट भयानक सुंदर वाटतिए!
दिवाळीसाठी भारतात जाउन यायची कन्सेप्टही चांगली आहे.
आधी एक बियर मारतो - म्हणजे विचारांत सुसुत्रता येईल. :)
इट वर्क्स!
माधुरीच्या ऑफिस मध्ये सतत 'मोराल बूस्टिंग' एव्हेंट्स चालू असतात.
परवा सामान आलं आणि आम्ही आपापली ढीगभर पुस्तकं आपापल्या ऑफिसमध्ये हलवली. (म्हणजे मी! माधुरी ने फक्त सूचना केल्या). रग्गड काम केल्यावर मला एक्स-बॉक्स (थोड्या वेळापुरता) आणि गारगार पेप्सीचं बक्षीस मिळालं. ते खेळत असताना मला अशाच कुठल्यातरी 'मोराल' इव्हेंट मध्ये उरलेल्या डझनभर बीयरच्या बाटल्या सापडल्या.
त्या मी शिस्तीत ढापल्या.
ऑफिस मधुन हाकलल्यावर घरी आलोय, शूजही न काढता खरोखरचा 'बेकार' बनुन फुकटची बियर पीत ब्लॉग लिहितोय.
मला सांगा - सुख म्हणजे नक्की काय असतं.....
फार टेन्शनची गोष्ट नाहिये - कंपनीच्या वकिलाने व्हिसा ट्रान्सफर ऍप्लिकेशन पाठवायला उशीर केला, आणि कंपनीने मी लवकर जॉईन व्हावं याची घाई. मी जॉईन झालोय याचा वकिलाला पत्ताही नाही. या नादात उगीच कॉम्प्लिकेशन नको म्हणुन कंपनीने आणि वकिलाने मिळुन मला थोड्या दिवसांपुरता घरी बसवायचा निर्णय घेतला.
आता या अनप्लॅन्ड व्हेकेशन मध्ये काय करावं हा सध्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न!
बाल्टिमोर मध्ये असतो तर घरी बसुन - दारु पीत, पिक्चर बघत आणि एखादं चांगलं पुस्तक वाचत - एन्जॉय केलं असतं. एक मिनीट - नाहीतरी मी आत्ता काय करतोय? बियर पीत माधुरीला २-४ पिक्चर आणायला सांगितलेत! चिकन रविवारी केलेलं - आज बटाट्याची सेक्साट भाजी करावी!
शूज काढायचा कंटाळा आलाय.
ते बायको कडुन काढुन घ्यावेत! (च्यायला - आयुष्यात यापेक्षा जास्त लाड काय असू शकतात?)
नको - असा काही उल्लेख जरी केला तरी लॉन्ड्री करावी लागेल.
पण ऍटलिस्ट वीकेंड ला केलेले दिवाळीचे प्लॅन्स - म्हणजे दारास तोरण, उंबऱ्याबाहेर रांगोळी, शंकरपाळ्या, झालंच तर एखादा आकाशकंदील, 'आयकिया'तुन आणलेल्या ढीगभर पणत्या घरभर लावता येतील.
नाहीतर खरंच आठवड्याभरासाठी भारतात जाता येईल. पप्पांना पुण्याला बोलावता येईल, नाहीतर आई-रंजू-पप्पांबरोबर गोव्यात दिवाळी करता येईल.
'मधुरा'ला तिकिट विचारलंय, बघुया उद्याच्या कॅरन आणि लॉयरबरोबरच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये काय होतंय ते!
गावाला आज्जींचीही तब्येत थोडी खराब आहे. आज्जी-बाप्पुंना काल एक छोटंसं पत्र पाठवलं.....
मी ३-४ वर्षांपुर्वी पाठवलेलं पत्र त्यांनी अजुन जपून ठेवलंय....
बाकी इतके दिवस शंका होती तो माधुरीचा 'एस्थेटिक सेन्स' भन्नाट निघाला - तिने घराची ऍरेंजमेंट अल्टिमेट केलिए. माझं एवढं सामान येऊनही कुठे गर्दी वाटत नाहिए. पण मला सगळ्यात जास्त आवडलेला प्रकार म्हणजे आमचं पुस्तकांचं कॅबिनेट!
माझी सगळी मराठी-इंग्लिश पुस्तकं व्यवस्थित बसली - वाईट गोष्ट म्हणजे फक्त नविन पुस्तकांसाठी जागा उरली नाहिए. परवा माधुरीची चिडचिड पत्करुनही नॉर्मन मॅकलीनचं 'अ रिव्हर रन्स थ्रु इट' आणि फोरसिथचं 'डॉग्ज ऑफ वॉर' घेतलं - त्या बदल्यात त्याच दिवशी मला माझी सगळी पुस्तकं लावायला मात्र लागली!
हात लांब करुन (सोयिस्करपणे) पहिलं पुस्तक हाताशी लागलं - 'सलील वाघ - निवडक कविता'.
त्यातली पहिली कविता -
तिथून पुढे
कधी आठवणीनी
पोनीटेल हेलकावत
जाणारी तू
डोळ्यासमोर आली की
एका झटक्यात शॉक सारखं
सगळं
डोळ्यापुढे तरळतं
कालपरवासारखं
कॉलेज
क्लास
परीक्षा
रिझल्ट
आयुष्य
मी
वाचन
चर्चा
वाद
पुस्तकं रॉय
आणि तत्वज्ञान
आणि ह्या सगळ्यांमधे
डेन्सर मिडियमकडून
जशा वेव्हज रिफ्लेक्ट होतात
तशा कविता
सगळंच
मुठभर हे श्वास
अजून रोखून ठेवलेत
तू आलीस की
मिळेल तो बिंदु पकडुन
पुन्हा जगायला श्रीकारापासून.
जर तू म्हणतो आहेस की काळजीचं काही कारण नाही, तर मग ठीकच आहे. म्हणजे बॉसशी घासाघीस करावी न लागता तुला दिवाळीची आठवडाभराची सुट्टी मिळाली म्हणायची! अरे, मग ती अगदी अनपेड का असेना वर्थ आहे की. :-) ये च जावून मग भारतात तू.. बऱ्याच वर्षात केली नसशील भारतात दिवाळी साजरी.. पुन्हा सोबत बायको नाही, म्हणजे सासुरवाडीची हैद्राबाद पर्यंतची ट्रिप ही वाचेल तुझी. ;-)
ReplyDeleteवा!!
ReplyDeleteफार छान लिहिलं आहेस.
मला flow फ़ार आवडला.
येतोयस का पुण्यात दिवाळीला?
आलास तर सांग. भेटू नक्की.
तुम्हा नवरा-बायकोला Happy Diwali.
वा! फार छान लिहिलं आहेस.
ReplyDeleteसहज आणि निवांत.
मला flow फार आवडला.
येतोयस का दिवाळीत पुण्याला?
भेटू नक्की आलास तर.
तरीही तुम्हा दोघा नवरा-बायकोला Happy Diwali
आभिजीत…
ReplyDeleteआज तुझा सगळा ब्लॉग ठरवून वाचून काढला…तेही ऑफिसच्या टायमात.
२-३ दा विंडो minimize करायला लागली. पत्रपेटी तपासण्यासाठी.
पण छान लिंक लागली. उद्यापासून सुरू होणारया दिवाळीच्या सुट्ट्टीचा मूड सेट झाला
च्या मारी ! हे सगळं खरंच होतं ? मला वाट्लं कदंबरीतलं पान वाचतॊय. मनात म्ह्ट्लं मराठी लेखक सुधार्ले. चक्क काहं सार्खं लिहितात...
ReplyDelete