Thursday, December 25, 2008

युगा अठ्ठाविसांची वेदना.... - तिला.

गहिऱ्या सकाळच्या पावणे अकरा प्रहरी....

या पावणेअकरा प्रहरी जर बाहेर बर्फ पडत असेल, घरी बसुन काम होत नसेल आणि तो जर बुधवार असेल तर मग तर सांगायलाच नको. समोर (अजुन न वाचलेलं) गो.नी. दांडेकरांचं ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ असेल आणि ते केवळ गिल्ट (काम करत असणं अपेक्षित असुनही न करावंसं वाटण्याची) तर मग विचारायलाच नको.
तशात काल रात्रीची भयाण स्वप्नं!
म्हणजे आईला डबलसीट घेऊन मोटसायकल वर चाललो होतो.
जंगली महाराज रस्त्यावर कुणाचा तरी फोन आला. आईच्या छोटुकल्या मोबाईलवर तो उचलला आणि मी कार चालवत नाहिए हे लक्षात आलं. दुचाकीच्या पुलाकडे टर्न मारला तशात ’कॉल वेटींग’! दिनेश दादाचा होता - त्याला म्हटलं - थांब दोन मिनिटांत करतो. असं बोलतोय न बोलतोय तो अचानक दुचाकी पूल अगदीच तोकड्या मॅन्युअल ट्रेडमिल सारखा अर्धा फूट अरुंद झाला - तो पण धळ सरळ नाही - वाकडा तिकडा! मग मोबाईल फेकुन देऊन डायरेक्ट पुलावरच उडी मारली. पुलाला धरुन लोंबकळायला लागलो. आईचं काय झालं माहित नाही, पण काही झालं नसावं, कारण एकेक करुन शेकडो लोक मला भेटायला यायला लागले तर आई ठणठणीत होती. मी ही ठणठणीतच होतो, पण का कुणास ठाऊक लोक मला भेटायला येत होते. आमचा हॉल म्हणजे ’काकडे पॅलेस’ मंगल कार्यालयाएवढा मोठा होता. उजवीकडे खुर्च्या होत्या, डावीकडे सोफ्याचे चार सेट्स. मधे मला भेटायला आलेल्या लोकांची रांग. भाऊ लोक येऊन ’चालु दे रे तुझं - आहोत आम्ही’ करुन सोफ्यांकडे वळाले. मी आपला मला माहित नसलेल्या लोकांना सिऍटल न्यु यॉर्क पासुन किती लांब आणि कॅलिफोर्नियाच्या किती वर आणि आमच्याकडे बर्फ का पडत नाही हे सांगत बसलो. बाहेर बदाबद पडणाऱ्या बर्फाकडे पहात मला या कालच्या स्वप्नातल्या आठवणी लख्ख आठवताहेत. त्यात परत गावाकडुन आलेल्या गुंठेपाटील मंडळींच्या बायका कपाळाला सोन्याचा पत्रा कि काय बांधुन! पण ते प्रकरण पत्र्यापेक्षा जाड असावं. कारण त्यावर सखुबाई नामदेवराव चव्हाण, खालच्या लाईनला A/P कवठे बुद्रुक Est 1972 आणि ते ही ऍम्ब्युलन्स वर कसं प्रतिबिंबित लिहितात - तसं लिहिलेलं. म्हणजे प्रत्येक बाईच्या पत्र्यावर वेगवेगळी नावं, गावाचं नाव वेगळं, Est लिहायचं का नाही आणि त्यावर कुठलं साल टाकायचं हे बहुतेक त्या त्या स्टाईलवर अवलंबुन. एका बाईच्या नाव आणि A/P च्या मधल्या लाईनवर Horn OK Please लिहिल्याचं आढळलं. ’हटके’ पत्रा लावण्याबद्दल त्या बाईचं कौतुक वाटल्याचं मला (अजुन) आठवतंय. भेटायला येणारे लोक मात्र माझ्या ऍक्सिडंट बद्दल विचारतच नव्हते - नुसतं आपलं अमेरिका!
मग भावांच्या टोळक्यात जाऊन बसलो. तिथे काय झालं ते डिटेलमध्ये सांगितलं - मग सगळेच हसायला लागले. कुणीतरी मी फेकुन दिलेला फोन आणुन दिला. त्याला जरा खरचटलं होतं. मग जीपमधुन कात्रज बायपासने कोंढवा कि असं कुठेतरी जायला लागलो तर कात्रजला पोलीस दिसला. त्याला टाळुन पुढे गेल्यावर वाटलं कि हे बरोबर नाही - त्याला त्याचा हप्ता दिलाच पाहिजे. म्हणुन मग हायवेलाच रिव्हर्स मारुन परत आलो. पण तो पोलिस पण अमेरिकेच्याच गप्पा मारायला लागला. आणि त्याने अमेरिकेला न्यायला माझ्यासोबत खाऊ पाठवला. एवढं कमी म्हणुन एक माजी छावी तिच्या भावाला बरोबर घेऊन भेटायला आली. तर कुणीही नातेवाईक तिच्याशी बरोबर बोलेनात. म्हणुन तिची चिडचीड झाली. मग मी तिला जाऊन म्हणालो कि हे बघ बाई, तु माझ्याशी जसं वागलीस त्यामुळे माझे हे आप्तस्वकीय तुझ्याशी असे वागणार हे स्वाभाविक आहे, पण तु त्यांना भेटण्यासाठी मुळात आलीच नसल्याने त्यांच्या वागणुकीचा तुझ्यावर प्रभाव का पडावा? हे बहुतेक तिला पटलं असावं. कारण तो प्रभाव नाहीसा झालेला मला बहुतेक दिसला. मग मी तिला ’पण मी तुझ्याशी बोलणं योग्य नाही’ म्हणुन उसाचा रस प्यायला गेलो. पहाटे साडे तीनला जाग आली तेव्हा थंडी वाजायला लागली. म्हणुन ऊब निर्माण करण्यासाठी लॅपटॉप मांडीवर घेऊन बसलो. पुरेशी ऊब निर्माण झाल्यावर लिहायला लागलो. एक दळभद्री पॅरेग्राफ लिहून लॅपटॉप ठेऊन देऊन झोपुन गेलो. झोपता झोपता व्हिस्कीचा उग्र दर्प आला. ’बाप रे!’ म्हणुन बायकोच्या तोंडाचा वास घेतल्यावर कळलं कि उग्र दर्प मीच साईड टेबलवर अर्धवट ठेवलेल्या ग्लासातुन येतोय. उगीच व्हिस्की वाया जायला नको म्हणुन ती प्यावी का असा विचार केला पण म्हटलं - कायको रिस्क! हाच वास उद्या सकाळी ऑफिसात यायचा. म्हणुन मग झाकायला इतर काही योग्य न मिळाल्याने दांडेकरांना सॉरी म्हणुन भ्रमणगाथा ग्लासवर ठेवलं आणि एकदाचा झोपी गेलो. परत एकदा उगीच बायकोपासुन लपवायला नको म्हणुन बायकोला झोपेतुन उठवुन स्वप्नाबद्दल - म्हणजे मला पडलेल्या स्वप्नाबद्दल (छावीचा पार्ट वगळुन) सांगितलं. मग बायको ’झोप आता’ म्हणाली. म्हणुन मग झोपी गेलो.

एवढं असं काही धडाधड लिहिल्याला तब्बल आठ महिने झाल्याने मला आता बरं वाटतंय. भारताच्या ट्रिपेत यंदा कळ्या सुरुवातीलाच भेटला. अजुनही राग म्हणुन ९५ साली सुरु केलेल्या इंजिनियरिंग चे दोन पेपर मुद्दाम ठेवलेत म्हणाला. हल्ली कॉलेजच ’दे रे, दे रे’ करत त्याच्या मागे लागलंय. त्या सब्जेक्ट्सचे बाहेर क्लासेस घेतो पण ’देत नाही - जा!’ ऍटिट्युड कायम. इतर वेळात सकाळी दहावी बारावी सायन्स चे क्लासेस, दुपारी CAT चे क्लासेस, संध्याकाळी CA आणि CS चा अभ्यास, आणि रात्री स्पॅनिश शिकतो. अस्खलित तमिळ बोलु शकतो म्हणाला. रजनी(कांत)ला भेटुन आला, कमल(हसन)ला भेटला. कुठलीही गोष्ट अस्खलित करणाऱ्या कळ्याच्या अस्खलित तमिळवरही शंका आली नाही. मग पॅरी भेटला. बायकोने पोराचं नाव ’रुद्र’ ठेवायला परवानगी तरी कशी दिली यावर म्हणाला - अरे बायको ना! ती म्हणे आमचे ज्योतिषी म्हणतात कि अशा नावाने मुलाचा स्वभाव रुद्र होईल. मग मी तिला म्हणालो - हे मला पटतंय, म्हणुन मग आपण आपल्या पोराचं नाव पैसा ठेऊ! (दे टाळी)!! राहुलला भेटलो, त्याने नविन फ्लॅट घेतला. मग मी संदीपला शिव्या घातल्या आणि राहुलला ’वॉक द लाईन’ची स्टोरी सांगितली. मग त्याने हल्ली ब्लॉग का लिहीत नाही विचारलं आणि ट्युलिप किती भारी लिहिते हे जरा जास्तच तिखट मीट लावुन सांगितलं. मग मी जनतेला माझ्या पोरीचे व्हिडिओज दाखवले. मग योगेशला भेटलो आणि ’अभिषेक’ मध्ये पावभाजी खाल्ली. अजुन लिहालला सुरु न केलेल्या पुस्तकाबद्दल बोललो. घरी येताना थंड वाऱ्याने सर्दी खोकला झाला. मग मी गावाला गेलो. आज्जी बाप्पुंना भेटलो. बालाजीचं मंदीर जोरात यंदा. विहीर तुडुंब. त्यात विरुळा दिसला. Handicam ने त्याचं शूटिंग केलं. काका गाळ काढायचं म्हणाले. सिताफळाची झाडं पाहिली, शेवग्याचं झाड पाहिलं, पेरुची बाग (लांबुन) पाहिली. झेंडु लावावा का - यावर जनतेला विचार करताना पाहिलं. घरी येऊन जेवलो - गावाला आता केबल आलिए, म्हणुन थोडा टि.व्ही. पाहिला. मग परत आलो. मग त्याच्या आधी राहुलबरोबर जाऊन सलील वाघला भेटलो. तो ई-मेल कर म्हणाला. मग ’बेगम बर्वे’ पाहिलं. बुधवार रात्रीची अस्सल सदाशिवपेठी गर्दी यशवंतराववर ओसंडुन वहायला लागल्यावर उलटी होईल असं वाटायला लागलं. म्हणुन मानकरांच्या केबीनमध्ये जाऊन बसलो. सोनावण्यांच्या फोनमुळे मानकरांनी उभेंकरवी फ्री पासेस पाठवले. नाटक ठीक होतं, मला झोप लागली. कजरीतुन साड्या ड्रेसेस घेतले, जयहिंद मधुन शर्ट पॅंट, श्रीमंत मधुन कुर्ता, गाडगीळांकडुन बायकोसाठी सोन्याचा पत्रा घ्यायचा विचार केला पण भाव वाढल्याने आयडिया ड्रॉप केली. मध्येच गिऱ्याला जाऊन भेटलो. त्यानेही फ्लॅट घेतला - दुसरा घेतोय. गजा टिंबर मार्केट मध्ये काम करतो म्हणाला - कुणी कुणी कुठे कुठे. गिऱ्याला म्हटलं मला तुझा अभिमान वाटतो. गहिऱ्या दुपारच्या पावणे बाराव्या प्रहरी मी भारताच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करतोय. कांताताईला भेटायला गेलो, आत्तु भेटायला आली. संवेदला भेटलो, गणेशला भेटलो - तो Lynch on Lynch वाचत होता म्हणुन मग आम्ही Ganesh on Ganesh अशी चर्चा केली. चहा पिलो बिडी मारली.

अजुन काही आठवत नाही.

एस्कलेटर कसा हात पाय न हलवता वरुन खाली आणि खालुन वर पोचवतो, तसंच अमेरिकेत किंवा इतर देशांत एअरपोर्ट्सवर जमिनीवरच पट्टे असतात. त्यावर उभं राहिलं कि एका जागुन दुसर्या जागी (आपोआप) जाता येतं. त्यावर हळू चाललं तरी भराभर चालण्याच्या स्पीडने चाल्लोय असं (बाहेरुन पहाताना) वाटतं. भारतात गेल्यावर तसं वाटलं. भारतात रॅट रेसचा उत्साह ओसंडून वहात होता, प्रत्येक जण पैशाबद्दलच बोलत होता, प्रत्येक जण धावत होता. एवढी धावपळ नुसती बघुनच मला थकायला झालं. मला माझी परिस्थिती त्या एस्कॅलेटरवरच्या प्रवाशासारखी वाटली. अमेरिका माझा एस्कॅलेटर. म्हणुन बाहेरुन पहाणाऱ्याला मी ’स्पीड’ने चाललोय असं वाटणार. त्यावरुन उतरलं कि मी या रेस मध्ये कितपत टिकणार असं वाटायला लागलं. म्हणजे स्वत:बद्दल डाऊट नाही, पण असं कि - योगेश सांगत होता, हल्ली KG च्या ऍडमिशन साठी नुसतं डोनेशन नसतं - मुलांच्या परिक्षा असतात, त्यांच्या पालकांचे इंटर्व्ह्यु असतात. त्याला म्हटलं अरे त्यात नविन ते काय - ते तर मी जायच्या आधीही होतंच की! तर तो म्हणे अरे हे काही नाही - हल्ली पालकांच्या साठी लेखी परिक्षा सुरु झाल्यात, आणि हे कमी म्हणुन त्या परिक्षांसाठी क्लासही! आता या रेसमध्ये मी सहभागी होणार नाही हे नक्कीच, पण अशा आणखी किती रेसेस, याची कल्पना कराविशी वाटली नाही. विकी म्हणाला - तु आता काही परत येत नाही. मुळात जायचं नसुनही गेलो आता यायचं असुनही शंका सुरु झाल्यात - त्या यायच्या किंवा रहायच्या किंवा अशा काही नाही. वेगळ्याच आहेत. नक्की काय पाहिजे याच्या शंका - मग जे पाहिजे ते कुठे मिळणार हा (अजुनतरी) दुय्यम प्रश्न.

आज चालायला प्रारंभ जरा लवकरच केला आहे.
वैशाख नुकताच लागला आहे. नऊदहाचा सुमार झाला, कि नर्मदाकाठ सपाटुन तापतो. वाटेनं महामूर फुफाटा. पात्रांत गरम झालेली पांढरी स्वच्छ वाळू. तिच्यात तर फुटाणे भाजुन घेता येतील. पाऊल घालायची सोय नाही.
आजही हे अग्निकांड सुरू होऊन गेलं आहे. माझ्या पायांना भेगा पडल्या आहेत. त्यांच्यात रोज संध्याकाळी हाती लागेल त्या झाडाचा चीक भरतो. प्रदक्षिणा करणाऱ्यानं पायांत पायतण घालायचं नसतं.
पण मी त्यावर एक युक्ती शोधून काढली आहे. सरगंधाच्या वेलीनं पायांना वडाची जूनसर पानं बांधतो. आता हा उपाय काही चिरकालीक नव्हे. कारण चालूनचालून पानं फार लवकर फाटतात. पण दुसरा ईलाज काय!
आजही मी पानं बांधली होती. पण मुळी बेलाचं बंधनच टिकेना. मग वेदनांनी ठणकणारं मन बाजूला काढून ठेवलं, अन फाटून चीध्या झालेले पाय जंजाळीक तापलेल्या धुळीच्या स्वाधीन केले.
मी चाललो आहे. उजव्या हाताला माता नर्मदा वाहत्ये आहे. डाव्या बाजूला वाटेच्या पालिकडं शेतं आहेत, गुरचराईचं रान आहे, फताड्या पानांचे साग आहेत, खडक आहेत, आकाशाला भिडणारी अंजनाची झाडं आहेत. या सगळ्यामधून रेंगाळणाऱ्या वाटेवरुन मी भराभर पावलं टाकतो आहे. ती वाट मला लवकरच संपवायची आहे.
पण का?
खरंच की! हे कधी लक्षात आलं नाही. लवकर का? सावकाश का नाही? माझ्या या भ्रमणाचा - एकूण जीवनाच्याच वाटचालीचा अर्थ काय? प्रदक्षिणा उशिरानं संपली, अथवा न संपली, म्हणून काय बिघडलं?
प्रश्न तर मार्मिक आहे.
थोडं थांबून विचार केला पाहिजे याचा. पण कुठं थांबायचं?
डाव्या हाताला मोहाचं हे गरगरीत झाड आहे. बसूं या त्याच्याखाली. बुद्ध बोधीवृक्षाखाली बसला. ज्ञानेश्वर अजानवृक्षाखाली विसावले. आपण मोहाच्याच झाडाखाली बसूं या! आपल्या वाट्याला तेंच आलं. एकेकाचं भाग्य! दुसरं काय?
पण दुपारकरता पाणी आणलं पाहिजे! मग दरडीवरून खाली उतरतो. पात्रांतले खडकही अपार तापले आहेत. मूंडकगतीनं वाळूचं सहारा ओलंडीत प्रवाहाजवळ पोचतों.
वा! वा! काय पाणी आहे?
मला वाटतं, पंचमहाभूतांचं शरीर आहे ना, त्यांतलं जलतत्व या जातीचं असावं. कसं आहे कोण जाणे, पण या जातीचं व्हावं. किंबहुना इतर चारी महाभूतांच्या जागाही अशाच हिरव्या, नितळ, अति स्वच्छ पाण्याचं शरीर व्हावं.
काय मजा येईल! मग माझ्या शरीरात चाललेली प्रत्येक क्रिया मला बाहेरुन पाहतां येईल. अन्न कसा प्रवास करतं, ते पचतं कसं, त्याचं रक्त कसं बनतं, हृदय कसं, त्याचं स्पंदन कसं, मनाचे व्यापार कसे -
अरे!
हे तर जगालाही सहजगत्या दिसुं शकेल! माझ्या मनांत हेलकावे खाणाऱ्या वासना, अन् त्यांनी निर्माण केलेली घाण जर कुणाला दिसली तर -
पण नर्मदामैयाचं पाणी मात्र अति देखणं आहे. त्याकडे किती पाहिलं, तरी तृप्ती होतच नाही. दिवसा, राट्री - रात्रीला डोळे फुटावेत, अन् तिनं हे पाण्याचं अपार रूप पाहून धन्य होऊन जावं.
कडू भोपळा कोरून केलेला कमंडलू पाण्यानं भरला, अन् मोहाच्या झाडाकडे निघणार, एवढ्यांत काही तरी गंमत दिसली. जरा जवळ जावं म्हणून माझ्या पलीकडे पाण्यांत एक खडक होता त्यावर उडी मारून उभा राहिलों.
वा वा! कसं हे जीवसृष्टीचं दर्शन! पडदा नाही, बुरखा नाही, भय नाही, शंकोच नाही. मनांत उठलेला तरंग निष्कपटपणानं आकाररूप होऊन बाहेर उमटायचा!
मला वाटतं, त्या जोडींतली एक कासवी असावी. दुसरा तिचा प्रियकर. आकार मोठ्या परातीएवढाले. दोघं शिवाशिवी खेळताहेत. कासवी लबाड आहे. एका ठिकाणीं जळांत स्थिर राहत्ये. प्रियकर जवळ आला, की सुळ्कन् खाली बुडी देत्ये. कासव आंधळ्यासारखा पाण्यातल्यां खडकांना टकरा देत तिच्या मागं धावतो.
पुन्हा ती वर आली. ती जणुं पाताळलोकांतून धावत वर उमटली. मला ऐंकूं येत नाही - कारण कासवं मोठ्याने बोलत नाहीत, केवळ इसापाची कासवंच बोलतात! पण बहुधा आता कासवी हसत असावी.
तो चिडला असावासा दिसतो. हें कासवीला कळलं आहे. ती आपले फताडे पाय हलवीत एका ठायी स्थिरावली आहे. तिने विचार केला असेल, कि पुरे झालं. येईना का बिचारा जवळ! करु या चार पाऊसपाण्याच्या गोष्टी.
कासवानं आपला फताडा, गिळगिळीत पाय कासवीच्या खांद्यावर ठेवला आहे. दोघांची तोंडं एका ठायीं मिळाली आहेत, तोंच -
"नर्मदे हर!"
मी चमकून मागे पाहिलं. बहुधा तो माझ्याच संप्रदायातला साथी असावा. खाद्यावर पोटोबाच्या आहुतीचं सामान लादलेली पिशवी आहे. गळ्यांत भली टपोरी रुद्राक्षांची माळ. भस्म फासलंय अंगाला. इतकं कि मला एकदम मोहरममधल्या वाघाची आठवण झाली. कसंबसं हसू दाबत मी प्रतिसाद दिली.
"हर नर्मदे!"
पण तेवढ्यानं माझी सुटका नव्हती. अर्थ असा कि आता कूर्मक्रीडादर्शन थांबवलं पाहिजे. हा भिडू तास दोन तास खाणार. त्यानं तरी काय करावं? दिवसभर तोंड बांधून चालायचं. कुणी भला गुराखी किंवा शेतकरी वाटेंत भेटलाच तर ’नर्मदे हर - हर नर्मदे’ हा गजर व्हायचा. त्याला पुढचं गाव किती लांब ते विचारायचं. तो सांगेल ते ऐकून घ्यायचं. त्यावर चर्चा करीत बसणं निरुपयोगी आहे. कारण मैल दोन मैल, एवढ्या किरकोळ अंतराकडे हे भूमीपुत्र गंभीरपणे पाहूच शकत नाहीत. एखाद्याला विचारावं,
"का हो भैया, सरमाठी कै मैल दूरीपर है यहॉंसे?"
तो सरमाठीच्या दिशेला हात झुगारुन सहज बोलून जाईल,
"जे जहीं तो है -"
पुन्हा प्रश्न करायचं धाडस करावं,
"जे जहीं याने? कै मील -"
"होगा दूचार मील -"
"लेकीन लोगबाग तो कहते हैं कि दस मील है -"
"हो भी सकता है -"
"आपको शायद पता नहीं है!"
"अरे पता क्यों नही? एक बार गया जो था!"
"कै साल हुवे?"
"उं:! छोटा था. मॉंकी गोदमें बैठा बैठा गया था सरमाठी. वहॉं फूफाजीके घर पकौडे बने थे -"
अशा लोकांशी संगतवार असं काय बोलता येणार? मग कुणी परिक्रमावासी भेटला, की त्याच्याशी भरपूर बोलायचा मोह अनावर झाला, तर कुणीं नावं ठेवूं नयेत.
रुद्राक्षधाऱ्यानं जटाभार मागं फेकीत प्रश्न केला,
"काय पाहत होतांत?"
खरं बोलून सोय नाही. म्हणालों,
"मासे कसे खेळतात तें!"
"हां हां! पण सांभाळून बरं का!"
"का?"
"अहो, मगरमच्छ पट्कन् पाय ओढायचा?"
याचं म्हणणं काही अजिबात खोटं नाही. नर्मदेंत मगरी फार. मीं पटकन् अलीकडील थडीवर उडी मारली. मग फुशारकीनं म्हणालों,
"माणसाला काय करतो मगरमच्छ!"
"अरे बाबा असं बोलूं नकोस. जवान आहेस. गरम रक्त असंच बोलत असतं. पण काल सकाळीच एक तुझ्याएवढा मुलगा मगरमच्छानं ओढून नेला -"
"तुम्ही पाहिला?"
"न पाहिला म्हणून काय झालं? थोरामोठ्यांनी सांगून ठेवलंय, ते काय खोटं आहे?"
"काय सांगितलंय् थोरामोठ्यांनी?"
"की रानांत वाघ बलवान्, अन् पाण्यांत मगरमच्छ -"
पराभव कबूल करणं मला रुचलं नाही. म्हणालो,
"आपण नर्मदेचे पुत्र. परिक्रमावासी. आपल्याला काय करतो मगरमच्छ?"
हें ऐकलं मात्र, अन् रुद्राक्षधारी खवळला. तो डोळे वटारुन म्हणाला,
"परिक्रमावासी हो?"
"हो ना! तेंच तर -"
"और फिर नर्मदाजीको उलांघकर खडे थे?"
नर्मदा केवळ भडोचजवळ काय ती ओलांडून पार व्हायची. एरवी कधीही तिला पाय लावायचा नाही. म्हणजे पाण्यांत उतरायचं नाही. किनाऱ्याला सोडून एखादा खडक असेल, त्यावरही पाय देऊन उभं रहायचं नाही. नर्मदा ओलांडल्याचा दोष पदरीं येतो. किनाऱ्यावर बसुन स्नान करायचं. भुरभुर माता हर गंगे!
हा कठोर दंडक आहे. पाळायला हवा. अन् मी तो मोडला होता. कारण परिक्रमा अशानं खंडीत होते, हे मला मान्य नव्हतं. मी हसून बोललों,
"बाबाजी रेवामाता आमची आई आहे ना?"
"मग?"
"काही नाही. पण मूल नाही आईच्या मांडीवर खेळत? तसं हे -"
"तूं कुठला?"
गाडं भलतीकडेच चाललं. ताळ्यावर आणलं पाहिजे. म्हणालों,
"मी कुठला का असेना! तूर्त तर परिक्रमा करतोंय्."
"पडशी दिसत नाही तुझ्याजवळ ती? अंथरुण-पांघरुण?"
आता प्रकरण निकरावर येत चाललं. मी सावरण्याचा यत्न करीत म्हणालों,
"महाराज, मी पडशीबिडशी नाही बाळगीत. अंथरुण-पांघरुण रेवामातेचा काठ अन् आकाश."
"मग जेवतोस कुठं?"
"जो न मागता वाढील त्याच्या दारीं बसून."
छे! तापलंच गाडं! पडशी उतरून दोन्ही हात कमरेवर ठेवून तो म्हणाला,
"तूं लबाड आहेस!"
"कशावरून?"
"तू परिकम्मेचे नियम पाळीत नाहीस. अरे, तुझ्यासारख्या नकली गोट्यांनीच तर परिकम्मा-मार्ग बिघडवून टाकला आहे. सदावर्ते बंद पडत चालली आहेत. आमच्यासारख्या निरंजनमूर्तींनाही वेळेवर शिधा-आटा मिळत नाही! काल एका सदावर्तवाल्यानं लेकानं तूपच दिलं नाही! त्याचा सत्यानाश होवो -"
मी म्हटलं बरी फट सापडली. थोडी परनिंदा करावी. म्हणालों,
"हो ना! काही लोक फार लबाड असतात -"
पण प्रकरण अगदीच भडकलं.
"तुझ्यासारखे धतुंदरबाबाजी भेटतात ना त्यांना? मग ते तसेच व्हायचे! छे! तुम्हाला मोकळं सोडून भागायचं नाही. चला माझ्याबरोबर -"
"कुठं?"
"पोलिसचौकीवर."
लिगाड चिकटातंय्. झटकून टाकलं पाहिजे. थोडं उग्र रूप दाखवलं, तर कदाचित् बला टळेल. नाही तर पोलिसचं शुक्लकाष्ठ मागं लागायचं. हे भोपाळी पोलिस म्हणजे प्रतिनरकासुर आहेत. अनेकदा तो त्रास भोगावा लागला आहे. तर मग छानदार सोंग काढलं पाहिजे.
डोळॆ वटारुन म्हणालो,
"येत नाही जा! अरे, मला पोलिस काय करणार! अवधूत आम्ही. आम्ही कुणाची पर्वा करीत नाहीं. पोलिस तुम्हा माणसांना भिववतील. आम्हाला कुणाची भीति? नाहं मनुष्यो, नच देवक्षयो! आम्हाला पाणी भिववीत नाही, आग जाळीत नाही, वारा उडवीत नाही-अच्छेद्योSयमदाह्योSयमविकार्योSयमुच्यते!"
भडाभड काही कठिण उच्चारांचे श्लोक म्हटले. कांही गोखाण्डं, काहीं स्वजौसमौट्‍!अन् तो भला माणूस गर्भगळीत होऊन टकाटका बघत उभा राहिला. मग आणिकच वात्रटपणा सुचला. पाणी उचललं हातांत. अइउण्ऋलृक् या महामंत्रांनी तें अभिषिक्त केलं, अन् त्याच्याकडे धावूं लागलों. चुळुक उगारून.
जो का पळाला आहे म्हणून सांगू तो मोहरमचा वाघ! धावतां धावतां तापून आग झालेल्या वाळूंत पडला देखील. पडशी एकीकडे. घोंगडी एकीकडे. हातांतली दोरबाटली एकीकडे. कसाबसा धांदरटासारखा उठला, अन् सामान गोळा करून माझ्याकडे दृष्टी न वळवतांच त्यानं पुन्हा धूम ठोकली!
वाईट वाटलं. उगीच बिचाऱ्याला या आगीत लोळावं लागलं. पण मी काय तरी करुं? प्रकरण अगदी हातघाईवर आलं, म्हणजे माणूस शस्त्रं बाहेर काढतो.


पोस्ट इथेच संपवणार होतो पण हा प्रसंग इथे का लिहिला हे कोणी ना कोणी तरी विचारणारच आणि मग त्याचं उत्तरही द्यावंसं वाटणार - मग ते आताच का देऊ नये. तर उत्तर असं कि - ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ या पुस्तकाबद्दल जेव्हा पासुन (सिरियसली) वाचायला लागलो तेव्हापासुन ऐकुन होतो, पण आकर्षक टायटल सोडून आणखी काहिही माहिती नव्हतं. खरं सांगायचं तर अजुनही नाही. अजुनतरी हा कुणीतरी तपस्वी यात्रेचे सर्वमान्य नियम झुगारुन - अनावश्यक वाटणारी लिमिटेशन्स न मानुन यात्रेवर निघालाय. तो कुठुन कुठे, कधी आणि कसा पोचणार आहे, हे अजुन तरी माहित नाही. इप्सित स्थळी पोचणार कि नाही हे ही. या सगळ्या unknowns मध्ये त्याचे फंडे interesting वाटताहेत. प्रदक्षिणा मारुन तो पुन्हा जिथुन सुरुवात केली तिथेच पोचणार असला तरीही! आणि तसंही कुठलाही माणुस एका ठिकाणुन निघुन काही वर्षांनी, महिन्यांनी, दिवसांनी पुन्हा तिथेच किंवा कुठेतरी पोचतोच - आणि जेव्हा कधी जिथे कुठे पोचतो तेव्हा त्याने प्रवासाच्या सुरुवातीपेक्षा जास्त कमावलेलंच असतं. फक्त जे कमावलं तेच कमावायचं होतं का - हा महत्वाचा प्रश्न!

भ्रमणगाथा continues....

(शीर्षक आणि उतारा संदर्भ - ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ - गो.नी. दांडेकर - प्रथम प्रकाशन १९५६)

पुढचं पोस्ट - Adaptation वर.
लवकरच.

Tuesday, September 09, 2008

My Nonsense - 2

पहिल्या चार गोष्टी मी सगळ्यात शेवटी लिहिल्यात.
बाकीच्या जशा प्रकाशित झाल्या - तशा क्रमाने आहेत.
पहिली - मी पॅरिसमध्ये लिहिली, शेवटची बार्सिलोनामधुन मेल केली.
त्याच्या आधीची माद्रिद मधुन.
माद्रिदमध्ये काम करायला धमाल यायची.
तशी तर पॅरिसमध्ये आणि फ्लोरीडातल्या की वेस्ट मध्येही.
पण ते फक्त थंडीत.
बाकी मॉन्टाना, टोरोंटो, शिकागो आणि क्युबातलं हवाना - लिहावं तर अशा ठिकाणी...
आणखीही जागा होत्या - नाही असं नाही - पण त्या एवढ्या खास नव्हत्या.
आयदर तसं - किंवा जेव्हा तिथे होतो तेव्हा आम्ही तेवढे खास नव्हतो.

इथे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत - आय होप तुम्हाला त्यातल्या काही आवडतील.
कारण...कारण त्यातल्या काही मला आवडतात.
बाकीच्या म्हणजे...बाकीच्या अशा काही आहेत कि त्या उगीचंच काही लोकांना जरा जास्तच आवडतात.
आणि मग अशा गोष्टी आवडणाऱ्या त्या लोकांना भेटलं कि तुम्हाला ’आयची जय!’ फीलिंग येतं. धड हसता ही येत नाही ना रडता!
तर अशा आणखीही काही गोष्टी आहेत.
त्या कधीना कधी कुणाना कुणाला कोणत्या ना कोणत्या कारणाने आवडल्या असणारच.
हो - नाहीतर प्रकाशित कोण का करेल?

बर ते जाऊ दे.
तर त्याचं असं आहे ना - कि जिथ कुठं जाणं आवश्यक आहे तिथे जाताना, आणि जे करणं प्राप्त आहे ते सर्व करताना, आणि वर जसं जसं जे काही घडतंय ते तसं तसं बिनबोभाट बघताना - तुम्ही ज्याने कशाने लिहीता, मग ते काहीका असेना - पण बोथट होत जातं.
खरंय.
पण त्याचं असं आहे कि ते जे काही आहे - कि ज्याने मी लिहितो - मला असं वाटतं कि एकवेळ ते बोथट का होईना, कि त्याला थोडे चिरे का पडेनात, कि मला त्याला धार का लावायला लागेना - भेंडि धुसमटत चकचकीत रहाण्यापेक्षा ते लई परवडलं.

आता - धार लावायची वेळ आली.
अजुन तीन कादंबऱ्या आणि पंचवीसेक भन्नाट गोष्टी लिहुन होईतो जगायला आवडेल.
च्यायला - त्याचं आहे असं ना - कि मला एवढ्या गोष्टी माहितेत!

फुल टु माजात -

- अर्नेस्ट हेमिंग्वे.

----------------------------------------------------------

आय याम बाक!
हे वाक्य खरं तर अरनॉल्डी (किंवा श्वार्झनेगरी म्हणा हवं तर) उच्चारात ऐकायला जास्त बरं वाटतं, पण सांगायचा मुद्दा असा कि मी परत आलोय.
या वाक्याचं विश्लेषण करणं म्हणजे भंपकगिरी होईल, कारण मी कुठेच गेलो नव्हतो.
पण टेक माय वर्ड फ़ॉर इट - आय ऍम बॅक.

मागचे आठ दहा महिने - मुक्ता नावाची एक मुलगी आमच्या घरी रहायला येणार आहे - या वाक्याने सुरुवात करुन कैक पोस्ट्स लिहिली. एवढ्या वेळात मुक्ता येऊन जुनी पण झाली पण सुरु केलेली पोस्ट्स लिहुन संपेनात.
’मुक्ताने हुल दिली कि चाहुल’ - हे पोस्ट लिहुन होईपर्यंत माधुरीचं डोहाळजेवण पण उरकलं होतं.
डोहाळजेवण नावाच्या राडा प्रकाराबद्दल लिहीपर्यंत मी घाटात रस्ते बांधायला गेलो आणि माधुरी सिंगापुर, जपान वगैरे दौर्यावर. त्याच्याबद्दल लिहीपर्यंत ’डायपर’ नावाची दुपटी आणि ’गुलाब्बो की बैलगाडी’ नावाची बाबागाडी वगैरे वगैरेची खरेदी आली.
ती होईतो सासू आली.
आय मीन - आमच्या सासुबाई आल्या!
(माधुरीला असली मराठी वाक्य पर्फेक्ट समजतात).
त्या आल्या त्याबद्दल लिहिण्यासारखं काही नव्हतं, पण त्या आल्या त्या रात्रीच मुक्ता पण आली.
म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी आली...पण - अबे समझा करो यार!

मराठी ब्लॉग्जवर एक लिखित नियम केला पाहिजे.
जे लोक MBA वगैरे करुन(ही) लिहितात - त्यांनी आपापल्या ब्लॉगवर तसं डिक्लेअर करावं.
म्हणजे लोक (निदान मी तरी) ते वाचण्याच्या फंदात पडणार नाही. हे लोक डेटा घेतात (नाहीतर तो अशक्य प्रकारे निर्माण करतात), त्याचं मस्तपैकी ऍनॅलिसिस करतात आणि त्यावर दळभद्री कन्क्ल्युजन्स काढतात. मला ज्यावेळेस आयुष्यात काहीच करावंसं वाटत नव्हतं तेव्हा ’भविष्याचे काय प्लॅन?’ या प्रश्नावर मी सरळ MBA असं ठोकुन द्यायचो. मी खरच आयुष्याला मरणाचा कंटाळलो असतो तर MBA केलं असतं. (अमेरिकेत MBA केलेले लोक या नियमाला सरसकट अपवाद - विषय संपला).
एनीवे - बाबाने MBA चा विचार जाहीर केल्यावर त्याच्यावर उखडलो.
बाबा हा (म्हणजे माझ्यासारख्या नतद्रष्टा साठी तर फारच) द्रष्टा माणुस.
आयुष्यातल्या कुठल्याही परिस्थितीचं अचूक आकलन करुन, त्याचं बिनतोड विश्लेषण करुन, त्या परिस्थितीतली (खरं तर तशा परिस्थितीतलीही म्हणायला हवं) सौंदर्यस्थळं दाखवत तुमची त्या परिस्थितीसाठी तयारी करुन देणं - या बाबतीत बाबाचा हात कुणी धरु शकत नाही. असं असताना - why fix something which aint broken?
बाबाचं MBA करुन होणारं भावी वाटोळं वाचवण्याचं (बाबाने दिलेलं नसलं तरी) क्रेडिट मी घेतो.

Your life has changed forever mann… It will never be the same again!! It is an amazing change… you’ll see it in everything you do… The stores you go to, the aisles you frequent in your local super market, the things that worry you, the things that please you, the channels you watch, the time you spend at home, the reasons you call home, the things that you discuss with friends and colleagues, you name it!

----------------------------------------------------------

मुक्ताला पहिल्यांदा हातात घेतलं त्याला आता तीन आठवडे झाले.
ते अंधुक आठवताहेत.
फोटो काढणं, व्हिडिओ शूट करणं वगैरे वगैरे नेहमीचे उपचार झाले, पण त्या क्लिप्स आता पाहिल्या कि काय वाटतं हे मला सांगता येत नाहिए.
लई तहान लागल्यावर बदाबद थम्स-अप पिलंयत का कधी?
तसं पिल्यावर - डोक्याला - म्हणजे टाळुच्या लगेच वरच्या डोक्याला, म्हणजे टक्कल पडायला लोकांना जिथुन सुरुवात होते - डोक्याच्या त्या पार्टला जशा झिणझिण्या येतात, तशाच मी मुक्ताला हातात घेतल्याच्या आठवणी येताहेत.

मुक्ता येणार हे बरेच दिवस माहित होतं.
बऱ्याचदा

---------------------------------------------------

मुक्ताला पहिल्यांदा हातात घेतलं तो क्षण वगैरे अंधुक आठवतोय.
आय मीन दोन आठवड्यापुर्वीची तर गोष्ट. पण मागचे दोन आठवडे जग असलं ढवळुन निघतंय सगळं ब्लर होतंय.

---------------------------------------------------

भींचे हुए जबडे दर्द कर रहे है।
कितनी देर तक दबाया जा सकता है अंदर खौलतें हुए लावे को?
किसीभी पल खोपडी क्रेटरमें बदल जाए
उससे पेहले जानलेवा ऐठनको लोमडीकी पुंछसे बांधकर दाग देना होगा।
हमलेसे बढकर हिफाजतकी कोई रणनीती नहीं है।
बेकार है ये सवाल कि संगीन किस कारखानेमें ढली है।
फर्क पडता है सिर्फ इस बातसे कि कौनसा हाथ उथे थामें है और किसका सीना उसकी नोंक पर है।
फर्क तो पडता है केवल इस बातसे कि उस जादूनगरीपर किसका कब्जा है
जहां रात दिन पसीने कि बुंदोंसे मोतीयोंकी फसल उगाई जाती है।
मानवता के धर्मपिता न्याय और सत्य का मंत्रालय कंप्युटरको सोंप कर आश्वस्त है।
वहीं निर्णय देगा -
निहत्थी बस्तियोंपर गिराए गए टनों नापाम बम
या तानाशाहकी बुलेटप्रुफ कारपर फेंका गया एकलौता हथगोला -
इन्सानियतके खिलाफ कौनसा जुर्म संगीनतर है?
दरसल -
इन्साफ और सच्चाईमें इन्सानी दखलसे संगीन जुर्म कोई नहीं है।

ताकत -
ताकत बंदुककी फौलादी नलीसे निकलती है
या कविताकी कागजी कारतूससे?
जिसके कोषमें कहेनेका अर्थ है होना
और होनेकी शर्त लडना -
उसकेलिए शब्द किसीभी ब्रह्मसे बडा है
जो उसकेसाथ हर मोर्चेपर खडा है।
खतरनाक यात्राके अपने आकर्षण है
आकर्षक यात्रा के अपने खतरे।
इन्ही खतरोंकी सरगमसे दोस्त निर्मित करना है हमें दुधारी तलवार जैसा अपना संगीत।

भींचे हुए जबडें अब दर्द कर रहे है।
कबतक दबाओगे खौलते लावेको?

-----------------------------------

परावृत्त करण्याचा प्रयत्न करुन झालाय - आता शिस्तीत धमकी - पुढे वाचु नका. परिणामांना मी जबाबदार नाही.

--------------------------------------
मिरची!

मला हे लिहायला अजिबात वेळ नाहिए.
मला माझ्या XXXXXXXX कारण XXXXXXXXXX! ह्याच्या बद्दल मी XXXXXXXX यापैकी कुणालाही सांगितलं नाहिए - मुक्ताला सांगितलंय - पण ती वेगळीच स्टोरी आहे....

-------------------------------

बरं तर सांगायचा मुद्दा असा कि मे बी वर्षभरापुर्वी एका पुलाच्या कामासाठी एका साईटवर जायला लागायचं. त्यात सगळ्यात बोरिंग गोष्ट म्हणजे सकाळी सात वाजता तिथे पोचायला लागयचं. एके सकाळी साईटवर पोचायच्या आधीच्या शेवटच्या सिग्नलला लेफ्ट टर्नची वाट बघत उभा होतो. पाऊस पडत होता, आणि सकाळचे सात वाजलेले असुनही थोडं थोडं उकडत होतं. (त्याचं कारण गाडीतला हीटरही असेल कदाचित (!)) पण उकडत होतं. मी आपला खिडकीची काच खाली करुन, मोठमोठ्याने ’सारे जहांसे अच्छा...’ वगैरे गात झोप घालवण्याचा प्रयत्न करत होतो. लेफ्ट सिग्नल मिळत नव्हता म्हणुन बोर होऊन मी उजवीकडे पाह्यलं आणि माझी झोप उडाली. कारण उजवीकडच्या ड्राईव्ह थ्रु कॉफी शॉपच्या खिडकीत उभी राहुन एक पोरगी (बहुतेक) कॉफी चा कप कि ग्लास भरत होती. ती काय करत होती हे मला सपशेल आठवत नाहिए कारण तिने अत्यंत तोकडी टु पीस बिकिनी घातलेली. (इथे मी स्वत:ला ईमॅजिन करतो तेव्हा मी एक कार्टुन कॅरॅक्टर आहे असं मला दिसतं - ज्याचे डोळे स्प्रिंग लावल्यासारखे बाहेर लटकताहेत!).
माझं ’सारे जहां से ...’ वरच्यावर अडकलं! मागच्या गाडीचा हॉर्न ऐकुन मी भानावर आलो तेव्हा ती पोरगी माझ्याकडे बघुन खट्याळ हसत होती (अस ऍटलिस्ट मला वाटलं)!

अशा "dazed" कंडिशन मध्ये मी साईट्वर पोचलो तेव्हा टिम माझी वाटच बघत होता.
म्हणाला - काय झालं? ठीक आहेस ना?
मी म्हटलं - मी ठीक आहे रे, पण मे बी मी फारच झोपेत होतो, कारण मी जे काही पाहिलं ते रिअल लाईफ मध्ये दिसणं शक्यच नाही!
तो म्हणे - आयची जय, काय पाह्यलं?
मी म्हटलं - अरे, मी त्या सिग्नलला उभा होतो ना, तेव्हा मी - असं असं - पाहिलं.
तर तो म्हणे - असं असं म्हणजे काय? डिटेल मध्ये सांग ना!
म्हटलं - च्यायला पकवु नकोस - असं असं म्हणजे काय ते तुला पण माहितीए.
मग त्याने साईटवरच्या तमाम जनतेला बोलावुन ’अब्जित ने असं असं पाहिलं’ असं सांगितलं.
मग सगळेच हसायला लागले - म्हणाले, अरे इतके दिवस या साईटवर येत असुन तुला काहीच दिसलं नाही?

---------------------

आई शपत हे असं झालं कि चिडचिड होते.
रविवारी हजार कामातुनही लईच किडा डोक्यात गेला तेव्हा लिहायला लागलो. झोप आली तेव्हा १-२ paragraphs च झाले होते. आता काहीतरी लिहु म्हणुन इकडे आलो तर आठवत नाहिए काय लिहायचं होतं ते. नाही म्हणायला माझ्या नावाचं ’अब्जित’ पासुन ’अबेजे..?त? - am I right?’ पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे भजं होतं. माझं नाव उच्चारताना लोकांच्या चेहऱ्यावरच्या गटांगळ्या पाहुनपण मजा येते.

---------------------

तुम्ही इथपर्यंत वाचत आला असाल तर थोर आहात.

टिंब.
टिंब.
टिंब.

---------------------

आता अजुन वाचत असालच तर मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचं देणं लागतो (असं मला उगीचच वाटतंय).
कवितांची पुस्तकं विकत घेऊन वाचणं वगैरे प्रकार मी भारतात असताना कधी केला नव्हता (अमेरिकेत राहुनही केला नाहिए, पण असं अधुनमधुन ’मी परदेशात रहातो’ चे पुरावे टाकले कि (मग तरी) लोक मला सिरियसली घेतील असा माझा गोड गैरसमज). एकतर बिबवेवाडी बसस्टॉप मागच्या रद्दीच्या दुकानात मिळतील तेवढ्या कविता (किलोने) विकत घ्यायचो. मग त्यातल्या प्रेमभंगाच्या वगैरे कविता फाईल करुन ठेवायचो. कधी केलं नसेल तर करुन बघा - आठवणी उगाळायला यांचा लई उपयोग होतो.

आयची जय - परत एकदा १२.०१ - लगेच संपवायचं असल्याने पाल्हाळ बंद.
प्रश्न बिश्न पडण्याएवढा पेशन्स असेल तर विचारा. नाही विचारलेत तर माझी उत्तरां बित्तरांची मगझमारी वाचेल.

----------------------------------

इतकावेळ लिहिलंय ते म्हणजे absolute चुत्याप्स होतं, पण सलील वाघ ची ही कविता मी इथे ’उगीच’ टाकत नाहिए.
मी बरेच दिवस सलीलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण नंतर म्हटलं ’एवढा’ संपर्क रोज होत असताना - कशाला उगीच conventional संपर्कांच्या फंदात पडा! मला कुणी शोधत आलं तर मी किती embarrass होईल!
तर -


सव्वीस -

बारकावे समजतील असं धोरण ठेवलं
टिकाणी पोचेपर्यंत प्रतिकीकरण करत आणलं
षड्रिपुंचं अरण्यरुदन शब्दांच्या व्यासपीठावर
ठेवून
मनमुराद पडताळा घेत मी जमिनीत शिरलो
पुढं गेल्यावर एक अंधार भेटला तो खडक होता
साशंक भाषा शिलगावून
भुरूभुरू पुढे गेलो
रस्ते दिसले न दिसले तरी
ओळख झाली न झाली तरी
माती भिजली न भिजली तरी
स्वत:चा जीव
खुडुन तळहातावर ठेवला
दिवसेंदिवस टाळली
ती कविता आता ही
लिहिली
न लिहिली तरी

--------------------

आणि ही लिहिण्यापासुन मला स्वत:ला परावृत्त करता येत नाहिए -

अठ्ठावीस -

काव्याची एवढी ह्या
उलटी पाचर बसेल
असं वाटलं नव्हतं
आता नंतर लफडं नको
हे मी
आत्ताच सांगून ठेवतो आधी
माझे चुकीचे अर्थ निघतील
माजं मौलिक ढापलं जाईल जगात
मी नको तसा रुपांतरीत होईन
माझ्या नंतर माझ्या मागे
कवितेबाहेरच मी केवढातरी सापडतो
प्रयत्नांतीही कवितेत सगळा
संपूर्ण शिरु शकत नाही
पुरुनही उरतो
अपरिमेय
कवितेच्या आणि माझ्या
व्यतिरिक्तातच
मी माझ्या वर्माची साधना करु शकतो

माझा सडा पडलाय माझ्या आजुबाजूला
मी चालत येतो माझ्याकडे चहुबाजूंनी
माझ्या समुद्रावरुन
मी येतोय का जातोय
ते मला सांगता येणार नाही
ने आण होते माझ्यात कसलीतरी
ये जा चालू असते कसली ना कसली रहदारी
गोड लाडावलेलं आकाश
पावसोत्तर प्रकाशाला
दैदिप्य पुरवतं
दिवसरात्री उचंबळतात भरुन येतात
सूर्यास्तानंतर दोन अडीच
चकचकीत ढग आग्नेयेला
तब्बल कबूल झाले कह्यात
वस्तुत्वकेंद्राचे तरंग माझ्यात
- एकसंपाती
लागोपाठ उद्‍भवत
फेर धरणाऱ्या
अवधींचा वेढा
जोरदार मी परतवतो
एकामागोमाग एक
थांबायची बात नस्से

- सलील वाघ.

Sunday, June 29, 2008

अरे रुक जा रे बंदे!

नविन जॉब सुरु केल्यापासुन बसने ऑफिसला जातोय.
बसमधले अलिखित नियम -
खिडकीशेजारची जागा मोकळी असताना इकडे तिकडे बसु नये.
शक्यतो एकेकटे बसावे.
इतरांशी बोलु नये.
स्मितहास्य वगैरे वर्ज्य.
अगदीच जागा नसली तर कुणाच्या शेजारी बसायला हरकत नाही.
त्यातही पुरुषांनी पुरुषांच्याच शेजारी बसावे (आणि बायकांनी बायकांच्या) - किंवा गेला बाजार आपापल्या बायकांच्या.
पण काहीही झालं तरी - म्हणजे अगदी जग पालथं झालं तरी - देसींनी देसींशेजारी बसु नये!
तसा प्रयत्न करु नये - अपमान होईल.
म्हणजे अगदी अपमान वगैरे नाही होत - पण मग तो देसी फोन काढुन गुल्टित किरकिर करायला लागतो.
मग आपली - ’जागा नको पण फोन आवर’ परिस्थिती होते!

एनीवे -

अशात काल गंमत झाली.
मी आपला आयपॉडवर गाणी ऐकत एक रिपोर्ट रिव्ह्यु करत होतो तर एक (अर्थात आयटम) देसी पोरगी माझ्या शेजारी येऊन बसली. म्हटलं चला! अजुन कशात काही नाही पण नियमाला अपवाद - हे ही नसे थोडके!!
म्हणुन मग मी कालच बायको ने प्रेझेंट दिलेला छोटुकला आयपॉड शफल खिशातुन बाहेर काढुन इंप्रेशन मारायच्या तयारीने बसलो.
मग ’चायना गेट’ मध्ये नासीर ज्या सहजतेने मागच्या खिशातुन भला मोठा सुरा काढतो - त्या आवेशात आयटमने (मागच्या खिशातुन) तिचा आयपॉड नॅनो काधला! (मग मी (ओघाने) चाट पडलो वगैरे वगैरे).
तिने तो नुसता बाहेर काढला नाही तर त्यावर ’परदेसी परदेसी जाना नहीं’ हे कर्णबधीर गाणं लावलं.
मग मी कैलाश खेरला ओरडायला लावुन तिचा आवाज मिट्टीमध्ये मिळवला (भा.पो.).
ऐक ना - पुढे आणखी गंमत.
(च्यायला मी लिहायला लागलो कि मला नको नको ते फाटे फुटत जातात.
म्हणजे या गमती वगैरे लिहायचं हे डोक्यातच नव्हतं.
बर ही सांगतो आधी).
म्हणजे झालं असं कि ओव्हरलेकला पोचेपर्यंत बाईंचा पाय माझ्या पायाला लागतोय अशी मला (खात्रीपूर्ण) शंका आली!
मग मी माझ्या दोन्ही हातातल्या ’strategic’ अंगठ्या वगैरे (दोन्ही हातांनी) फिरवत ’बाई - गैरसमज होतोय’ वगैरे (चिल्ला चिल्लाके) समजावण्याचा प्रयत्न सुरुवात करता करता कानात ’अरे रुक जा रे बंदे’ सुरु झालं.
इथे मी ऍक्चुअली थांबलो. (का ते माहित नाही).
पुढे ’अरे थम जा रे बंदे’ वर मी एक (खोल) श्वास घेतला.
पण ’के कुदरत हस पडेगी....होsss!’ वर माझी टोटल फाटली.
मग ’च्यायला - रुक जा काय!’ वगैरे वगैरे प्रश्न (मनातल्या मनात मनाला) विचारत मी काढता पाय घेतला.
च्यायला! ’काढता (आणि) पाय (आणि) घेतला’ या वाक्याने मला चांगलंच बुचकळ्यात टाकलंय!!
म्हणजे सांगायचा मुद्दा असा कि - माझाच पाय मीच बाजुला घेतला.
पण मॉन्टलेकला पोचेपर्यंत पुन्हा तेच!
च्यायला मग मी उखडलो आणि ’ओ बहेनजी - आपको बाप भाई नहीं है क्या?’ च्या आवेशात तिच्याकडे पाह्यलं तर कळलं कि बाई झोपल्यात! यावर मला हायसं आणि निराश असं एकत्र वाटलं.
पुढे आणखी गंमत आहे, पण ते जाऊ दे.

तर सांगायचा मुद्दा असा कि देसी देसींचं असं अगदी विटाळ नसलं तरी टाळाटाळ नातं असताना, घरी परत येताना १० मिनिटं माझं निरिक्षण करुन (सगळे अलिखित नियम धुडकावुन) सिराज माझ्या शेजारी येऊन बसला तेव्हाच मला तो अमेरिकेत नवा असल्याची खात्री पटली.
त्याने कागदावर लिहिलेला पत्ता दाखवत ’इथे जायला स्टॉप कुठला?’ हे विचारलं आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या.
म्हणजे बोलत मी होतो आणि ऐकत तो. (असल्या ’गप्पा’ मला भयंकर आवडतात).
गप्पांना - त्या पण ’एवढ्या’ गप्पांना कारणही तसंच होतं.
म्हणजे - ’तु कुठला?’ वर (’चीनी कम’ मधल्या कोलगेटच्या टोनमधे) ’हाईद्राबाद’ असं उत्तर मिळाल्यावर मी त्याला आणखी थारा देण्याचा काही स्कोपच नव्हता, पण का कुणास ठाऊक मी माझ्या सासुरवाडीचं (अ)ज्ञान पाजळायला म्हणुन ’हायद्राबाद - म्हणजे प्रॉपर कि....’ विचारलं आणि तो ’गुन्टकल’ म्हणुन गेला.
म्हणुन गप्पा सुरु झाल्या.
झाल्या त झाल्या - लांबल्या.
लांबल्या त लांबल्या - त्याला जेवायला घरी घेऊन गेलो तिथे सुरु राहिल्या.
गप्पा म्हणजे - आयुष्यातली एकमेव दुपार ज्या गुन्टकल मध्ये काढली त्या दुपारच्या आठवणींना उजाळा.
आता तो उजाळा आयपॉडमधुन, ओरहान पामुकच्या ’स्नो’ मधुन, तेराव्या मजल्यावरुन दिसणाऱ्या समुद्राच्या पाण्यातुन - आणि न लिहिलेल्या ’यात्रा’ तुन पुन्हा एकदा झिरपत राहिलाय.

कुठल्याही गोष्टीचं एवढं विश्लेषण करु नये - नाहीतर तुमचा ’विदुषक’ होतो - असं जी.ए. म्हणतात.

ते बहुतेक खरं असावं.

(sort of अपूर्ण - पूर्ण व्हायचा स्कोप कमी).

Tuesday, May 06, 2008

वहाँ दासताँ मिली....

बर्फ आणि धुक्याचा राडा

सगळीकडे नुसतं धुकं, बर्फ, पाऊस, बोचरा वारा, डोंगर, त्यांचे सुळके, जागा मिळेल तिथे उगवलेलं, उंचच उंच वाढलेलं पाईनचं जंगल, गोठलेलं भलं मोठं तळं, डोंगरउतारावर रस्ता काढायच्या नादात बनलेले उंचच उंच कडे, त्याच्यावरुन निखळणारे दगड, सततची ऍव्हलान्शची भिती, आणि मान वर करुन कड्याच्या वरच्या जंगलाकडे पाहिलं तर अस्वल दिसेल अशी मनात भंपकसारखी घर करुन राहिलेली भावना.

आणि हो - मी.

मी -
सुरुवात इथुन होते आणि झोपायच्या आधी शेवट इथेच होतो.

काल दुपारी कंट्री सॉंग्ज ऐकत घरुन निघालो या साईटवर यायला. नविन जॉब घेतला. नविन म्हणजे तसा जुनाच. ब्लॉग लिहायला सुरुवात केली - म्हणजे मराठीत ब्लॉग लिहायला - तेव्हा ज्या इंटर्व्ह्युला निघालो होतो, तोच जॉब दोन वर्षांनंतर स्विकारला. त्यात बायको माहेरी गेलेली असताना त्यांनी - महिनाभर साईटवर जाशील का म्हणुन विचारल्यावर बोरियतमध्ये हो म्हटलं. इतर सगळे लोक जायला नाही का म्हणत होते, ते इथं आल्यावर कळलं.
म्हणजे अगदी कुठे स्मशानात वगैरे काम नाहिए, पण सुरुवातीला म्हटलं तसं - सगळीकडे नुसतं धुकं, बर्फ, पाऊस, बोचरा वारा, डोंगर, त्यांचे सुळके....आणि मी.

हे अमेरिकेतलं बरंच फेमस स्कीईंग रिसोर्ट.
पण हिवाळा संपायला (आणि यांचा सिझन संपायला) आणि मी इथं यायला काहीतरी विक्षिप्त टायमिंग जुळायला लागतं - तसा मी इथे. च्यायला काय करावं?
येताना - एवढा एकांत मिळतोय तर भरपुर लिहावं असा विचार केलेला, पण असा विचार डोक्यात येणं याचा अर्थच मुळी अश्या विचाराला नाट लागणं असा होतो. त्यामुळे प्रयत्न करुनही काहीही सुचणं अशक्य.

ऍलन टेलर चुत्या आहे.
’चुत्या’ हा माझा सिग्नेचर शब्द बनायला लागलाय कि काय अशी शंका मला यायला लागलिए.
काहिही लिहायचं म्हणजे - चुत्या म्हटल्याशिवाय मला बहुतेक माणसात आल्यासारखं वाटत नाही.
तर - ऍलन टेलर चुत्या आहे.
५०० मिलियनचा प्रोजेक्ट आहे (असं ऐकुन आहे). प्रोजेक्ट टीम २-३ ठिकाणी डिजाईन्स करतिए. वॉल्स आणि फाउंडेशनची डिजाईन्स मला करायचिएत, प्रोजेक्ट २ वर्षांपुर्वी सुरु झालाय आणि पुढच्या २ वर्षांत संपवायचाय आणि आमचं गाडं अजुन कन्सेप्चुअल डिजाईनपाशीच अडकलंय. त्यात बरेच लोक सोडुन गेले - म्हणुन माझ्यासमोर पायघड्या. मला या प्रोजेक्टबद्दल पप्पु एवढा गंध. पप्पु म्हणजे गुल्टी चिंच-गुळाची आमटी - म्हणजे मला या प्रोजेक्टचा आमटीएवढा गंध. (याचा अर्थ गंध नाही).
आणि म्हणुन ऍलन टेलर चुत्या.
आज ड्रिलिंगचा पहिला दिवस आणि बाप्पुला ड्रिलिंग लोकेशन्स माहित नाहीत, जी.पी.एस. कसा वापरायचा माहित नाही, ड्रिलर्सवर वचक कसा ठेवायचा माहित नाही, बर ते कमी म्हणुन त्याच्या जोडीला यिन आणि यॅंग.
दोघंही चिंकु.
यिन चिंकु - वय वर्ष ४६.
यॅंग चिंकु - वय वर्ष ४७.
आज या दोघांनी (अगदी छापा-काटा करुन) माझा एकेक कान वाटुन घेतला.
दिवस संपेपर्यंत आपापल्या वाट्याला आलेल्या कानाचा पार चावुन चावुन चोथा करुन टाकला.
च्यामायला - दोघं चिंकुत बोलतात. त्यांना म्हटलं - अरे चिंकुत काय बोलताय? तर ते एकदम ऑफेन्सिव्ह झाले - म्हणे हे चिंकु नाही - मॅन्डॅरिन आहे. च्यायला मला एकदम ’दलाई लामा झिंदाबाद!’ म्हणायची उबळ आली.
नंतर ते दोघही माझ्याशी मॅन्डॅरिनमध्ये बोलायला लागले - मग मी उचकलो - म्हटलं - बाप्यो, मला ही मॅन्डॅरिन येत नाही! तर म्हणे मॅन्डॅरिन कुठे? आम्ही तर आत्ता इंग्लिशमध्ये बोललो!
मग म्हटलं - जाऊ द्या राव - आपल्या खाणाखुणांतुन अर्थ पोचल्याशी मतलब. या लोकांना फोन करायचा म्हणजे अंगावर काटा येतो.
तर हे यिन आणि यॅंग.
चावु असले तरी हुशार आहेत.
म्हणुनच ऍलन टेलर आणखीनच डोक्यात जातो.
च्यायची जय!
कामाचा गंध नाही, उगीच झुलपं उडवत फिरतो, बायकोला बरोबर घेऊन आलाय, गरज पडेल तेव्हा हमखास नसतो, असला तर त्याला (पप्पुचा) गंध नसतो.
हा माणुस झोल करणार.

तर - आज पहिल्याच दिवशी एवढा कावलो आणि हॉटेलवर परत आलो.
म्हणजे यायला निघालो.
आत्तापर्यंत कंट्री सॉंग्जचा कंटाळा आलेला.
ग्लव्ह कंपार्टमेंटमध्ये हात घातला आणि हातात आलेली पहिली सी.डी. (Abhi the great - vol. 3) प्लेयरमध्ये टाकली.
परत एकदा - धुकं, घाट, बर्फ आणि मी.
आणि नेमाडे.
भालचंद्र नेमाडे ’कोसला’ वाचायला लागले!
सुर्शाचं आधीपासुनच मराठी होतं - इथपासुन गाडी सुरु झाली ते महामहोपाध्यायांनी एसवीसन एकोणिशशे ऐंशी बद्दलची काय मतं मांडली येईपर्यंत हॉटेलवर पोचली.
बेचिराख बर्फाकडे पहात किती वेळ नेमाडे ऐकत गाडीत बसलो काय माहित.
तिरिमिरीत वाटलं ट्रंकमधुन फील्ड नोटबुक काढावी आणि नेमाड्यांचे शब्द ऐकत ’कोसला’ लिहावी.
दरवाजा उघडला तर बोचरी थंडी वाजली - मग गुपचुप हॉटेलमध्ये येऊन बसलो.
टी.व्ही. लावला, आंघोळ केली - पण डोळे बंद केले तरिही बर्फमिश्रीत धुक्याचा पापुद्रा डोळ्यांसमोरुन हटत नाही.
खिडकी उघडली तर समोर चार इंचांवर कुणीतरी पांढऱ्या कापडाचा मांडव घालावा तसा बर्फ! च्यायला घरातली एक भिंत बर्फाची असल्यावर खिडकीसाठी पडद्यांचीही गरज नाही. आता तर डोळ्यांसमोर पापुद्रापण नाही - आख्खी भिंतच.
च्यायला धुकं बिकं म्हटलं कि आपल्याला ’माया मेमसाब’ आठवायचा - आता च्यायला इतक्या धुक्यात ऍव्हालान्श आला तर काय करायचं याचीच भिती. याबद्दलचं (मानसिक) ट्रेनिंग ’रारंगढांग’ पुरतं मर्यादित....

आणि त्यात परत ऍलन टेलर चुत्या.

--------------------------

बऱ्याच प्रोजेक्ट्स बद्दल बरंच लिहावंवंसं वाटतं, पण राहुन जातं.
आता अनायासे करायला (म्हणजे हॉटेलवर परत येऊन करायला) काम धंदा नसल्याने लिहु म्हणतोय.
२० दिवसांचा प्रोजेक्ट आहे, एकच दिवस झालाय.
लाईव्ह पहिल्यांदाच लिहितोय - त्यामुळे अर्थातच पुढे काय होणार माहित नाही.
सगळी पात्रं अर्थातच खरी आहेत, आणि अर्थातच त्यांची नावं बदललिएत. ऍलन बॉर्डर आणि त्यानंतरचा मार्क टेलर - त्यामुळे ऍलन टेलरचं नाव ऍलन टेलर पडलं - त्याला मी जबाबदार नाही.
लेखाचं नाव - बर्फ आणि धुक्याचा राडा असं ठेऊ.
भाग बिग नको म्हणुन - इथुन पुढचं इथेच.
तरी रेफरन्स मध्ये झोल नको म्हणुन प्रत्येक भागाचं नाव वेगळं ठेऊ.

--------------------------

दिल दर्द का टुकडा है....

आज यॅंग चिंकु परत गेला आणि मी दिवसभर यिन चिंकुशी सुरक्षित अंतर ठेवलं.
असं म्हणेतो संध्याकाळी त्याने मला गाठलंच.
रॉक कोर सँपल्स लॅबला पाठवण्याची तद्दन गावठी प्रोसीजर त्याने लई रंगवुन दोन तास समजावुन दिली. ती ऐकुन इतका वैताग आला कि याला सहन करतो म्हणुन ऍलन टेलर बद्दलही मला सहानुभुती वाटली!
त्या कावाकावीचा विचार करत करत परतत होतो तर एक्झिट चुकुन आठ अधिक आठ असा सोळा मैलांचा वळसा पडला....
पार्किंग लॉटमध्ये गाडी लावली आणि म्हटलं गेलं उडत सगळं - मी चाललो फिरायला.

शॉर्ट कट मारुन इथलं वर्णन करायचं म्हटलं तर निकल्सनचा ’द शायनिंग’ पाह्यलाय का? तर तिथल्या हॉटेलचं करावं लागेल. सिझन संपुन ओसाड पडलेलं एक सहलीचं ठिकाण. आणि गारीगार एकटेपणा वगैरे वगैरे....
वेल, इट डिपेंड्स.
आज धुक्याने मूड बदलला आणि महाबळेश्वरात भर पावसाळ्यात फिरतोय असं वाटायला लागलं.
मागच्या वेळेस इथे आलो होतो तो माधुरी, आयोडेक्स आणि डिस्को बरोबर. तेव्हा सहा एक फूट बर्फ होता, तो आता पंधरा फूट वगैरे झालाय.
बर्फ इतका असला तरी, तापमान शुन्याच्या वर गेल्यानं तो वितळायला लागलाय आणि म्हणुन स्कीइंग बंद.
माझ्या गुहेतल्या बर्फाच्या भिंतीच्या एका टोकाकडुन बर्फाची शुभ्रता वाढत चाललिए असंही मला वाटायला लागलंय....
बर्फ वितळला कि त्याचं पाणी होतं! (असं वाक्य मीच लिहु शकतो, हे माझं मलाच पटल्याने मलाच माझं कौतुक वाटायला लागलंय! :))
पण त्यामुळे होतं असं कि सगळीकडुन पाणी गळत असतं किंवा बाहेर पडल्या पडल्या पाण्याचाच आवाज आधी जाणवतो. धुकं तर नेहमीचंच - त्यामुळे पावसाची रिपरीप सतत चालु आहे का असं वाटत रहातं....
धुक्याचं आणि सुर्यकिरणांचं युद्ध दिवस चालु झाल्यापासुन सुरु होतं ते संध्याकाळपर्यंत संपत नाही. पण बहुतेक वेळ धुक्याचाच माज जास्त चालतो.
साईटवर तळं, डोंगर, बर्फ, आणि मधुन मधुन पडणारं ऊन - हे निसर्गदृश्य दिवसभर धुक्याला टांगलेलं रहातं.
सगळ्यात वैतागाची गोष्ट म्हणजे अशा थ्री डायमेन्शल व्ह्यु मध्ये विचार करायला भरपूर वेळ मिळतो आणि इथेच गोची होते.
कॉलेजमध्ये रॉयसी आणि राजेश दोघं बॅकी होते - मी लेफ्ट मिडफील्ड खेळायचो. तसा माझा खेळ कबड्डी, पण अकरा लोक भरायचे म्हणुन फुटबॉल टीममध्ये मी पण. तेव्हा रॉयसी ने एक टेक्निक शिकवलं होतं. तो म्हणे बॅकीचं काम सगळ्यात सोपं. बदाबदा धावत फॉरवर्ड बॉल घेऊन येत असेल नुसतं त्याच्या समोर उभं रहायचं. त्याच्या मनात तुमच्या दसपट जास्त टेन्शन्स असतात. त्यात तो एवढा गुरफटतो कि स्वत:च काहितरी चूक करतो आणि बॉल आपसुक तुमच्याकडे येतो! मला खरं नव्हतं वाटलं, म्हणुन थोडे दिवस बॅकी होऊन पाह्यलं आणि विश्वास बसला.
तर सांगायचा मुद्दा असा कि विचार बिचार करायला वेळ मिळाला कि मी त्या फॉरवर्ड सारखा होतो आणि माझा एक्झिट येईपर्यंत माझी गोची झालेली असते.
आजची गोची म्हणजे - का कुणास ठाऊक आज भर दुपारच्या कोवळ्या उन्हात मला ’अस्तित्व’ आठवला.
थोडा आणखिन प्रयत्न केल्यावर तब्बु बद्दल मजबुत सहानुभुती वाटल्याचंही आठवलं. आणि सचिन खेडेकर आणि सुनील बर्वेला खरंच शिव्या का घालाव्यात असंही वाटुन गेलं.
तेवढ्यात स्काय नावाच्या एका हेल्परने पांढऱ्या शेपटाची घार दाखवली.
तिचे फोटो काढले.
मग अचानक एक सहा फुटी खडक डोंगरावरुन गडगडत खाली आला. त्यावर जरा हाय हुय झालं. त्याच्या धक्क्याने एक झाड पडलं.
रस्तारुंदीत आधीच कापलेले कडे आणखी कापायचे कि रस्ता तळ्यात ढकलायचा यावर जुगलबंदी चालु असताना या रस्त्यावर एक कॉंक्रीटचा बोगदा बांधुन वरुन येणारा ऍव्हालान्श बोगद्यावरुन तळ्यात जाऊन द्यावा असा एक सनसनाटी विश्वनाथी विचार माझ्या डोक्यात तळपुन गेला. रारंग ढांगात डंपी लेव्हल ठेवायला जागा नव्हती - मग एवढ्या उतारावर ड्रिल रिग ठेऊन सॉईल सॅपल्स कशी घेणार या कारणावरुन विश्वनाथाला जेम्स राईटने कटवलं होतं. इथं आमचे जेम्स राईट म्हणताहेत कि - त्यात काय? आपण हेलिकॉप्टरने ड्रिल रिग उचलुन ढांगावर ठेऊ.
म्हटलं ठेऊ तर ठेऊ.
माझा आणि राईट साहेबांचा अजुन तरी सुखसंवाद चालु आहे. पण मध्ये नायरसारखे देणं घेणं नसलेले आणि बंबा सारखे बधीर लोकही आहेत. ऍव्हालान्श थांबवु तर शकत नाही - पण दर वेळेस रस्ता बंद करण्याची तसदी कशाला या कारणाने निर्मिती चालु.

सकाळी सकाळी - म्हणजे भल्या पहाटे सव्वा सहाला सगळे इथल्या फायर स्टेशन कम वर्कशॉपमध्ये जमतात.
दोन महिन्यांपुर्वी इथल्या एका जवळच्या गावातल्या काही बिल्डिंग्ज चं साईज्मिक रिट्रोफिटिंग केलं - म्हणजे ऍक्चुअली केलं नाही - नुसते रिपोर्ट लिहिले - कसं करायचं याचे. असे नाकर्ते रिपोर्ट्‍स लिहिले कि चिडचिड होते.
साईज्मिक रिट्रोफिटिंग म्हणजे - भुकंप झाला तर ही उभी असलेली बिल्डिंग ’ढेर’ होऊ नये म्हणुन त्यात जे काय बदल करतात ते.
तर त्या दरम्यान काही फायर स्टेशन्स पाहिली - म्हणजे अग्निशामन विभागाची दुकानं. तिथल्या फायर फायटर लोकांशी गप्पा मारल्या. त्यांनी आगीशी लढायचा खेळ शिकवणारी घरं फुल टु आग वगैरे लावुन दाखवली. पण सगळ्यात जास्त कौतुकाने दाखवलं ते त्यांचं जिम! म्हणजे असं कि - रोज रोज सकाळ संध्याकाळ काय आगी लागत नाहीत. मग उरलेल्या वेळात शक्तिप्रदर्शन म्हणुन जिम. वेल एक्झॅक्टली शक्तिप्रदर्शन नाही - त्याचे त्यांच्या व्यवसायात होणारे फायदेही बक्कळ आहेत, पण तरी....
तर हे असं फायर स्टेशन.
रोज सकाळी सकाळी २३ पुरुष ’आज काय करायचं?’ याच्या मीटिंगला बसले कि जे व्हायचं ते होतं. Testosterone नुसतं भरभरुन वहात असतं.
रस्त्यावरच्या वहानांपासुन आणि इतर नैसर्गिक आपतत्तींपासुन बचाव म्हणुन आम्हाला एक दहा लोकांचा भीमकळप दिला गेलाय. शरीरयष्टी सोडली तर हे लोक आणि आपल्या शिक्षण संचालनालयातले कर्मचारी यांच्यात मला तरी फरक जाणवत नाही. म्हणजे असं कि SSC, HSC बोर्डातल्या लोकांना वर्षभर कसं कुत्रं विचारत नाही, पण परिक्षा, रिझल्ट, ऍडमिशन आल्या कि या लोकांची चलती असते - तसं.
म्हणजे कडे बिडे कोसळले, आकाशातुन ढिगभर बर्फ पडला, पुर बिर येऊन रस्ता बुडाला कि या लोकांना शक्तिप्रदर्शनाची संधी मिळते. अशा वेळेस हे लोक अशक्य कोटीतलं काम करतात. इतर वेळेस वादळवाऱ्याचा धावा करत झोप घालवण्याचा प्रयत्न करतात.

बर ते सगळं नंतर.

संध्याकाळी फिरायला गेलो आणि लगेचच धुक्याने वेढलं.
रिसोर्टकडे चालत राहिलो.
मग मध्येच बर्फाचं मैदान लागलं.
मग कळलं कि सगळीकडे पांढराच पांढरा बर्फच बर्फ.
वर पाहिलं तर तीन तीन बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं.
डावीकडाच्या दरीतनं येणारं धुकं समोरच्या कड्याला वळसा घालुन घाई घाईत डोंगराकडे चाललेलं.
च्यायला - कॅमेरा गाडीत राहिला.
मग म्हटलं चांगलं झालं गाडीत राहिला.
मग डोंगराखालच्या कुठल्यातरी घराच्या धुराड्यातनं येणारा धूर दिसला.
मग अचानक एखादं पीस उडत यावं तसे नकळत रस्त्याकाठचे दिवे लागले.
मग मला बर्फात पंजे दिसले.
मला वाटलं - आयला! अस्वल!!
पण पंजे अगदीच छोटे होते - कुणाचंतरी कुत्रं वगैरे असणार.
मग म्हटलं - कायको रिस्क लेनेका?
मग परत आलो.

आलो तर यिन चिंकुचा मेसेज - भायसाबको कलका डिस्कशन करना है!
मग त्याला मॅन्डॅरिनमध्ये शिव्या घातल्या.

-----------------------------

दिवस ३

आज ऍलन टेलरशी पंगा झाला.
त्याचा मुर्खपणा, बेजबाबदारपणा, आणि बौद्धिक दारिद्र्य याचे परिणाम मला भोगावे लागल्यानं त्याच्यावर उखडलो.
करतोय त्या कामातलं त्याचं अज्ञान इतकं टोकाचं अगाध आहे कि झिणझिण्या येतात....

झिणझिण्या जास्त झाल्याने पोस्ट उद्या.

-----------------------------

.....और पर नालोंसे खून बहें.....

या टायटलचा आणि जे काही लिहीन त्याचा काहीही संबंध नाही.
आज दुपारी गुलजारचं हे गाणं गुणगुणत होतो म्हणुन हे टायटल.
च्यायला प्रत्येक टायटल मध्ये गुलजार असलाच पाहिजे का? असा प्रश्न मलाच पडायला लागलाय.
सिव्हिल मध्ये ’प्रोजेक्ट’ म्हणजे काय, आमचं काम कसं चालतं - कंपनीचं स्ट्रक्चर कसं असतं वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणजे तुम्हा लोकांना यिन, यॅंग, टेलर, बंबा, राईट वगैरे लोकांची माहिती मिळेल.
पण ते सांगत बसलो तर बराच वेळ जाईल.
सकाळी उठुन बाहेर पडेपर्यंत दात घासणे, एकावर एक हजार कपडे चढवणे, दिवसभरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे तपासणे आणि शूज घालणे या सगळ्या गोष्टींना मिळुन मी दहा मिनिटं ठेवलेली असतात.
आज परत आल्यावर टबमध्ये सूर मारताना - दोनेक तास तरी लिहू असं ठरवलं होतं - ते आता १४ मिनिटांवर आलंय - त्यात जेवण इनक्ल्युडेड! :-(
माझ्यासाठी साधे स्पोर्ट शूज घालणे हा ही एक मोठा कार्यक्रम असतो - स्टील टो शूज घालणे सा तर आणखीच मोठा कार्यक्रम होतो.
पण मला हे शूज आवडतात.
एक तर यांची लेस कधी निघत नाही (हे मुख्य कारण), शिवाय यातुन थंडी कधी वाजत नाही.
स्टील टोज मुळे थंडी वाजते असं लोक म्हणतात - पण माझं (नेहमीसारखंच) उलटं असतं.
शिवाय - स्टील टो शूज आणि हेल्मेट घातलं कि लई भारी वाटतं हे एक वेगळंच.
परवा सेफटी जॅकेट घातलेलं माधुरीने पहिल्यांदाच पाहिलं - ती म्हणे तु यात किती वेगळा दिसतोस....

एनीवे -

टेलरला म्हटलं - चल बीयर मारु.
मग बोलता बोलता त्याला कुठकुठल्या गोष्टींची माहिती पाहिजे याबद्दल बोललो.
तो पण परवाच्या गोष्टीबद्दल सॉरी म्हणाला.
हे निस्तरतंय तर यिन आणि मी एकच काम वेगवेगळ्या प्रकारे करतोय हे लक्षात आलं.
त्यात कन्सिस्टंसी असणं महत्वाचं आणि ती आहे हे पहाणं यिंगचं काम - त्याचा अर्थातच त्याला पत्ता नाही.
बंबा शी बोलतो म्हटलं यिन ला तर यॅंग पेटला.
म्हटलं त्याला उभा आडवा घ्यावा - पण परत विचार केला कि जुम्मा जुम्मा दोन आठवडे झालेत जॉब जॉईन करुन. एकाच वेळेस समस्त जनतेशी पंगे घेणं बरोबर नाही.
मॅनेजमेंट में जाना है तो इन्ही लोगोंसे अपने तरीकेसे काम करवाना पडेगा - असं सत्यातल्या भिकु म्हात्रेच्या (देख - करना है, तो करना है) स्टाईलमध्ये स्वत:ला सुनावलं - मग ते ही मिटलं.

आता चार मिनिटं राहिली.

आज एक आर्मी कॉनव्हॉय साईटवरुन गेला.
७० माईल पर आवर ने जातानाही त्यांच्या हम्व्ही वर तीन तीन बाजुंनी मशीनगन्स धरुन सैनिक बसले होते - वाटलं च्यायला बगदाद वरुन परत आलोयत याचा मेमो या लोकांना मिळालाय कि नाही?
माझा एक मित्र अफघाणिस्तानात काम करायचा - म्हणजे त्याने थोडे दिवस केलेलं आणि दुसरा एक्सप्लोजिव्ह्ज एक्स्पर्ट होता - म्हणजे ’detect and destroy' पथकात.
त्यांच्या स्टोर्याही सांगितल्या पाहिजेत कधीतरी.

च्यायला एकदा गम्मतच झाली - काम करता करता रात्र झाली.
४ वर्षांपुर्वीची गोष्ट ही - बाल्टिमोर ला होतो - अजुन लग्न वगैरे झालं नव्हतं - त्यामुळे काम करता करता रात्र झाली वगैरे बद्दल फारसं काही वाटायचं नाही.
रॉजर रिग दुरुस्त करत होता तेव्हा त्याच्या हेल्परशी बोलायला लागलो.
तर तो म्हणे सी.आय.ए. मधुन रिटायर झालो!
च्यायला - म्हटलं तिथे काय करायचास?
डिटेक्टिव्ह होता - पण तो म्हणे बऱ्याच लो लेव्हलला होतो.
मग त्याने कुणाचा पाठलाग कसा करायचा, होणारा पाठलाग कसा टाळायचा वगैरे वगैरे लई भारीमध्ये सांगितलं.

च्यायला - सांगत वेगळंच होतो. आर्मीच्या बोटिंबद्दल.

ते आता उद्या.

ओळ अशी होती -
छतपर आकर गिध बैठे और पर नालोंसे खून बहे....
अरे कौन कटा है कौन गिरा है किसे मातम है कौन कहे....

त्याबद्दलही नंतर. (नाहीतर उद्या मला अनवाणी साईटवर जावं लागेल....) :))

-----------------------------

?

Discontinued for good....

Wednesday, March 19, 2008

चि. विश्वनाथ - हजामा, आठव!

आज ठरवुन बोर लिहायचा विचार आहे!
आय मीन - न ठरवताही बोर लिहिणार असेल तर च्यायला ठरवुन काही केल्याचं समाधान तरी का नको?
शिवाय युजुअली मन:स्थिती जशी असेल तसं लिहिलं जातं - त्यामुळे unpretentious लिहायचं असेल आणि जसं आहे तसं दाखवायचं असेल (बघणार कोण आहे म्हणा) तर बोरियत बाहेर पडणार.

काय विशेष नाय - सकाळी उठुन बायकोबरोबर ऑफीसला जातो.
घरापासुन पाच मिनिटांच्या अंतरावर बायकोचं ऑफीस - सहाव्या मिनिटाला माझं. (च्यायला आम्ही तरीसुद्धा दोन दोन गाड्या का विकत घेऊन ठेवल्यात काय माहित).
मग ऑफिसात जरा इकडे तिकडे, मग कॉफी, मग मेल्स, मग न्युज, मग थोडं काम, मग लंच, मग काहीतरी रटाळ काम आणि मग बायकोला घेऊन घरी.
तर हा दिनक्रम - त्यामुळे त्यात लिहिण्यासारखं काय घडणार?
गोष्टी बिष्टी लिहायच्या फडतुस विचारात अडकुन सहा एक महिने घालवले (त्यात एकही गोष्ट सुचली नाही).
ऑफिसमधल्या सनसनाटी (!) घटनांमध्ये मलाच इंटरेस्ट नसतो - त्यामुळे त्यातही विशेष काही नाही.
वीकेंड्स....सगळ्यांच्या वीकेंड्स सारखे हळुहळु येतात आणि भरभर जातात. शिवाय रविवार हा आठवड्यातला सगळ्यात भीषण दिवस! त्याच्यापेक्षा गुरुवार शुक्रवार कितीतरी प्रेमळ!
सर्किट म्हणतो त्याप्रमाणे आयुष्याची पानं उलटत रहायची - मग त्यात काय लिहिणार?

बाबाची मागच्या पोस्टवरची कमेंट वाचुन वाटलं, च्यायला खरंच मी माझ्या कामाबद्दल का नाही लिहीत? जेव्हा दुनियेतली सगळी जनता एकाच प्रकारची मगझमारी करत असते - तेव्हा मी तरी ’हटके’ काम करतो....
साईट - मग ती कुठलीही असेना - हा एक भन्नाट प्रकार असतो.
पण त्याबद्दल लिहिणं म्हणजे लिखाण टेक्निकल होण्याची भिती.
टेक्निकॅलिटी शिवायचा त्याबद्दलचा दुसरा प्रॉब्लेम असा कि सिव्हिल इंजिनियरिंग - या विषयाबद्दल लिहायचं म्हणजे ते ’रारंगढांग’, ’आम्ही भगिरथाचे पुत्र’ आणि काही प्रमाणात ’द फाउंटनहेड’ च्या तोडीचं नाही झालं तर त्यात काही राम वाटणार नाही अशी एक निष्कारण भिती.
निष्कारण कारण....जे इनएव्हिटेबल आहे ते झालं तर काय - अशी भिती वाटुन घेण्यात काय हशील?

तर - प्रोफेशन बद्दल लिहावं.

तर प्रोफेशन.
एकेकाळी माझेही रविवार प्रसन्न होते! त्यावेळी वय अवघे अकरा असल्याने असेल कदाचित, पण अशाच एका प्रसन्न रविवारच्या प्रसन्न सकाळी फिजिक्स लॅबमध्ये बसुन पोंक्षे सरांबरोबर ’ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ पाहिला आणि सिव्हिल इंजिनियर बनायचं ठरवलं.
असं आता आठवतंय - पण इतर आठवणींसारखंच - एवढं धडधडीत विधान करणं योग्य का असा प्रश्न पण मनात येतोय. कारण एवढं ठरवलं वगैरे असतं तर भविष्यातल्या झका मी का मारल्या असत्या?
मे बी ’जंजीर’ बघुन जसं इन्स्पेक्टर बनावंसं वाटलेलं तसंच ’ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ बघुन सिव्हील इंजिनियरिंग बद्दल वाटलं असणार.
ठरवलं नक्की कधी याबद्दल माझंच कन्फ्युजन आहे, पण तसं वाटलेलं हे नक्की.
पुढे (गोनीदांच्या) ’आम्ही भगिरथाचे पुत्र’ ने ती ओढ वाढली.
(प्रभाकर पेंढारकरांच्या) ’रारंग ढांग’ ने आणखीनच तीव्र झाली. (हे पुस्तक वाचुन BRO - Border Roads Organization - साठी काम करण्याची इच्छा अजुनही अधुन मधुन मान वर काढते).
पण एवढं होऊनही - मी CME - म्हणजे College of Military Engineering - च्या परिक्षेला कल्टी मारली ही फॅक्ट आहे. तशीच INS शिवाजी मध्ये Naval Architecture चा प्रवेश नाकारला ही पण. कदाचित तेव्हा भोपाळच्या SSB - Service Selection Board - मध्ये ऐकलेला ’अंधे लौडे फौजमें दौडे’ हा सुविचारही त्याला कारणीभूत असेल.
मग बारावी झाल्यावर (रिझल्ट यायच्या आधीपासुनच) ’मी सिव्हिल इंजिनियरिंग करावं कि नाही’ यावर पप्पांशी घुमशान लढाया सुरू झाल्या. (पुन्हा) एवढं सगळं करुन - सुखासुखी मिळणारी सिव्हिल इंजिनियरिंगची ऍडमिशन नाकारुन मी Instrumentation & Controls या शाखेत प्रवेश घेतला!

इथे एक मेजर गोष्ट झाली. पहिलं वर्ष संपलं आणि वाचंच म्हणुन सत्यजितने माझ्या हातात ’द फाउंटनहेड’ कोंबलं. आता मेजर गोष्ट म्हणजे - या पुस्तकात मला हॉवर्ड रॉर्क रुपी देव भेटला (ज्याची जागा आजतागायत कुणी माईका लाल घेऊ शकलेला नाही) आणि त्याने मला पुढची तीन वर्ष ’जिस गांव जाना नहीं उस रस्ते चलनेसे क्या फायदा?’ म्हणत मरणाचं छळलं! ही छळवणुक सोसत आणि (एक दिवस) सिव्हिल इंजिनियर बनायची स्वप्नं पहात मी Instrumentation इंजिनियर झालो!

BE झाल्यावर (म्हणजे अगदी नुक्ता नुक्ता - गरम गरम - झाल्या झाल्या - म्हणजे शेवटचा पेपर दिल्या दिल्या) टोटल राडा.
अगदी हाथी घोडा पालकी....करत आणि Absolute विध्वंस mode मध्ये मी Instrumentation ला रामराम ठोकला, आणि स्वत:ला Civil Engineer ही पदवी प्रदान केली.
एकतर रॉर्कचं भूत मानेवर संवार आणि ’जर मला उरलेलं आयुष्य सिव्हिल इंजिनियर म्हणुन घालवायचंय तर त्याची सुरुवात आजच आणि झालीच पाहिजे’ हा एक विचार.
तर थोडक्यात सांगायचं म्हणजे - पुढे २ वर्ष भारतात कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम करुन मी अमेरिकेला कल्टी मारली. मग इथे निवांतपणे (हे जरा अगदीच निवांतपणे झालं) सिव्हिल इंजिनियरिंगचं उच्चशिक्षण वगैरे घेऊन मागचे चारेक वर्ष इमानेईतबारे (हे फक्त म्हणायला) चाकरी करतोय.

हे सगळं लिहिताना मला मी माझा रेझ्युमे इथे का लिहितोय असा प्रश्न पडायला लागलाय!

तर आता माझी आणखी जास्त लाल करण्यापेक्षा आपण भारतात सिव्हिल इंजिनियरिंगचा धंदा कसा चालतो याच्या सुरस कथा ऐकु.
म्हणजे मी सांगतो - तुम्ही ऐका.
आय मीन - वाचा.

आता इथे काही disclaimers (म्हणजे बहुतेक नकारघंटा) टाकले/टाकल्या पाहिजेत.
१) मी स्वत:ला सिव्हिल इंजिनियर असं डिक्लेअर वगैरे करुन काही फायदा झाला नाही (तो होणार नव्हताच - पण तरी - झाला नाही). रॉर्कच्या नादाला लागल्याने मला ’काम’ करायचं होतं - कुठलंही आणि कुठेही. ते मी केलं.
२) Unofficially मी designs वगैरे केली - पण officially मी contractor म्हणुन काम केलं. (तसंही designs करायला logic आणि common sense शिवाय फार काही लागत नाही - तरिही...)
३) इथे नमुद केलेले (म्हणजे करीन ते) अनुभव माझे वैयक्तिक आहेत - तुमचे अनुभव वेगळे असु शकतील.
४) इथे नमुद केलेल्या (मी सोडुन) प्रत्येक व्यक्तीचे नाव बदललेले आहे.
५) भारतात प्रचंड भ्रष्टाचार चालतो, पण भ्रष्टाचार करणारा माणुस बुद्धीने तल्लख असणं आवश्यक असतं. त्यामुळे सिस्टिम कितीही disgusting असली तरी भारतात तल्लखबुद्धी सिव्हिल इंजिनियर्सची कमी नाही. रस्त्यांवर कितीही खड्डे असोत, गटारं कितीही वाहती (अथवा न वहाणारी) असोत आणि दरवर्षी मुंबई कितीही बुडो, ही सेना - अनियमीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर आणि नियमीत मिळणाऱ्या (आणि नाईलाजाने स्वीकारल्या जाणाऱ्या) लाजिरवाण्या लाचेवर - देश चालवते ही वस्तुस्थिती आहे. (तरीही त्यांनी केलेला भ्रष्टाचार समर्थनीय नाही).
६) भारतात राहुन, भ्रष्टाचार न करता सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये जागतिक तोडीचं काम करणारे लोक आहेत - अशा काही लोकांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो. पण त्यांची संख्या (काळजी वाटावी एवढी) कमी आहे.

अजुन काही disclaimers आत्तातरी सुचत नाहिएत! सुचले तर जेव्हा सुचतील तेव्हा लिहीन.

मयुरेश आणि शची या जवळच्या मित्रांनी अमेरिकेला रामराम ठोकुन भारतात सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये काम करायचं ठरवलंय. Believe me - सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये (अजुनही) हा धाडसी निर्णय आहे. हा लेख त्यांच्यासाठी!
मयुरेश, शची (आणि राधा, अर्जुन) (आणि तुमच्या आधी गेलेला मंदार) - Best of luck - लढा!

----------------

कंत्राटदार हा एक भिकारचोट शब्द आहे.
कॉन्ट्रॅक्टरला कंत्राटदार कुणी म्हणत नाही. आपल्याकडे पेपरमध्ये बोली भाषेतले शब्द वापरण्याची प्रथा नाही आणि तिथे कॉन्ट्रॅक्टरचा कंत्राटदार होतो. कॉन्ट्रॅक्टर ही जगातली बहुतेक सगळ्यात बदनाम जात. यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिनकामाचे पैसे घेणे - हा आरोप या जातीवर सर्रास होतो. तो बऱ्याचदा रास्त असतो.

मी काम करायला लागलो एका नातेवाईक मामांबरोबर. ते earthwork contractor होते. खरंतर माझे आजोबा (आईचे बाबा) ही contractor होते एकेकाळी, पण त्यांच्यानंतर त्यांचा व्यवसाय कुणी चालवला नाही. पुरंदर गडावर जाणारा गाडीरस्ता त्यांनी बांधला असं आई सांगते.
तर मी माझ्या या मामांबरोबर काम करायला लागलो.
आता earthmoving contractor म्हणजे काय? तर जो contractor माती एका ठिकाणुन उचलुन दुसऱ्या ठिकाणी टाकतो त्याला earthmoving contractor म्हणतात.
आता तुम्हाला वाटेल यात विशेष ते काय?
खरं सांगु का?
काहीच नाही!
I mean - खरं तर इन जनरल - सिव्हिल इंजिनियरिंग या व्यवसायाबद्दल विशेष असं काहीच नाही. लोक जेव्हा माझाच (म्हणजे त्यांचाच) धंदा कसा महत्वाचा - याबद्दल वाद घालायला लागतात तेव्हा माझी सॉलिड चिडचिड होते! खरं सांगायचं तर कुठलाच धंदा महत्वाचा नाही किंवा सगळेच महत्वाचे - किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं - उगीच मला पटवायच्या फंदात पडु नका.
आता कृती असते एवढीशी - कि एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी नेउन टाकायची - पण त्यात हजार झंझटी येतात. म्हणजे - ही कृती करायला तुम्ही शे-पाचशे मजुर लावणार आहात कि earthmoving machinery?
हल्ली या कामासाठी मजुर (आणि माती वाहुन न्यायला गाढवं) वगैरे कुणी वापरत नाही - आमच्याकडे यासाठी JCB आणि Poclain नावाची machinery होती - आणि हो - डंपर! (खरं तर मी कार बीर नंतर चालवली - ’ड्रायव्हिंग’ शिकलो ते या डंपरवर!)

JCB हे एक ट्रॅक्टर सारखं दिसणारं मशीन असतं (याला इकडे अमेरिकेत Back hoe म्हणतात), आणि त्याला हातासारखा दिसणारा अवयव असतो! ज्याला arm म्हणतात (duh!) आणि त्याला जोडलेलं - माती उचलणारं (हाताच्या पंजासारखं) - bucket. पुढे bulldozer सारखं दिसणारं (आणि त्याच्यासारखंच वागणारं) पातं असतं. हे एक मजबूत काम करणारं यंत्र - पण इतर मोठी यंत्रं पाह्यली कि ’हे म्हणजे काहीच नाही’ असं वाटु शकेल.

Poclain ला Poclain का म्हणतात माहित नाही - खरं तर ही (poclain) एक फ्रेंच कंपनी - ज्यांनी hydarulic excavation machinery बनवायला सुरुवात केली, पण ते १९७० च्या सुमारास! नंतर ही कंपनी विकली गेली आणि blah blah blah - पण कसंतरी त्या सुमारास हे नाव भारतात पोचलं आणि या particular यंत्राला चिकटलं! - ते आजतागायत!! (अशी कित्येक नावं कित्येक गोष्टींना चिकटलेली असतात, शिवाय सिव्हिल ही इंजिनियरिंग ची अशी एक शाखा - जिथे अनपढ लोकांशी बराच संबंध येऊ शकतो - त्यामुळे साध्या सुध्या इंग्रजी शब्दांचेही भयानक अपभ्रंश पहायला मिळतात - त्या अपभ्रंशांची मुळं शोधणं हा एक जबरा exciting खेळ होऊ शकतो).

तर poclain हे एक रणगाड्यासारखं tracks वर चालणारं यंत्र असतं, आणि JCB सारखा यालाही हातासारखा अवयव असतो - फरक एवढाच कि हे यंत्र स्वत:भोवती गोल गोल फिरु शकतं - डंपर ’लोड’ करायला त्याच्यामुळे य बरं पडतं - शिवाय हे मशीन कुठेही जाऊ शकतं - काट्याकुट्यातुन, झाडाझुडपातुन, चिखल-राड्यातुन....
मी पहिल्यांदा हे मशीन पाह्यलं त्याची एक स्टोरीच आहे!

साईट होती - पुण्यापासुन तीसेक किलोमीटर वर.
असं फक्त म्हणायला!
तीसेक म्हटलं कि तीस ते शंभर - याच्या अधेमध्ये कुठेतरी असणार असं समजायचं.
या साईटबद्दल सांगायचं म्हणजे - पुणे नगर रोडवर (तीसेक किलोमीटरवर) आम्ही रस्ता (पुणे - नगर) सोडला आणि एका खेड्याकडे घुसलो.
आम्ही म्हणजे - मी, सुन्या मोहिते (contractor), आणि शंकर नावाचा poclain ऑपरेटर.
मग डांबरी रस्ता संपुन खडीचा रस्ता लागला.
मग तो संपुन बैलगाडीचा!
सगळीकडे उजाड माळरान, काट्याची झाडं (ज्याला बाभळी म्हणतात), अधुनमधुन येणाऱ्या टेकड्या, randomely पसरलेले दगड....

च्यायला या दगडाचीपण स्टोरीच आहे!
Contractor लोक (ऍटलिस्ट भारतातले - वेल, अमेरिकेतले फार काही वेगळे नसतात, पण आपण सध्यातरी भारतातल्या contractor लोकांबद्दल बोलु) फारसे शिकलेले नसतात. म्हणजे अगदीच अनपढ असतात असं नाही, पण त्यांना अर्धशिक्षित म्हणु.
काही लोक पदवीधर वगैरे पण असतात, पण B.A., B.Com. केलेले.
काही लोक डिप्लोमे (Diploma in Civil Engineering - यांना बोली भाषेत ’डिप्लोमे’ म्हणतात) असतात.
अगदी rarely वगैरे BE सापडतात, त्यांच्याकडे इतर contractor लोक कीवमिश्रीत आदराने बघतात.
यांना आयदर सॉलिड पोलिटिकल बॅकिंग असतं - किंवा हे लोक पराकोटीचे उद्विग्न असतात.
बर ते नंतर - तर contractor लोक इन जनरल (किंवा टेक्निकली) - अर्धशिक्षित असतात.
इंग्रजी शब्द वापरुन हे अर्धशिक्षण लपवण्याचा मग ते पराकोटीचा प्रयत्न करतात - हे सगळं पुढे (कदाचित) येईलच, पण इथे सांगायचं कारण म्हणजे - साधारण १ फुट diameter च्या sphere एवढ्या दगडाला - ज्याला आपण दगड किंवा छोटा दगड म्हणु शकु - अशा दगडाला हे लोक आवर्जुन boulder म्हणतात. (सुरुवातीला मला हे असे इंग्रजी शब्द वापरणं लई विनोदी वाटायचं - नंतर सवय झाली).

तर कुठे होतो आपण - हां - तर आम्ही असे डोंगर, बाभळी, भरपुर गवत आणि इतस्तत: विखुरलेले ’बोल्डर’ यांच्यामधुन गेलेली बैलगाडीची वाट फॉलो करत जात राहिलो.
अधुन मधुन बाभळी, गवत आणि बोल्डर - यांचं प्रमाण कमीजास्त होत होतं, पण तेवढंच.
इथे कुठलातरी मेजर प्रोजेक्ट चालु असेल अशी सुतरामही शंका वाटत नव्हती.
अशात - आपण मस्तपैकी हातातल्या काठीने आजुबाजुचं गवत हाणत जात असताना अचानक समोर गवा दिसावा - तशी दाण्‍कन ती हवेली आमच्यासमोर आली!
आय मीन - it was ridiculous!
इथे आजुबजुला काहीच नाही, रस्ता नाही, बाभळीचं जंगल, अशात कोण मरायला इथे रहाणार - असा प्रश्न आम्हा तिघांनाही पडला.
हवेली ऐतिहासिक वाटत होती.
ऑफकोर्स - तिचं आता खंडहर झालं होतं - पण एकेकाळची शान लपत नव्हती.
कुंपणात गवत माजलेलं - दारं-खिडक्या लोकांनी बाकायदा (म्हणजे बा च्या कायद्यानं) पळवलेली.
मागं उरलेला आणि आत अडकलेला - अनामिक इतिहास!
हे बघत आम्ही हवेलीच्या गेटसमोर थांबलो.
जीप बंद केली.
आणि पहिल्यांदाच भरदुपारी रातकिड्यांचा प्रचंड गोंगाट ऐकु आला!
प्रचंड कलकलाट करणारं ते स्तब्ध रान, काळी पडत चाललेली ती कोठी कि हवेली, आणि जीपने उडवलेला धुरळा खाली बसला कि आपले पुतळे होऊन आपणही या इतिहासाचा भाग होणार असं काहीसं आलेलं फीलिंग.
फारशी चर्चा न करता तिथुन कल्टी मारलीच पाहिजे यावर एकमत झालं.
मग आम्ही (ताबडतोब) तिथुन कल्टी मारली.

अंदाजाने थोडा वेळ गवतातुन जात राहिलो आणि अचानक हिरालाल कोठारींची हिरवीगार केळीची बाग दिसली.
काम इथेच चालु होतं.
हिरव्यागारीचं कारण म्हणजे - बाजुने वहाणारी, तुडुंब भरलेली, संथ नदी!
हिरालाल कोठारी आणि केळी - यांचा खरंतर बादरायणही संबंध नाही. पण कुठल्यातरी शासकीय अधिकाऱ्याने कोठारींना सांगितलं कि ’कोठारी - आता तुम्ही शेतकरी व्हा!’ म्हणुन कोठारी शेतकरी झाले.
म्हणजे - कागदावर!
पैसे कमावणे हा कोठारींचा एक आवडता छंद (आणि conscience धुवुन बिवुन स्वच्छ करण्या करता वेळ मिळेल तेव्हा तिरुपतीच्या खेपा घालणे - हा दुसरा). त्यात चोरांपासुन (म्हणजे - शासनापासुन) पैसा वाचवायचा असेल तर दाखवायला म्हणुन शेतीसारखा टॅक्स-फ्री धंदा नाही!
त्यात शासनाने केळीशेती वाढावी म्हणुन भरमसाठ सबसिडी डिक्लेअर केलेली.
म्हणुन केळी.
आणि अगदी काहीच न लावता पैसा लाटायचा हे बरं दिसत नाही म्हणुन हा प्रपंच, आय मीन - प्रोजेक्ट.
शेती ’लेव्हल करणे’.
शेती ’लेव्हल करणे’ हा सधन शेतकऱ्यांचा (आणखी एक) आवडता छंद. (इतर छंदांसाठी चौफुला वगैरे आहेच, अधिक माहितीसाठी एका माजी गृहमंत्र्यांना गाठावे). कारण शेती अशी ’लेव्हल’ असेल तर मोठमोठी यंत्रं वापरुन शेती करणं सोयिस्कर ठरतं.
हे सिद्ध करणारं संशोधन उपलब्ध आहे.
पण कुठे? तर अमेरिकेत!
यावर अवचटांनी ’माती आणि पाणी’ मध्ये लई भारी लिहिलंय.
एनीवे - तर तिथे मी पहिल्यांदा poclain पाह्यलं.
शंकर म्हणाला - ’चलिए भैय्या - आपको अंदरसे मिशन दिखा दुं!’ (राज ठाकरे - तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे कि महाराष्ट्रात रहायचं असेल तर पराभुत राजकारणाचं प्रतीक असलेला मरणप्राय बिहार तुम्हाला महाराष्ट्रात निर्माण करता येणार नाही. पण असं असुनही 'मावळत्या उन्हात, केवड्याच्या/बाभळीच्या बनात’ poclain चालवायला मराठी माणुस मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे).
तर मी शंकरला म्हटलं - ’चलो, दिखा दो!’
तुम्ही लोक gaming या प्रकाराचे रसिक असाल तर तुम्हाला joy stick म्हणजे काय प्रकार असतो ते माहित असेल.
असं रिमोटच्या आकारचं खेळणं असतं.
अशा त्या खेळण्याने हे अजस्त्र धुड हलतं.
अजस्त्र म्हणजे केवढं तर त्याच्या दोन बकेटमध्ये डंपर नुसता भरत नाही, तर वजनाने कुरकुरायला लागतो! त्याचं बकेट म्हणजे एक मोठा हौद असतो ज्यात पाच-सात माणसं आरामात मावतील. आणि हे सगळं - शिवाय tracks आणि गरगर motion - या joystick ने चालतं. (ही मशीन्स अमेरिकादी देशांत विकसित झाल्याने) operator ल बसायला प्रशस्त आणि AC केबिन असते.
त्या केबिनमध्ये बसवुन शंकरने मला त्याचं काम समजावुन सांगितलं.
तेवढ्यात सुन्या म्हणाला - ’चल अभि, तुला गंमत दाखवतो!’
मी त्या रणगाड्यातुन उतरता उतरता सुन्या आणि शंकरमध्ये काही खाणाखुणा झाल्या आणि मी आणि सुन्या बकेट बघायला गेलो.
त्या अजस्त्र बकेटला तीक्ष्ण लोखंडी वगैरे दात होते.
सुन्या म्हणे - ’जा बकेटमध्ये!’
म्हटलं - ’कशाला?’
’अरे जा तर - गंमत दाखवतो!’
’भाय मेरे - काय करणार आहेस ते सांग आधी’.
तर सुन्या म्हणे - ’अरे काय घाबरतो!’
असं म्हणुन सुन्या बकेटमध्ये जाऊन literally 'बसला'!
मग भीड चेपवत मी पण जाऊन बसलो.
मग शंकरने हत्तीच्या सोंडेच्या टोकासारखं बकेट आत वळवलं आणि त्याच सोंडेसारखा poclain चा हात वर उचलला. वर उचलत सरळ केला.
आता आम्ही जमिनीपासुन पंचवीसेक फुटांवर - हवेत!
तिथुन नदी, केळीची हिरवीगार बाग, त्याच्यापलिकडचं गवताचं पिवळंशार रान आणि बाभळी - नको इतक्या स्पष्ट दिसायला लागल्या.
वीस वर्षांचा होऊन ओरडणं प्रशस्त दिसत नाही म्हणुन मीपण ’सही है मॅन, सही है मॅन’ असं मोठयाने (आणि परत परत) म्हणायला लागलो!
मग शंकरने खालुन आम्हाला ’थम्स अप’ केलं. हसत हसत सुन्याने पण केलं. मला काहीच न कळल्याने मी पण.
मग शंकरने तो poclain चा हात मशिनभोवती बऱ्याच वेळा गोल गोल फिरवला! आयची आण - आजतागायत अमेरिकेतल्या कुठल्याही रोलर कोस्टरमध्ये माझी एवढी फाटली नाहिए जेवढी त्या दिवशी शंकरच्या poclain मध्ये फाटली!
खाली आल्यावर मग मलाही सहत सहत टाळ्या देणाऱ्या सुन्या आणि शंकर बरोबर हसायला लागलं! (हे सहत सहत चुकुन झालेलं नाहिए - ती चक्कर आठवली कि माझी अक्षरं अजुनही पुढे मागे होतात).
मग सुन्याने मला ’प्रोजेक्ट’ समजावुन सांगितला.
त्यात विशेष काही नव्हतं - इकडची माती तिकडे.
सिव्हिल इंजिनियरिंग - particularly construction - मध्ये इंजिनियरिंग पेक्षा मॅनेजमेंट - मशीन्स आणि माणसांचं - महत्वाचं ठरतं. १९९९ मध्ये मी पहिल्यांदा जेव्हा poclain (आतुन) पहिलं तेव्हा आम्ही ते तासाला रु.१२००/- या दराने भाड्याने देत होतो. त्याची किंमत तेव्हा - ४५ लाख रुपये होती. असं असताना हे मशीन रोज कमीत कमी १२ तास चालणं आवश्यक होतं. इतकं चालवल्यावर मशीनचं आयुष्य चार सहा वर्षापेक्षा जास्त असु शकत नाही. अशावेळेस डिझेल, इंजीन किंवा हायड्रॉलिक ऑईल, किंवा इतर मेकॅनिकल ब्रेकडाऊन्स मुळे मशीन २-४ तास न वापरता उभं ठेवणं परवडत नव्हतं. अजुनही नाही. शिवाय प्रॉब्लेम कितीही छोटा असला तरी असल्या अशक्य जागी - जिथे सायकल मेकॅनिक मिळणं मुश्किल - तिथे हे मशीन दुरुस्त करणं दुरापास्त होतं. मग अशावेळेस २-३ Operators (एक आजारी पडला तर काय घ्या!), स्पेअर पार्ट्स, ऑईल्स वगैरे तयार ठेवायला लागायचं.
एनीवे - हे सगळं कधी तर अजुन मी BE पण व्हायचो होतो.

मशीन वगैरे बघुन झाल्यावर जवळच्या एका विहिरीपाशी जाऊन बसलो - हिरवीगार झाडी, मागची नदी, केळीचं बन - सगळाच खतरनाक प्रकार होता. तिथे स्वैपाकाला ठेवलेल्या आजीबाईंनी मग आम्हाला गरम गरम भाकऱ्या आणि बोंबलाचं कालवण आणुन दिलं.
आता इथे नमुद केलंच पाहिजे म्हणजे - (शिवाय माझं लेखन ’प्रॉडक्टिव्ह’ वगैरे करण्यासाठी तुमच्यापैकी मला कुणी जेवायला वगैरे बोलावलंच तर) संगीत, खवैय्येगिरी वगैरे प्रकारांबद्दल अगदी ’अहाहा’ करुन हळहळ वगैरे व्यक्त करणारे लोक असतात.
मी त्यातला नाही.
मी काहीही खाऊ शकतो, काही न खाताही राहु शकतो. फक्त जेव्हा जेवीन तेव्हा मला ’क्वान्टिटी’ लागते - क्वालिटीशी माझं फारसं देणंघेणं नसतं. (MS करताना मी Taco Bell मध्ये जाऊन ७५ पैशांचा ’बीन बरिटो’ खाल्ला होता. रोज. सलग सहा महिने!)
एवढं सगळं असुन त्या वातावरणात खाल्लेलं बोंबलाचं कालवण आठवुन अजुनही तोंडाला पाणी सुटतं.
तट्ट जेवण झाल्यावर नदीत राईड मारुन यायची कि तिथेच झाडाखाली पडी टाकायची असा विचार सुन्या करायला लागला. म्हटलं - अरे आपण इथे काम करायला आलोय - पडी काय टाकायची?
तर सुन्या म्हणे - अरे अभि, आपण कामच करतोय! ही मशीन्स चालु आहेत ना - म्हणजे आपले मीटर पूर्ण क्षमतेने चालु आहेत - त्यातला कुठला बंद न पडु देणं हे आपलं काम.
मला Civil Engineering मध्ये दिग्विजय करायचे होते - आणि मला वाटायला लागलं - च्यायला मी इथे वेळ वाया घालवतोय.
पण तिथे, मग तिथुन पुढे, मग ब्रायसन बरोबर स्कुल मध्ये, एरिक, शिवा, सुरी बरोबर अमेरिकेत - कळत गेलं कि Civil Engineering म्हणजे एक युद्ध असतं.
एक असं युद्ध जिथे सैनिक जन्मभर खंदक खोदत रहातात - शत्रुपासुन बचावासाठी.
शत्रु म्हणजे निसर्ग -
स्थपति!
त्याच्याबद्दलचं, त्याला समजण्याचा प्रयत्न करणारं शास्त्र ते - स्थापत्य!

हे निसर्ग वगैरे प्रकारावरुन आणखी एक आठवण आठवली.
भोपाळला SSB च्या interview च्या वेळेस interview घेणारा कमांडर म्हणाला - मी तुला मला एक प्रश्न विचारायची संधी दिली तर काय विचारशील?
मी म्हटलं - तुमचं शिक्षण काय?
तो म्हणे - मी मेकॅनिकल इंजिनियर आहे.
मग म्हटलं - आणखी एक प्रश्न....
तर तो म्हणे - एकाची संधी होती, एक झाला.
म्हटलं ठीक आहे.
तर तो म्हणे - मी प्रत्येक interview मध्ये प्रत्येकाला ही संधी देतो आणि प्रत्येकाचे प्रश्न ठराविक असतात, पण आत्तापर्यंत ’माझं शिक्षण किती’ - हे कधी कुणी मला विचारलं नव्हतं. तुला असा प्रश्न का विचारावासा वाटला?
मी म्हटलं - तुम्ही अशी संधी प्रत्येकाला देता हे बाहेर येऊन प्रत्येक जण सांगतो - मग प्रत्येक जण काहीतरी जबरा प्रश्न विचारुन तुम्हाला थक्क वगैरे कसं करायचं याचे आराखडे बांधतो - मला ती सगळी चुत्येगिरी वाटली. पण तरी - मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला याचं कारण ऐकायचं असेल तर मला दुसरा प्रश्न विचारणं आवश्यक आहे.
तर तो म्हणे - विचार.
म्हटलं - मेकॅनिकल इंजिनियर असुनही, infact मेकॅनिकल इंजिनियर असल्यानेच - तुम्हाला Indian Navy चा motto ’शं नो वरुण:’ ऐवजी ’शं नो यंत्र:’ करावासा कधी वाटला नाही का?
तर त्यावर तो (काळा कभिन्न) कमांडर हसला आणि म्हणाला - तुझं वय (मग कागद चाळुन - ) सतरा असल्याने तुला असं वाटणं साहजिक आहे, पण तंत्रज्ञान कितीही पुढारलं आणि शत्रुला नेस्तनाबुत करण्याची तुमची ताकद कितीही वाढली तरी निसर्गाला टक्कर देऊन नेहमीच त्यावर विजय मिळवतील अशी यंत्र अजुन बनली नाहीत. Navy जॉईन कर - ऍटलिस्ट अशी यंत्र बनवायचा अटेम्प्ट करता येईल तुला.
(मला अजुनही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, पण) तेव्हा मला त्याचं उत्तर फारसं पटलं नव्हतं!

च्यायला फाटा कुठे फुटला?
तर खंदक!
Civil Engineering मध्ये प्रत्येक सैनिक जन्मभर असे खंदक खोदत रहातो - स्वत:भोवती, सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाभोवती, प्रत्येकासाठी, प्रत्येकाकडुन असे खंदक खोदुन घेत रहाणं हा त्याचा व्यवसाय बनतो. जुन्या जाणत्या सैनिकांनी निसर्गाचा संहार पाहिलेला असतो. त्यांच्याकडुन शिकत, कधीकधी त्यांच्याशीही लढत, जो सैनिक लढत आणि कणा शाबुत ठेऊन दिवसाच्या शेवटी त्याची स्टोरी सांगायला जिवंत रहातो - तो झाड.
बाकीची लव्हाळी.

हे नंतर कळलं पण.
कळत गेलं - अजुन कळतंय.
पण तेव्हा माझी सॉलिड चिडचिड होत होती.
निसर्गाचा संहार मी लिंबाळ्यात पाहिला होता, जेव्हा याच navy चे भाऊबंद याच poclain ने खड्डे करत होते, याच डंपर्समधुन प्रेतं येत होती, पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या त्या प्रेतांनी हेच खड्डे भरत होते, त्यांच्यावर हेच बुलडोझर्स माती ढकलत होते....
इयत्ता अकरावीत होतो, पण तोवर मी कधी प्रेत पाहिलं नव्हतं.
लिंबाळ्यात इतकी पाहिली कि काही न वाटण्याएवढा बधीर झालो होतो.
त्या बधीरतेत जीपमध्ये बसुन केळी खाताना आलेला एक अनुभव सांगता सांगवत नाहिए....

च्यायला हे असं काही स्क्रीनवर उमटलं कि असं वाटतं कि माझ्या लहानपणी मला आलेल्या विदारक वगैरे - म्हणजे ’दीवार’ मधल्या ’मेरा बाप चोर है’ सारख्या अनुभवांमुळे तर मी Civil Engineer नाही ना झालो! (मग मला - मी earthquake resistant structures वगैरे बांधुन हजारो लोकांचे जीव वगैरे वाचवुन हीरो होतोय वगैरे वगैरे स्वप्न पडायला लागतात).
वेल, मी हीरो नाही.
आय मीन - अजुनतरी नाही.
त्याचा निवाडा व्हायला अजुन बरीच वर्ष जायचीत.
हीरो रॉर्क असतो, अमिताभ असतो, 'प्रहार’ चा नाना असतो, ’धारावी’ चा ओम पुरी असतो, (its funny but) ’राम जाने’तला शाहरुख असतो आणि माझ्याशी जागतिक युद्धं करुनही मला माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक लढाईत लढायला उकसवणारा माझ्या बापासारखा बाप असतो!

असं असताना - विहिरीशेजारच्या त्या झाडाखाली, सतरंजीवर झोपुन, काम करणाऱ्या अजस्त्र यंत्रांकडं पहात - माझी चिडचिड होत होती.
ज्या शत्रुची इतके दिवस वाट पाहिली, तो शत्रु मला दिसत नव्हता.
त्याच्याशी लढायला तो लढाईच करत नव्हता.
नको तेव्हा झाड बनुन मलाच सावली देत होता

विहिरीशेजारच्या त्या झाडाखाली, सतरंजीवर झोपुन, मनात एकच विचार घुमत होता -

आत्ता - माझ्याजागी - रॉर्क असता तर -

त्याने काय केलं असतं?

-------------------

(मला ते भाग बिग पाडुन लिहायला आवडत नाही - शिवाय हे म्हणजे हनुमानाच्या शेपटीसारखं लांबतच चाललंय -
त्यामुळे इथुन पुढचं - इथेच).

-------------------

उत्खनन

सिव्हिल मध्ये एक भारी असतं - पावसाळ्यात (This is incomplete - will work on it offline and publish it whenever ready).

Wednesday, February 27, 2008

न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं

आकाश, सिद्धार्थ आणि समीर.
म्हणजे काय तर - आपण.
’दिल चाहता है’ ची पब्लिसिटी चालू होती - तेव्हा भारतात होतो. त्यावेळचा फरहान अख्तरचा इंटरव्ह्यु आठवतोय. तो म्हणे - ’हिरोचा आदि-अंत सगळ्यांनाच माहित असतो, पण कित्येक सीन्समध्ये अधुन मधुन डोकावणाऱ्या, त्याच्या जोक्सला हसणाऱ्या, त्याच्या लफड्यात त्याची मदत करणाऱ्या मित्रांचं काय होतं याची मला नेहमीच उत्सुकता असायची. म्हणुन हा पिक्चर!’
त्या मित्रांबद्दल उत्सुकता मलाही होतीच.
पिक्चर पाहिला - आवडला.
नुसताच आवडला नाही तर त्याने मागचे सहा वर्ष विचार करायला भाग पाडलं. जसे सगळेच ग्रेट पिक्चर्स करतात - मग तो ’इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड’ असो कि ’इजाजत’, ’मेमेंटो’ असो कि ’हजारों ख्वाईशे ऐसी’....
पण खरं तर ग्रेट पिक्चर्स हा या लेखाचा विषय नाहीच. डिसीएच पण नाही.
विषय - न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं.
वेळ - दुपार.
स्थळ - पॅसिफिकचा रम्य किनारा, हवा ढगाळ पण तरीही स्वच्छ, मागे कर्कश्श कोकलणारं ऍन्डीचं ड्रिल रिग.
अशा ’आई शपत!’ आणि ’आयला!’ च्या रेताड किनाऱ्यावर अडकलो कि सुचतात ते हे असे ’नदीला पाणी वेग कमी’ प्रश्न.
आता विषय निघाला आहेच डिसीएच चा तर -
प्रीती झिंटाने आकाशशी लग्न करुन चूक केली का?
पिक्चर पाहिल्यावर तसं वाटत नाही वाटत.
पण माझ्यासारखा (उल्टी खोपडीका) विचार करुन पहा -
म्हणजे असं कि - बाई, तुझं लग्न ठरलंय. अगदी बुडुक बुडुक प्रेमात नसशील त्या प्राण्याच्या पण निदान - ’शादी! और तुमसे!!’ असा तर प्रकार नाही!
अशात तुझा छावा तुला पूल खेळायला घेउन जाणार. तिथे तु मैत्रिणीशी ’मी कि नै - लग्नात कांजीवरम घालणार’ किंवा तत्सम विषयावर गहन चर्चा करत असताना एक बडे बापका (अर्थात वाया गेलेला) पोरगा भरसभेत तुझा हात धरुन वगैरे तुला प्रपोज मारणार, आणि कुठलाही - शहाणासुरता/येरागबाळा/मुंबईचा/दिल्लीचा/गेला बाजार पुण्याचा - छावा वागेल तसाच तुझा छावा त्याला काळा-निळा बदडणार.
मग माझे आई - तु त्याच टवाळाबरोबर ऑपेरा हाऊसच्या पुढे-मागे बागडायला लागल्यावर तुझ्या छाव्याने तुला शिव्या घालायच्या कि हातातल्या क्यु स्टिकचं टोक गोल करायचं?
त्याचे ’अवगुण’ काय? तर म्हणे पजेसिव्ह आहे. कोण नसतं?
आणि या आकाशचे गुण काय - तर दर आठ्वड्याला छावी बदलणे, मित्रांबरोबर टवाळक्या करणे, कुठलंही क्वालिफिकेशन नसताना डॅडींच्या बिझनेसच्या नावावर सिडनीत लफडी करणे आणि मग रडत गात कल्टी मारणे.
एवढं कमी म्हणुन मागच्या दाराने लग्नात येऊन ’चल’ म्हणणे!
(च्यायला प्रीती आकाशला ’चल फुट!’ म्हटली असती तर त्याचा कसला पोपट झाला असता!)
बरं यावर तिचा छावा बोलतो पण कसलं प्रॅक्टिकल! तो म्हणे - ’धिस इज सो एम्बॅरेसिंग!’
’मी नाही जाऊ देणार तिला याच्या बरोबर’ म्हणतो तो. मग आकाश मारे एक ढिशुम मारुन राग आवरण्याचा प्रयत्न वगैरे करत त्याला हात वगैरे देतो. (च्यायला हात द्यायला त्याच्या बापाचं काय जातंय?)
आकाशने काय एवढा दिग्विजय केला कि त्याचं सगळं चांगलं होणार? आणि त्या छाव्याची कुठली असली घोडचुक कि आऊच्या काऊ समोर त्याचा एवढा मोठा पोपट होणार?
आय गेस - दॅट्स लाईफ!
हे आणि असे प्रश्न हा पिक्चर पाडतो - म्हणुन हा पिक्चर माझ्यासाठी ग्रेट होतो. गैरसमज नको - आकाशला प्रीती मिळाल्यावर मी सुद्धा टाळ्या पिटतो, पिक्चरची तोंडभर स्तुती करतो (एनफॅक्ट या पिक्चरची करु तेवढी स्तुती कमीच होईल), चहा टाकतो आणि कल्टी मारतो.
पण हा पिक्चर - न संपता मनातल्या मनात सुरुच रहातो. प्रश्न विचारत रहातो -
आणि अशा भर दुपारी - अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांत भर घालत रहातो.

आता हे लिहुन झालं.
पण अजुन ड्रिलिंग चालु. समुद्र चालु. पक्षी बिक्षी पण चालु. म्हणुन मग आणखी प्रश्न.
स्वातंत्र्य म्हणजे काय?
म्हणजे मी वैयक्तिक स्वातंत्र्य वगैरे बद्दल विचारत नाहिए. इन जनरल - पंधरा ऑगस्टच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याबद्दल वगैरे विचारतोय. म्हणजे त्याचं असं कि -
आताचा मी आणि स्वातंत्र्याआधीचा मी - यात काय फरक?
आताच्या मी ने देश सोडलाय - म्हणजे कायमचा नाही, पण तात्पुरता तरी - सोडलाय ना?
तर देश सोडलेल्या आताच्या मी आणि (जर सोडला असता तर) देश सोडलेल्या तेव्हाचा मी मध्ये - काय फरक?
कन्फ्युजिंग आहे ना?
मलाही तसंच वाटतंय!
ऍन्डीने सातवा ऍन्कर सुरु केला - सिल्टी फाईन मीडियम डेन्स टु डेन्स सॅन्ड - च्यायला वाळु पण तीच ती!

परवा गब्बरने मेल करुन सांगितलं - ब्रिटिशांच्या काळात भारतात इन्कम टॅक्स म्हणे ६०% होता - च्यायला म्हणजे वाईटच!
म्हणजे ब्रिटिशांच्या काळी माझे आजोबा आणि पणजोबा शेतमजुर होते - त्यांना बहुतेक इन्कम टॅक्स भरावा लागला नसणार - पण होत्या त्या तुटपुंज्या शेतीवर सारा भरायलाच लागत असणार.
अर्थात -तो अजुनही भरावा लागत असणार. आता इन्कम टॅक्सही ३३ कि ३५ टक्के झालाय.
तर ३५% म्हणजे स्वातंत्र्य आणि ६०% म्हणजे पारतंत्र्य का?
कधी नव्हे ते काय वाटतंय ते मांडताना माझाच झोल होतोय.
म्हणजे त्याचं असं कि परवा ’रंग दे बसंती’ (परत) बघताना एक प्रश्न (परत) पडला - कि असं काय होतं कि ज्याच्यामागे आख्खा देश पेटला होता? ज्याच्यासाठी लोक बिनदिक्कत आयुष्य झुगारुन देत होते? (ऍटलिस्ट असं ऐकलंय).
पारतंत्र्य पारतंत्र्य - म्हणजे त्यांना नक्की एवढं काय टोचत होतं? काहीतरी असणारच! मग स्वातंत्र्य मिळाल्यावर ती टोच संपली का? म्हणजे ६०% ची ३५%? म्हणजे स्वातंत्र्य ३५ ते ६० मधे कुठेतरी असणार.

-------------

हे लिहुन पण वर्ष वगैरे झालं असणार.
पॅसिफिकच्या रम्य वगैरे किनाऱ्यावर नक्की कुठे होतो ते आठवत नाही. आय मीन आठवतंय - पण अंधुक - आणि जे आठवतंय ते चुकही असु शकेल.
ज्या ऍन्डी नामक प्राण्याचा इथे १-२ वेळा उल्लेख आलाय - तो आठवत नाही.
उगीच बोंबलत उन्हातान्हात कसकसले प्रश्न पडत होते आणि त्यांची कुठली उत्तरं सुचत होती - ते ही आठवत नाही.
बायको आयोडेक्स कडे गेलिए - घरी जाऊन बोर होण्यापेक्षा ऑफिस साफ करु म्हटलं तर कचऱ्यात हे कागद सापडले - आणि न आठवणाऱ्या प्रश्नांची न सुचणारी उत्तरं.
साला लाईफ भी कुछ ऐसाही होगा.

काल ’४९ अप’ नावाची एक डॉक्युमेंट्री बघत होतो. म्हणजे इंग्लंडमध्ये बीबीसी कि कुणीतरी अशी शक्कल लढवली कि आपण ७ वर्ष वयाच्या एका लहान मुलांच्या ग्रुपचा इंटरव्ह्यु घेऊ या. मग सात सात वर्षांनी त्यांना भेटुन त्यांच्याशी बोलु. असे सात सात करत ते आता ४९ वयाचे झालेत.
सगळेच.
आय मीन होणारच - डि.एन.ए. पासुन प्रत्येक गोष्ट वेगळी असणाऱ्या प्रत्येक आयुष्यात तेवढी एकच गोष्ट कॉमन - वेळ.
डॉक्युमेन्ट्री दोनेक तासांची आहे - मी अर्धाच तास पाहिलिए - आज घरी जाऊन कंप्लिट करीन. पण जी अडीच आयुष्यं पाहिली त्यातलं पहिलं म्हणजे - त्याचं नाव आठवत नाही - म्हणुन त्याला ब्रुस म्हणु.
तर ब्रुसला सात वर्षाचा असताना घोडे आवडत. त्याला जॉकी व्हायचं होतं. १४ व्या वर्षी तो एका तबेल्यात कामालाही लागला होता. पोरीबाळींत इंटरेस्ट नाही म्हणत होता. जॉकी व्हायला जमलं नाही तर काय करणार तर म्हणे - माहित नाही, मे बी टॅक्सी चालवीन. २१ व्या वर्षी ब्रुस टॅक्सी चालवत होता आणि त्याचा जोरदार प्रेमभंग झाला होता. आता पोरिबाळींपासुन लांब रहाणार म्हणत होता. २८ व्या वर्षी ब्रुसचं लग्न झालं होतं. नवरा बायको लाजत लाजत कॅमेऱ्यासमोर - तीन वर्षांपुर्वी कसे भेटलो सांगत होते. डिस्कोत भेटलो, आवडलो, लग्न केलं. प्रेम म्हणजे काय तर दोघांनाही सांगता येईना. आता ब्रुसच्या बायकोचं नाव काय ठेवायचं? तिला डेमी म्हणु. तर ब्रुसने स्वत:ची टॅक्सी घेतली होती. खरंतर २ टॅक्सीज घेऊन ब्रुस आणि डेमी दोघंही कॅबी झाले होते. आयुष्यात एक मुलगा हवा - असं ब्रुसचं तेव्हाचं स्वप्न.
३५ व्या वर्षी त्यांना दोन मुलं - मोठा मुलगा, धाकटी मुलगी. च्यायला आता आणखी नावं! तर मुलाचं नाव किम्बल आणि मुलीचं मिसी. मुलं घरात बागडत असताना ब्रुस आणि डेमी डायनिंग टेबलशी एकमेकांकडे बघुन मख्ख. लाईफ टफ असतं म्हणत होते. भांडतो एकमेकांशी, कधी कधी वाटतं कि डिव्होर्स घ्यावा. पण यु हॅव टु वर्क ऑन इट - यु नो! मग आढ्याकडे बघत परत पुटपुटतो - लाईफ इज टफ!
४२ व्या वर्षी ब्रुस, डेमी, किम्बल आणि मिसी मध्ये आणखी एक भर - डेना! मनोज कुमार, आशा पारेख वगैरे चेहरे पाहिल्यावर आता कसं वाटतं - तसं ब्रुस आणि डेमीकडे पाहिल्यावर वाटतं. अंधुकशी ओळख. बाकी निराशा. आणि शांतता. दोघं एकमेकांना केवळ सहन करताहेत. त्याच्या बागेत गेल्यावर म्हणतो - मागच्या वेळेस छोटी होती ती झाडं बघा किती मोठी झालिएत! पण ते झाड बघा - कुणीतरी म्हटलं कि त्याच्या फांद्यांवर पाणी मारा, तर ते झाड मरुन गेलं - लाईफ इज टफ! यु नो!! देशात सुळसुळाट झालेल्या देसी, पाकिस्तानी लोकांबद्दल बोलायला लागला कि त्याचा तिळपापड होतो - हा आमचा देश आहे म्हणतो. आमच्यासारखे वागा.
४९ व्या वर्षी ब्रुस आणि डेमीने देश सोडलाय - दोघं स्पेनमध्ये रहातात आणि धमाल करतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं कि ही ती ’हीच ती’ का! इंग्लंडमधल्या घरावर सेकंड मॉर्टगेज काढुन आणि दोन्ही टॅक्सीज विकुन त्यांनी स्पेनध्ये एक हॉलिडे होम विकत घेतलंय. टाईल्स पासुन प्रत्येक गोष्टीत भांडत प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगताहेत. जवळंच मोठं टुरिस्ट कॉम्प्लेक्स बनतंय. तिथे एक स्पोर्ट्‍स बार सुरु करायचा ब्रुसचा विचार आहे. किम्बल जॉब करतो इंग्लंडमध्ये. मिसीला हायस्कुल मध्ये असतानाच मुलगी झाली. छावा पळुन गेला म्हणे. पण तरी आता ती जबाबदार झालिए म्हणे. पोस्ट ऑफिसमध्ये काम करते - पहाटे पाच वाजता उठुन जाते. तिचा बॉयफ्रेंड तिची काळजी घेतो. त्या मानाने डेना चांगलीच समजुतदार - आणि हुशार.
लाईफ इज टफ - बट वी आर हॅपी - इती ब्रुस.

मी सात ते एकोणपन्नास च्या अधे मधे!

बायकोचा फोन आला - अजुन थोडा वेळ थांब म्हणाली.
मला थांबायला लागलं कि प्रश्न पडायला लागतात.
उगीच कुणाचं काय नि कुणाचं काय!
जॉशुआ वेइट्झकिन नावाच्या एका अमेरिकन चेस प्लेयरवरचा एक पिक्चर बघत होतो. नाव - ’सर्चिंग फॉर बॉबी फिशर’.
बॉबी फिशर हा ही एक चेस प्लेयर.
त्याचं झालं असं कि बॉबी फिशर वयाच्या सातव्या वर्षापासुन बुद्धिबळाच्या सामर्थ्यावर लोकांना थक्क करायला लागला. वयाने, अनुभवाने आणि गणतीत मोठ्या असणाऱ्या लोकांना लीलया हरवायला लागला. हसत खेळत वीस वीस लोकांशी एकाच वेळी लढत त्याचा आत्मविश्वास दुणावला. अशात वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप आली. अमेरिका रशिया एकमेकांवर कुरघोडी करायला सदैव तत्पर. आणि चेसमध्ये आपला हात धरणारं कुणी नाही अशी रशियाची दर्पोक्ती. ’मी रशियाला हरवीन’ असं फिशर म्हणाला आणि लढायला आईसलंडला गेला. पण स्पर्धेशिवाय इतर बाबतींमुळेच त्याचं नाव गाजायला लागलं. म्हणे मागासलेला देश आहे हा - का तर तिथे बोलिंग ऍलीज नव्हत्या!
पण घुमशानपणे त्याने बोरिस स्पास्कीला हरवलं आणि रातोरात तो अमेरिकेत स्टार झाला!
अमेरिकेचा पहिला बुद्धिबळ विश्वविजेता!
बॉबी फिशर हे नाव गाजु लागलं.
’मी माझा शब्द पाळला - रशियाला हरवलं’ करत बॉबी फिशर भाषणं ठोकायला लागला.
हे सगळं चालु असताना बॉबी फिशर कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी एक अचाट खेळी खेळला.

बॉबी फिशर गायब झाला.

पुढे ’फिडे’ वगैरे आलं, त्यांनी बॉबी फिशरला आव्हान दिलं कि - ये, लढ, नाहीतर दुसरं कुणीतरी विश्वविजेता होईल, पण कुठलाही मागमुस मागे न ठेवता बॉबी फिशर बेपत्ता झाला तो झाला.

शाळेतुन परत येता येता बागेत बसणाऱ्या अट्टल जुगारी चरसी लोकांकडे उत्सुकतेने बघत बघत जॉशुआ वेइट्झकिन बुद्धिबळ खेळायला शिकला. आय मीन - तो खेळायला शिकला हे कुणालाच कळलं नाही. आई हात ओढत घरी न्यायचा प्रयत्न करायची आणि हा सात वर्षाचा पोरगा चरसींच्या कोंडाळ्यातुन हटायचा नाही. एकदा गम्मत म्हणुन एका भिकारी पण नावाजलेल्या जुगाऱ्याला त्याच्या आईने पाच रुपये देऊन जॉशुआशी खेळायला सांगितलं. दोन मिनिटांच्या स्पीडचेस मध्ये जॉशुआ हरला, पण दोन मिनिटं पुरी होता होता ’जॉश वेइट्झकिन’ या नावाचा रुतबा बागेतल्या अट्टल चरसींना कळला होता. सात वर्षाचा जॉश तेव्हापासुन बागेत आला कि बिड्या विझायला लागल्या आणि डोकी खाजायला लागली!
जॉशचे बाबा बेसबॉल रिपोर्टर होते.
जॉशने बॅट ऐवजी प्यादं उचललं याचं त्यांना क्षणभर वाईट वाटलं, पण मग त्यांनी जॉशसाठी उत्तमोत्तम शिक्षकांचा शोध सुरु केला. शिक्षक म्हणुन त्यांना बेन किंग्जले सापडला - सर बेन किंग्जले! बुद्धिबळापायी स्वत:चं आयुष्य उधळलेला आणि अनेक आयुष्य उध्वस्त झालेली पाहिलेला - जुना जाणता शिक्षक. त्याच्या कडुन शिकत बागेतल्या अवलिया लॉरेन्स फिशबर्नशी टपोरी बुद्धिबळं लढत जॉश धमाल आणायला लागला.

पहिली स्पर्धा खेळेपर्यंत.

जॉशचं दुर्दैव म्हणजे खेळलेली पहिलीच स्पर्धा जॉश जिंकला.
इतके दिवस ’आपल्या बाळात गुण आहेत’ एवढंच माहित असलेल्या जॉशच्या बाबांना पहिल्यांदाच आपल्या बाळात किती किती गुण आहेत याची प्रचिती आली. प्रत्येक स्पर्धेगणिक त्यांची मान अभिमानत गेली आणि जॉशला हरायची भिती वाटायला लागली. राणी बाहेर काढु नकोस, पेशन्स ठेव म्हणणारा बेन किंग्जले, धुंवाधार लढ - पटाशी नाही तर प्रतिस्पर्ध्याशी लढ म्हणणारा लॉरेन्स - जॉशला समजु शकले नाही. ते काम केलं जॉशच्या आईने. न बोलता. जॉशने बुद्धिबळ सोडलं. चूक लक्षात आल्यावर सगळ्यांनीच मग जॉशला असं कर, तसं कर सांगणं थांबवलं.
आणि अशात अचानक - जॉश खेळायला लागला. बेन किंग्जले म्हणाला तसं - पटावर प्यादी न ठेवता.
पटाशी न खेळता, प्रतिस्पर्ध्याशी न खेळता - स्वत:शी खेळायला लागला.
पुढच्या चालीचा विचार न करता - पुढच्या पंधरा चालींचा विचार करु लागला.
आणि जॉश वेइट्झकिन स्वत:साठी जिंकु लागला.
पिक्चर संपला तेव्हा जॉश वेइट्झकिन - अमेरिकेचा अठरा वर्षांखालील - बुद्धिबळ विजेता होता आणि त्याला बॉबी फिशर बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला ’मी बॉबी फिशर नाही!’ हे खमक्यात सांगु लागला होता.

एवढं होऊन - गेला तसा अचानक बॉबी फिशर परत आला!
सतरा वर्षांनी!!
फिरुन बोरिस स्पास्कीशी लढला.
फिरुन जिंकला आणि पुन्हा बेपत्ता झाला.

पण यंदा परत आला नाही.
दोन-तीन पॅरेग्राफ्स पुर्वी त्याला विकीपीडिया वर शोधुन काढलं तर कळलं कि बॉबी फिशर मागच्याच महिन्यात गेला....


लेखाला टायटल तर दिलंय ’न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं’, पण लिहितोय तसा भलतेच प्रश्न पडत चाललेत आणि भलभलत्याच प्रश्नांची उत्तरं मिळत चाललिएत. आता हे लिहिलंय तर पब्लिश करावं का?
करुन टाकावं - कारण अजुन वर्षभर थांबुन त्यात काही सुसुत्रता येईल कि नाही ही शंका आहेच.
वर्षभरापुर्वी आठवलेले डीसीएच, विचार करायला लागणारे आरडीबी, काल परवाचे ’४९ अप’ आणि बॉबी फिशर....

बायकोने मला वाट पहायला लावणं बंद केलं पाहिजे.

Thursday, January 31, 2008

आठवण आठवण - जय मल्हार

मला एक बायको आहे.
आणि एक मित्र आहे.
आय मीन - मित्र अनेक आहेत, पण बायको एक.
आय मीन -
वेट अ मिनिट - झोल होताहेत.
मला म्हणायचंय वेगळंच आणि बाहेर येतंय भलतंच!

मला लिहिण्यापासुन परावृत्त करणाऱ्या दोन व्यक्ती - एक माझी बायको आणि दुसरा हा मित्र.
अनेक जवळच्या (ऑर जवळच्या अनेक) मित्रांमधला हा एक मित्र. (असं लिहितोय म्हणजे मी थाप मारतोय. कारण मला फारच थोडे जवळचे मित्र आहेत). {ओह बाय द वे - पूर्णविराम हा कंसाच्या आत घालतात कि बाहेर?}
बायकोचं म्हणणं असं कि मला हजार चांभारचेष्टांसाठी वेळ आहे, पण तिच्यासाठी नाही. (हे ऍक्चुअली खरं नाहिए - पण तरी).
माझ्या मराठी लिखाणाला तिचा तत्वत: विरोध नाही, पण ज्यातुन पैसे अथवा मार्क्स मिळत नाहीत अशा गोष्टी निरर्थक - हे गुल्टी पासपोर्टचं ब्रिदवाक्य असल्याने तिचाही नाईलाज होतो.
ति़च्या उलट मित्र - मी लई भारी लिहितो असा त्याचा गैरसमज. वेल, नॉट एक्झॅक्टली, पण माझा ऍटिट्युड लई भारी असा त्याचा बचपनसे गैरसमज. तर त्याचं म्हणणं असं कि - वेल, त्याची बरीच म्हणणी आहेत. अगदी मी का लिहावं इथपासुन मी कुठे लिहावं (आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे - कुठे लिहु नये) इथपर्यंत.
तर बायको आणि मित्र यांना सुरक्षित अंतरावर ठेउन लिहित होतो, तोपर्यंत बरं चाललं होतं. दोघांचे एकेकटे हल्ले व्हायचे ते ही काही वाईट नव्हतं, पण काही महिन्यांपुर्वी बहुतेक एकत्र हल्ला झाला आणि....आणि पुढचं आठवत नाही.
म्हणजे ते कसं - ’मै कहां हुं?’ माणुस बेडभोवतीच्या आपल्याच माणसांकडे आश्चर्याने पहातो तसं माझं आणि माझ्या पोस्ट्सचं झालं.
म्हणजे हे मीच लिहिलंय माहिती होतं, असंच वाटलेलं माहिती होतं आणि मग आपण कसे एस.टी. स्टॅंडवर कुणा सटासट चित्रकाराच्या चित्रांकडं बघुन ’कसं काय जमतं एकेकाला....’ चेहरा करतो तसा मी माझ्या पोस्ट्स कडे पाहुन करायला लागलो.
त्यातुन झालं असं कि -
खरं सांगायचं तर काहीच झालं नाही.
लिहायचं थांबलो म्हणुन बायकोची भुणभुण थांबली नाही कि मित्राची गाऱ्हाणी....
रात्र आणि दिवस जात राहिले - or whatever....
मग एड भेटला.
एड म्हणजे - एडवर्ड.
आडनाव - नॉर्डन. नॉर्टन नव्हे. नॉर्डन.
त्याचं झालं असं कि नेहमीसारखा मी ’सबवे’ मध्ये गेलो लंच साठी.
नेहमीसारखी त्याच वाढप्याला तीच ऑर्डर दिली.
टुडेज स्पेशल ऑन व्हाईट, पेपरजॅक प्लीज, येस प्लीज, लेट्युस, टोमॅटो, अनियन, ग्रीन पेपर, कॅन आय हॅव सम ऍलॅपिनोज प्लीज, चिपोटले साऊथवेस्ट, नो थॅन्क्स, कॅन आय हॅव अ ग्लास फ़ॉर वॉटर, थॅन्क यु.
आता नमुद केली पाहिजे ती गोष्ट म्हणजे - मी माझी ऑर्डर कधीच बदलत नाही.
सबवेचं ’डेली स्पेशल’ रोज बदलतं, म्हणजे रोज त्यात वेगवेगळ्या प्रकारचं मीट असतं, हाच काय तो बदल. त्याला मी जबाबदार नाही.

****

निद्रानाशाच्या कविता -

असं म्हणुन निद्रानाशाच्या कविता न लिहिणं म्हणजे जनतेला चुत्यात काढणं.
तसं तर तसं.
रात्री अकरा चाळीसला धाड धाड खाली जाऊन लॅपटॉप आणला तेव्हाच माहित होतं कि आजच्या रात्रीला चुना.
सकाळी सकाळी बो ला मर्सर आयलंडवर भेटीन म्हटलंय - पण सकाळचं सकाळी.
विशीचे पाच महिने राहिले.
याचं फारसं सोयर नाही आणि सुतकही नाही.
यावर लिहु म्हटलं तर विशी आठवायला लागली.
लहानपणापासुन खत्रुड मराठी खत्रुडपणे शिकवण्याचा आणि मुख्य म्हणजे मी शिकण्याचा परिणाम म्हणजे - मन नको तेव्हा नको तिथे भरकटतं आणि जिथे भरकटणं आवश्यक असतं तिथे - म्हणजे इथे, ते लाईनीत चालायला लागतं. म्हणजे विशी आठवायची म्हणजे - १९९८ साली मी नक्की काय करत होतो - असा सरळ सरळ विचार डोक्यात आला.
चिडचिड झाली.
म्हणजे १९९८ मुळे नाही, माझ्या डोक्यात असा बिनडोक विचार आला म्हणुन.
१९९८ - म्हणजे मी आणि छावी चुत्यासारखे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. म्हणजे - असं मला वाटलं होतं. मी पडलो होतो, छावीचं छावीला माहित.
लिहायचं म्हणजे गांडीत दम लागतो.
मी एकेकाळी क्ष मुलीवरती प्रेम केलं होतं.
हे वाक्य इथे लिहायचं सोडा, स्वत:शी मान्य करण्यात अनंत वर्ष गेली.
माझ्याकडुन चूक झाली - परत न करण्याचा प्रयत्न करीन - हे एक असंच निद्रानाशाचं वाक्य.
वीस वीस वीस - नाही, आढावा नाही घेणार. कारण....कारण झोप आवश्यक असताना जागं राहुन आढावे घेणं यासारखी चुत्येगिरी नाही.
’अस्वस्थ दशकाची डायरी’ लिहावी तर एवढं पण अस्वस्थ नाही गेलं दशक - थोडं फार मेहनतीचं वगैरे ठीक आहे, पण रुळलेल्या वाटा चालत गेलं कि रुळलेलं यश मिळतं आणि त्याच्यात दम नसतो - हे तुम्हाला माहित आणि मला.
तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही सुदैवी आहात.
वि.कु. अमिताभचं उदाहरण द्यायचे - कि चित्रपटात दाखवतात तसा हीरो - हुशार,प्रामाणिक, शूर, यशस्वी - जन्मत: नसतो. त्यामागची मेहनत चित्रपटात दाखवत नाहीत. पण तुम्ही तसे बनु शकता - एकेक मुद्दा घ्या - त्याच्यात हीरो बना. वगैरे वगैरे.
नाही - अनादर नाही करत आहे, एकेक मुद्दा घेऊन हीरो बनता येतं, पण त्यात ढिशुम ढिशुम ची मजा नसते.
ओह बाय द वे - हे म्हणायला ठीक, पण भर चौकात कुणाकडुन सण्णकन कानाखाली खाऊन बघा, किंवा त्याचं नाकाड फोडुन हातावरचं रक्त त्याचं कि माझं या झोलात अडकुन पहा - छातीतला भाता बाहेर पडायला धडपडत असतो, कानशिलं तापलेली असतात, हात थरथरत असतात आणि आईशपत - आख्ख्या जगातुन किण्ण आवाज येत असतो....
तर - ढिशुम ढिशुम ची मजा वेगळी.
विशीत ढिशुम ढिशुमची मजा घेतली. त्यात तेव्हा काहीच मजेशीर वाटलं नव्हतं, आता....मे बी.
हे लिहायचं खुळ म्हणुनच वाईट. तेव्हा कसं वाटलं होतं हे तेव्हात जाऊन लिहायला लागतं कारण आज त्याबद्दल वेगळंच वाटत असतं. आय मीन आठवणी वगैरे निव्वळ भंकसपणा आहे - मनाचे खेळ.
म्हणजे त्याचं असं कि मी चार वर्षाचा असताना मला विकेटकीपर म्हणुन उभा केला. बंटीच्या बॉलवर मंगेश पुढं जाऊन मारायला गेला, बॉल हुकला, आणि माझ्या हातावर टप्पा खाऊन स्टंपवर आदळला. मग सगळ्यांनी धावत येऊन माझी पाठ थोपटली - हे असं मला लख्ख आठवतंय. पण हल्ली मला तसं नक्की झालं होतं का? याची घोर शंका वाटतिए.
बहुतेक म्हणुनच लोकांना जुन्या मित्रांना भेटायला आवडत असावं. आपापल्या आठवणी तपासुन घेऊन (वाक्य अर्धवट - कंस अर्धा
पण तिच्यायचा माझा प्रॉब्लेम असा कि मला तेव्हाच्या आठवणी तेव्हासारख्याच आठवतात - त्या जुन्या होत नाहीत, त्यांविषयीच्या माझ्या भावना बदलत नाहीत किंवा त्यांची इंटेन्सिटी ही. आयदर हे - किंवा मी त्या आठवणी - म्हणजे आठवणींची माझी व्हर्जन - उगाळत रहातो, त्यांना जुनं होऊ देत नाही....
’घायल’ मध्ये सनी देओल कसा जुन्या घरच्या अठवणींत एवढा मग्न होतो कि तेव्हाची घरंगळती बाटली उचलायला खाली झुकतो - तसं काहीसं....
असा आठवणींचा लवाजमा घेऊन लिहायला बसल्यावर खरं काय आणि भास कुठले, दाखवायचं काय आणि बघायचं किती, कसं, कुठे, कुणाला - झोल इतके होतात, कि काव्याशिवायच्या निद्रानाशाच्या कविता जन्म घेतात.
किंवा घेत असाव्यात.
वीस -
लिहायला काही नाही, असल्यास लिहावंसं वाटत नाही, वाटल्यास लिहिता येत नाही, येत असल्यास लिहायचा दम नाही, दम असल्यास -
वेल दम आहे म्हणुनच लिहायला बसलोय, पण वीसला जनक मानुन लिहिणं यात राम वाटत नाही.
वीस आलं आणि गेलं - त्यात माझं काय झालं हे महत्वाचं.
माझ्या आयुष्यात माझं काय झालं याचा ऍनॅलिसिस मला करता आला तर सही होईल.
’Life is what happens when you are planning for something else' असं लोक म्हणतात - तसं माझ्या बाबतीत झालं नाही. मी जे प्लॅन केलं ते मिळवलं. निदान मला तरी तसं वाटतं. म्हणुन मी महान होत नाही. चारचौघांच्या नजरेत यशस्वी होतो. हेच चारचौघे दशकापुर्वी माझ्या याच प्लॅनला हसत होते - हा भाग अलाहिदा.
या चारचौघांना ’ले भेंचोद’ म्हणणं २-४ वर्षांपुर्वी बरं वाटायचं - आता बोअर वाटतं.
दशकांपुर्वीची जयगीते अजुनी घुमत कानी
दशकांपुर्वी अखिल धरेला क्षेम दिले आम्ही
ते सळसळते पौरुष फिरुनी नसांत वाहु द्या....

गिरीकुहरातिल गर्द बनांतिल सिंहाच्या छाव्यांनो....उद्या झोप बीप झाली कि परत लिहायला बसा.

मीनव्हाईल - लिहिणं चालु.
नसल्यास - लिहायचा विचार चालु.
नसल्यास - अनुभव चालु.
नसल्यास - असला पाहिजे.
नसल्यास - त्याची आठवण बनते.
बनल्यास - छळु लागते.
लागल्यास - कधी ना कधीतरी लिहुन तिची कत्तल करावी लागते.
विशीची कत्तल - तिशी उदास.

मध्यंतर.

नको - समाप्त.

****

ता.जा.भां.ल.न.