इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड
सतरा.
- सलील वाघ.
काही पानगळीची
काही पानगळ थांबलेली
वसंताच्या रस्त्याला लागलेली
वस्तुमानाची वाटणी वेगळी
प्रत्येक झाडात फांद्यांना खोडांना
पानांना
तसंच माझं इथं आहे
प्रत्येकात प्रत्येकात माझी
गुंतवणुक आहे वर्मी
ठक्क आकाशावर ठिण्ण चांदण्यांवर
शुकशुकाट दिव्यांवर
अपरात्री पसरलेल्या मैदानांवर
माणसं घरोघर गेल्यावर
आणि कोणत्यापण रस्त्यांवर
माझा जीव आहे वर्षांवर महिन्यांवर
प्रसंग कट्टे ओळखी आठवणी
आजुबाजुच्या झुडपाकुंपणाला
मंद फासलेले कडुलिंबाच्या
मंजिऱ्यांचे वास शिवाय
मोगऱ्याचेही सहनशक्तिपलिकडचे
घणाघाती घणाघाती
माझे अवयव आहेत ते
मला फुटलेले
मी त्यांना आपलं मानतो
शिवाय त्यांना मी मजकुराची
विरामचिन्हं मानतो
धाव घेतो एका विरामचिन्हाकडुन दुसऱ्या
प्रत्येकाकडुन उचल घेत
धाव घेतो धाव घेतो
उफाळुन धडपडत
गोळा करतो फेकतो गोळा करतो
माझ्या संज्ञेची खांडोळी वारंवार
धाव घेतो एका विरामातून
दुसऱ्या विरामाकडे
प्रत्येकात असतो वेग
कोंडिस्त
माझ्या अस्तित्वाचा स्फटिक
पदोपदी विरघळतो धारण होतो त्यात
निकरानी. तगमगत. मंत्रमुग्ध.
पण हवं ते मिळायला
धूळप्रमाथी पश्चिमवारा इथं येईल
तेंव्हा मी सगळ्या इथून
हायसा झालेलो असीन
माझ्यालगत बिलगुनही
अनोळखी देशात
अस्तित्वप्रमेयाची दणकट चौकट फोडून
अज्ञाताच्या अमानुष प्रांतात
फारतर माझा लवलेश
आणि मागमूस इथं उरणार
कवितांमधुन ठाय लयीत
कवितांमधून ठार लयीत
एकदा मला एक कोणतंतरी
फूल सापडलं होतं म्हणजे
ऍक्चूली फूल असं नाही
फुलासारखंच काहीतरी
ते मी तुझ्याकरता
दोनशेपानी वहीत
जपुन ठेवलवतं फार
हमसाहमशी. तू दिसताक्षणीच
शेकडो शुभवाद्यं डसली इत्यादी सगळं
मी तुला कसं कळवू कायम ठेवू
कवितेत्नं
माझी अस्तित्वमुळं थेट पसरलेली
माझ्यापासून जैविक शरीरानी
माझ्या उंचीत रंगात चणीत श्वसनशैलीत
रक्तगटात वीर्यपेशींत घटकात एकीकडे
माझ्या इतिहासभूगोल मूल्यांत
परंपरा सणासुदी मानस-विश्वात
एकीकडे मी आत्मसात करतो
अभिव्यक्त करतो त्या जाणीवांच्या
अंतरिक्ष खगोलात. ददातीत. शोषात.
अगदी एकूणएक एकूणएक
आणि तू तरी वेगळी कशी
तुझी सुद्धा अस्तित्वमुळं
वेगळी तरी अशीच थोड्याफार फरकानी
अशीच गेलेली सर्वकडे.....
अस्तित्वाचं केवलमूल्यं
व्यवस्थेच्या कालावधीच्या
जागतिक नाईलाजाला खिळलेलं
माझ्यासारखंच एका मनुष्याचं माणसाचं
या सगळ्या पाळामुळांचे भानांचे
उंबरे ओलांडून
कसं जाता येईल
क्रांतीमान उजाडणाऱ्या भाषांमध्ये
नको असलेल्या संदर्भांना धाशा देऊन
तुझ्यापुढं निमिषात कसं होईल
माझं रूपसर्जन कवितेत्नं आणि -
परिक्रमेचं परिमार्जन खडानखडा?
त्यातून शिवाय हल्ली तर मी
मलाच आवडेनासा आहे
माझ्या खुनशी नजरेपास्नं
नेटानी लपवतो मी स्वत:ला
पण एक दिवस असा येणार
आणि खडसावेल मला परखड
म्हणून मी अगोदरच सगळ्या
सगळ्या संवेदना दोलायमान
पाजळून घेतोय
मांज्रीसारख्या
ह्यावर त्यावर
ओक्साबोक्शी
'Who in their right state of mind would work on something for the entire night and not save it?' इति बायको!
ReplyDeleteमरमर करुन शनिवारच्या पहाटे पर्यंत लिहिलं आणि उद्या सेव्ह करु म्हणुन कोसळलो. उगवेपर्यंत (घरातले इतर ३ लॅपटॉप्स सोडुन) बायकोने घराची साप्ताहिक स्वच्छता करताना माझा (एकमेव) लॅपटॉप रीस्टार्ट केलेला!
एनीवे - जॉन म्हणतो त्याप्रमाणे मर्फिज लॉ ला अनुसरुन रविवारी रात्री १२.३० वाजता लिहिण्याची प्रचंड उर्मी आणि सकाळी उठुन साईट वर जायचंय....!
मीनव्हाईल या पोस्ट चे काय लावायचे ते अर्थ लावा.
नाही लावलेत तर काही हरकत नाही.
पुस्तकाचं पान उघडलं.
’लम्हा शोधताना दास्तां सापडली’ अशी किंवा तत्सम खुण सापडली.
नगमा श्वास घ्यायला लागला.
तो जिवंत होण्याआधीच उतरवुन काढला.
पुस्तकात खुण सापडली म्हणजे ही कविता वाचताना कधिकाळी काहितरी वाटलं होतं एवढाच त्याचा अर्थ. काय वाटलं होतं याचा विचार करायला आता उशीर झालाय. म्हणजे ऐतिहासिक उशीर वगैरे नाही - पण रात्र फार झालिए.
शीर्षकाचा अर्थ कुणीतरी विचारेलंच.
तेव्हा सांगीन.
आता जांभया असह्य....
सांग
ReplyDeleteकविता...व्वा व्वा!! पण तुझं "भाष्य" वाचायला मिळालं पाहिजे बुवा. नुस्तंच चित्र महत्वाच नसतं रे, त्याची पार्श्वभुमी, त्यातले रंग सगळंच महत्वाचं असतं. तारेत न लिहिलेल्या चित्र्यांच्या काही कविता वाचाच, निदान मी म्हणतो म्हणून तरी. तुला नक्की आवडतील.
ReplyDeleteEk ratra panala laun lihilela kahibahi ugavtya suryana nahisa kela... arere..:)
ReplyDeleteTe nakkich eka ratripurta maryadit navta..
Salil chya kavitena sangitlele lakho astitva sandarbha aslela?
Tari pan link lavaycha prayatna karuya kay asava te kahibahi...
Joel: It would be different if we could just give it another go-around.
Clementine: Remember me. Try your best. Maybe, we can.
Rahul Kale
झक्कास
ReplyDeleteमला एक सांग अभिजीत, तू ही कविता इथे लिहीताना कसा लिहीत होतास? म्हणजे फक्त पुस्तकातले शब्द उतरवून काढत होतास की तुला अर्थ समजलाय म्हणून लिहीत होतास? खरंतर, मी दोन वेळा वाचून समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा तर माझा पेशन्सच संपला पुढे काय लिहिलंय हे वाचायचा. म्हणून विचारलं की लिहिताना तुलाही असंच वाटलं का?
ReplyDeleteआता जगजाहीरपणे असा आपला बावळटपणा व्यक्त करणं जरा जडच जातंय, पण मला या कवितेतला(?) एक शद्बही समजला नाही की साधी पुसटशी कल्पनाही आली नाही की त्या माणसाला लिहिताना काय म्हणायचं होतं. एनीवे, संदर्भासहीत स्पष्टीकरण लिहिलंस तर नक्कीच आवडेल वाचायला आणि काहीतरी समजल्याचा आनंदही होईल. :-)
चु.भू.दे.घे.
-विद्या.
आधीची कमेंट आता सबमिट केल्यामुळे गायब झालीय त्यामुळे पुढचं लिहिण्यासाठी अजून एक. अरे,म्हणजे होतं काय की अनेकदा न समजणारे संदर्भ, भव्य-दिव्य शब्द आणि न झेपणाऱ्या उपमा, यातूनही बाकीच्यांना ते समजलं आणि आवडलंही याचं आश्चर्य आणि आपल्याला न समजल्याचं फ्रस्ट्रेशन, सगळं साचलं की सॉलिड चिडचिड होते. त्याच्यात असली एखादी कविता आली की अजून भर. तू आपलं तुझ्या भाषेत काय ते लिही म्हणजे आम्हा पामरांची या त्रासातून सुटका होईल.
ReplyDelete-विद्या.
बरं झालं उलट काही तुला हे कसं भिडलं वगैरे टाकलं नाहीस. कविता प्रत्येकाला वेगवेगळीच भेटते-भेटावी. (उगीच अभिजीतला असं वाटलं तर आपल्याला तसंच वाटतय की काय असं तपासून पाह्यला लागायचं:P)
ReplyDeleteमला आवडली कविता. ह्या ब्लॊग मधल्या पोस्ट्स च्या abstract स्टाईलला कमालीची मिळतीजुळती वाटते. अर्थात तसं काही इथे वाचूनही जमाना झालाय. ( ह्या आधीच पोस्ट आपलं ’उगीच काहीतरी’ स्टाईल होतं). कदाचित डिलिट झालेलं पोस्टं तु ’बाजार’ वर लिहिलेल्या गोष्टीप्रमाणे काहीतरी ग्रेट असणार असं वाटून हुरहुर लागलीय.
कवितांमधून ठार लयीत
एकदा मला एक कोणतंतरी
फूल सापडलं होतं म्हणजे
ऍक्चूली फूल असं नाही
फुलासारखंच काहीतरी
ते मी तुझ्याकरता
दोनशेपानी वहीत
जपुन ठेवलवतं फार
हमसाहमशी. तू दिसताक्षणीच
शेकडो शुभवाद्यं डसली इत्यादी सगळं
मी तुला कसं कळवू कायम ठेवू
कवितेत्नं >>
हे तर जाम आवडलं.
आणि
ठक्क आकाशावर ठिण्ण चांदण्यांवर
शुकशुकाट दिव्यांवर >> हे कसलं भारी वाटतय.
शीर्षकाचा अर्थ काय हे कधी सांगणार? ते (laptop मधल्या मजकुरा सारखं) तुझ्या डोक्यातून डीलिट व्हायच्या आत सांग.
बापरे. विद्यानं तर भयंकरच demand केली आहे. I declare this as a terrorist act!!
ReplyDeleteया नावाचा एक मुव्ही होता ना? जिम कॅरी फार वेगळ्या रोल मधे आहे.. नीट आठवत नाही,परंतु आठवणी erase करण्याबद्दल आहे..
ReplyDeleteneways.. पोस्ट्वरून तो मुव्ही आठवला.. कविता काहीच कळली नाही.. परत वाचीन.. पण somehow ती पुर्ण वाचवली पण जात नाहीय(डोक्यात काही शिरत नसल्या मुळेच, वाघांना काही म्हणायचे नाही आहे मला :) .. )
तुझ्या पोस्टपासून स्फुर्ति घेऊन, मी पण एक कविता छापूनच टाकली...
ReplyDeletechyayala malaa aata complex yayala laagalaye haan mama - dont tell me ki ithe comment lihinaarya pratekala hi kon kuthali kavita bhetate bitate?? Chyayala mala kashi kadhi bhetat naahi??
ReplyDeleteKavita "vaachane" hyaa prakaracha malaa prachanD kanTaLa aahe! Especially jyancha artha laavat basawa laagato...
Maajhi mazal 4 oLinchya kavitechya puDhe kadhi jaat naahi mitra - ekdach geli hoti - Raja Shiv Chhatrapati wachatana Samartha Ramdasanche Sambhaji Rajanna lihilele patra - (Hey Raja Shiv Chhatrapati madhye ki Shriman Yogi madhye ki aankhi kuthe? Kunaas thaauk?) - Aso... mudda to naahi...
Tar maajhi mazal 4 oLinchya palikade ekdach geli hoti ti -
Nishchayacha maha meru...
AkhanD sthiticha nirdharu...
(aata pudhache aathavat naahi )
vachatana... Aakhe 800 paani pustake vachatana kitii tari goshTi bhavun gelya malaa - pan tya itakya succinctly Samarthanchya tya eka kavitet hotya ki DoLyaat agadi paani taraarale... Samarth Ramdasanchi vaaNi agadi madhur aahe bagh!
Tar sangayacha mudda ha suddha naahi -
Sangayacha mudda ha ki itakya lokanna bina sandarbh / bina spashTikaraN hii kavita bhetatech kashi?? :-?
Koi batayega kya mere ko??
हीमॅन आट्यापाट्याची (असं मी आपलं बिचारयाचं नामकरण केलयं- रागावु नका) कॉमेन्ट वाचून हिंदीत लोटपोट झालो रे बाबा....असं वाटतय हा मित्र एका कोपरया आड दबा धरुन बसलाय आणि कविता भेटली रे भेटली की तिला मोठ्ठ्याने भ्भो करणार!!
ReplyDeletehaha:)).. kavita vachaNe ha in general ch ek baryapaiki kanTalwaNa prakar asato he nakki. pan himanshu arre nidan tya greeting card kavita ani gard chandane-tapora chandra-haLave rutu- shabdanni barbatalelya 'kavita' shivay jhalach tar 'khare/gokhale' kavita-charolya DoLyansamor chilTansarkhya nachat bheTat rahatat halli sagLyannach sagaLikade tyapeksha hya salil vaghanche shabd ani upama vagaire tari veglya vatatahet. nakki kay lihitoy ha asa vichar tari karayala bhag paaDatoy ha. aNi agadihi dilip chitre style n kaLanebal hi nahiyet. chitrenchya kavita tyanna swat:la tari kasha kaLatat te tyanna bheTaNara Tukaram ch jaNe. ekada patience thevun shevatparyant pochal tar nidan paschattap tari hota nahi salil vagh chya babtit:))
ReplyDelete[baki btw..ek shanka- he sail vagh fakt abhijit chyach blog var kavita ka lihit asatat? ( ani ek upa-shanka abhijit bathe mhanje ch salil vagh ka? )]
Me jar swatahchya khandyavar donda uabha rahilo na...tari pan hi kavita dokyachya varunch jail! Sadhya fakt "kahitari khupach bhari vachla" itkach feeling ahe...baki mind ekdum spotless...Blank!!!!
ReplyDeleteAni ho...hya kavitecha title Satra ka bara hae te pan sang...
ReplyDeleteतो आजन्म वैतागलेला.
ReplyDeleteआज सकाळी वैतागत उठतो, वैतागत आवरतो, वैतागत खाली येतो तर गाडी कुणीतरी ठोकलेली!
भेंचोत आता ट्रेनने ऑफिसला जायला लागणार....
स्टेशनवर येतो तर स्टेशन मोकळं.
तो एकटाच.
याचंही त्याला विषेश काही वाटत नाही.
मग म्हणतो - गेलं बोच्यात - आज ऑफिसला दांडी.
मग करायचं काय - तर उलट्या दिशेची ट्रेन घेऊ.
आणि जायचं कुठे तर - बीचवर जाऊ.
मग ब्रीफकेस घेऊन कुडकुडत बीचवर फिरत असताना त्याला ती दिसते.
मग ते (मोकळ्या ट्रेनमध्ये परत येताना) चुकुन भेटल्यासारखे एकमेकांना भेटतात.
रीतसर आकर्षित होतात आणि उरलेला दिवस (रीतसर) त्याच्या घरी घालवण्यासाठी तिच्या गाडीतुन जाऊ लागतात.
जाताना तिच्या गाडीत सापडलेली कॅसेट ऐकायला लागतात तर त्यात तिने त्याला घातलेल्या शिव्या!
मग तो चिडतो - आणि तिच्या गाडीतुन उतरुन घरी परत येतो.
कि असंच काहितरी.
मग स्टोरीत पुढे कुठेतरी हेच किंवा असंच पण व्हाईस व्हर्सा होतं.
मध्यंतरात याचं कारण कळतं - म्हणजे दोघांनी आपापली मेमरी 'सिलेक्टिव्हली डिलिट' करुन घेतलिए.
म्हणजे असं कि ऍक्चुअली तो आणि ती याआधीही एकमेकांना भेटले होते, प्रेमात पडले होते, आणि मग (ते ही रीतसर?) एकमेकांशी अधम झाले होते.
मग वैतागुन 'नको ती आठवण' म्हणुन त्यांनी आपापली मेमरी सिलेक्टिव्हली डिलिट करुन घेतली.
राहुल ने आठवण करुन दिलीच आहे तर - त्याचं नाव जोएल आणि ती क्लेमेन्टीन.
बरं इतपत तरी ठीक आहे.
म्हणजे भेटले, प्रेमात पडले, भांडले, वेगळे झाले.
पण पुन्हा भेटले!
सगळे झोल इथुन सुरु होतात....
जसे महेन आणि सुधा भेटल्यावर सुरु झाले होते....
गुलजारच्या आयची जय!
भेंचोत महेन आणि सुधा आपापल्या आयुष्यात असलेले झोल आपापल्या परीने निस्तरत होते.
बळचकर गुलजारने त्यांना परत एकत्र आणलं.
पावसाळ्या रात्री.
सोयिस्कर एका शांत स्टेशनवर.
आणि मग 'माझी को माझी न रहने दिया तो....' ची स्पष्टीकरणं त्यांच्याकडुन वदवुन घेतली.
स्वत: न देता....
हे उगीच कॉम्प्लिकेटेड भाषेत लिहायचा प्रयत्न नाहिए - लागायचे ते संदर्भ लागायचे त्यांना लागतील, नाही लागले तर 'इजाजत' पहावा.
बरं आणलं तर आणलं एकत्र - परत त्यांना आपापल्या दिशेने धाडुन दिलं.
आणि मी अजुन स्टेशनवर - गुंता सोडवत....
त्याच गुंत्यातली पुढची गाठ म्हणजे 'इटर्नल....'
मेमरी सिलेक्टिव्हली - म्हणजे व्यक्ती आणि घटनांबाबत बदलली किंवा डिलिट केली तर नियती बदलते का? - असा काहिसा प्रश्न विचारणारी....
धूळप्रमाथी पश्चिमवारा अजुनतरी माझ्या पर्यंत पोचलाय कि नाही माहित नाही, पण दोनशेपानी वहीत ठेवलेले लम्हे सापडतात - 'सतरा' च्या रुपात.
'इजाजत' हा पोएटिक जस्टिस झाला.
'इटर्नल' हा कल्पनाविलास.
'सतरा' हे वास्तव....
'सतरा' ही 'इजाजत' आणि 'इटर्नल' च्या दरम्यान आली.
एका न सुटलेल्या गुंत्यात परत परत न अडकण्याचा प्रयत्न करताना.
आणि कविता आवडते आवडते म्हणजे तरी काय?
'एक मूड एक कैफियत
उसमें कुछ सहीसे लव्ज जोड दो तो नगमा सांस लेने लगता है
जिंदा हो जाता है
बस इतनीसी तो जान होती है एक लम्हे की
हां कुछ लम्हे बरसों जिंदा रहते है....'
असं गुलजार म्हणतो.
अगदी नगमा नाही पण त्यातलाच कुठलातरी लम्हा म्हणजे कविता.
हवेहवेसे दु:ख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलु काही....म्हणणारी.
'मालगुडी डेज' पाहिल्याचं आठवतंय?
मला अंधुक आठवतंय.
स्वामी च्या सुखात सुख वाटलं असेल नसेल पण दु:खात दु:ख वाटल्याचं व्यवस्थित आठवतंय.
त्याने त्याचं खादीचं जाकिट (जॅकेट नव्हे) परदेशी कपड्यांच्या होळीत टाकल्याचं मला अजुन दु:ख होतं!
परत 'मालगुडी डेज' पाहिली तर तेच दु:ख त्याच तीव्रतेने होईल का?
होईल न होईल.
पण होईल ची शक्यता जास्त.
पण यंदा होईल ते दु:ख नक्की असेल कशाचं नि कुणाचं?
स्वामीचं, त्याच्या कोटाचं, त्याच्या हरवलेल्या निरागसतेचं, कि माझ्या विसरुन गेल्या बालपणाचं?
शिवाय कुणाला कशाचं दु:ख होईल हे कसं सांगावं?
दु:खही होईल कि नाही हे ही?
कवितेचं तसंच काहीतरी.
अगदीच पान उघडलं, दिसली, वाचली, लिहिली - एवढं सोपं फक्त नव्हतं ते.
यातल्या प्रत्येक क्रियेत वेगवेगळे संदर्भ येत गेले.
त्याचे वेगवेगळे अर्थ लागत गेले.
अगदीच 'डंब डाऊन' करायची झाली कविता तर असं म्हणावं लागेल कि हीरो यडा झालाय, छावीचं लग्न झालंय किंवा होऊ घातलंय किंवा काहीही झालं तरी त्याच्याशी होणार नाही अशी परिस्थिती, आणि मग तो शब्दांच्या गुंत्यात अडकलाय.
आता कविता सोडुन काहीच नाही.
कन्फ्युजन.
- असं काहीतरी.
अगदीच वाक्यावाक्याचा अर्थ सांगायचा झाला तर मला आवडलेली कविता मी हरवुन बसेन म्हणुन - वाचा.
आवडणार नाही.
परत वाचा.
लगेच आणि सगळंच आणि कळलंच पाहिजे अशी अट ठेवलीत तर - या पानावर किंवा त्या कवितेत काय - या आख्या ब्लॉगवर काहीही कळेलसं सापडणार नाही.
एनीवे -
जुनी डायरी परत वाचुन काय वाटतं?
आय मीन 'मी कसला च्युत्या होतो!' सोडुन?
खरं सांगु का?
काहीच वाटत नाही!
कारण एकदा लिहिलं कि ते निदान स्वत:साठी तरी अमर होऊन जातं.
मग तो जुना दिवस - त्या दिवसासारखाच परत आठवतो.
त्यात जुन्याचं जुनेपण जाणवत नाही.
तेच आधी कधी न पाहिलेला फोटो, मित्राने उगाळलेली - तेव्हा कधीही विसरणं शक्य नाही वाटलेली - आठवण वेगवेगळ्या मूड मध्ये नेते.
'सतरा' वाचली तेव्हा पोएटिक जस्टिस पासुन अगदी कल्पना विलासाकडे नसलो तरी विलासाकडे वाट चालु लागलो होतो.
यंदा 'ओक्साबोक्शी' वर मागे ठेवलेली पोतडी पुन्हा दिसली.
पोतडीतला जुना मूड आठवला.
त्याचं दु:ख झालं नाही आणि दु:ख न होण्याचं आश्चर्यही वाटलं नाही.
'सतरा' च्या वेळी आयुष्य दोलयमान होतं.
'सतरा' ही त्या दोलायमान आयुष्याला (तेव्हा) वाहिलेली लाखोली -
’इटर्नल’ च्या सुडाआधीची -
'इजाजत' सारखी -
ह्यावर त्यावर
ओक्साबोक्शी....
----------------------------
अभ्या घे - सांगितलं. :)
विद्या - I hope तुला पोस्टपेक्षा जास्त कळलं! :)
भाग्यश्री, आनंद - प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. युजुअली जनता प्रतिक्रिया लिहीत नाही, कवितांना तर नाहीच नाही (अर्थात - आयदर वे - मला त्याच्याशी देणंघेणं नाही). पण ’कविता वाचली, कळली नाही’ हे कळवल्याबद्दल धन्यवाद. :)
आनंद - ’सतरा’ कारण ’सलील वाघ - निवडक कविता’ या पुस्तकात ही कविता सतरावी आहे!
संवेद, हरेकृष्णाजी - कविता आवडल्याबद्दल मी धन्यवाद म्हणणं खरं तर चुकीचं - कारण त्यात माझं काहीच श्रेय नाही, पण तरिही प्रतिक्रियेच्या तसदीबद्दल धन्यवाद. :)
ट्युलीप - मी सलील वाघ नाही. सलीलचं दुसरं पुस्तक आल्याचं मी मागच्या भारत भेटीत पाहिलं, पण का कुणास ठाऊक ते मी उचललं नाही - कदाचित पुढच्या भेटीत उचलीन. परवा सलीलचा ई-मेल ऍड्रेस मिळाला, पण मेसेजला ’मेलर डेमन’ आला - बघुया काही कॉन्टॅक्ट होतोय का!
शिवाय - माझ्या ब्लॉगवरच्या सर्व मजकुरास मी जबाबदार असल्याने मला किंवा कंटेटला (माझ्या ब्लॉगवर) डिफेंड करण्याची विषेश गरज नसावी.
बाबा - आपण आज सुरु केलेल्या Economics च्या शिकवणी सोबत कवितेची शिकवणी सुरु करु - बघु जास्त झिणझिण्या कशाने येतात ते! :))
राहुल -
हे पुस्तक तु मला दिलंस (आणि त्यानंतर मी ते रितसर ढापलं) त्याला जवळपास ५ वर्ष झाली.
तुझ्या प्रतिक्रियेतुन तुला ही कविता आठवतिए असं वाटलं. इथे जनता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतिए, पण मला आवडायच्या आधीच सलीलच्या कविता तुला आवडल्या होत्या.
ही कविता ’जयपुर’ मध्ये तु वाचुन दाखवलीस तेव्हा आपण एकमेकांकडुन ती आवडल्याबद्दलची स्पष्टीकरणं मागितली नव्हती.
पण आज उत्सुकता वाटतिए.
स्पष्टिकरणाची नाही - पण in general तुझ्या मताची! मागच्या पाचेक वर्षात सलीलला भेटलास वगैरे का?
आणि by the way - तुझ्या कविता मला सलीलच्या कवितांएवढ्याच ’भाई’ वाटतात - पुस्तकाबद्दल बोलला होतास, कुठवर आलंय?
मी आता पार येडा झालोय, कम्प्लीट मान्य...
ReplyDeleteडोकं पार फिरायच्या आधी ट्युलिपला एक सलाम! मोठ्या लोकांच्या धोतराला हात घातलाय! ट्यु. तुझ्या साठी मी चित्र्यांची एक अप्रतिम कविता छापेन. नक्की वाच आणि मला सांग. पण मान्य, बरयाच कविता, मी मागे अभिजीतला म्हटलं तसं तारेत लिहीलेल्या वाटतात...
अरे अभिजीता...तुझं काय करु? आपण जाम फिदा...म्हणजे आता संपलच सगळं...मनातून मला आसुरी आनंद वगैरे होतोय हे सगळं वाचून..का ते विचारु नकोस. सगळे yz तिकडे संमेलनात नाही नाही त्या चर्चा करत बसतिल पण साल्यांना माहित नाहीच खरं साहित्यं कुठं फळफळतय ते!
संवेद -
ReplyDelete"मनातून मला आसुरी आनंद वगैरे होतोय हे सगळं वाचून..का ते विचारु नकोस. सगळे yz तिकडे संमेलनात नाही नाही त्या चर्चा करत बसतिल पण साल्यांना माहित नाहीच खरं साहित्यं कुठं फळफळतय ते!"
संपूर्ण शरणभावासह अत्यानंदानं सहमत.
Speechless !!!
ReplyDelete-Vidya.
क्या बात कही है, पोस्ट पेक्षा कॉमेण्ट चेपून टाकलीयेस. मजा आ गया..
ReplyDeleteमघापासून तीन वेळा परत येऊन तुझी पोस्ट वाचली आणि तरी समाधान होत नाहीये. आणि काहीतरी लिहायचंय ते काय आहे हे पण कळत नाही.
ReplyDeletePlease keep writing....
-Vidya.
mooL kavita theT Dokyavarun geli mhaNun kahich comment karavena...ni tyavarachya comment var kay comment karayachi...
ReplyDeletefakt trivar salaam!!!...
meghanapramane mihi Samved shi shabd n shabd sahmat...
Abhi,
ReplyDeleteAkher ekdacha lihilas tar..
Kavitevar nahi lihilas..
Te apekshit navtach..
Pan Eternal Ijajat ani satra
combination awadla..
Ithe Satra samjun ghenyasathi challeli lokanchi dhadpad baghun chan vattay..
Ata tula agdi utsukta vagaire vattiye majhya matachi mhanun he thodasa kavitebaddal..
Kavita he goshta ithli nahich muli..
Ti ithli rahivasi ch nahi tyamule te tumhala pahije teva pahije tashi ajibat bhetnar nahi..
Kavita vijesarkahi chamakte tumchya avkashat..
tyaveli tya prakash-nimishat je ani jevdha disel tevdhach tumcha..
Bakicha aplyasathi nahi mhanaycha ani pudhe vhaycha...
Majhya kavitela bhai mhantlyabaddal dhanyavad..
Bhaigiri aplya gallipurtich maryadit thevli ahe...:)
Rahul
Ekdum dho dala!!! Kavita vachane ek prkar ahe...kavita samajne ek....tu je karto ahes..tyala Kavita jagne mhanta yeil kadachit!
ReplyDeleteHey Abhijit,
ReplyDeleteTula tag kelay.. lihi nakki
http://parag-blog.blogspot.com
arre sahi.. parag ne bathe sahebanna TAG kelaye.. for a change, bathe sahebankadun "gadya" vachayala miLel apalyala. ;-)
ReplyDeletecome on! (btw, pls avoid Rarangdhang, te adhich zalaye eka blog var)
mala kavita kadhi bhetat naahi.
ReplyDeletekalat ajibaat naahi.
majha mitra dhananjay mhanto tasa,
"I forget whats in the nth line when I reach to n+5th line"
kinvaa himanshu mhanto tasa - 4 olin pekshaa jaast asel, tar tithech doka band hota, dole vaachat raahataat.
tujhyaa post pekshaa tujhi comment vaachaaychi jaast tivra icchhaa hoti. hya comments madhla discussion vaachaavasa vaatat hota.
samved, himanshu, tulip, rahul, vidya - saglyaanchyaach comments varun tu kaay lihila aahes, aani tyaatla konaalaa kiti jhepat aahe, kaay aavadat aahe...tya baddal vaachaycha hota...
mag tujha explanation.
mee ijaazat naahi paahila. eternal sunshine paahilaa, tevha major confusion jhaala hota. as u say, it is indeed the other end of the spectrum - kalpanaa-vilaas!
ijaazat jevha baghel, tevha kadaachit tu jyaalaa "poetic justice" mhanat aahes, tey jhepel.
pan vaastav, mhanje hee kavitaa, kadhich jhepnaar hee naahi.
tujhi post vaachli, ki asach hota maajha nehmi. :D
but i like it.
i rarely like to read something twice again. just like first love, first date, first kiss - i always believe that the first set of emotions and feelings should remain the same, after reading a book, or a blogpost.
kavita jhepli naahi. tyaacha frustration aahe.
but to quote dhananjay again,
Dhananjay: tu kadhi tula Picasso chi chitra samjat nahi yacha tension ghetos ka
Ketan: naahi
:D
Dhananjay: ki Particle Physics madla aaplya la particle paan mahit nahi mhanun chintit hotos ka
mag ekadi kavita nahi jheplai tyacha yewda ka tension ;)
lihit rahaa.
aamhi loka samjaaychaa prayatna karu. :D
Ketan ni tujha blog forward kela "Iternal" vachnya saathi. Salil Vagh aadhi kadhi vachla navta, pan kavita vachlya war vatu lagle aahey ki maaydeshi parat jain tewa Majestic madhey pustaka milta ka bagawa. Kavita aavdlich pan tya pakesha tyachyawarcha tujha tippan, to anand kalvanay saathi olak nastana hi comment taknyacha aagantuk pana.
ReplyDeleteAani tujya bakichya blog madhey Gulzar chey yewde sandarbh aale aslyane, Gulzar chi ek kavita, kadhachit aadhi vachli ashil, nashil mahit nahi, pan aagantuk pana kelach aahey tar aanki thoda sa:
kitabein jhankti hain band almaari kay sheeshon se
barhee hasrat se takti hain
maheenoo ab mulaaqat nahi hoti
jo shamein in ki sohbat main kata karti thein,,,,ab aksar
guzar jaatee hian computer kay pardon par
bari bachain rahti hian kitabein
zaban par zaiqa aata tha jo in safhe palatne ka
ab ungli click karne se bas
ik jhapki guzarti hai
buhat kuch tah-b-tah khultaa chalaa jaataa hai parde par
kitabon se jo zaati rabta tha kat gaya hai
kabhi seeny pe rakh ke lait jaate the
kabhi godee mein rakhte thay
kabhi ghutno ko apne rahal ki soorat banah kar
neem sazade mein parhaa karte thay,chhoote jabhee se
khuda nay chaha to wo sara ilm to miltaa rahegaa baad mein bhee
magar who jo kitabon mein milaa karte thay sookhay phool
kitabein maangne,giraanay,uthaane kay bahaane rishty bante thay
unkaa kyaa hogaa
wo shayad ab nahi hongey!
GULZAR
हे म्हणजे,
ReplyDelete’मारे दिग्गज म्हणून कोणा थोरांच्या मैफिलीला जायचं आणि आज हे काय म्हणत बाहेर पडायचं, मग नंतर घरीच मैत्रांच्या अड्ड्यात मैफल झक्क रंगावी,’
तसं झालं.
बाकी कल्पना काही वाईट नाही, काय मंडळी?
bathe sahebanna lihayala pravrutta karayachi ti receipe kutheshi geli ho? ghya barr yanna punha tavyavarr!! ;)
ReplyDeleteतसा आग्रह करून काही उपयोग नसतोच. पण तरी, मेला-बिलास की काय परत? की समुद्र, आळस आणि कंटाळा? एखादी कविता तरी टाक छापून. म्हणजे तुझ्या भाषेत ’जनता काय अर्थ लावत बसते ते बघत हसत बसायला’ बरं तुला!
ReplyDeleteमी इथे कडमडलो तुझा तीव्र निषेध करायला पण माझ्या आधी मेघनाने हजेरी लावल्याबद्द्ल प्रथम तिचा तीव्र निषेध. मी हा मेसेज काळ्या फॉन्टमधे लिहून तुझा जमेल तेव्हढा जळजळीत धिक्कार करतो.
ReplyDeleteअरे हो, का ते सांगायच राहिलं...नविन काही न लिहिल्याबद्दल!
Mama - absolute pure fun!
ReplyDeleteKuthalyach blog warachya comments chi "series" waachun evhadhi majaa aali navati!
This was great!!
Btw - kavita kaLat naahi aani patience sampato hey mhaNatana me ajun kaahi "sanmananeeya apvaad" saangayala visaralo:
1. Mirza Ghalib - 4 oLichya palikaDe bolayachi hya saahebanna garaz faarshi kadhi paDali naahi. Suits me best!
2. Saahir - Saahir chya lihiNya itakech tyache likhaan majhyaparyant pochawayache shreya jaate te Amitabh, Lata, Rafi aadinna...
3. Chan.Go. - hya lokanchya companit agadi saadha vaatel kadachit pann 4 oLit chhan arthapurna saangun jaayachi khubi bhaavali nehamich.
4. Ehsan Qureshi - Laughter Challenge baghaNaryanna maahit asel hey character! :-)) aaplyala jam aawaDala buwaa!! :-))
On sidelines - Mama, tujhya blog war comment moderation taaklayes khare - pan moderatorlach moderation chi garaz asel tar kaay upaay? :-p
I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.
ReplyDeleteलिही की आता. किती भाव खातो यार हा माणूस. कुणीतरी धरून पिटला पाहिजे याला...
ReplyDelete(मेघनाताईंच्या इस्टाईलमध्ये) =
ReplyDeleteअरे, मेला-बिला असशील तर निदान खीर आणि वडे खायला तरी बोलाव रे! ;-)
@’.’
ReplyDeleteहज्जार वेळा नावं कशासाठी बदलतोस रे? जसं काही आता तू नाव बदलल्यामुळे तुला कुणी ओळखणारच नाहीये! की मजेत असताना पूर्ण नाव, ’चिंतनशील’ वगैरे मूडमधे असताना शॉर्टफॉर्म आणि सूक्ष्मात गेलेला असताना फक्त पूर्णविराम?
don mahine hot aale, raav. kahi liha ki.
ReplyDeleteHappy Diwali
ReplyDeletekhoop hotay....
ReplyDeleteAhes ka re ajoon? ka annoo gogtya zala tuza?
ReplyDeleteआता हे अती होतय असं नाही का वाटत तुला? की भुमध्य सागराच्या तळाशी कसलं बांधकाम करत बसला आहेस?
ReplyDeleteअजून २-३ दिवस लिहिलं नाहीस तर तू कॉमेन्ट्स ची हाफ सेंच्युरी नक्कीच पुर्ण करशील; तेही तुझ्या न लिहिण्याबद्दलच्या....
"उठा दयाघना..लावा निरांजने"..असं वाटतं ग्रेसनी खास तुझ्या करताच ही कविता लिहीली आहे...फक्त दिवे लावा म्हणण्याऎवजी त्यांनी त्यांच्या पद्धतीने निरांजने वगैरे ऎतिहासिक लिहीलं आहे. आता अजून भाव खाशिल तर ग्रेसबिस सोडून दे, मीच एक कविता "पाडेन" तुझ्यावर...बाद मे नही बोलनेका की बोल्याचं नही!
संवेद आणि गाववालों -
ReplyDeleteलिहायचंय पण ’नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या?’ असा प्रकार झालाय! :))
Tu lihilelya mhanicha nemka arth nahi kalalay. tuzya lihinyachya sandarbhat tar nahich... can u explain?
ReplyDeleteएका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
ReplyDeletehttp://sty-mar1.blogspot.com/
भाऊसाहेब. आता मी वेगळी अशी काय मागणी करणार. आता तुमचं "नंगे"पण उतरवून ठेवा आणि कपडे चढवा. काही द्यायचं घ्यायचं असेल तर तसं सांगा. म्हणजे कसं .. आपलं मोलाचं साहित्य ही सगळी फ़ुकटी मंडळी फ़ुकट चेपताहेत असं जर वाटत असेल, तर तसा स्पष्ट सांगा ... आम्ही एखादा फ़ंड काढू की तुमच्या नावे आणि करू डोनेशन. पण "खाणार ही नाही आणि देणार ही नाही" असा आव कशाला म्हणतो मी. बापू सांगून गेले "जगा आणि जगू द्या" .. तसच "लिहा आणि वाचू द्या" ... प्लीज.
ReplyDeletehttp://loksatta.com/daily/20080119/ch10.htm
ReplyDeletekavita zakkas aahe..asech likhan chalu tevha.
ReplyDeleteबायकोला आज ’इटर्नल सनशाईन’ दाखवला आणि का कुणास ठाऊक, या ब्लॉगची, पोस्टची आणि राहुलच्या - लिंक लावायचा प्रयत्न करु - कमेंटची आठवण आली. मग बायकोला कुठल्या रात्री कसं हे पोस्ट लिहिलं हे ऐतिहासिक गोष्टींची आठवण काढत असल्यासारखं सांगितलं.
ReplyDeleteसप्टेंबर २००७. खरंच ऐतिहासिक - म्हणजे खुप खुप जुने वाटतात ते दिवस आता. ब्लॉग नावाचं फॅड होतं. जिथं दिवसातुन दहादा जाणं व्हायचं. सध्या कित्येक महिन्यांनी आलो. आता आलोच आहे तर रणजीत देसाईंच्या ’बारी’ च्या सुरुवातीचा शेर आठवला. अर्थात त्याचा आर्थार्थी काही संबंध नाही.
मेरी किस्मत में गम गर इतना था
दिल भी यारब कई दिये होते।