वेल....तपशील! रात्री नऊ साडे नऊ वाजता बिडी मारत रस्त्यावर उभा होतो तेव्हा का कुणास ठाऊक के-फाईव्ह चा विचार डोक्यात आला. के-फाईव्ह ही सामंतांची एक न आवडलेली गोष्ट. मग म्हटलं बरेच दिवस आहे फोन नंबर हाताशी तर करु फोन. म्हणुन केला. त्यांनीच उचलला. मी म्हटलं - तुम्हाला लक्षात नसेल पण आपण दहा एक वर्षांपुर्वी बोललो होतो. तेव्हा तुम्ही ’न आवडलेल्या गोष्टींबद्दल पत्र लिहा’ असं म्हणाला होतात. तर ते म्हणाले - लक्षात आहे. म्हटलं - पत्र नाही जमलं, म्हणजे दहा वर्षे वगैरे प्रयत्न करुनही नाही जमलं - म्हणुन हा फोन. मग आम्ही मला आवडलेल्या - खळाळ, लिलियनची बखर, ऑक्टोबर एन्ड, किबुत्झ मधला डॅनी इथे आला होता, रास, अ ग्रेट जॉब, ओश्तोरीज, एक मुर्ख देव आणि किंग सॉलोमन - या गोष्टिंवर बोललो. त्यांना न आवडलेल्या गोष्टींबद्दलही (अजुनही) ऐकायचं होतं - म्हणुन मग के-फाईव्ह, मितवा, अ ते ज्ञ, आता कुणीही येणार नाही, दृष्टी - याबद्दलची माझी मतं लई वळसे घेत सांगितली. मध्येच संदीप खरेचा विषय निघाला म्हणुन त्याच्या अमेरिकन संध्याकाळीचं चित्र, यलो ऑकर आणि मला सगळ्यात जास्त आवडलेल्या असं हो काय साखळकरबद्दल जरा सांगितलं. अविरत आणि अश्वत्थ बद्दल सामंत भरपुर बोलले. के-फाईव्ह, एम टी आयवा मारु - याबद्दल त्यांनी बरंच काही सांगितलं. मी आपला संभाषण ताणत गेलो आणि ’स्वत:ची स्तुती ऐकायला कुणाला आवडत नाही?’ म्हणत ते मला बोलवत गेले. मधेच आम्ही गुलझार बद्दल बोलल्याचं आणि मी मला एकेकाळी नारायणगावात भेटलेल्या एका कवीची कविता त्यांना ऐकवल्याचं आठवतंय. बोलता बोलता मी नेहमीप्रमाणे विषय विसरत होतो आणि जमेल तसं आम्ही संभाषण बॅकट्रॅक करत ’मी नक्की कुठल्या विषया बद्दल बोलत होतो’ याचा शोध घेत होतो. काय बोलत होतो यात बोलतानाही सुसुत्रता नव्हती, त्यामुळे ती आता लिहिताना येणं अशक्य. गप्पा - आणि मुख्य म्हणजे - गप्पांतल्या गोष्टी पुढे हळूहळू आठवत जातील आणि आठवत रहातील. गप्पांची खरी गंमत त्यात. सामंतांना मेघनाची अश्वत्थ बद्दलची मतं सांगितली आणि तिने त्यांची एका पुस्तकावर सही घेतलेली त्याचा किस्सा. मग आम्ही मेघना पेठेंवर थोडं बोललो. मग हेमींग्वे वर. त्यांनी ’फॉर हुम द बेल टॉल्स’ आवर्जुन वाचायला सांगितलं. त्यांनी गॉडफादरच्या आठवणी सांगितल्या. त्यांना हेमिंग्वे बद्दल माझ्या पेक्षा जास्त माहिती होती. पण तरी मी त्यांना हेमिंग्वे ची एक गोष्ट सांगितली. मध्येच नाना पाटेकरचा विषय निघाला. मध्येच फोन कट झाला - म्हणजे माझं फोन कार्ड संपलं. म्हणुन मग मी ते रिचार्ज करुन परत फोन केला. खुप वेळ बोलल्यावर मी त्यांना म्हटलं कि - बाप रे! तुमचा एवढा वेळ घेतलाय कि आता तुमची बायको मला मारेल! तेव्हा ते हसुन - नाही नाही, बोला तुम्ही - म्हणाले. त्यांनी मला अधुन मधुन आवर्जुन ’अरे’ म्हणण्याचा प्रयत्न केला. आम्ही अॅन रॅंड आणि तिच्या पात्रांबद्दल बोललो. खूप वर्षांपुर्वी वाचुनही त्यांना ती पात्र लख्ख आठवत होती. मधुनच अविदाचा विषय निघाला. तेव्हा मी त्यांना आमच्या सिअॅटल भेटीबद्दल सांगितलं - आणि फॉल्स गॉड्स पेक्षा रॉर्क का बरा याबद्दल. मग मी त्यांना ’तुम्ही ब्राह्मण का?’ विचारलं.
ते मला ते किती ’नॉर्मल’ आहेत हे ’माझी बायको मला भ्रमिष्ट म्हणते’ हे सांगुन झाल्यावर पटवत राहिले. मी त्यांना त्यांच्या गोष्टींतली पात्रं माझ्यासाठी किती उंचीवर आहेत हे समजावत राहिलो.
’किबुत्झ मधला डॅनी’ याच्या अध्यात मध्यात कुठेतरी होता.
हे कदाचित तेव्हा कुठेतरी जाणवुन गेलेलं. पोस्टला टायटल दिलं तेव्हा तसा विचार केला नव्हता. आता समर्पक वाटतंय. त्यांच्या कुठल्याही गोष्टीचं, त्यातल्या कुठल्याही पात्राचं नाव पोस्टला समर्पक झालं असतं हे अलाहिदा. कारण आय डोन्ट थिंक फोन वर बोलुन मला सामंत ’जास्त’ कळले. लेखक लेखनात सापडतो. सामंत फुल टाईम लेखक आहेत. मला सामंतांची पात्र ओळखीची होती. ती माझ्याशी बोलली इतकंच.
सामंतांनी महाराष्ट्रा, देशाबाहेरचा मराठी मला दाखवला. स्त्री व्यतिरिक्तची स्त्री. रगेपारची रग.
सामंत म्हणजे ’माज’. ते इतके ’डाऊन टु अर्थ’ वाटतात कि विश्वास बसत नाही. त्यांचा माज उसळत नाही, पेटत नाही, कोसळत, भिडत नाही. तो फक्त झिरपत रहातो - गोष्टी गोष्टींत, पात्रा पात्रांत, शब्दा शब्दांत. आणि गोष्टीसारखा येतो तसाच जातो. विध्वंसाचा मागमुसही मागे न ठेवता. ’किबुत्झ मधल्या डॅनी’ सारखा. त्या माजाशी काय आणि किती आणि कसा बोललो आणि त्याने किती विध्वंस झाला याची मोजदाद करायला वर्षं लागतील. आणि त्याचे तपशील ते काय? शिंगा शेपटांचेही हिशेब लागतील - लाथा मिळतील त्यांचं काय?
तपशील प्लीज.
ReplyDeleteतू चुकून फेसबुक अपडेट इथं टाकलं कारे भौ? काही शिंग-शेपूट दाखवाल तर कळेल..
ReplyDeleteवेल....तपशील!
ReplyDeleteरात्री नऊ साडे नऊ वाजता बिडी मारत रस्त्यावर उभा होतो तेव्हा का कुणास ठाऊक के-फाईव्ह चा विचार डोक्यात आला.
के-फाईव्ह ही सामंतांची एक न आवडलेली गोष्ट.
मग म्हटलं बरेच दिवस आहे फोन नंबर हाताशी तर करु फोन.
म्हणुन केला.
त्यांनीच उचलला.
मी म्हटलं - तुम्हाला लक्षात नसेल पण आपण दहा एक वर्षांपुर्वी बोललो होतो. तेव्हा तुम्ही ’न आवडलेल्या गोष्टींबद्दल पत्र लिहा’ असं म्हणाला होतात.
तर ते म्हणाले - लक्षात आहे.
म्हटलं - पत्र नाही जमलं, म्हणजे दहा वर्षे वगैरे प्रयत्न करुनही नाही जमलं - म्हणुन हा फोन.
मग आम्ही मला आवडलेल्या - खळाळ, लिलियनची बखर, ऑक्टोबर एन्ड, किबुत्झ मधला डॅनी इथे आला होता, रास, अ ग्रेट जॉब, ओश्तोरीज, एक मुर्ख देव आणि किंग सॉलोमन - या गोष्टिंवर बोललो. त्यांना न आवडलेल्या गोष्टींबद्दलही (अजुनही) ऐकायचं होतं - म्हणुन मग के-फाईव्ह, मितवा, अ ते ज्ञ, आता कुणीही येणार नाही, दृष्टी - याबद्दलची माझी मतं लई वळसे घेत सांगितली.
मध्येच संदीप खरेचा विषय निघाला म्हणुन त्याच्या अमेरिकन संध्याकाळीचं चित्र, यलो ऑकर आणि मला सगळ्यात जास्त आवडलेल्या असं हो काय साखळकरबद्दल जरा सांगितलं.
अविरत आणि अश्वत्थ बद्दल सामंत भरपुर बोलले.
के-फाईव्ह, एम टी आयवा मारु - याबद्दल त्यांनी बरंच काही सांगितलं.
मी आपला संभाषण ताणत गेलो आणि ’स्वत:ची स्तुती ऐकायला कुणाला आवडत नाही?’ म्हणत ते मला बोलवत गेले.
मधेच आम्ही गुलझार बद्दल बोलल्याचं आणि मी मला एकेकाळी नारायणगावात भेटलेल्या एका कवीची कविता त्यांना ऐकवल्याचं आठवतंय.
बोलता बोलता मी नेहमीप्रमाणे विषय विसरत होतो आणि जमेल तसं आम्ही संभाषण बॅकट्रॅक करत ’मी नक्की कुठल्या विषया बद्दल बोलत होतो’ याचा शोध घेत होतो.
काय बोलत होतो यात बोलतानाही सुसुत्रता नव्हती, त्यामुळे ती आता लिहिताना येणं अशक्य.
गप्पा - आणि मुख्य म्हणजे - गप्पांतल्या गोष्टी पुढे हळूहळू आठवत जातील आणि आठवत रहातील.
गप्पांची खरी गंमत त्यात.
सामंतांना मेघनाची अश्वत्थ बद्दलची मतं सांगितली आणि तिने त्यांची एका पुस्तकावर सही घेतलेली त्याचा किस्सा.
मग आम्ही मेघना पेठेंवर थोडं बोललो.
मग हेमींग्वे वर.
त्यांनी ’फॉर हुम द बेल टॉल्स’ आवर्जुन वाचायला सांगितलं.
त्यांनी गॉडफादरच्या आठवणी सांगितल्या.
त्यांना हेमिंग्वे बद्दल माझ्या पेक्षा जास्त माहिती होती.
पण तरी मी त्यांना हेमिंग्वे ची एक गोष्ट सांगितली.
मध्येच नाना पाटेकरचा विषय निघाला.
मध्येच फोन कट झाला - म्हणजे माझं फोन कार्ड संपलं.
म्हणुन मग मी ते रिचार्ज करुन परत फोन केला.
खुप वेळ बोलल्यावर मी त्यांना म्हटलं कि - बाप रे! तुमचा एवढा वेळ घेतलाय कि आता तुमची बायको मला मारेल!
तेव्हा ते हसुन - नाही नाही, बोला तुम्ही - म्हणाले.
त्यांनी मला अधुन मधुन आवर्जुन ’अरे’ म्हणण्याचा प्रयत्न केला.
आम्ही अॅन रॅंड आणि तिच्या पात्रांबद्दल बोललो.
खूप वर्षांपुर्वी वाचुनही त्यांना ती पात्र लख्ख आठवत होती.
मधुनच अविदाचा विषय निघाला.
तेव्हा मी त्यांना आमच्या सिअॅटल भेटीबद्दल सांगितलं - आणि फॉल्स गॉड्स पेक्षा रॉर्क का बरा याबद्दल.
मग मी त्यांना ’तुम्ही ब्राह्मण का?’ विचारलं.
ते मला ते किती ’नॉर्मल’ आहेत हे ’माझी बायको मला भ्रमिष्ट म्हणते’ हे सांगुन झाल्यावर पटवत राहिले.
मी त्यांना त्यांच्या गोष्टींतली पात्रं माझ्यासाठी किती उंचीवर आहेत हे समजावत राहिलो.
’किबुत्झ मधला डॅनी’ याच्या अध्यात मध्यात कुठेतरी होता.
हे कदाचित तेव्हा कुठेतरी जाणवुन गेलेलं.
पोस्टला टायटल दिलं तेव्हा तसा विचार केला नव्हता.
आता समर्पक वाटतंय.
त्यांच्या कुठल्याही गोष्टीचं, त्यातल्या कुठल्याही पात्राचं नाव पोस्टला समर्पक झालं असतं हे अलाहिदा.
कारण आय डोन्ट थिंक फोन वर बोलुन मला सामंत ’जास्त’ कळले.
लेखक लेखनात सापडतो.
सामंत फुल टाईम लेखक आहेत.
मला सामंतांची पात्र ओळखीची होती.
ती माझ्याशी बोलली इतकंच.
सामंतांनी महाराष्ट्रा, देशाबाहेरचा मराठी मला दाखवला.
स्त्री व्यतिरिक्तची स्त्री.
रगेपारची रग.
सामंत म्हणजे ’माज’.
ते इतके ’डाऊन टु अर्थ’ वाटतात कि विश्वास बसत नाही.
त्यांचा माज उसळत नाही, पेटत नाही, कोसळत, भिडत नाही.
तो फक्त झिरपत रहातो - गोष्टी गोष्टींत, पात्रा पात्रांत, शब्दा शब्दांत.
आणि गोष्टीसारखा येतो तसाच जातो.
विध्वंसाचा मागमुसही मागे न ठेवता.
’किबुत्झ मधल्या डॅनी’ सारखा.
त्या माजाशी काय आणि किती आणि कसा बोललो आणि त्याने किती विध्वंस झाला याची मोजदाद करायला वर्षं लागतील.
आणि त्याचे तपशील ते काय?
शिंगा शेपटांचेही हिशेब लागतील - लाथा मिळतील त्यांचं काय?