लत.
वाचनाचं व्यसन लागलंय.
म्हणजे वाचन आवडतं, यड्यासारखा वाचतो वगैरे म्हणायला ठीके, पण मला व्यसन लागलंय.
म्हणजे २-४ मिनिटं मोकळी मिळाली के मला स्वस्थ बसवत नाही.
एका सायबेरियन वाघाची गोष्ट वाचली.
दुसऱ्या महायुद्धातल्या एका हेराची.
त्याने जर्मनी आणि इंग्लंड दोन्ही देशांसाठी हेरगिरी केली!
आणि दोघांकडुनही पदकं मिळवली.
स्टीव्ह कोलचं बिन लादेन बद्दलचं पुस्तक वाचतोय.
काही वर्षांपुर्वी त्याचं ’घोस्ट वॉर’ वाचलेलं - अफगाणिस्तानमधल्या यादवी बद्दलचं.
सीमोर हर्शचं ’चेन ऑफ कमांड’ वाचतोय - ९/११ नंतरच्या अमेरिकन इंटेलिजन्स सर्व्हिसबद्दलचं.
९/११ ते अबु गरीब - असं काहितरी.
सिअॅटलच्या इतिहासाबद्दल वाचलं.
डेनिस लेहानी चं ’मिस्टिक रिव्हर’ वाचलं.
त्याचं आणखी एक वाचलं - नाव आठवत नाहिये आता.
हे एवढं सगळं मागच्या ३-४ आठवड्यात.
मला व्यसन लागलंय.
माझी मान दुखायला लागलिए.
आता मी ’माझा प्रत्ययकारी अस्थिरोग’ असा लेख लिहायचा विचार करतोय.
मान दुखायला लागली तरी वाचत राहिलो.
मग दुर्लक्ष करवेना म्हणुन हॉस्पिटल मध्ये गेलो.
त्यांनी आयबु प्रोफेन आणि नारकॉटिक्स दिली.
मी अमली पदार्थ कधी वापरले नाहीत - त्यामुळं त्यांना म्हटलं कि ओ.के. मद्यपदार्थ ठीके, अमली वगैरे नाही.
रात्री खांदे आणि मान असे कपाळात गेले कि अमली तर अमली असा प्रकार झाला.
ते कमी म्हणुन सोमवारी सकाळी उठुन बघतो तर माझा ग्लॅड्सन स्मॉल झालेला.
म्हणुन आज इमर्जन्सी रुम नको - खऱ्याखुऱ्या डॉक्टरकडे जाऊ म्हणुन ’कुणी डॉक्टर आहे का डॉक्टर’ करत फिरलो.
एक आजोबा सापडले.
त्यांनी पाठ नाही - मानेचं दुखणं आहे असं सांगितलं.
बहुतेक डिस्क स्लिप झालिए.
मग जहाल अमली - व्हॅलियम!
मग एम.आर.आय.
उद्या आजोबांशी परत बैठक.
भेंडी हॉस्पिटलमध्ये बेडवर एकटाच पडुन होतो तेव्हा वाटलं कि च्यायला एवढंच?
धिस इस इट?
च्यायला इथुन सुटलो तर रोज लिहीन.
म्हणुन लिखाण.
व्यसनातुन सुटायला नविन व्यसन....
पिक्चर कुणाच्या पॉंट ऑफ व्ह्यु मधुन बघतो याने किती फरक पडतो?
कुठल्याही कृतीमागची भावना कळली कि त्या कृतीबद्दल सहानुभुती निर्माण होते का?
म्हणुन आपले मित्र नेहमी छान का?
म्हणुन ओये लक्की मध्ये अभय देओल त्याच त्या परेश रावल कडुन परत परत गंडतो का?
रिअल लाईफ मधला परेश रावल कसा ओळखावा?
कि सच - याद नहीं जूते कहा उतार आये थे?
परवा मुंबई पुणे मुंबई पाहिला.
आणि डिप्रेशन मध्ये गेलो.
प्रेमपट पाहिल्यावर प्रेमात पडल्याची आठवण येणं साहजिक आहे का?
कि ते ही पिक्चरच्या दर्जावर अवलंबुन?
बिफोर सनराईजने हुरुहुर लागते.
मुंबई पुणे ने डिप्रेशन का यावं?
पिक्चरमध्ये कधितरी कळतंच कि अरे हेच ते!
मग तरी हेच ते तेच ते असावेत असं का वाटावं?
पिक्चर संपुच नये असंही?
परत परत वर्षानुवर्षे गाडं ’इजाजत’ वर येऊनच का अडावं?
परवा दो नैना और एक कहानी मुक्ताला गाऊन दाखवलं
तिला इतकं आवडलं कि ती ही ते गुणगुणते माझ्या सोबत.
आम्हाला गाणी बनवायला आवडतात.
काल काय तर
I sleep up
Baba sleeps down
when I ned help
Baba comes to town.
एनीवे - तर तिला दो नैना दाखवलं परवा.
मग ती त्याची अम्मा का?
आणि ते त्याचे बाबा का?
मग त्याची अम्मा कुठे गेली?
का?
मग शेवटी तिला त्याची गोष्ट सांगावी लागली.
मग मुक्ता धो धो रडली.
Please dont leave me करत.
मग तिला सिमेटरी, अंत्यविधी हे प्रकार काय असतात सांगितलं.
आपण हिंदु आहोत हे ही.
आणि वेडी बिडी आहेस का? असं कुणी जात नाही - १०० वर्ष झाल्यावरच लोक जातात.
आणि गेल्यावर पटकन सगळ्यात आवडत्या व्यक्तीच्या पोटी जन्माला येतात.
तिला ही कल्पना जबरा आवडली.
तिका मोठेपणी प्रिन्सेस व्हायचंय.
आणि ती तिच्या castle च्या शेजारी माझ्यासाठी घर बांधणार आहे. (अम्मासाठी नाही).
म्हणजे मग तिला कधी भिती वाटली कि ती माझ्या घरी येऊन झोपू शकेल.
आणि माझी १०० वर्ष संपली कि मी तिच्या किंवा तिच्या पोराबाळांच्या पोटी जन्म घ्यायचं प्रॉमिस केलंय.
आणि तिने (अम्माला सांगु नको म्हणुन) मग मला पाहिजे तेवढे चिप्स आणि चॉकलेट्स द्यायचं कबूल केलंय....
तुम्ही से जनमूं तो शायद मुझे पनाह मिले.....

पोस्टचा शेवट जबरा. बाकी ठीक...
ReplyDeleteकमेंटची सुरुवात जबरी. बाकी ठीक.
ReplyDeletechar hi post wachun kadhlya eka damaat kaal ratri.. sakali uthun baghtoy tar window ajunhi tashich open ahey, baal ajun uthaychay, bayko suddha ajun uthaychiye, ahey wel hatashi mhatla taku comment.. :-)
ReplyDeleteata farsa kahi athwat nahi posts baddal pan i'm sure u wont mind me admitting this, karan tu lihitosach tasa khalaltya dhabdhabyasarkha.. barech topics touch kartos, interesting lihitos.. thodkyaat prasiddha sandeep khare mhanto tasa - jasa gandh nighto hawechya pravasa, na avdhaan kasle.. na anumaan kahi.. ;-)
amhi baba sadhi mansa, amhala awadto to.. gulzarach hawa asa kahi hatta nahi amcha.. samajto tevha gulzar baapach watato pan baryachda dokyawarun suddha jato..
anyways.. posts chaan zalyaat.. hya particular post cha end kharach chaan hota.. wishing u a speedy and healthy recovery..
aaj kaal koni farsa wachat nahi asa kuthlyatari comment madhe bollas, tasa nahiye he sangnyasathi khaas ha comment cha prapanch..
char hi posts vachun kadhlya eka damaat kaal ratri.. sakali uthun pahila tar window tashich open, bayko ajun uthaychiye, baal suddha ajun uthaychay, ahey wel tar mhatla taku comment.. :)
ReplyDeletefar kahi athwat nahiye ata posts baddal, but i'm sure u wont mind me admitting that.. after all tu lihitosach tasa, khalaltya dhabdhabyasarkha.. touching a lot of irrelevant things, making them interesting but seldom in a fixed pattern.. kinwa prasiddha sandeep khare mhanto tasa.. jasa gandha nighto hawechya pravasa, na anumaan kasle na avdhaan kahi.. btw, evdha kahi waeet lihit nahi to.. :)
anyways, post chaan jamlyaat.. hya particular post cha end tar khaasach.. lok ajunhi wachat ahet, hey sangna ha comment magcha mukhya uddesh.. :)
wishing u a speedy recovery!!
"च्यायला इथुन सुटलो तर रोज लिहीन.
ReplyDeleteम्हणुन लिखाण." che kay jhale?
AB - तु लिहिलेली दोन मराठी पोस्ट्स वाचली. त्यातलं दीर्घ वालं लई भाई होतं.
ReplyDeleteलेखकाला त्याच्या जुन्या वाचनाचे दाखले देऊ नयेत - कारण मग त्याला परत जाऊन नक्की काय लिहिलं होतं हे आठवायला लागतं आणि मग त्याला स्वत:ची ओळख पटत नाही. हे वाक्य मला आत्ताच सुचलं -
तुला तुझ्या जुन्या लिखाणाची आठवण करुन देताना.
आपली ओळख नाही.
तुझा तो लेख वाचल्यावर ओळख आहे असं वाटलं.
वाढवायला आवडेल.
विद्या -
लेखकाला त्याच्या जुन्या शपथांचे दाखले देऊ नयेत - कारण मग त्याची चिडचीड होते!
मग तो सोमवारी रात्री अकरा नंतर लिहायला बसतो.
मग त्याला त्याच्या हेडफोनमधुन चित्रविचित्र(!) आवाज यायला लागतात.
हे गंडतंय.
तर एक पटण्या जोगं कारण द्यायचा प्रयत्न करतो -
मी माणुस इतका अस्ताव्यस्त आणि गचाळ आहे कि मला point A पासुन point B पर्यंत जायला ’लिस्ट’ च्या कुबड्या घ्याव्या लागतात. तीन कॅलेंडर्स, अलार्म्स आणि रिमाईंडर्स लागतात.
आणि मग ’आजच्या लिखाणासाठी’ म्हणुन मग मी दिवसभर सुचेल ते तीन-चार शब्दात वगैरे लिहुन ठेवायला लागतो - रात्रीच्या लिखाणासाठी म्हणुन.
मग अशा तीन-चार गोष्टी घेऊन लिहायला बसणं वगैरे हे इतकं कृत्रिम वाटतं ना!
त्या ऐवजी हे असं - न ठरवता लिहायला बसलं कि वाहुन जाणाऱ्या हजारो विचारातले थोडे ढापणं फारच सोपं आणि सहज वाटतं.
ते नंतर वाचायलाही बरं वाटतं.
तर ’म्हणुन लिखाण’ चं असं झालं.
च्यायला मी स्वत:चं ब्रेन वॉशिंग इतकं सही करतो ना....
एनीवे - सासु भारतात गेल्या पासुन दोन पोरं आणि आम्ही - या गोष्टीची प्रचंड भिती वाटत होती मला, पण एक आख्खा आठवडा छान गेला. We were actually nice to each other - याला समर्पक मराठी वाक्य सुचत
नाहिए. आणि आम्ही दोघंही एकमेकांना मदत करण्यात इतके तत्पर कसे झालो याचं आम्हा दोघांनाही आश्चर्य वाटलं.
बाळ टी.व्ही. समोर शांत असतं.
यावर - We work all our life to find the best position in front of TV - असं वाक्य सुचलं.
TV किती पहावा, घरात पसारा किती घालावा, मित्रांशी किती बोलावं, मैत्रिणींशी किती बोलु नये, किती वेळ, किती वेळा काय आणि कसं खावं (आणि प्यावं), किती निरर्थक आणि निरर्थक किती वाचावं, आंघोळ करावी, दात घासावेत, लवकर झोपावं, लवकर उठावं....
आई आणि बायको - यांच्या मध्ये चौतीस पैकी वट्ट आठ वर्षं मी असा "between the jobs" होतो. And I hated those years. Now I wonder why!
I am winding myself way too much - time to sleep again.
चौतीस वर्षं, पाच महिने, चार दिवस.