Thursday, January 31, 2008

आठवण आठवण - जय मल्हार

मला एक बायको आहे.
आणि एक मित्र आहे.
आय मीन - मित्र अनेक आहेत, पण बायको एक.
आय मीन -
वेट अ मिनिट - झोल होताहेत.
मला म्हणायचंय वेगळंच आणि बाहेर येतंय भलतंच!

मला लिहिण्यापासुन परावृत्त करणाऱ्या दोन व्यक्ती - एक माझी बायको आणि दुसरा हा मित्र.
अनेक जवळच्या (ऑर जवळच्या अनेक) मित्रांमधला हा एक मित्र. (असं लिहितोय म्हणजे मी थाप मारतोय. कारण मला फारच थोडे जवळचे मित्र आहेत). {ओह बाय द वे - पूर्णविराम हा कंसाच्या आत घालतात कि बाहेर?}
बायकोचं म्हणणं असं कि मला हजार चांभारचेष्टांसाठी वेळ आहे, पण तिच्यासाठी नाही. (हे ऍक्चुअली खरं नाहिए - पण तरी).
माझ्या मराठी लिखाणाला तिचा तत्वत: विरोध नाही, पण ज्यातुन पैसे अथवा मार्क्स मिळत नाहीत अशा गोष्टी निरर्थक - हे गुल्टी पासपोर्टचं ब्रिदवाक्य असल्याने तिचाही नाईलाज होतो.
ति़च्या उलट मित्र - मी लई भारी लिहितो असा त्याचा गैरसमज. वेल, नॉट एक्झॅक्टली, पण माझा ऍटिट्युड लई भारी असा त्याचा बचपनसे गैरसमज. तर त्याचं म्हणणं असं कि - वेल, त्याची बरीच म्हणणी आहेत. अगदी मी का लिहावं इथपासुन मी कुठे लिहावं (आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे - कुठे लिहु नये) इथपर्यंत.
तर बायको आणि मित्र यांना सुरक्षित अंतरावर ठेउन लिहित होतो, तोपर्यंत बरं चाललं होतं. दोघांचे एकेकटे हल्ले व्हायचे ते ही काही वाईट नव्हतं, पण काही महिन्यांपुर्वी बहुतेक एकत्र हल्ला झाला आणि....आणि पुढचं आठवत नाही.
म्हणजे ते कसं - ’मै कहां हुं?’ माणुस बेडभोवतीच्या आपल्याच माणसांकडे आश्चर्याने पहातो तसं माझं आणि माझ्या पोस्ट्सचं झालं.
म्हणजे हे मीच लिहिलंय माहिती होतं, असंच वाटलेलं माहिती होतं आणि मग आपण कसे एस.टी. स्टॅंडवर कुणा सटासट चित्रकाराच्या चित्रांकडं बघुन ’कसं काय जमतं एकेकाला....’ चेहरा करतो तसा मी माझ्या पोस्ट्स कडे पाहुन करायला लागलो.
त्यातुन झालं असं कि -
खरं सांगायचं तर काहीच झालं नाही.
लिहायचं थांबलो म्हणुन बायकोची भुणभुण थांबली नाही कि मित्राची गाऱ्हाणी....
रात्र आणि दिवस जात राहिले - or whatever....
मग एड भेटला.
एड म्हणजे - एडवर्ड.
आडनाव - नॉर्डन. नॉर्टन नव्हे. नॉर्डन.
त्याचं झालं असं कि नेहमीसारखा मी ’सबवे’ मध्ये गेलो लंच साठी.
नेहमीसारखी त्याच वाढप्याला तीच ऑर्डर दिली.
टुडेज स्पेशल ऑन व्हाईट, पेपरजॅक प्लीज, येस प्लीज, लेट्युस, टोमॅटो, अनियन, ग्रीन पेपर, कॅन आय हॅव सम ऍलॅपिनोज प्लीज, चिपोटले साऊथवेस्ट, नो थॅन्क्स, कॅन आय हॅव अ ग्लास फ़ॉर वॉटर, थॅन्क यु.
आता नमुद केली पाहिजे ती गोष्ट म्हणजे - मी माझी ऑर्डर कधीच बदलत नाही.
सबवेचं ’डेली स्पेशल’ रोज बदलतं, म्हणजे रोज त्यात वेगवेगळ्या प्रकारचं मीट असतं, हाच काय तो बदल. त्याला मी जबाबदार नाही.

****

निद्रानाशाच्या कविता -

असं म्हणुन निद्रानाशाच्या कविता न लिहिणं म्हणजे जनतेला चुत्यात काढणं.
तसं तर तसं.
रात्री अकरा चाळीसला धाड धाड खाली जाऊन लॅपटॉप आणला तेव्हाच माहित होतं कि आजच्या रात्रीला चुना.
सकाळी सकाळी बो ला मर्सर आयलंडवर भेटीन म्हटलंय - पण सकाळचं सकाळी.
विशीचे पाच महिने राहिले.
याचं फारसं सोयर नाही आणि सुतकही नाही.
यावर लिहु म्हटलं तर विशी आठवायला लागली.
लहानपणापासुन खत्रुड मराठी खत्रुडपणे शिकवण्याचा आणि मुख्य म्हणजे मी शिकण्याचा परिणाम म्हणजे - मन नको तेव्हा नको तिथे भरकटतं आणि जिथे भरकटणं आवश्यक असतं तिथे - म्हणजे इथे, ते लाईनीत चालायला लागतं. म्हणजे विशी आठवायची म्हणजे - १९९८ साली मी नक्की काय करत होतो - असा सरळ सरळ विचार डोक्यात आला.
चिडचिड झाली.
म्हणजे १९९८ मुळे नाही, माझ्या डोक्यात असा बिनडोक विचार आला म्हणुन.
१९९८ - म्हणजे मी आणि छावी चुत्यासारखे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. म्हणजे - असं मला वाटलं होतं. मी पडलो होतो, छावीचं छावीला माहित.
लिहायचं म्हणजे गांडीत दम लागतो.
मी एकेकाळी क्ष मुलीवरती प्रेम केलं होतं.
हे वाक्य इथे लिहायचं सोडा, स्वत:शी मान्य करण्यात अनंत वर्ष गेली.
माझ्याकडुन चूक झाली - परत न करण्याचा प्रयत्न करीन - हे एक असंच निद्रानाशाचं वाक्य.
वीस वीस वीस - नाही, आढावा नाही घेणार. कारण....कारण झोप आवश्यक असताना जागं राहुन आढावे घेणं यासारखी चुत्येगिरी नाही.
’अस्वस्थ दशकाची डायरी’ लिहावी तर एवढं पण अस्वस्थ नाही गेलं दशक - थोडं फार मेहनतीचं वगैरे ठीक आहे, पण रुळलेल्या वाटा चालत गेलं कि रुळलेलं यश मिळतं आणि त्याच्यात दम नसतो - हे तुम्हाला माहित आणि मला.
तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही सुदैवी आहात.
वि.कु. अमिताभचं उदाहरण द्यायचे - कि चित्रपटात दाखवतात तसा हीरो - हुशार,प्रामाणिक, शूर, यशस्वी - जन्मत: नसतो. त्यामागची मेहनत चित्रपटात दाखवत नाहीत. पण तुम्ही तसे बनु शकता - एकेक मुद्दा घ्या - त्याच्यात हीरो बना. वगैरे वगैरे.
नाही - अनादर नाही करत आहे, एकेक मुद्दा घेऊन हीरो बनता येतं, पण त्यात ढिशुम ढिशुम ची मजा नसते.
ओह बाय द वे - हे म्हणायला ठीक, पण भर चौकात कुणाकडुन सण्णकन कानाखाली खाऊन बघा, किंवा त्याचं नाकाड फोडुन हातावरचं रक्त त्याचं कि माझं या झोलात अडकुन पहा - छातीतला भाता बाहेर पडायला धडपडत असतो, कानशिलं तापलेली असतात, हात थरथरत असतात आणि आईशपत - आख्ख्या जगातुन किण्ण आवाज येत असतो....
तर - ढिशुम ढिशुम ची मजा वेगळी.
विशीत ढिशुम ढिशुमची मजा घेतली. त्यात तेव्हा काहीच मजेशीर वाटलं नव्हतं, आता....मे बी.
हे लिहायचं खुळ म्हणुनच वाईट. तेव्हा कसं वाटलं होतं हे तेव्हात जाऊन लिहायला लागतं कारण आज त्याबद्दल वेगळंच वाटत असतं. आय मीन आठवणी वगैरे निव्वळ भंकसपणा आहे - मनाचे खेळ.
म्हणजे त्याचं असं कि मी चार वर्षाचा असताना मला विकेटकीपर म्हणुन उभा केला. बंटीच्या बॉलवर मंगेश पुढं जाऊन मारायला गेला, बॉल हुकला, आणि माझ्या हातावर टप्पा खाऊन स्टंपवर आदळला. मग सगळ्यांनी धावत येऊन माझी पाठ थोपटली - हे असं मला लख्ख आठवतंय. पण हल्ली मला तसं नक्की झालं होतं का? याची घोर शंका वाटतिए.
बहुतेक म्हणुनच लोकांना जुन्या मित्रांना भेटायला आवडत असावं. आपापल्या आठवणी तपासुन घेऊन (वाक्य अर्धवट - कंस अर्धा
पण तिच्यायचा माझा प्रॉब्लेम असा कि मला तेव्हाच्या आठवणी तेव्हासारख्याच आठवतात - त्या जुन्या होत नाहीत, त्यांविषयीच्या माझ्या भावना बदलत नाहीत किंवा त्यांची इंटेन्सिटी ही. आयदर हे - किंवा मी त्या आठवणी - म्हणजे आठवणींची माझी व्हर्जन - उगाळत रहातो, त्यांना जुनं होऊ देत नाही....
’घायल’ मध्ये सनी देओल कसा जुन्या घरच्या अठवणींत एवढा मग्न होतो कि तेव्हाची घरंगळती बाटली उचलायला खाली झुकतो - तसं काहीसं....
असा आठवणींचा लवाजमा घेऊन लिहायला बसल्यावर खरं काय आणि भास कुठले, दाखवायचं काय आणि बघायचं किती, कसं, कुठे, कुणाला - झोल इतके होतात, कि काव्याशिवायच्या निद्रानाशाच्या कविता जन्म घेतात.
किंवा घेत असाव्यात.
वीस -
लिहायला काही नाही, असल्यास लिहावंसं वाटत नाही, वाटल्यास लिहिता येत नाही, येत असल्यास लिहायचा दम नाही, दम असल्यास -
वेल दम आहे म्हणुनच लिहायला बसलोय, पण वीसला जनक मानुन लिहिणं यात राम वाटत नाही.
वीस आलं आणि गेलं - त्यात माझं काय झालं हे महत्वाचं.
माझ्या आयुष्यात माझं काय झालं याचा ऍनॅलिसिस मला करता आला तर सही होईल.
’Life is what happens when you are planning for something else' असं लोक म्हणतात - तसं माझ्या बाबतीत झालं नाही. मी जे प्लॅन केलं ते मिळवलं. निदान मला तरी तसं वाटतं. म्हणुन मी महान होत नाही. चारचौघांच्या नजरेत यशस्वी होतो. हेच चारचौघे दशकापुर्वी माझ्या याच प्लॅनला हसत होते - हा भाग अलाहिदा.
या चारचौघांना ’ले भेंचोद’ म्हणणं २-४ वर्षांपुर्वी बरं वाटायचं - आता बोअर वाटतं.
दशकांपुर्वीची जयगीते अजुनी घुमत कानी
दशकांपुर्वी अखिल धरेला क्षेम दिले आम्ही
ते सळसळते पौरुष फिरुनी नसांत वाहु द्या....

गिरीकुहरातिल गर्द बनांतिल सिंहाच्या छाव्यांनो....उद्या झोप बीप झाली कि परत लिहायला बसा.

मीनव्हाईल - लिहिणं चालु.
नसल्यास - लिहायचा विचार चालु.
नसल्यास - अनुभव चालु.
नसल्यास - असला पाहिजे.
नसल्यास - त्याची आठवण बनते.
बनल्यास - छळु लागते.
लागल्यास - कधी ना कधीतरी लिहुन तिची कत्तल करावी लागते.
विशीची कत्तल - तिशी उदास.

मध्यंतर.

नको - समाप्त.

****

ता.जा.भां.ल.न.

23 comments:

  1. हा हा हा हा हा.

    ReplyDelete
  2. dam lagla wachun. parat niwant wachal pahije. tewhach jamalyas - zeplyas comment. towar nustech abhar. lihilyabaddal.

    ReplyDelete
  3. विशीची कत्तल - तिशी उदास.
    bhale Shabbas, Bhale Shabbas

    ReplyDelete
  4. SAHI.
    ultimate post.....te aathvaninbaddal lihilay te jaam aavadala....ekun post ch lay bhari zalay....pan he nehemichach nahi ka?

    ReplyDelete
  5. "ता.जा.भां.ल.न."

    म्हणजे काय?

    बाकी वर म्हटल्याप्रमाणे लिवल्याबद्दल आभार.

    पण एकंदरीत आपण बर्‍यापैकी भरकटलायत. आणि नेहमी आपल्या भरकटण्यातही पॅटर्न असतो. तो इथं नाहीय. :(

    ReplyDelete
  6. mitra...
    motha vakya ahe,

    "रुळलेल्या वाटा चालत गेलं कि रुळलेलं यश मिळतं आणि त्याच्यात दम नसतो - हे तुम्हाला माहित आणि मला.
    तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही सुदैवी आहात."

    Agdi manatla bollas..

    ReplyDelete
  7. तुझ्या भाषेत हा हा हा हा...

    तुला दमात घेतल्याशिवाय तू लिहीत नाहीस राव. आधीच कळालं असतं तर आख्खं रामायण तुझ्या मानेवर सुरा ठेवून लिहून नसतं का घेतलं?
    एकदम बाठे स्टाईल. तुला लक्षात येतय का, तुझा हळुहळु नेमाडे होत चाललाय....
    मजा आली राव. मी काय दारुबिरु पित नाही पण मला हळुह्ळू हे लिहिणं चढतयं....

    ReplyDelete
  8. ते गुल्टी पासपोर्टचं जबरी लिहीलंयस! तशा हिशेबाने तर तुझं हे असं मराठी ब्लॉगिंग तिला कधीच कळणार नाही काय? :)

    आणि अचानक का रे बाबा ९८ च्या आठवणींत गेलास? हे काय वय आहे का तुझं गेल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडायचं? आणि खासकरून तुझं पर्सनल लाईफ़ एकामागून एक सक्सेस-स्टोरीजनी भरपूर असताना हा दु:खी आठवणींचा येळकोट कां? :)

    ReplyDelete
  9. क्रॅक्ड! => ताकाला जावून भांडं लपवायला नको!

    ReplyDelete
  10. तुम्ही लिहिलंत .... आमची कमेन्ट ... दोन्ही संदिग्ध.

    नवं पोस्ट लवकर येऊंद्यात बाठे.

    ReplyDelete
  11. Enjoyable post - fluid and random.

    One needs courage to share the past with others - but to share it honestly needs humility. I started with my wife - took 4-5 years to tell everything about my past the way I remembered..literally everything..:-) It was (is) a true test of honesty and humility.

    अनील अवचट - त्यांच्या "स्वत:विषयी" पुस्तकातले काही किस्से - प्रमाणिकपणा आणि नम्रता.

    ReplyDelete
  12. lihitana bebhaan na hota bebhaan zalyasarkha lihitos re!!
    kasa kaay jamta buwa ekekala :P

    chokkas chey tamara post ;-)

    ReplyDelete
  13. a child is born.
    as he grows, incidents happen - he remembers a few, forgets most of them. as an adult, he s'times wonders if those incidents actually happened (ref: ur cricket stumping)

    he enters his teen years. he's love-struck. its difficult for him to admit 2 things - 1, tht he's in love and 2, the name of the gal with whom he's in love.

    as he completes his undergrad, he becomes a fine young man - ready to take on the world. he loves challenges, he makes plans - his friends mock him. he has a point to prove - to himself, to his friends and to his world.

    in the next few years, he achieves all that - and even more!
    but that doesnt excite him anymore - its a case of 'been there, done that'.
    he slowly moves into complacency, or routine. he starts ordering the same sandwich frm subway; submits to his wife and close friend; and once in while, raises his head and voice to prove that he's very much alive...

    ......

    an excellent post, as always!
    but would love to have more of your posts.

    like the way you put across your thoughts in free flowing manner.
    have just tried to put those thoughts in a chronological manner. wonder, if this pattern applies to all of us or most of us:)

    guess each of us will undergo this when we turn from a 20-something into a 30-something...

    last year, met a jolly old American in a flight who asked me how old i was; and when i told him my age - he said,
    "wow!! 28 is such a fine age to be! you know you can do so many things at that age; things which you cant do when you will be 38 - have a good life!"

    ReplyDelete
  14. मस्त ऍनालिसिस केलंयस केतन! बाठे जर ’सरळ’ विचार करत असता तर त्याने कसं पोस्ट लिहीलं असतं हे तू फ़र्स्ट पार्ट मध्ये लिहीलंस! ;-)

    आणि ते अमेरिकन चं शेवटचं वाक्य तर अगदी Quotable Quotes मध्ये लिहून ठेवावं असं आहे. २८ आणि ३८ च्या ऐवजी दरवेळेस फ़क्त (क्ष) आणि (क्ष+१0) टाकून वाचायचे - लाईफ़लॉंग साथ देईल अशी फ़िलॉसॉफ़ी आहे. थॅंक्स!

    ReplyDelete
  15. आपल्यालाही पटतं -
    रुळलेल्या वाटा चालत गेलं कि रुळलेलं यश मिळतं आणि त्याच्यात दम नसतो

    बऱ्याच दिवसांनी आलेली पोस्ट थोडी मारूनमुटकून आलेली वाटते. . .तसं तिज्यायला आयुष्यात काय काय करायला लागतं. . पण म्हणून काहीच करू नये असं नव्हे - वगैरे स्टाईल

    ReplyDelete
  16. arey abhijit kulkarni,
    kaay karnaar? arey, haa bathe kaahitari itka jabardast lihito, ki tey aadhi digest karaaycha.. aani mag tyaavar comment kaay lihaaychi... mag aaplyaalaa kaay kal-la tyaatla.. tevdha tari lihaaych..
    lets hope he shirks off e'thing else.. n starts writing more regularly :)

    ReplyDelete
  17. अरे मित्रांनो, मला अगदी खात्री आहे की आपलं हे सगळं discussion वाचून, अभिजीत अगदी "हा हा हा हा हा" असंच हसत असणार...
    किती म्हणून dissection करावं आता...
    बाठे साहेब..हाणा

    ReplyDelete
  18. प्रश्न पडणे - यात कौतुक वाटुन घेण्यासारखं काही नाही, पण 'मला माझ्या पोस्ट्सवर येणाऱ्या कमेंट्सवर लिहावं असं का वाटतं?' असा मला (सध्या) प्रश्न पडलाय.
    कमेंट्सच्या निमित्ताने पोस्ट पुन्हा वाचलं (अर्थात त्यामुळे आणखीच प्रश्न पडले) पण त्याबद्दल नंतर - आधी जरा कमेंट्सचा समाचार घेऊ:
    कोहम - ’विशीची कत्तल, तिशी उदास’ असं काहितरी लिहिलं कि एकदम कविता करतोय असं वाटतं ना? :)) विशेष काही नाही, जरा कुठे ’वॉर्म अप’ व्हायला लागलो होतो तर झोपेने पोस्ट संपवलं.
    मेघा - मी नेहमीचंच लिहितो. म्हणुन मला दोन पोस्ट्स मधे चार-सहा महिन्यांचा गॅप घ्यावा लागतो. हेच मी दर आठवड्या-दोन आठवड्याला लिहायला लागलो तर लोक काय म्हणुन वाचतील? (असं मी आमीर खानाच्या आविर्भावात म्हणतोय असं समज) :)
    मेघना - भरकटण्यात पॅटर्न यायला लागला म्हणुन वैतागलो असं मी पोस्टमध्येच म्हटलंय, मला वाटलं कि तो मला टाळता आला नाही. तो मी टाळु शकलोय असं तुला वाटलं असेल तर मला बरंच वाटायला पाहिजे, नाही का? (पण I agree, हे तसं बऱ्यापैकी टुकार पोस्ट आहे).
    अनिरुद्ध - लई (निरर्थक) विचार केला कि असली (असंबद्ध) वाक्य आपोआप सुचतात. प्रयत्न करुन बघ.
    संवेद - माझ्या पोस्टने तुला बरं वाटलं असेल तर छानच. लिहित नव्हतो तेव्हा ज्या लोकांनी लिहायचा आग्रह केला आणि ज्यांनी आग्रहाने ’लिहू नकोस’ असं बजावलं, अशा सगळ्यांचेच आभार. पण मनापासुन सांगायचं झालं तर - either way, फारसा फरक पडला नाही. पडत नाही. एकेकाळी पडायचा, आता सवय झालिए. बाकी नेमाड्यांचं मी एकच पुस्तक वाचलंय आणि ते आवडलं होतं पण त्याचा माझ्या लिखाणावर कितपत प्रभाव पडलाय याची मला शंका वाटते. पण त्यांच्यासारखं एखादं पुस्तक लिहिता आलं तर मजा येईल. (हे वाक्य लिहितानाच मला (परत एकदा) जाणवायला लागलंय कि मला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यात तुम्ही सगळे लोक (परत एकदा) यशस्वी झालायत!) :))
    अभ्या - बायकोला माझा ब्लॉग कळणे....याचे प्रयत्न मी सोडुन दिलेत. पुर्वी भरपुर प्रयत्न करायचो - माझी पोस्ट्स ट्रान्सलेट करुन तिला ऐकवण्याचे. तेव्हा ती ऐकायची नाही! हल्ली माझ्या मागे लागते कि पोस्ट्स मराठीत वाचुन दाखव म्हणुन - का? तर ते ऐकताना तिला गाढ झोप लागते!
    ’झोप येत नाही’ या सबबीखाली तुमची बायको तुमचं लिखाण तिला वाचुन दाखवावं असा हट्ट करते - याच्या एवढा सॅड प्रकार नसेल! :))
    पण हे तरी बरं - माझ्या छावीने ’मला तुझ्यापेक्षा तुझी पत्रं जास्त आवडायची, आता ती पण आवडत नाहीत, त्यामुळे ती परत घे आणि कल्टि मार’ असं सुनावलं होतं!
    बायकोला ऍटलिस्ट लिखाणा शिवायचा मी (अजुनतरी) आवडतोय याबद्दल मला (पुरेसं) धन्य धन्य वाटतंय! :))
    बाकी दु:खी आठवणींचा नाही, पण आठवणींचा येळकोट यासाठी कि - काहितरी पाडायचं म्हटल्यावर पाणी लागायला माठात लई खाली जावं लागतं राव! एकतर ’अनुभवविश्व’ समृद्ध नाही आणि आजुबाजुला बघुन काही टिपावं एवढ्या संवेदनाही टोकदार नाहीत! :(
    शिवाय दुख बिकता है मॅन! सुदैवाने आणि माझा कुठलाही दोष नसताना घडणारे लुटुपुटु पराक्रम ऐकवायला लागलो तर लोक कावतील! :))
    शिवाय - ता.जा....क्रॅक केल्याबद्दल अभिनंदन!
    ट्युलिप - संदिग्ध लिहायचा प्रयत्न नसतो. ते बहुतेक होतं असं कि एखाद्याला एखादं चित्र जमतं म्हणुन लोक वा वा करतात. परत त्याला कधीच कुठलंच चित्र जमत नाही पण ’लोक काय म्हणतील’ म्हणुन तो गिरमिटवत जातो आणि लोक ’आपल्याला कळलं नाही तर तो चित्रकाराचा दोष नाही’ म्हणत चित्रकाराला ’चढवायला’ लागतात आणि either जनतेला ’चुत्यात काढायला’ किंवा ’यांना आतातरी कळेल कि मी कसला फ्रॉड आहे’ च्या अपेक्षेत तो चित्र काढत जातो, तसं काहिसं माझ्या पोस्टबद्दल होतं हे (आय ऍम शुअर) सगळ्यांनाच माहितिए. एनीवे - पोस्ट संदिग्ध बनलं असलं तरी नि:संदिग्ध कमेंटबद्दल धन्यवाद! :)
    प्रशांत - धन्यवाद.
    रणजीत - past मधलं काहिही सांगायला usually courage च लागतं, पण humility या प्रकाराची माझ्याकडे लई वाणवा आहे. Humility, patience, attitude यातले जे काही constructive attributes आहेत ते दिवसातले सगळे नळ इतके शोषुन घेतात कि बोलता सोय नाही!
    बाय द वे - एक आतला सवाल - तुला तुझ्या सगळ्या ’पास्ट’ बद्दल सांगायला ४-५ वर्ष लागली? (तु नक्की करत तरी काय होतास?) :))
    मला माझं (होतं नव्हतं ते सगळं) ’पास्ट’ सांगायला एक भीषण संध्याकाळ पुरली! :)) (त्या संध्याकाळीच्या आठवणीनेही मला अजुनही भयाण स्वप्नं पडतात!) :))
    ab - हे म्हणजे ड्रायव्हिंग सारखं झालं - म्हणजे फास्ट तर चाललोय, पण तरी कंट्रोलपण ठेवावा लागतोय....अशा भान ठेऊन बेभान होण्यात नेहमीच मजा नसते. (कधीकधी असते - म्हणुन तर एकदा लिहायला लागलेले लोक चारसींसारखे - ’हाय होण्याच्या’ आशेत वेळ बरबाद करत रहातात).
    केतन, अभ्या, झेट्रोपल्सार, आणि संवेद - आता झोप आल्याने बाकीचं नंतर.

    ReplyDelete
  19. मी जेव्हा कधी तिकडे येईन, तुला नक्की भेटेन मित्रा...एक दिवस-एक संध्याकाळ आणि एक रात्र नक्की गप्पा मारण्यासाठी ठेव. सारे प्रहर अश्यासाठी की त्यानुसार गप्पांचे विषय आणि पोटतिडीक वाढत जाते...

    ReplyDelete
  20. Thomas Mann said - No man remains quite what he was when he recognizes himself.

    ३-४ वर्ष स्वतःला सामोरे जण्यात गेले रे! मग कुठे सुरुवात करता आली. स्वतःला न जाणता सांगितले असते तर कदाचीत फ़क्त सांगायचे म्हणून सांगितले असते. सगळे का सांगावेसे वाटले त्याबद्दल लिहायचे झाले तर एक पोस्टंच टाकावी लागेल कुठेतरी. Another time.

    ReplyDelete
  21. केतन - मी लई पाल्हाळ लाऊन लिहिणारा माणुस आहे, त्यामुळे होतं असं कि एक पॅराग्राफ लिहुन होई पर्यंत मी ’नक्की काय लिहायचं होतं’ हे विसरुन जातो. मग तसंच धकवुन लिहिता लिहिता थोडं थोडं आठवत जातं. म्हणजे असं कि मला या माझ्या लेटेस्ट पोस्टबद्दल काहितरी लिहायचं होतं - ते पण २ दिवसांपुर्वी! पण कमेंट्सला उत्तरं द्यायला लागलो आणि आज सपशेल आठवत नाहिए काय लिहायचं होतं ते! पण आठवण्यात वेळ घालवत बसण्यापेक्षा उरलेली उत्तरं लिहीत जातो (त्यालापण २ दिवस लागताहेत)!

    तर -
    केतन - बरं झालं तु स्पष्टिकरण लिहिलयस माझ्याया पोस्टचं - ते वाचुन अभ्यासारखं मलाही वाटलं कि अरेच्चा - हो कि! मलाही हेच वाटलं होतं!!
    पण तुझी कमेंट वाचुन मनात आलेला पहिला नतद्रष्ट विचार म्हणजे - हे बरंय - ३८ च्या माणसाला २८ च्या माणसाबद्दल असं वाटावं तर मे बी ४८ वाल्याला पण ३८ बद्दल असंच वाटत असेल!
    झेट्रोपल्सार - खरंय, बहुतेक हे पोस्ट बरंच मारुन मुटकुन आलंय. त्याचं झालं असं कि बरेच दिवस काही न लिहिल्याने लिहिण्याची सवय गेली होती, त्यामुळे एकेकाळी कसं लिहीत होतो वगैरे आठवुन आठवुन लिहिल्यासारखं!
    आता बाकीच्या कमेंट्सला कल्टी. मी या स्पीडने माझे रिप्लाय लिहायला लागलो तर मी जन्मभर रिप्लायच लिहीत बसीन!

    पोस्टबद्दल लिहिण्याच्या लायकीचं काही सुचत नाहिए - त्यामुळे या पोस्टवर closure!
    अर्थात - काय लिहायचं होतं ते आठवलं तर परत लिहीन.

    ReplyDelete
  22. लवकर लवकर ब्लॉग लिहा रे.. बाकी काही नव्हतं तर मी आज शिवाजी महाराजांची आरती (!!!) वाचून काढली.. वर त्यांचा आत्मा धन्य झाला असेल!

    ReplyDelete