वरचा मजला आणि प्रतिप्रश्न
इतिहास किसी भाषा का नाम नहीं,
और न ही किसी उदात्त मानवी संबंध का नाम।
वो तो शक्ति के लिए किया गया नितांत अमानुष रक्तस्नान है।
समर्पण का एक ऐसा विचार फूल वनस्पती कि स्वाहा वाणी है।
प्रार्थना मनुष्यकी -
इसलिए प्रतिइतिहास हो जानेका नाम नहीं,
बल्की इतिहाससे सर्वथा उदासीन होकर वनस्पती हो जानेका नाम प्रार्थना है।
समुद्र जब आकाश के प्रति आकर्षित होता है
तो प्रतिआकाश नहीं - मेघ बनना होता है।
सूर्य जब पृथ्वी के लिए आकुल होता है
तब प्रतिपृथ्वी नहीं धूप बनना होता है।
पर्वत जब यात्रा के लिए व्याकुल होता है
तो प्रतियात्रा नहीं नदी बनना होता है।
येह मेघ यह धूप ये नदीयां इतिहास नहीं - प्रार्थनाएं है।
इतिहास का उत्तर प्रतिइतिहास कभी नहीं होता -
क्योंकी दोनों भी एक दूसरेकी तलाश है!
एक प्रश्न है - तो दूसरा केवल प्रतिप्रश्न।
उत्तर ही नहीं....
- नरेश मेहता.
------------------
मकांकी ऊपरी मंझिलपर अब कोई नहीं रेहता
वो कमरे बंद है कबसे
जो चौबीस सीढियॉं उनतक पहोंचती थी वो अब ऊपर नहीं जाती
मकानकी ऊपरी मंझिलपर अब कोई नहीं रेहता
वहॉं कमरोंमें इतना याद है मुझको
खिलौने इक पुरानी टोकरीमें भरके रखें थे
बहोतसे तो उठाने फेंकने रखनेंमें चूर हो गये
वहॉं इक बाल्कनी भी थी
जहॉं एक बैदका झूला लटकता था
मेरा एक दोस्त था तोता
वोह रोज आता था
उसको हरीं मिर्च खिलाता था
उसी के सामने छत थी
जहॉं एक मोर बैठा आसमांपे रातभर मीठे सितारें चुगता रेहता था
मेरे बच्चोंने वोह देखा नहीं है
वो नीचे कि मंझील पर रेहतें है
जहॉंपर पिआनो रखा है पुराने पारसी स्टाईल का - फ्रेजरसे खरीदा था
मगर कुछ बेसुरी आवाजें करता है
कि उसरी रीढ्स सारी हिल गयी है
सुरोंके उपर दुसरें सुर चढ गएं है
उसी मंझिलपे एक पुश्तैनी बैठक थी
जहॉं पुरखोंकी तस्वीरें लटकती थी
मै सीधा करता रेहता था - हवॉं फिर टेढा कर जाती थी
बहूको मूछोंवाले सारे पुरखे क्लिशे लगते थे
मेरे बच्चोंने आखिर उनको कीलोंसे उतारा
पुराने न्युजपेपरमें उनको मेहफूज करके रख दिया था
मेरा भांजा कभी ले जाता है
फिल्मोंमें कभी सेट पे लगाता है
किराया मिलता है उनसे
मेरी मंझिलपे मेरे सामने मेहमॉंखाना है
मेरे पोते कभी अमरिकासे आएं तो रुकते है
अलग साइझमें आते है वो जितनी बार आतें हैं
खुदा जाने वहीं आते हैं या हर बार कोई दूसरा आता हैं...
वो इक कमरा जो पीछेकी तरफ बंद है जहां बत्ती नहीं जलती
वहां एक रोजरी रखी है
वो उससे मेहेकता है
वहां वो दाई रेहती थी जिसने तीनों बच्चोंको बडा करने अपनी उम्र दे दी थीं
मरी तो मैने दफनाया नहीं
मेहफूज करके रख दिया उसको
उसके बाद दो सीढियॉं है - नीचे तेहखानेंमें जाती है
जहॉं खामोशी रोशन है,
सुकुन सोया हुआ है बस इतनीसे पेहलुंमें जगह रखकर
कि मै सीढियोंसे उतरकर नीचें आऊं तो उसीके पहलुंमें बाजु रखकर गले लग जाऊं - सो जाऊं
मकान कि उपरी मंझिलपर अब कोई नहीं रेहता.
- गुलझार.
"अशा ओवाळल्या न ओवाळल्या सत्तर मैलाच्या सोबतीस"
जागरण फार - झोप आवश्यक.
प्रतिप्रश्न चे कोडे अजून सुट्ले नाही... म्हणजे उत्तर नाही, निदान प्रश्न कळ्तोय का ते बघतो....
ReplyDeleteउपरी मंझिल मस्त, टिपिकल गुलजार... (एक पुराना मौसम लौटा) actually कवी वाच्ल्यावर परत वाचली... त्याच्या खर्ज्यातल्या आवाजात अजून मस्त वाट्ली...
Thanks for sharing....
काल रात्री संवेदचं अनुवाद पोस्ट वाचल्यावर त्याला कमेंट म्हणुन कविता लिहायला घेतली. पण मेघना आणि संवेदनं बहुतेक मला ब्लॉक केलंय, त्यामुळे माझ्या कमेंट्स त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. कविता सुरु केली आणि मग झोप आली. मी युजुअली गाढ झोपतो - पण काल अधुन मधुन जाग येत राहिली आणि रेटत राहिलो. लिहुन झाल्यावर पोस्ट करण्याचा प्रयत्न केला पण होईना. मग म्हटलं लिहुन ठेवलंय ते वाया का घालवा - म्हणुन इथे टाकलं.
ReplyDeleteसंवेद - ओरिजिनल कविता वाचायचा प्रयत्न केला पण झेपली नाही. अनुवाद/इंटरप्रिटेशन भारी.
तुझं नेट गंडलं असेल, उगाच का माझ्यावर आरोप?!
ReplyDeleteमेघना आणि संवेदनं बहुतेक मला ब्लॉक केलंय....hehehehehe
ReplyDeleteह्यांचा नि संवेदच्या ‘खो’चा काय संबंध? काही कळे ना बुवा.
ReplyDeleteअभिजीत, अरे किती टिंग्या माराव्या माणसानं? इंटरनेट म्हणजे काय माणूस आहे का की खुप दिवसांनी भेटलं तर ओळख दिली नाही? काही ही फेकावं अन तेही टेकी माणसासमोर? तुला ब्लॉक वगैरे करुन आम्हाला काय आ बैल करायचं का?
ReplyDeleteआणि थॅन्क्स!
आता जागचा उठला आहेसच तर खो पुर्ण कर की माणसा!!
वय झालं की गुलजारच्या कविता अधिक भिडतात का?
ReplyDeleteनिमिष - ह्याचा आणि संवेदच्या ’खो’ चा काहिही संबंध नाही. मी असंबद्ध लिहितो हे मला (पुन्हा एकदा) सांगावंसं वाटलं असणार मी या कविता टेपल्या तेव्हा.
ReplyDeleteसंवेद - मला कुणी कधी खो दिला मी तो पूर्ण करायला? (दिला असता तरी मी असले प्रकार केले नसते हा भाग अलाहिदा. याचं कारण म्हणजे मला जनरली मराठी लोकांना माहिती असलेल्या भाषांशिवाय इतर भाषा येत नाहीत, मग ते अनुवाद वगैरे म्हणजे मला मराठी कवितेचा मराठीतच अनुवाद करण्यासारखं वाटतं. माझ्या पोस्ट्सचा बऱ्याच लोकांना मराठी अनुवाद का हवा असतो हे मात्र मला कळत नाही. तुझी पोस्ट्स मात्र मला ३-४ लोकांशी बोलुन समजुन घ्यावी लागतात :))) (म्हणजे कंस समाप्त).
राधिका - वय झालं कि गुलजारच्या कविता अधिक भिडतात का? माहित नाही. ’वयात आल्यापासुन’ त्या भिडायला लागतात असं म्हणणार होतो, पण माझी दोन वर्षांची मुलगी कुठल्याही हलणाऱ्या गोष्टीवर बसली कि ’लकडीकी काठी’ गायला लागते तेव्हा आता हिची(ही) गुलजार पासुन सुटका नाही - हे कळुन चुकतं....
गुरुभाय - कविता आवडल्या आणि ते आवर्जुन कळविल्या बद्दल धन्यवाद, पण मला तुला एक बेसिक प्रश्न विचारायचाय. म्हणजे गाणं आणि कवितेमधला. मी संदीप खरेला एकदा विचारलं होतं कि तुला तुझ्या गाण्यांच्या चाली कशा सुचतात? म्हणजे आधी चाल सुचते कि आधी कविता? तर तो म्हणाला होता कि कविता लिहितानाच चाल सुचली तर त्याचं गाणं होतं - नाहीतर नाही. ते कितपत खरं आहे हे कळायला मार्ग नाही - कारण मी कविता (आणि फॉर दॅट मॅटर गाणी) लिहीत नाही. गुलजारच्या कविता वाचताना त्या कविता वाटतात - गाणी ऐकताना हे गाणंच, ही कविता असणं शक्य नाही असं काहितरी वाटतं. म्हणजे असं कि -
"गोली मार भेजेमे
भेजा शोर करता है
भेजेकी सुनेगा तो मरेगा कल्लु
तु करेगा दुसरा भरेगा कल्लु
मामा - कल्लु मामा"
ही कविता होऊ शकत नाही असं वाटतं, आणि वर लिहिलय ती कविता गाणं होऊ शकत नाही असं. (त्याच्या कवितांची गाणी बनवणारा राहुल देव बर्मन म्हणुनच कदाचित थोर वाटतो).
तु "कोमल काया" लिहिलीस ती कविता म्हणुन कि गाणं म्हणुन? ती कविता म्हणुन वाचली कि वेगळा इंपॅक्ट येतो - गाणं म्हणुन ऐकली कि वेगळा. पाहिल्यावर आणखीच वेगळा. परवा माझ्या इंग्लंड मध्ये जन्मलेल्या, इस्राईल मध्ये वाढलेल्या, कॅनडात रहाणाऱ्या इटालियन कलीग ने ती ऐकली आणि त्याला त्यात वेगळाच इंपॅक्ट जाणवला - पण त्याबद्दल नंतर कधितरी.
वय झालं कि गुलजारच्या कविता अधिक भिडतात का? माहित नाही. ’वयात आल्यापासुन’ त्या भिडायला लागतात असं म्हणणार होतो, पण माझी दोन वर्षांची मुलगी कुठल्याही हलणाऱ्या गोष्टीवर बसली कि ’लकडीकी काठी’ गायला लागते तेव्हा आता हिची(ही) गुलजार पासुन सुटका नाही - हे कळुन चुकतं.... >>
ReplyDeleteहे फार आणि फारच छान लिहिलं आहेस! अगदी अगदी .. म्हणावसं वाटण्याइतकं.
"अशा ओवाळल्या न ओवाळल्या सत्तर मैलाच्या सोबतीस" >> या वाक्याचा अर्थ काय असू शकेल? कुठल्या लेखाचं/पुस्तकाचं हे टायटल असेल तर ते वाचायलाच हवय. आणि तुझंच असेल वाक्य तर पुन्हा फारच छान.
संदिप खरेंचं कविता सुचतानाच चाल सुचली तर त्याचं गाणं होतं हे उत्तर अगदीच काहीही. गुरु ठाकुरांचं काय म्हणणं असू शकेल माहित नाही. पण कविता आणि गाणं यासंदर्भात सुचणे, फरक वगैरेंबाबत ग्रेसने अत्यंत सुंदर लिहिले आहे. मिळवून वाच.