Tuesday, November 07, 2017

रांबा हो! हो! हो! हो!

च्यायला लिखाणात ईमानदार नाही रहाणार तर कधी? आज धावत पळत अनुला आणायला पोचलो तर तो ठोकळ्यांत मग्न, बाहेर कुणी पालकही नाहीत ताटकळत.
मग उलगडत गेलं.
काल रात्री झोप कमी झाली.
आणि आज दुपारी जास्त!
एनीवे - सकाळी किंवा दुपारी - बळंबळं झोपेतुन उठुन ताबडतोब हिशेब केले कि ते चुकतात हे चाळीस वर्षांत नाही शिकलो तर कधी शिकणार?
भेंचोद वाजले किती?
भेंचोद इथे कसा?
भेंचोद झोपलो कधी?
भेंडी....
काल जिम मध्ये गेलो.
पहिल्यांदा!
म्हणजे बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा!
जिममध्ये गेल्यावर भलभलते विचार यायला लागतात.
स्वत:बद्दलच्या आपल्या कल्पना इतक्या पराकोटीच्या अशक्य का असतात?
कि माझ्याच असाव्यात?
एनीवे - तर अशक्य ते शक्य करिता सायास
कारण जिम तुका म्हणे....
लिखाणात ईमानदार रहाता येत नाही.
उगीच कशाला स्वत:ला चुत्या बनवा?
पोरांना घ्यायला येणाऱ्या आया अशक्य आयटम असतात.
हे तितकसं खरं नाही.
आपण त्या त्या वेळी कुठला चष्मा लावुन येतो त्यावर ते डिपेंडंट असावं.
कुठल्या वेळी कुठला चष्मा लावावा हे आपल्या हातांत असतं का?
बहुतेक असतं.
असावं.
अचानक उठवळ झाली असं सहसा होत नाही.
सहसा काय - असं सार्वजनिक कधीच होत नाही.
आपणच आपल्या कल्पनाविलासात इतके भरकटायला ’सोलेदाद’ थोडीच आहोत?
आता थोड्या वेळाने कागद संपणार.
मग विचारही.
मग मी ही.
माझ्या हातात सेलफोन नसेल आणि मला कंटाळा आला कि मी लिहायला लागतो.
हे भारी ना?
पण मला फारसा कंटाळा येत नाही.
आणि तो आल्यावर फोन हातात नाही असं सहसा होत नाही.
आज झालं.
म्हणुन लिहिलं.
मनात आलं ते आणि तसं.
पण याचा अर्थ मी किंवा माझं लिखाण ईमानदार झालं का?
उत्तर माझं मला आणि नक्की माहितिए.
आता मला सगळ्या जगातल्या सगळ्या लिखाणाबद्दल शंका यायला लागलिए.

हे ही नेहमीचंच.

 

No comments:

Post a Comment