Friday, July 28, 2006

वीकेंड

बास.
डिक्लेअर.
लई झालं.
हा वीक संपला.

वीकेंडला अजित आणि विकी येतायेत पिट्सबर्गहून. त्या निमित्ताने घर साफ होईल. खास काही प्लॅन नाहिये. अजित म्हणाला काही करूही नकोस. एकतर उकाडा मरणाचा आहे. वीकेंड वेदर चेक केलं तर ह्युमिडिटीही खूप. या वर्षी समर एकटाच काढायचा असल्याने एसी चालू करायचा नाही असं ठरवलं होतं. भारतातल्या सगळे ऋतू 'अंगावर' काढण्याच्या सवयीने एका फॅन ने समर टॅकल करता येतो ही खात्री पटलिये. मागच्या वर्षी जून मध्ये या जून पेक्षा ४ पट वीज जास्त वापरली होती! बिल चौपट कमीच पण बीजीई ने मला ३ डॉलरचं बक्षीसही दिलंय!
पण बहुतेक हे दोघे आल्यावर मला एसी चालू करायला लागणार.

वीकेंड ला काय करायचं?
आत्ताच थॉमस येउन गेला. वीकेंड चा काही प्लॅन आहे का विचारायला. हाइक वगैरे ला जायला आवडेल पण या दोघांचा उत्साह किती आहे त्यावर ते अवलंबून.
विकी माझा मामेभाऊ आणि अजित खूप जवळचा मित्र.

बाय द वे बाबा - ते 'सिगरेट ओढण्या एवढ्या तीव्र वैतागाचं कारण' म्हणजे लग्न. टु बी स्पेसिफ़िक - लग्नातला बॅंड!
अरे काय कटकट असते यार एकेक कार्यक्रम जमवून आणणे म्हणजे.....
शेवटी मला जसं नको होतं - अगदी त्याच प्रकारे - ते यथासांग पार पडलं.

पिक्चर टाकावा एखादा - 'ओंकारा' अजून आला नसेल. अजित ला 'भोपाल एक्स्प्रेस' दाखवायचा विचार आहे. च्यायला त्या अंकल ची 'वॉरियर' परत करायचिये.
बाकी दारू वगैरे पीत मराठी गाणी.
विकी ला 'अवेळीच केव्हा दाटला अंधार' भलतीच आवडायला लागलिये. तो मराठी गाणी कविता वाचायला लागला याचा त्याच्या आई पेक्षा जास्त मोठा धक्का त्याला स्वत:ला बसला. आता म्हणे भारतात जेवढा मराठी बोलायचो त्या पेक्षा जास्त इथे अमेरिकेत येऊन बोलतो!
त्याला कधी कधी संदिप खरे वगैरे पण समजावून द्यावा लागतो पण काही का असेना - ब्लॉग ला आणखी एक 'हक्काचा वाचक' मिळण्याची शक्यता तर निर्माण झाली! हे ही नसे थोडके!!
बाकी संदिप हल्ली बरेचदा वैताग कविता लिहायला लागलाय. या इंडिया ट्रिप मधे इतर अनेक अशक्य प्लॅन्स सारखा त्याला भेटून झापायचा प्लॅन होता - पण राहुल म्हणे हल्ली तो फार फेमस झालाय. त्याला शेवटचं भेटून ५ वर्ष झाली. राहुलच्या लग्नातुन कल्टी मारून सिंहगड रोड ला भर दुपारी टल्ली झालो होतो, तेव्हा तो (त्याच्या जड आवाजात) म्हणाला होता - रोज काहीतरी लिहित रहा. हळूहळू कविता करायला लागशील.
बहुतेक हल्ली तो रोज एक 'काहितरी' कविता करतो. (आणि हळुहळु त्याचा दर्जा घसरत चाललाय).

भारतातल्या प्लॅन्स वरून आठवलं - अनंत सामंतांना भेटायचं होतं!
कैक वर्ष त्यांना पत्र लिहीन लिहीन म्हणत टाळाटाळ केली. ५ वर्षांपुर्वी (च्यायला पाच वर्ष पाच वर्ष फारच करतो का मी? मलाच आता असं वाटायला लागलंय कि पाच वर्षांपुर्वी माझ्या आयुष्यात बर्याच ऐतिहासिक घटना घडून गेल्यात!) निघताना (पुन्हा एकदा राहुल च्या वशिल्याने) सामंतांशी फोन वर का होईना - मनभर बोललो.
त्यांनी अगदी त्यांच्या भाचीचा वगैरे फोन नंबर देऊन भेटायला, त्यांना पत्र लिहायला आणि आवर्जून त्यांच्या गोष्टिंमधल्या न आवडलेल्या गोष्टी लिहायला सांगितलं होतं. त्या वेळेस वाटलं होतं कि त्यांच्या गोष्टींच्या एवढा प्रेमात पडल्यावर त्यांना काय कप्पाळ सांगणार मी - कि हे आवडलं नाही, सुधारणा करा म्हणून!
म्हणुन मग मागची पाच वर्ष (पुन्हा पाच वर्ष) - त्यांच्या गोष्टी परत वाचणे, कथावाचन, त्यांच्यावरचे (पॉसिबल) एन्फ़्ल्युअन्सेस (इज्राईल, जॅक लंडन, प्लॅटून आणि तत्सम वॉर मुव्हीज, मराठ्यांचा (लिहिलेला) इतिहास, आरमार) यावर थोडा रिसर्च झाला.
रिसर्च वगैरे म्हटल्यावर भारी वाटतं ना?
ऍक्चुअली तसं काही नाही - वाचत गेलो, बघत गेलो आणि असं वाटलं - अरे या माणसाने हे पाहिलं असेल... इथला रेफ़रन्स तिथून! इथे फॅक्ट सॅपते - इमॅजिनेशन सुरू. इथे इमजिनेशन संपतं - शब्दच्छळ सुरू.
कधीकधी वाटलं सामंत एवढे ग्रेट नाहीत जेवढे वाटतात, पण जितकं जास्त (त्यांच्या व्यतिरिक्त) वाचत गेलो तेवढं हे पटत गेलं कि साला माणसात धमक आहे!
थोडंफार लिहायचा प्रयत्न केला तर जाणवलं - च्यायला या तोडीचं, या विषयांवर लिहायचं म्हणजे नुस्ता बोटात नाय तर **त दम पाहिजे!
अजुनही त्यांच्या गोष्टी गरम रक्ताएवढ्या 'लाईव्ह' वाटतात!!
बरं सांगायचा मुद्दा - ते ही राहून गेलं.

च्यायला आजचा विषय काय?
अजित-विकी, वीकेंड, संदिप, सामंत.....

दारूचा मूड नाहिये.
हल्ली दारूचा वाईट नॉशिया आलाय.
तेच बिडीचं.
पण तरीही सवय म्हणून बिडी चालू.

वीकेंडच्या वैयक्तिक प्लॅन्स मधे 'द रोड्स दॅट बिल्ट अमेरिका' हे पुस्तक वाचायचंय. परवा ऑफिस च्या लॉबीत दिसलं - जॅकी (आमची सेक्रेटरी - म्हातारी आहे - आधीच सांगून ठेवतो!) म्हणली तुला पाहिजे तर घेउन जा. वाचून परत आणून दे. काल आणलंय आणि हातातुन खाली ठेववत नाहिये. अमेरिकेतल्या रोड्स च्या इतिहासाचं उत्तम फोटोंसहीत केलेलं उत्कृष्ठ वर्णन! (इतिहास आणि लिखाण - यावर अखिल भारतीय अनिच्छेबद्दल मी न बोललेलं बरं).

वीकेंडला लिहायचा मूड आला तर बघु, पण तोवर अभ्या, बाबा आणि अश्विनी यांना रिप्लाइज टाकल्याबद्दल धन्यवाद.
अमित, स्वप्ना - रिप्लाय न टाकताही ऍटलिस्ट वाचताय तरी म्हणून तुमचेही!

3 comments:

  1. सही. जबरा प्लॅन दिसतोये वीकेण्ड चा. छान लिहीतोयेस. जशा गप्पा मारतोस तसंच लिहू शकतोयेस. गुड. :-) जसं गप्पांत, तसंच वाचतानाही.. तुझं सामंत, संदीप, दारू, वाचन, बिडी याबद्दल झोकून देवून बोलणं; समजतं, पण आपल्याला जमेलसं वाटत नाही. तुला या सगळ्याचं इतकं तुफ़ान आकर्षण वाटतं हे पाहून आश्चर्य आणि कौतुक वाटतं, पण बाबाने कधी "आज मस्तं व्यायाम केला" असं म्हटलं की मलाही १० सूर्यनमस्कार घालायचा मोह होतो, तसं तुझा ब्लॉग वाचून 'प्रेरित' होणं शक्य नाही. येह सब अपुनके बस के बाहर है. यावर तू जरी म्हटला की "अभ्या तू तुझ्या आयुष्याच्या "ह्या" कडा कापून टाकल्या आहेस", तर I AGREE. ;-))

    ReplyDelete
  2. अनंत सामंतांच्या 'ओश्तोरिज'ने मला असेच चक्रावून टाकले होते. केकी मूसच्या व्यक्तिरेखेत वास्तव, कल्पना ह्यांची इतकी विलक्षण सरमिसळ केलीय. मराठीमधे क्वचितच आढळणारा मोठा canvas ते अगदी सहज वापरतात. हल्ली नाही लिहित का ते काही?
    The roads.... मला पण आवडल. प्रशस्त, भव्य, सुंदर रस्त्यांच वैभव जर्मनीमधेही डोळ्यांच पारण फिटवतं. भक्कम रस्त्यांचा सक्षम राष्ट्र निर्मितीमध्ये किती महत्वाचा वाटा असतो हे भारताला चायनाच्या रस्तेनिर्मितीची प्रगती इतकी वर्षे शेजारुन निरखूनही आणि एका युद्धात त्याचा फटका खाऊनही अजून उमगू शकलेले नाही हे केवळ दूर्दैव! हिमालयातल्या रस्तेनिर्मितीबाबत अगदी 'रारंग ढांग' बांधतानाही ज्या प्रतिकुल मानसिकतेला इतक्या वर्षांपूर्वी विश्वनाथला तोंड द्यावे लागले तीच मानसिकता आजही बदललेली नसावी ह्याला काय म्हणावे? autobans हे भारताबाबत कायम स्वप्नच रहाणार बहुतेक. neways...

    छान लिहितोस तु अभिजीत. keep posting! and enjoy the weekend.

    ReplyDelete
  3. ithe >>> http://marathiblogs.net/

    ReplyDelete