Tuesday, November 07, 2017

रांबा हो! हो! हो! हो!

च्यायला लिखाणात ईमानदार नाही रहाणार तर कधी? आज धावत पळत अनुला आणायला पोचलो तर तो ठोकळ्यांत मग्न, बाहेर कुणी पालकही नाहीत ताटकळत.
मग उलगडत गेलं.
काल रात्री झोप कमी झाली.
आणि आज दुपारी जास्त!
एनीवे - सकाळी किंवा दुपारी - बळंबळं झोपेतुन उठुन ताबडतोब हिशेब केले कि ते चुकतात हे चाळीस वर्षांत नाही शिकलो तर कधी शिकणार?
भेंचोद वाजले किती?
भेंचोद इथे कसा?
भेंचोद झोपलो कधी?
भेंडी....
काल जिम मध्ये गेलो.
पहिल्यांदा!
म्हणजे बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा!
जिममध्ये गेल्यावर भलभलते विचार यायला लागतात.
स्वत:बद्दलच्या आपल्या कल्पना इतक्या पराकोटीच्या अशक्य का असतात?
कि माझ्याच असाव्यात?
एनीवे - तर अशक्य ते शक्य करिता सायास
कारण जिम तुका म्हणे....
लिखाणात ईमानदार रहाता येत नाही.
उगीच कशाला स्वत:ला चुत्या बनवा?
पोरांना घ्यायला येणाऱ्या आया अशक्य आयटम असतात.
हे तितकसं खरं नाही.
आपण त्या त्या वेळी कुठला चष्मा लावुन येतो त्यावर ते डिपेंडंट असावं.
कुठल्या वेळी कुठला चष्मा लावावा हे आपल्या हातांत असतं का?
बहुतेक असतं.
असावं.
अचानक उठवळ झाली असं सहसा होत नाही.
सहसा काय - असं सार्वजनिक कधीच होत नाही.
आपणच आपल्या कल्पनाविलासात इतके भरकटायला ’सोलेदाद’ थोडीच आहोत?
आता थोड्या वेळाने कागद संपणार.
मग विचारही.
मग मी ही.
माझ्या हातात सेलफोन नसेल आणि मला कंटाळा आला कि मी लिहायला लागतो.
हे भारी ना?
पण मला फारसा कंटाळा येत नाही.
आणि तो आल्यावर फोन हातात नाही असं सहसा होत नाही.
आज झालं.
म्हणुन लिहिलं.
मनात आलं ते आणि तसं.
पण याचा अर्थ मी किंवा माझं लिखाण ईमानदार झालं का?
उत्तर माझं मला आणि नक्की माहितिए.
आता मला सगळ्या जगातल्या सगळ्या लिखाणाबद्दल शंका यायला लागलिए.

हे ही नेहमीचंच.

 

Sunday, November 05, 2017

अझेलिया

आज तर मी काहिसा उदास
सखे तु ही मंदशी हास
सावळी धरती घुमट वरती
निळं भरलं अथांग आकाश
आपण काहिही बोलतो ना तासन तास

च्यायला सगळ्याच कवितांतल्या सगळ्याच ओळी आवडायलाच पाहिजेत असं काही नाही. आणि शिवाय एक ओळ नावडल्याने आख्ख्या कवितेचाच जीव घ्यावा यालाही काही कारण नाही.

आठ वाजता झोपल्यावर माणसं उठतात कधी आणि करतात काय?

बारटेंडरला फोन दिला चार्ज करायला आणि माझी मलाच भिती वाटायला लागली. म्हणजे भिती असं नाही, पण करायचं काय असा प्रश्न पडला. च्यायला लिहिता येत असताना काय करायचं हा प्रश्न पडायचं काही कारण नाही .
आता हे सगळं लिहुन या बारटेंडरलाच द्यावं.
साकी....
प्याला....
आणि तिलाच विचारावं कि बाई दारु तु दिलीस, पेन, पेपर तुझाच. आता काय खाऊ तुच सांग.
तिनं सांगितलं.
म्हणजे ऑप्शन्स दिले.
मग हे नको, ते नको करत न्युयॉर्क स्टेक निवडला.
आता या सगळ्या प्रकारात तिने दिलं किती आणि मी घेतलं किती आणि काय याचा हिशोब केला तर...च्यायला घंटा मीच उरतो!
पुर्णस्य पुर्णमादाय पुर्णमेवावशिष्यते
- याचा अर्थ घंटा!
ती, मी, वगैरे असलं काही रिलेशन नसतंच.
आपले आपणच असतो.
सगळीकडेच.
आपल्यातनं आपले आदाय
आपले आपण उरस्यशे!
भेंचोद आपल्याला दुसऱ्याने काढलेलं आपलं, तुपलं, कशाचंही चित्र भारी वाटतं.
च्यायला चित्र चित्र म्हणजे या लिखाणापेक्षा वेगळं असतं का?
इकडचे तिकडचे तुकडे.
थोडीशी डागडुजी.
थोडीशी अब्रुमिमांसा.
खाली लफ्फेदार सही.
भेंचोद घ्या आणि मोजमापा आपापली लायकी, धुडकावा, ओळखा, भिरकावा, वेडे व्हा नाहीतर आई घाला.
पासपोर्ट साईजचा फोटो चौकटीत मावत नव्हता म्हणुन चौकट वाढवत गेलो आणि मर्यादाच दिसेनाश्या झाल्या.
मग भलतंच एकटं वाटायला लागलं.
पण इतरांच्या चौकटींचा हेवा वाटावा इतकंही नाही.

जेवण आलं.
ते इतकं सुंदर दिसल्यावर त्याचा फोटो न काढता ’वदनी कवळ घेता’ म्हणावंसं वाटेतो संस्कृती जिवंत आहे!

कि चौकटही?