Monday, August 28, 2006

कुण्य़ा दोघांची भ्रमणगाथा

अगासीने तिसरा सेट घेतला!
ले भेंचोत!!
लढ!!!
अमेरिकन ओपनच्या पहिल्याच राऊंडमध्ये पावेल शी लढताना दोन सेट टायब्रेक मधे १-१ झाल्यावर तिसऱ्यात आन्द्रे ४-० मागे पडला, तेव्हा त्याच्याबरोबरच माझाही इतिहास डोळ्य़ांसमोरुन तरळून गेला. २१ वर्षांपुर्वी तो खेळायला लागला तेव्हा मी टेनिस कधी बघितलंही नव्हतं.
जेव्हा बघायला लागलो तेव्हा डाइव्ह्ज मारुन पॉइंट घेणारा बोरिस बेकर भयंकर आवडायचा. मग त्याची जागा लेंडलने घेतली. थोडे दिवस स्टिफन एड्बर्गचाही (अभ्याच्या भाषेत) पंखा झालो. मग कुरियर.
दुसर्य़ा बाजूला स्टेफी मनावरची अनभिषिक्त साम्राद्नी झाली होती. (आणि आजतागायत तिची जागा कुणी घेऊ शकलेलं नाहिये - बायकोचा 'सन्माननीय' अपवाद सोडून दॅट इज....)
आंद्रेला तसा पाहिला होता, आणि तो लक्षातही राहिला होता, पण मुख्यत: त्याच्या पोनीटेलमुळे.
९२ च्या विंबल्डन फायनलमधे त्याने गोरान इव्हानिसेविक ला हरवलं तेव्हा खरं तर सूतक बरेच दिवस लांबलं होतं. इव्हानिसेविक पुढे विंबल्डन फायनल ला जात राहिला आणि हरत राहिला - जिंकेपर्यंत.
कुरियर मध्येच कुठेतरी गायब झाला. होता तोवर जबरा होता.
सॅंप्रास आला आणि हजामापासुन सुरू होऊन गळ्यातला ताईत झाला.

चौथ्या सेट मधे अगासी ३-० पुढे आहे.
लवकर झोपायचं ठरवूनही मॅच सोडवत नाहिये आणि अगासिच्या विजयाच्या वेगापुढे लिखाणाचा वेग कमी पडतोय.

९० च्या सुरुवातिला अगासी नजरेत आला, अपेक्षेप्रमाणे चमकला आणि अपेक्षेप्रमाणेच भरकटला.
९२ च्या कॉंपिटिशन सक्सेस रिव्ह्यू मधला त्या वेळच्या विंबल्डन विजेत्या अगासी आणि स्टेफीचा बॉलरुम डान्सचा ब्लॅक अऍंड व्हाइट फोटो मात्र पुढे कित्येक वर्ष (खरं तर स्टेफी साठी) टेबलावर राहिला.
ब्रुक शील्ड्स आली.
गेली.
गेलेले केस परत आले नाहीत.
तो 'डाऊन ऍंड आऊट' झाला तेव्हा त्यानं खरी ओढ लावायला सुरुवात केली.
अभ्या, बाबा - तुम्ही लोक म्हणता तसं कदाचित माझ्यातलं (तुमच्या मते) इन्हेरिटंट पेसीमिज्म त्याला कारण असेल कदाचित!

अगासी ४-१.
अगासी ५-१.

'भेंचोत हरणार नाय' ची जिगर, बेशिस्त बुद्धिमत्ता, रिबेल वृत्ती.....

अगासी ५-२ सर्व्ह करतोय आणि रडतोय!

अगासी जिंकला.
ले!!!!!!!!!!!!!!!!!!

लंबी खामोशी.....आणि - ब्लिस.

खूप लिहायचंय.
नक्कीच लिहीन, पण हे पोस्ट केलंच पाहिजे!

2 comments:

  1. अभिजीत,
    आगासी रडलेला मला बघायला मिळाला नाही ऐकायलाच मिळाला.पण तुमचा लेख वाचताना खूप छान वाटलं.
    स्टेफी माझ्या प्रेरणांपैकी एक आहे आणि आगासीची एकूण वाटचाल पाहून मी त्याच्यापुढे नमले आहे.
    हा लेख वाचताना अनेक संदर्भ आठवून गेले.
    तुमचं एकूणच लेखन मला खूप आवडलं.
    --अदिती

    ReplyDelete