Wednesday, May 30, 2007

अब तक छप्पन!

सुचना: हे माझं सगळ्यात दळभद्री पोस्ट आहे. उगीच काहीतरी लिहायचं म्हणुन लिहिलंय. टाळता येत असेल तर अवश्य टाळा!

लहान मुलं कशी रांगायला शिकतात, आणि मग जनता त्यांचं य कौतुक करते - तसं काहीसं माझं झालं.
म्हणजे - येणाऱ्या कमेंट्स ने असेल कदाचित, पण मीच मला जरा सीरियसली घेतलं.
कि चला - आता आपण लिहु शकतो.
तर - चला आता आपण लिहु.
मग मागच्या पोस्ट नंतर काही चांगले विषय वगैरे सुचुनही - नको, सतत लिखाणाने दर्जा घसरेल वगैरे खुळचट फंडे स्वत:लाच बजावुन ठेवले.
मग उगीच विसरतील वगैरे म्हणुन फील्ड बुक मध्ये सुचलेले विषय वगैरे व्यवस्थित नोंदवुन ठेवले. म्हणजे एका रात्री काम करताना सुर्य मावळताना कसा पाह्यला आणि मग थोड्या वेळाने त्याच जागेहुन वाफाळती कॉफी पिता पिता तो उजाडताना कसा पाहिला वगैरे वगैरे.
आता म्हटलं - चला, मागचं पोस्ट लिहुन महिना झाला, आता काही तरी लिहु - तर च्यायला काहीच सुचत नाहिये.
आय मीन - जे लिहितोय ते असं काहीतरी पकाऊ सुचतंय.
म्हणजे - मी पण बोअर आणि हे वाचणारा पण.
एखाद्या जंगलात उन्हाळ्यातल्या भर दुपारी - काडीमात्र वारा नसताना - ह्युमिडिटी कशी धुक्यासारखी पसरते - अगदी हाताने कापता येते - तसं काहीसं फीलिंग.
काहीना काही वाचन चालु. या वर्षाचं उद्दिष्ट याच महिन्यात पुर्ण होईल कदाचित - आता बाकीचे पाठलाग काय होते ते तपासलं पाहिजे. नव्या घरासाठी नाव शोधणे, पॅकिंग, मुव्हिंग, आई पप्पांचा पहिला परदेश प्रवास वगैरे गोष्टिंनी एका बाजुला वाईट 'हायपर' मध्ये दिवस चाललेत तर दुसऱ्या बाजुला - लिखाण ऑल्मोस्ट बंद.
काही चांगले पिक्चर्स बघतोय पण त्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे स्वत:चीच लिमिटेशन्स स्वत:ला कबुल करण्यासारखं. आणि माझ्यासारख्या 'अहंगंडी' (च्यायला याचा अर्थ 'इगॉटिक' घ्यावा कि 'सतत गंडलेला'?) - तर माझ्यासारख्या 'अहंगंडी' माणसाला - असले कबुलीजवाब नामंजुर!

आता इथवर वाचत अलाच असाल तर - लेट मी ट्राय टु मेक युअर व्हिजिट वर्थ द एफर्ट....:)

छप्पन्न

पायात तुटकी चप्पल होती
पाय तुटक्या चपलेत होता
हे आता इतिहासजमा होईल
सतेज रंग डोळ्यांत होते
डोळ्यांत डोळ्यांची झाक होती
हे आता इतिहासजमा होईल

अगदी सुरुवातीपासून
आढावा घेतला तर
मागे वळून खूप पुढे जावं लागेल

मला त्या वेळी सगळंच बोलायचं होतं
मी ऐनवेळी काही बोलू शकलो नाही
कदाचित निवळेल आयुष्य आज ना उद्या ह्या हिशोबानी
मी सगळे डिटीपी जॉब फार
तत्परतेने केले स्वत: आणि हस्तलिखितं
आणि नमुने एकत्र स्टेपल करुन ठेवले

याची इतिहासदफ्तरी नोंद होईल

माझ्यावर लाटालाटांनी पसरत गेलेली
सुन्न आणि संथ संध्याकाळ
मी कडेकडेने निरखत राह्यलो
याला इथुन पुढे आता
ऐतिहासिक महत्व प्राप्त होईल

लिव्हिंग इज अ डिफरंट प्रोजेक्ट
नॉलेज इज अ डिफरंट प्रोजेक्ट

लिव्हिंग कॅनॉट बी पोस्टपोन्ड्‍

प्रेमात हरलो प्रेमाबाहेर हरलो
त्यागात हरलो भोगात हरलो

ज्याची वाट पाह्यली वाट पाह्यली वाट पाह्यली
ते धर्मयुद्ध शेवटपर्यंत झालंच नाही

इकडे आपणच येडे ठरलो.

- सलील वाघ.

12 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. "नको, सतत लिखाणाने दर्जा घसरेल वगैरे खुळचट फंडे स्वत:लाच बजावुन ठेवले."
  हे मात्र खरं बोललास! असलं कमी वा जास्त लिहून दर्जे सुधारत-घसरत असते तर काय पहिजे होतं! खरं म्हणजे हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं - एकदम ’ना. सी. फडके’ स्टाईल नोंदी करणं किंवा ’कमी पण दर्जेदार’ लिहिणं - ऍज इफ तो कमाण्ड परफॉर्मन्स असतो!!
  जाऊ दे, देर आए, दुरुस्त आए!

  ReplyDelete
 3. Khup diwasani "दळभद्री" ha shabd samor ala. Eke kali majhya tondat basla hota ha shabd. tendlyachya inning pasun te karlyachya bhaji paryant saglyana "दळभद्री" he visheshan lavaycho. Punyala alo teva kalala ki "दळभद्री" ha proper AURANGABADI/GHATI shabd ahe mhanun!

  Junya athvani tajya jhalya :)

  ReplyDelete
 4. कुंथण्याचेही श्रम न घेता बाहेर पडते ती खरी प्रतिभा!
  (वाह, मी आताच एका ऐतिहासिक वचनाचा जन्म पाहिला! :-))

  सगळे फ़ंडे बाजूला ठेव यार, जे वाटेल, जेव्हा वाटेल तेव्हा बाहेर पडू दे. अशा गोष्टी जास्त दाबून ठेवून नयेत.

  ReplyDelete
 5. मला कधी कधी वाटतं ह्या सलील वाघाचं पण तुझ्यासारखंच होत असावं.. म्हणजे खूप काही ठासून भरलंय मनात.. सांगायचंय.. पण सांगायला गेल्यावर काही विषयही सापडत नाही, आणि मग हे असं कसंच्या कसं मन मोकळं होतं, जे जसे शब्द/वाक्य सापडतील तसं! जसा तुझा ब्लॉग, तशा त्याच्या कविता! सेमि-ऍब्स्ट्रॅक्ट .. कॉन्शसनेस आणि सबकॉन्शसनेस च्या मधे कुठेतरी अडकलेल्या..

  we like it! keep writing as it comes!

  ReplyDelete
 6. अभिजीत.. आत्ता मला तु माझ्या ब्लॉगवर दिलेली कॉमेन्ट जशी च्या तशी इथे देण्याचा मोह आवरत नाहीये. पण नंतर विचार केला की पोस्ट लिहायला सुचत नाहीये आपल्याला ते ठीक आहे कॉमेन्ट्सही स्वत:च्या शब्दंत न लिहिता येण हे अतीच :P
  पण खरोखरच काहीतरी लिहावं असं अगदी उर्मी वगैरे म्हणता येईल असं आतून वाटतं आणि त्यावेळी वेळ पण असतो किंवा त्यावेळी वेळ असतोच.. अशावेळी ते सगळ आधीच्या कितीतरी क्षणी मनात उमटून गेलेलं आता कुठे उडून गेलय नेमकं असं वाटून वैताग वैताग होतो. आणि असं असताना शिवाय तु म्हणत आहेस तसं लिहिणं ते सुद्धा आधीच्या पोस्ट पेक्षा जास्तं चांगल असं काही मनात ठेवण्याचं प्रकरण आणखीच वाईट. ते तसं ठेवू नये हे उत्तम हे सांगण दुसयांना सोपं असं आता मी नक्की म्हणू शकते कारण ह्या सगळ्या प्रोसेस मधून मी गेलेय गेल्या काही महिन्यांत. अजूनही जातेय. आणि शेवटी याचं कन्क्लूजन वर पोचतेय की वाटतय तर लिहावं. कसंही. स्वत:ला वाटॆल ते. जसं आधी लिहित होतो तसंच.

  तुझी सगळी पोस्ट्स तर हेवा वाटावा अश्या spontaneity ने उसळत असतात. पण आत्ताचं (खरंतर आधीची अनेक) तुझं हे पोस्टं वाचल्यावर मला डस्टीन हॉफ़मनच्या एका most spontaneous category मधे गणला जाईल असा एक सीन पाहून एका सिनियर ऍक्टरने केलेलं विधान आठवलं. तो म्हणतो की आत्ता मला डस्टीनने पडद्यावर जे काही ’सहज/स्वयंस्फ़ूर्त’ वगैरे साकारलय ते पहाण्यापेक्षा तो स्टुडीओमधे ह्या सीनच्या तयारी आधी मनात जे काही विचार करत असेल ते जाणून घ्यावं असं प्रकर्षाने वाटतय. कारण माझी खात्री आहे त्याचा पडद्यावरचा हा आविष्कार त्याच्या एक्स्टेन्सीव क्रिएटिव विचार साखळीतील फक्त एक छोटीशी कडी आहे.

  एक ब्लॉगर म्हणून लिहावंस वाटलं की लिहावं. विषय, शब्दांच्या बंधनात राहू नये हे तुझ्या बाबतीत जास्त सोप्पं, शोभून दिसणारं आहे.
  ते म्हणतातच नां की writing is like driving a car at night. Yu can see only as far as yor headlights, but yu can make the whole trip that way

  p.s. डीलिट केलेली कॉमेन्ट जशीच्या तशी देतेय बघ:))). आता तुला ती उपदेशात्मक वगैरे वाटली तर त्याला इलाज नाहीच.

  ReplyDelete
 7. somehow i always come back to ur bolg becaus i expect to read something which is 'sahaj' and not a planned, delibrate,tharvun lihile le, sachebadh...mastrepiece....tu mala tuzya oghavatya shaili sathi vegala vatato. tuzya vishyansathi kiva content sathi nahi.

  i can just hope ki tu tasach rahavas.

  ReplyDelete
 8. लिहु की नको विचार करत होते म्हणून पोस्ट वाचूनही इतक्या उशीरा प्रतिसाद देतेय. हा पोस्ट वाचताना सगळ्यात पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे या आणि 'रिदम ऑफ लाईफ'दोन्ही पोस्टची सुरुवात सेमच आहे.
  "मला लिहायचंय.
  काय लिहायचंय माहितिए - पण बाहेर पडत नाही."

  मग मला हे ही आठवलं की तू तुझ्या ब्लॉगची सुरुवात केलीस तेव्हाही २-३ पोस्टस 'काय लिहू' असाच सूर देणाऱ्या.(माझ्यासारख्या लोकांना किती रिकामा वेळ असतो बघ आणि चोंबडेपणा करायची सवयही :-))असो.
  काय लिहावं,कशावर,किती,कधी लिहावं हे सर्व ज्याच्या त्याच्या मर्जीवर आणि हो तू जे लिहितोस हे मला आवडतंही.पण तू विविध विषयावर लिहिलेलं वाचायलाही आवडेल. माझं निरीक्षण सागांवं असं वाटलं म्हणून हा comment.

  -विद्या.

  ReplyDelete
 9. तुझा प्रत्येक ब्लॉ आवर्जून वाचतो .. एखाद्या दिवशी संवेदच्या ब्लॉगपासनं सुरूवात करतो आणि मग तू, ट्यूलीप, भुस्कुटे मॅडम .. सगळे सगळॆ झाडून काढतो ...

  "मला लिहायचंय पण सुचत नाही" .. या बद्दल मी काहीतरी लिहीलय ... जमलं तर वाच. माझं लिखाण म्हणजे काही तुम्हा ग्रेट सारखं नाहीये ... पण आपला बापडा प्रयत्न.

  ही स्टेज बहुधा सगळ्यांनाच पार करावी लागते .. प्रसुतिवेदनाशिवाय जसा जन्म देता येत नाही तसं बहुधा या तकलीफ़ीशिवाय लिहीताही येत नाही ... anyway, एखादा थंड रविवार काहीहि न करता काढ .. जमल्यास बेड मधे ... आणि मग सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटेल :)

  ReplyDelete
 10. लिही की आता.

  ReplyDelete
 11. जास्त भाव खातो यार हा. लिही ना आता.

  ReplyDelete
 12. @Abhijit Bathe, Please check - http://www.mogaraafulalaa.in/2007/05 . You may find more...

  ReplyDelete