Tuesday, March 09, 2010

तु - गं.

प्रस्तुत कमेंट या ब्लॉगसाठी लिहिली होती. पण बहुतेक तांत्रिक कारणांनी तिथे चिकटवता येत नाहिए.
http://shamaaemahafil.blogspot.com/

आता एवढं लिहिलंच आहे, आणि ईर बीर फत्ते मागे लागलेच आहेत म्हणुन म्हटलं - चलो हमहु कहीं लिख आए...

---------

इथुन पुढे वाचण्याआधी शर्मिला फडके यांचा मूळ लेख वाचा, प्रतिक्रिया वाचा. मूळ लेख माहितीपूर्ण आहे आणि साधार वाटतो. माझी प्रतिक्रिया - ऍज युजुअल - तिरकस, टोकाची आणि निखळ वैयक्तिक.

....

या उदाहरणांचं ससंदर्भ स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी ’डेन्स’ असल्याने म्हणा किंवा ’पुरुष’ असल्याने - मला अजुनही या लेखामागचं ’लॉजिक’ कळत नाहीए. आय मीन ठीक आहे, जिजाबाई, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, आनंदीबाई, मेधाबाई या ग्रेट होत्या/आहेत/असतील. पण त्या होत्या/आहेत/असतील म्हणुन तुम्ही ’आहात’ हे गणित काय आहे? हे म्हणजे शिवाजी, तानाजी, टिळक, गांधी, नेहरु, पटेल, दोन्ही तेंडुलकर होते - म्हणुन मी आहे - असं म्हटल्यासारखं वाटतं.

लेखाची टिंगल करणे हा या कमेंटचा हेतु नाही. केवळ महिला दिन आहे म्हणुन टिमक्या वाजवु नका - असं सांगण्याचा प्रयत्न आहे.

’कथा’ या पिक्चरमध्ये एक सीन आहे. एक शेजारी बायकोला स्वैपाक कि धुणी भांडी करायला मदत करतो - म्हणुन इतर शेजारी त्याला हसतात असा. मला त्या सीनची पहिल्यांदा पिक्चर पाहिला तेव्हापासुन प्रचंड चीड आहे. त्या जोकची नाही, तर सई परांजपे नावाच्या ’महिला’ दिग्दर्शिकेची.

एनीवे - विषयांतर नको. पण हे ’बाई’ लोक लांब राहिले हो, बायका अजुनही टिकल्या लावतात, मंगळसुत्र घालतात, लग्न बिग्न झाल्यावर नवऱ्याचं नाव लावतात, हुंडा देतात घेतात मागतात, नित्यनेमाने कर्तव्य म्हणुन रोज स्वैपाक करतात, आपापल्या मुलींना शिकवतात, दागदागिने करुन त्याला ’स्त्रीधन’ म्हणतात, नवऱ्याने बदललं म्हणुन गाव बदलतात, रीत म्हणुन शिकतात आणि एम.बी.ए. वगैरे करुन घरी बसतात. आणि हे सगळं त्या ’बायका’ आहेत म्हणुन करतात. हे सगळं करण्यासाठी त्यांना मारहाण होत नाही, केशवपन केलं जात नाही, सती धाडलं जात नाही. हे सगळं त्या - आय डोन्ट बिलिव्ह इट - ऍन्ड यु वोन्ट ऍडमिट इट - स्वेच्छेने करतात!

आता याच्यावर बोंबाबोंब होईल.

बाई - गैरसमज नको. टिकल्या लावुन बायका सुंदर दिसतात, मंगळसुत्रात मर्यादा आणि जबाबदारी दर्शवतात, आणि वर सांगितलेल्या प्रत्येक आक्षेपाचे काव्यात्मक खुलासे देतात. पण हे स्लो पॉईझनिंग नाही का? प्रत्येक चॅनलवरच्या प्रत्येक मालिकेत, प्रत्येक मल्टिप्लेक्सच्या प्रत्येक पिक्चरमध्ये, आणि प्रत्येक घराच्या प्रत्येक प्रथेमध्ये हीच भिकारचोटगिरी मुलामुलींना जन्मापासुन चमच्या चमच्याने नाही भरवली जात का?

मला या चुत्येगिरीची चीड येते. आणि दर महिला दिनाला पडणाऱ्या या ’या ओवाळा’ लेखांची म्हणुनच अधिक. बायका या पुरुषांइतक्याच पोकळ आहेत, नेभळट आहेत, लाचार आहेत, कर्म आणि कल्पनादरिद्री आहेत, मुर्ख आहेत. रोजचा अन्याय त्या पुरुषांइतक्याच आळशीपणे सहन करतात. लिंगभेद पुरुषांच्याच हिरिरीने जपतात. त्या काल, आज, उद्या जिथे कुठे आहेत आणि असतील त्या त्यांची तशी लायकी होती म्हणुनच होत्या आणि म्हणुनच असतील. त्या तिथे आहेत किंवा असतील ते तुम्ही सांगितलेल्या लिस्टच्या inspite of असतील. because of नव्हे.

आज केवळ बायका शिकतात आणि नोकऱ्या करतात आणि परदेशवाऱ्या एकट्या दुकट्या करतात म्हणुन त्या स्वतंत्र झाल्यात आणि पुंडलिक वरदा हारी विठ्ठल आणि जिजाबाई टु मधु किश्वर कि जय?

Bullshit.

.....

प्रतिक्रिया वरच्या चार पाच टिंबांपाशी संपली.
आता बोला - भायलोग - कसे आहात?
सर्किट, ट्युलिप, मेघना, संवेद, जास्वंदी, विद्या, निमिष आणि इतर सगळेच - कुणीच लिहीत का नाही आहात?
ओह बाय द वे - कमेंटमध्ये आणखी बरंच काही लिहायचं होतं पण विसरुन गेलो. ’पुरुष’ दिन कधी असतो? एका गटारी अमावास्येत आयुष्य किती जगुन घ्यायचं? च्यायला अनारक्षित आणि ते ही पुरुष म्हणजे आपण ४० च्या जर्मनीतले ज्यु किंवा गेला बाजार आय पी एल मधले ऑफ स्पिनर बनत चाललोय असं मलाच वाटतंय कि तुम्हालाही? :))

आणि हे माझं सगळ्यात छोटं पोस्ट आहे कि नाही यावर आता आपण मतदान करु.

माझं मत - हो.

.....

अमेरिकेत काहिच्या काही करतात. म्हणजे घराच्या भोवती इनव्हिजिबल कुंपण. म्हणजे घरातल्या कुत्र्याने बाहेर पळुन जाऊ नये किंवा फुटपाथ वरच्या लोकांवर आक्रमण करु नये - असा हेतु. आता हे कुंपण मागची नऊ वर्षं बघतोय. पण परवा विचार आला कि अनवधानाने कुत्रा कुंपणातुन बाहेर पडला, तर तो आत कसा येणार?
आता हा तसा ’फंडामेंटल’ वगैरे प्रश्न नाहिए. पण हल्ली माझ्या फंडामेंटल प्रश्नांना ’पडायचा’ कंटाळा आलाय. म्हणुन.
दुपारी आंधळ्याच्या गायी वाचायला काढलं.
आज रात्री डेंजर स्वप्न पडणार.
एकदम फंडामेंटल.

तावत् शुभमस्तु!

15 comments:

 1. तू न दिलेला खो मी घेतला. :)
  बाय दी वे, तुझ्या पोस्टच्या शीर्षकाचा अर्थ काय? आणि हो, हे सगळ्यांत जरी नाही, तरी वन ऑफ दी स्मॉलेस्ट पोस्ट आहे हे.
  वेलकम ब्याक. :)

  ReplyDelete
 2. bathe, mahila dinachya diwashi asa "a ga, tu ga" karun bhaNdataye kaay? :D

  ReplyDelete
 3. म्हणजे आपण करत असलेल्या कुठल्या गोष्टी आंधळेपणे करतो आहोत याचंही भान नसणं, हेही पारतंत्र्यच.
  आणि हे भान एकाच वेळी सगळ्यांना येणं probable नाही. काही ’privileged' व्यक्तींना ते आधी आलं आणि त्यांनी ते इतरांना देऊ केलं हे कुणाला प्रेरणादायी वाटत असेल तर काय चूक आहे?
  क्रांती करणं ’परवडावं’ लागतं. स्विमसूट घालून चित्रपटात गाणं म्हणणं मीनाक्षी शिरोडकरांना - सगळ्या गदारोळासकटही - परवडलं, पोहण्याची आत्यंतिक आवड असलेल्या कुण्या "खानदानी" बाईचा तलावावर जायच्या आधीच मुडदाही पडला असता. (एकेकट्या ’वेगळ्या’ बायकांची क्रयशक्तीच जास्त होती. उदा. जिजाबाई, अहिल्याबाई: सत्ता. आणि समूहाने झगडणं = भिशी?)

  शर्मिलाच्या लेखातल्या उदाहरणांचा, तितक्या स्पष्टपणे न मांडलेला मुद्दा मला असा वाटला : तर्क किंवा सदसद्विवेकबुद्धीला (त्यासाठी दोन्हीही गोष्टी अंगी हव्या?) एखादी गोष्ट पटत नसेल तर उगाच प्रथा आहे म्हणून ती पाळू नये; आणि आपल्यावर किंवा इतर कुणावर अन्याय होतो आहे असं वाटत असेल तर त्याचा यथाशक्ती प्रतिकार करावा. आता हे वाक्य किती gender-neutral आहे!
  त्यामुळे बरे-वाईट जे काही स्वभावगुण आहेत ते अख्ख्या मनुष्यजातीत सारखे (त्यामुळे आपण कसं वागायचं हे ठरवायला स्त्री-पुरुष सारखेच स्वतंत्र) हे तुझं म्हणणं पटलंच. पण तरीही आत्ताच्या स्थल-काल-परिस्थितीत "वरवरचं" स्त्रीस्वातंत्र्य आणि पुरुषस्वातंत्र्य वेगळं आहेच आहे. तुला जे रूढिस्वातंत्र्य अभिप्रेत आहे, तो दुर्दैवाने बर्‍याच बायकांचा प्राधान्यक्रमच नाहीये. काही बाबतींत स्वत:ला हवं ते करण्याची मुभा मिळाली की स्त्रिया नेभळट, लाचार, पोकळ, कल्पनादरिद्री राहणार नाहीत हे खोटंच आहे. पण "ताठ कण्याच्या, लाचार नसलेल्या, सघन, कल्पनाश्रीमंत" होण्याची पात्रता असलेल्या स्त्रियांना (हे "options" आहेत याची जाणीवही नसलेल्या स्त्रियांना) see this catalog म्हणून चार नावं दाखवावी, येवढ्याचसाठी बाईलपोळा साजरा करत असतील की.

  ReplyDelete
 4. ’त्या होत्या म्हणून तुम्ही आहात’ <=> शिवाजी...तें. होते म्हणून मी :))
  पण खरंचेय ते.
  तें. वाचले आणि सचिनचा खेळ पाहिला आणि शिवाजी...पटेल यांच्याबद्दल जे जे ऐकवण्यात आलं ते ऐकलं - त्या सगळ्याचा ’मी’च्या विचारांवर, पर्यायाने ’मी’पणावर प्रभाव पडलाच की. आता ’म्हणून’ शब्दाने उगाच थेट कार्य-कारणभाव आलाय आणि नको तितकं ठाम झालंय ते वाक्य हे बरोबर. मला वाटतं अशा ’ओवाळा’ लेखांचा उद्देश या वाक्याच्या पुढे लिहायला पाहिजे स्पष्टपणे. नाहीतर प्रबोधिनीतल्या त्या ’तत: किम्‌?’ सारखा तुझा प्रश्न आल्यावाचून राहणार नाही. ’आमचे आईबाप होते म्हणून आम्ही आहोत.’ या वाक्यालाही थेट ’लॉजिक’ आहे; पण पुढे काय? विधान फोपसं आहे की दमदार ते त्या पुढच्या हेतूवरून ठरणार ना?
  शर्मिलानी लेखाच्या शेवटी हेतू लिहिलाय: " आज आपण 'स्त्रीत्व' सन्मानाने उपभोगू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपले अधिकार हक्काने बजावू शकतो. समाजात असे अधिकार बजावू न शकणार्‍या अनेक स्त्रिया सर्व स्तरांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांच्यासाठी लढा पुढे चालवण्याची, नव्या संदर्भातून पुन्हा उभारण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रियांच्या कार्यामधून आपल्यात ती प्रेरणा कदाचित निर्माण होईल."

  हे वाक्य फार ढोबळ आहे आणि कदाचित तुझा "शिकणं, नोकरी करणं आणि एकटीने परदेशवारी करणं हे स्त्रीस्वातंत्र्याचे/अधिकाराचे खरे निकषच नव्हेत" असं सुचवणारा संताप या वाक्याला उद्देशून आहे. लेखिकेला नक्की काय अभिप्रेत आहे ते स्पष्ट नाही. ”स्त्रीत्व सन्मानाने उपभोगण्या’सारख्या वाक्याने मला सुरुवातीला चीड आली होती, पण कापल्या क्लिटोरिसपासून ते केल्या / न केल्या अबॉर्शनपर्यंत मूलभूत गोष्टी याच वाक्यात येऊ शकतात हे नंतर लक्षात आलं.

  तुला ज्या भिकारचोटगिरीची चीड येते, तिच्यावर ’आपण शहाणे आहोत असं वाटत असेल तर इतरांना शहाणं करा’ हा शर्मिलाचा मुद्दा एक उतारा असू शकत नाही का? बायका ’स्वेच्छेने’ ज्या गोष्टी करतात त्या तू लिहिल्यास. त्याच गोष्टी न करणार्‍या बायका समजा ग्रेट. तर त्यांनी आपलं हे मोठेपण मालिकांमधून आणि पिक्चरांमधून दाखवावं की. श्रीमंतचोटगिरी करावी थोडी. ( btw, टिकल्या-दागिन्या-मंगळसूत्रापासून रीत म्हणून शिकण्यापर्यंत सगळ्या गोष्टींना "सौदा" असं घसघशीत न-काव्यात्म उत्तर देता येईल. (पण च्यामारी दिल का दिल से सौदा म्हणजे प्रेम बीम असेल तर व्यापारही काव्यात्मच झाला. एकदम लक्षात आलं: तुझ्या भाषेची चटक लागते. :( ) सन्मान मिळावा/ अपमान मिळू नये/ बाजारात आपली किंमत राहावी म्हणून केलेला सौदा. तू वापरलेला सगळ्यात महत्त्वाचा शब्दप्रयोग म्हणजे ’रीत’. समाजमंथन का काय ते झाल्यावर समजा ’दागिने न वापरणं’ ही रीत झाली, तर तू उल्लेखलेल्या स्वेच्छाधारी बायका ’लोक काय म्हणतील?’ म्हणून , स्वत:ला अतिशय आवड असूनही दागिने घालणार नाहीत.)
  म्हणजे मुद्दा काय? ’रीत’ म्हणून आपण ज्या गोष्टी करतो त्या न करणं हे अधिक ’योग्य/ तर्कशुद्ध/ फायद्याचं/ प्रगल्भ/ परिपूर्ण/आवडीचं/ सोयीचं (!)’ आहे का, हे सतत तपासलं पाहिजे. आता हा वाक्प्रचार वापरण्याची रीत आहे म्हणून "लिस्टच्या inspite of असतील. because of नव्हे" असलं वाक्य तू लिहिलंस. या वाक्याला काही अर्थ आहे का? बायका (उदा. मी) जशी आहे ती "in spite of" आनंदीबाई जोशी आहे? "because of" हे जितकं logic ला सोडून आहे तितकंच in spite सुद्धा.

  ReplyDelete
 5. बा, बो!
  ही ऍनॉनिमस म्हणजे गायत्री नातु. आणि हे मला माहिती असण्याचं कारण म्हणजे तिने मेलने पाठवलेली (ही) प्रतिक्रिया मीच इथे (विनापरवानगी) चिकटवलिए. कारण तिने मी सुचवलेल्या मुद्यांना रोखठोक (आणि सडेतोड आणि बाणेदार आणि मुद्देसुद) प्रकारे निकालात काढलंय. आणि एवढंच नाही, हे पण वाचा:
  http://meghanabhuskute.blogspot.com/

  (च्यायला सीझन आलाय तर आपणपण स्त्रीमुक्तीचं काम काढु असा विचार करत होतो. पण इथं आधीच एवढी सशक्त मुक्ती सेटिंग लावुन बसलिए. वर यांना ३३ दिले - सॉरी सॉरी - वर यांनी ३३ घेतले तर २०५० पर्यंत बाप्यांना पोरं नक्कीच होतील :))) (तीन कंस म्हणजे हशा आणि कंस समाप्त).

  ReplyDelete
 6. गायत्री - बझ्झ वर कमेंट, मग इथे (वरची) कमेंट, आणि आता आणखी लिहिणं - यात मी मला सुचलेले बहुतेक सगळे चांगले मुद्दे विसरलोय. त्यामुळे जसं जमेल तसं लिहितो. शिवाय आधी आक्रस्ताळेपणे बेधडक (पराचा कावळा) विधानं करणं आणि मग लोंबणं असा माझा इतिहास आहे. तरिही -

  आता हे सगळ्यांना -
  लेखातली चिडचिड अशी कि आलाय दिन तर आठवतील त्या सगळ्या महिलांची आठवण काढा - असा प्रकार वाटला. जिजाबाई ह्या ’जिजाबाई’ म्हणुन ग्रेटच आहेत, पण त्यांनी ’स्त्रियांसाठी’ म्हणुन काही केल्याचं ऐकिवात नाही. जसं शिवाजी महाराजांनी मागासवर्गियां साठी किंवा निरक्षरता निर्मुलनासाठी....आणि तसं नसण्याने त्यांचं मोठेपणही कमी होत नाही. त्या काळाचे प्रश्न वेगळे होते. त्या प्रश्नांचे प्रेफरन्सेस वेगळे.

  तिथुन टुणुक टुणुक आपण ऍनी बेझंट वगैरेवर येतो. ह्यांनी आजुबाजुला एवढी पुरुष मंडळी असुनही कॉंग्रेस वगैरे थाटली. पण माझ्या अल्प इतिहास ज्ञानात त्यांनी वैश्विक, भारतीय, मराठी महिलेला मेघना म्हणते तसा किती ’परप्रकाश’ दिला याबद्दल मेजर झोल आहे.

  त्याच्या आसपास सती प्रथा बंद पाडणारे, बालविवाह बंद पाडणारे, विधवा विवाह सुरु करणारे लोक झाले. द्विभार्या प्रतिबंधक कायदा कुणी काढला माहित नाही - पण त्यांचंही योगदान मोठंच. मुलींसाठी शाळा काढणं किंवा आहेत त्या शाळा कॉलेजात त्यांच्या शिक्षणाला, वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांच्या नोकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांचंही काम मोठं. इंटरनेट सुरु होणं आणि आपली आयुष्यं त्याच्याशी जोडली जाणं ’आज’ जेवढं लॉजिकल वाटतं तेवढंच हे समाजसुधार (आज) लॉजिकल वाटतात. (ते करताना त्य लोकांची तेव्हा सॉलिड लागली असणार).

  त्या त्या काळच्या समाजात (इन जनरल समाजात जसे अन्याय होते तसेच) महिलांवर अन्याय होते. त्याविरुद्ध काही स्त्री-पुरुष पेटुन उठले. त्यांची ’अन्याय निवारक’ कृती जनरल समाजाला (हळुहळु) पटली, आणि घडायचे ते बदल घडले/घडवले गेले.

  एवढं तर कुणालाही कळतं हो!
  माझी चिडचिड - ऍज युजुअल - वेगळीच. जनरल समाज सुधारणेतुन - स्त्रीसुधारणेला वेगळं काढायचं, दरवर्षी ठराविक दिवशी ठराविक लोकांची नावं घेऊन त्यांना थॅंक यु म्हणायचं आणि गायत्री म्हणते त्या रुढी घेऊन रोजचा दिवस घालवायचा. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, न्यु इयर्स डे, इंडिपेन्डन्स डे - तसा विमेन्स डे.

  मला आई आहे, बायको आहे, मुलगी आहे. त्यांच्या हक्कांसाठी मी रोजच्या रोज झगडतो. लोकांशी, कित्येकदा स्वत:शी, आणि बिलिव्ह इट ऑर नॉट कित्येकदा त्यांच्याशीही. (आता लिहीन ते सहा वर्ष विचार करुन लिहितोय - सहानुभुती साठी नाही). तर - मला एकदा एक आतेबहिण होती. म्हणजे अनेक आते, मामे, मावस भावंडं आहेत तशीच ही ही. मी पहिल्यांदा अमेरिकेला येताना माझ्यासाठी कविता घेऊन आली होती. मी पहिल्यांदा भारतात गेल्यावर तिने तिला बी.एस्सी. (फिजिक्स) साठी मिळालेलं पुणे विद्यापिठाचं सुवर्णपदक दाखवलं होतं. तसंच सुवर्णपदक तिला एमेस्सीला ही मिळालं. इस्रो मध्ये नोकरी ही. घरातल्या निरक्षरांना शिक्षणाचं मोल नव्हतं, म्हणुन मग वेळा, कपडे, किती शिकावं - यावरुन वैताग (असं ऐकुन आहे). तिच्या आत्महत्येबद्दल जेवढं दु:ख नाही तेवढा तिच्या मार्कलिस्ट्स आणि मेडल्स जाळुन टाकणाऱ्या तिच्या आप्तांबद्दल मला ’राग’ आहे. मी तसा बऱ्यापैकी ज्वालाग्रही माणुस असल्याने - मला ’राग’ आहे - असं मी शांतपणे म्हणतो तेव्हा तो किती आतपर्यंत आहे हे निदान माझ्या वाचकांना तरी कळु शकेल! :)

  एनीवे - उगीच ’निधन’ बातमी ऐकुन दिवस काळवंडुन घेऊ नका. राग ’मला’ आलाय - ६ वर्ष टिकलाय - त्यामुळे तो वांझोटा नसेल याची काळजी मी घेईन.
  आता विषय तर संपवायचाय, तर - त्या काळातल्या त्या समाजाचे प्रश्न वेगळे होते. तेव्हाच्या काही स्वयंप्रकाशित व्यक्तिंनी मार्ग दाखवायचा प्रयत्न केला. त्याने जे व्हायचं ते झालं. पण ते पुरेसं - ते ही या काळासाठी - आहे का?
  स्वयंप्रकाश लांब राहिला - पत्रिका घेऊन येणाऱ्या मित्राला - भाई मेरे, लग्नाला येईन आणि जेऊनच जाईन, आपल्या मैत्रीत माझ्याकडुन काही फरक पडणार नाही, पण हुंडा घेतल्याबद्दल मला तुझी मित्र म्हणुन नेहमीच लाज वाटेल - असं आपण म्हणु शकतोय का? का नाही?

  एकेकाळी आपण हाताने पत्रं लिहायचो आणि पोस्टाच्या पेटीत टाकायचो हे जेवढं धक्कादायक वाटतं तेवढेच मागच्या काळातले अन्याय. आता आपण लय भारी हा भ्रम आहे. पण जाग आल्याशिवाय ते आपल्याला कळणार कसं? जय महिला दिन!

  ReplyDelete
 7. १. हे तुझं सगळयात छोटं पोस्ट आहे...I was going to say, "aye". पण प्रतिक्रिया वाचून होता होता मी पुन्हा तटस्थ झालोय.
  २. अनंत क्रॉस रेफ़रेन्स वाचून इथवर पोहोचलोय, नि मला आता कळत नाहीये की हा विषय संपलाय की नाही? तुझ्या शेवटच्या वाक्यावरून तो संपल्यासारखा वाटतोय. पण नेमकं कळत नाहीये.
  ३. तर हा विषय संपला नसल्यास - मुळात contradiction कुठाय? तुम्ही सगळे तेच म्हणताय नाही का? की परिस्थिती बिकट होती, आता त्यापेक्षा बरी आहे, पण पेक्षाच - अजून तशी वाईटच आहे, त्यामुळे न्याय्य हक्कांची लढाई चालूच राहणार. त्या म्हणतात मग त्याची जाणीव होण्यासाठी/करून देण्यासाठी/झालेली शाबूत ठेवण्यासाठी एक दिवस नि तुझं म्हणणं कशासाठी? एवढंच ना? ह्याचं सोपं उत्तर जागतिक पर्यावरण दिन, एड्स दिन, कामगार दिन असतो तसं, असं नाहीये का? नि समाजसुधारणेतून महिलांना वेगळं का काढायचं असा थयथयाट करून तू स्वत: "हे असे दिवस कशाला पाहिजेत?" ह्या (बहुदा तुझ्या) प्रश्नातून महिला दिनच का वेगळा काढतो आहेस? तू भावनेच्या भरात महिला दिनाला वॅलेंटाइन, न्यू इअरच्या यादीत ढकलल्यामुळे तुला ते लक्षात आलं नसावं असा माझा अंदाज आहे. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीसुद्धा "खल्लास, उद्याला ऑक्सिजन मिळेल की नाही माहीत नाही" अशी अवस्था असली, तरी "चिपको आंदोलन झालं म्हणून आपण आहोत" असे लेख येतातच ना? तसंच आहे हे. प्रश्न असले, जागृती नसली की दिवस आलेच, नि आले की प्रश्न असेपर्यंत, जाणीव नसेपर्यंत त्यांचं अस्तित्त्वही राहणारच. केवळ दिवस असून काहीच होत नाही. पण, "पाहिजेत कशाला?" असं म्हणणं म्हणजे, "माहितेय लोक अप्रत्यक्ष हुंडा देत/घेतच राहणार, तर पाहिजे कशाला हुंडाविरोधी कायदा?" असं म्हणण्यासारखं आहे.


  "Peace one day" नावाची documentary पाहिली नसल्यास आवर्जून पाहा. एक दिवस यु. एन. ने शांतिदिन म्हणून जाहीर करावा ह्यासाठी सर्वस्व पणाला लावून झटणाऱ्या माणसाची नि शांतिदिनाबद्दलच्या आस्था-अनास्थेची कथा आहे. कदाचित असे ‘दिन’ निर्माण करण्यामागेही एक लॉजिक असतं असं तुला कळेल. नि तरीही तुला केवळ महिला दिनच वेगळा काढायचा असेल, तर ह्या संपूर्ण वादात तू(च) तुलाच contradict करतो आहेस. अन्यथा, मुळात contradiction कुठाय?

  ReplyDelete
 8. Above comment was from Nimish.

  Nimish -
  2) I dont know if the issue is over. We can discuss it further or we can stop. The x-days will keep coming.
  3) "Where is the contradiction?" - Thats a good point. Maybe there is, maybe not, or maybe I am not able to bring it out. Forget about other days - lets deal with this issue.

  Every year we get saturation coverage of 'Women's day'. Though the article - for which I wrote my initial comment - was (kind of) a matter of fact and rather benign, it symbolized all other articles on this issue and irked me to no end. The contradiction lies in the present day society and what we think has been corrected. Sati, child marriage, and tonsuring were gross injustices, and have been irradicated. But a number of (non-gross) injustices still remain, which we still either tend to ignore, or try to tackle in idiotic ways. (Such as 33% reservation for women! Let me stress that I am not against reservations, but we can deal with that subject later).

  I see injustice everywhere. (Maybe I am like that kid in 6th sense who sees dead people). Apart from the obvious physical capacity of women to bear children, I think there should not be ANY difference between men and women. When you start with that assumption, you are bound to see the contradiction in the way things work around us. Take literature, media, sports, relations - its almost like we go with the crowd - 'yeah, thats the way it is' - this is what men do, and women are from earth. Unless we stop and question, we dont even see the contradiction!

  From point A to point Z, there are still a number of obstacles in a woman's life (that have everything to do with them being women), and I am uncomfortable with them. Reading this article was like reading an article on independance day about how we are/should be grateful to certain individuals. May be we should be, may be not! I dont care! I dont care what life would have been if they had not done what they did. Things around us sometimes make me wonder - Independence? Oh really? Thats what happened to me after I read this article. Reacting to it - the way I did - was like pissing in the wind. But me being me - couldnt stop myself. It was a lot easier to say - yada yada yada - whatever and move on.

  I have been through the stages of childhood, education, career, relations, marriage and now fatherhood. And I have done things at each stage that I didnt think twice about, but a woman of my age does not have that luxury! The more I think about it, more I get angry. Which is not a bad thing! Do you think 'PEACE' drove all the people mentioned in this article and otherwise - to do whatever they did?

  I am against injustice.
  If my wife expects me to fix the plumbing in the house because 'I am the man of the house', I consider that as an injustice as well! :))

  When I look at a person and think 'What a waste!' - more often than not, that person is of the other gender. Its got to stop.

  ReplyDelete
 9. kuneehi kaahi hi lihit naahi he kharey! :| abhi bakkich saar nantr vaachtoch...

  ReplyDelete
 10. Abhijit: Urmila has replied to yr comment on the POL post on my blog. Read it whenevr posible. Thanks!

  ReplyDelete
 11. प्रत्येक चॅनलवरच्या प्रत्येक मालिकेत, प्रत्येक मल्टिप्लेक्सच्या प्रत्येक पिक्चरमध्ये, आणि प्रत्येक घराच्या प्रत्येक प्रथेमध्ये हीच भिकारचोटगिरी मुलामुलींना जन्मापासुन चमच्या चमच्याने नाही भरवली जात का?

  Patal.
  mudda chhedalyabaddal tujhe aani sharmila doghanchehi aabhaar. ya post mule ek khup sakas charcha waachayala milyach samadhaan milal.

  ReplyDelete
 12. Sonal - dhanyawaad. Hetu saadhya.

  ReplyDelete
 13. have become a great fan of urs now. wish i could write like u and other few marathi bloggers.

  ReplyDelete