Wednesday, October 10, 2012

माधुरी दीक्षित नेने


फोबिया म्हणजे भिती.
आज मला झोपायची भिती वाटतिए.
काल रात्री झोप लागली ते पहाटे पाच वाजता मला माझ्याच ओरडण्याने जाग आली.
उजवा खांदा मेजर दुखत होता.
तो दुखतही होता आणि हलवताही येत नव्हता.
ओरडुन ओरडुन घशाला कोरड पडली.
माधुरी, मुक्ता, सासु कुणालाही काय करावं कळेना.
मी कसंबसं एक ग्लास पाणी पिलं आणि २ आयबु प्रोफेन आणि एक नारकॉटिक घेतली.
माधुरीने ९११ कॉल केला.
त्या ऑपरेटर शी बोलल्याचं आठवतंय.
मग पॅरामेडिक्स आले, त्यांनी बसतं केलं, स्लिंग मध्ये हात अडकवला, पण मला पेन-किलर्स देऊ शकणार नाहीत असं सांगितलं.
बेडवर बसल्यावर बरंच बरं वाटलं.
थोड्या वेळाने बसल्या बसल्याच एक डुलकीही काढली.
उठल्यावर बाबाशी बोललो आणि स्वत:च ड्राईव्ह करुन डॉक्टरकडे गेलो.
त्याने सी-७ व्हर्टीब्राची डिस्क थोडी घासली गेलिए आणि स्लिप झालिए असं सांगितलं.
अधिक जाणकारांसाठी: Herniated disc of C7 Cervical Spine.
इतरांसाठी: ब्रह्मांड चा ट्रेलर पहायचा एकदम सोप्पा मार्ग!
उद्याची न्युरोसर्जनची अपॉइंटमेंट.
त्या आधी ते फुटभर लांब सुई मणक्यात घालणार आणि लिटमस पेपरने टिपल्यासारखं मणक्यात ’डाय’ सोडणार.
३ तासात घरी.
एनीवे ज्याला कुणाला सांगतोय त्याला मेजर भिती वाटतिए.
पण कदाचित ब्रह्मांडचा ट्रेलर पाह्यलाने मला काय फरक पडत नाहिए.
डॉक्टरशी बोलताना -
हा डॉक्टर सही आहे पण एकदम. बुर्सेझ कि असं काहितरी नाव आहे.
नक्की आठवत नाही - कारण त्याला भेटत असतो तेव्हा ब्रह्मांडचा ट्रेलर....
तर - डॉक्टर सही आहे.
म्हातारा आहे.
मला म्हातारे डॉक्टर आवडतात.
म्हणजे अनुभव वगैरे ठीके - पण एवढे दिवस धंद्यात राहिला म्हणजे त्याने नक्कीच चांगलं काहितरी केलेलं असणार.
एनीवे - तर डॉक्टर सही आहे.
माधुरीने विचारलं कि हा डिस्क वगैरे काय प्रकार असतो?
तर तो म्हणे कि गाडीचा कसा शॉक अ‍ॅब्झॉर्बर असतो - तसा आपला डिस्क हा प्रकार.
तो असा जनरल चुकुन घसरत नाही.
पण तुझा नवरा जर म्हणतोच आहे कि त्याचा कुठे अ‍ॅक्सिडेंट झाला नाही, तर त्याचा अर्थ त्याचं आता वय होतंय.
माझी बायको अशी एकदम डोळे मोठे हरणासारखे निरागस वगैरे करुन ऐकत राहिली.
नक्की गळ कुणी टाकलेले ते मला कळेना ते बहुतेक नारकॉटिक मुळे.
मग डॉक्टर तिला म्हणाला - आपण तुझ्या डिस्क्स तुझ्या नवऱ्याला ट्रान्स्फर करुयात का?
च्यायला मला एवढं मरणाचं दुखत असताना लोकांना मला हसवण्यात काय असुरी (या आसुरी) - तर काय असुरी आनंद मिळतो काय माहित.
तर तो पुढे म्हणे कि टेन्शन नको घेऊ - वि विल स्लॅप हिम अराउंड अ‍ॅंड ही विल बी ऑल राईट.
नाहितर नवरा बदलुन टाक - कमी, न वापरलेल्या डिस्क्स शोध. ओह बट देन मनी वोन्ट बी दॅट गुड.
मी म्हटलं मी ही नविन कार शोधतो - चांगल्या शॉक अ‍ॅब्सॉर्बर ची.
तर - पहाटेचे तीन.
आणि मला झोपेचा फोबिया.
अमली पदार्थांमुळे विचित्र स्वप्न पडतात.
म्हणजे मी सकाळी उठुन आमच्याकडे एक जुनं वापरात नसलेलं लव्ह सीट आहे - त्याला पॉलिश करत बसलो होतो असं स्वप्न पडलं.
लव्ह सीट वरुन आठवलं - परवा कुणीतरी विचारलं कि तुमचं लव्ह मॅरेज का? म्हटलं सहा वर्षांपुर्वी तर होतं बुवा. आता बहुतेक फक्त मॅरेज.
माधुरी जवळपास नसेल तर मी हेच काय - काहिही बोलु शकतो.
आंडु पांडु समझ्या क्या - मराठा है मराठा!
आणखी एक म्हणजे या प्रकाराला लव्ह सीट का म्हणतात काही माहित नाही.
अगेन - उत्सुकांनी गुगल सर्च मारावा.
आमच्या अर्ध अंडाकृती तिरक्या लव्ह सीट मध्ये लव्ह नक्की कसं करणार हे आम्हाला सहा वर्षांत समजलेलं नाहिए.
एनीवे पाठीत/खांद्यात उठणाऱ्या कळेपेक्षा तिचं अ‍ॅंटिसिपेशन जास्त दु:खद.
मी आयदर आत्ता झोप हॅल्युसिनेट करतोय किंवा मला झोप येतिए.
त्यामुळे मी आता डोळे मिटुन ग्रेस नाहीतर महानोर आठवतो.
ऑर फॉर दॅट मॅटर चंकी पाडे!
सौ. नेनेंची स्वप्नं आपल्या हॅल्युसिनेटिंग नशीबातही नाही.
उगीच कशाला अपेक्षा वाढवा!

2 comments:

 1. च्यायला, गंडवागंडवीचे धंदे आहेत. माधुरी दीक्षित नेने म्हणे पोस्टचं नाव आणि तुझ्या डिस्कचे तपशील वाचायचे काय आम्ही!
  पण तू लिहितोहेस हे मात्र खरोखर भारी.
  ग्रेस, महानोर, चंकी पांडे नि सौ. नेने एका श्वासात तूच ओवू जाणेस. लगे रहो!

  ReplyDelete
 2. मॉर्फिन बाई मॉर्फिन....
  एकदा ट्राय करुन बघ - चंकी ’वळणवाटातल्या झाडीत हिरवे चंद्र’ नाय गायला तर महानोर ’ओये ओये’ लिहायला लागतील आणि आणि ग्रेस नेने काकुंना घेऊन अगम्यगामिनी बनवतील.
  आणि गंडवागंडवीचे धंदे काय?
  धंदा किती बसलाय हे दिसत नाही का तुला?
  च्यायला मला वाटलेलं कि एवढ्या दिवसांनी लिहायला लागलो म्हणुन माझं दिलीप कुमारने किंवा गेला बाजार मनोज कुमार ने इतक्या वर्षांनी पदार्पण केल्यासारखं स्वागत होईल. तर कह्याचं काय - पहिल्या पोस्टला ६ कमेंट्स - त्यातल्या काही रिपीट. दुसऱ्या आणि तिसऱ्या पोस्टला तर वालीच नाही!
  आता जमाना बदललाय बाई!
  ’माझ्या डिस्कच्या वेदना’ चालत नाही आता - सेक्स अपील लागतं, आयटम सॉंग लागतं.....
  That makes me think - what should I write for next post....?

  ReplyDelete