Sunday, October 07, 2012

गणित वगैरे.

काल ठरवलं कि एक गोष्ट नियमीत करायची.
अ‍ॅक्चुअली दोन.
एक आपोआप झाली.
दुसरी विसरलो.
अडचणीत आल्यावरच देवाची आठवण का होते?
देवाचीच का?
कि अडचणीच्या इंटेन्सिटी वर कोण आठवणार हे ठरतं?
मग मित्र/मैत्रीण, भाऊ बहीण, आई-बाबा हे देवत्वाचे टप्पे झाले का?
म्हणजे मग बायको नंतर डायरेक्ट देवच भेटत असावा.
फारसा विचार न करुनही बायकोचं हेच मत असावं.
माझेच पैसे मीच स्टॉक मध्ये गुंतवले.
आता गुंतवले तर रोज बघु त्यांचं कसं चाललंय असं म्हणुन रिमाईंडर टाकलं स्वत:ला कि रोज स्टॉकमार्केट चेक करायचं.
पण रोज हा प्रकार पेनफुल होतो.
म्हणजे किमती रोज वर खाली व्हायच्या त्या होतात - आपण त्या रोज बघुन फरक पडत नाही.
दुसरं म्हणजे - भेंडी विकायचंच नाही तर ’विकलं तर किती येतील’ याचा हिशोब का?
पण च्यायला याचाच हिशोब नेहमीच.
गाडी घेताना रिसेल व्हॅल्यु काय येईल?
घर घेतलं तर किंमत किती वाढेल?
३८ मैल अंतर तीस मिनिटात ताशी ६० मैलाच्या लिमिटने कसं पार करता येईल?
मामा कुठे असतो?
स्पीड कुठे वाढवायचा?
स्पीड लिमिटच्या किती वर अ‍ॅक्सिडेंटची शक्यता किती वाढते?
जी वाढते ती लिनिअर कि लॉगॅरिद्मिक स्केल ने? याचं कुणीतरी इक्वेशन लिहिलं पाहिजे.
आणि मग त्याचं कुणीतरी अ‍ॅप्लिकेशन बनवलं पाहिजे.
म्हणजे मग घरातुन बाहेर पडताना आपोआप स्क्रीन वर पॉप अप विन्डो येईल - भेंडी जायलाच पाहिजे का?
आणि च्यायला पॉप अप, रिमाईंडर, अलार्म, ट्वीट, स्टेटस अपडेट, मेसेज, ईमेल, व्हॉईसमेल याच्या जंजाळात वेळ, अंतर, पैसा, महत्व, गरज, समाधान याची इक्वेशन्स लिनीअर बायलॅटरल कधीच नसताना लिमिट्स, डेरिव्हेटिव्हज आणि काय नाय तर सगळंच जंजाळ इटिग्रेशनच्या पिशवीत कोंबुन बाकी जे उरेल त्याला कॉन्स्टंट म्हणायचं.
म्हणजे मग आपण उद्याच्या पॅराबोलांचे आडाखे बंधायला मोकळे.
आडाखे चुकले कि देव आहेच.
मुक्ताला झोप येत नाहिये.
असं झालं कि ती अंधारात ती चित्र बनवायला लागते.
नाहीतर कविता करायला.
नाहितर तिच्या बाहुल्यांना गोष्टी सांगायला लागते.
हल्ली तिला गणित शिकवतोय.
म्हणजे मग तिलाही इक्वेशन्स ची सवय लागेल.
भेंडी मी वाईट आहे.
काल मित्रांसोबत गप्पा मारत बसलो असताना जेफ आला.
त्याला म्हटलं माझं वय काय गेस कर बरं.
तो म्हणे ४८.
च्यायला मी ३४ आहे म्हटल्यावर तो म्हणे - मी ३४ च म्हणणार होतो, पण तुम्ही लोक हसाल असं वाटल्याने ४८ म्हटलं.
त्याला म्हटलं च्यायला ३४ कुठे आणि ४८ कुठे?
जेफ गंडलाय.
जेफचं गणित चुकलंय.
गणितं चुकलेले लोक सुखी असतात का?
जेफला ३ वर्षांपासुन ओळखतो.
कॉंट्रॅक्टर खड्ड्यात साचलेलं पाणी पंप करुन बाजुला नेत होता.
तिथुन ते पाणी फिरुन खड्ड्यात परत येत होतं.
च्यायला हा सुपीकपणा कुणी केला हे शोधायला गेलो तर एका ट्रकच्या मागे हा धार मारत उभा असलेला दिसला.
त्याचं गणित चुकलंय म्हणलं ना? ते असं.
एनीवे.
तेव्हा तो ५० होता.
पुढच्या वर्षी त्याने लग्न केलं.
त्यानंतर महिन्याभरातच बहुतेक त्याच्या बायकोला कॅन्सर झाला.
पण त्यांचं छान चाललंय.
रोज येतो, मर मर काम करतो, घरी जातो - डोक्याला ताप नाय.
काल रात्री मधुरी आणि तिची आई आणि मुक्ता रात्री बाहेर चक्कर मारायला गेले.
वांगडु आणि मी घरी.
मग तो उठुन रडायला लागला म्हणुन त्याला चंद्राची गोष्ट सांगायला लागलो.
मग म्हटलं ’रात्र सुंदर’ गाऊ.
ते रात्र सुंदर, चंद्र सुंदर ठीके, पण मग रात्र ओला शब्द बिब्द मागायला लागली.
मग त्याला - बाबा रे तुझ्या साठी ट्विंकल ट्विंकल योग्य आहे म्हटलं.
गणपतीत कधितरी मुक्ताला गणपतीची गोष्ट सांगितली कि गणेशाची अम्मा शॉवर घेत असताना त्याचे बाबा बाथरुम मध्ये जायला लागले.
त्याने जाऊ दिलं नाही म्हणुन - त्यांचं नाव शिवा.
तर त्यांनी म्हणुन त्याचं डोकं कट केलं.
आणि मग हॉस्पिटल मध्ये दुसरं डोकं नसल्याने डॉक्टरांनी त्याला हत्तीचं डोकं लावलं.
आणि मग आपण त्याला गणपती बाप्पा म्हणायला लागलो.
हो तो बेबी एलीफंट होता.
नाही तो ऑलरेडी मेलेला होता.
दोन मिनिटं विचार करुन मुक्ता म्हणाली कि अम्मा शॉवर घेत असताना मी बाथरुमपाशी उभी रहाणार नाही!
पोरं पण ना....
पण यु ट्युबवर शोधुन रात्र सुंदर सापडलं नाही.
लोकप्रिय संदीप खरे बराच सापडला - पण तो पोकळ होता.
हल्ली तर त्यातही रिमिक्स प्रकार आलाय.
म्हणजे त्याचं असं ना - कि कुणाची तरी आई बहीण मित्र मैत्रीण खांदा किंवा मानदुखीच्या वेदनेनं तडपत असताना कुणीतरी विचार केला असणार कि च्यायला एवढं शिकुन माझा उपयोग काय? म्हणुन मग त्या माणसाने कुठलातरी बाम वगैरे शोधुन काढला असणार. मग फार विचार करुन अत्यंत योग्य असं किंवा ’हु गिव्हज अ फक’ म्हणुन फेकलेलं ’झंडु बाम’ असं नाव त्या माणसाने दिलं असणार. मग ते प्रसिद्ध वगैरे झालं असणार. मग दुसर्या तिसऱ्या पिढीत कुणीतरी एकावर एक फ्री अशी स्किम किंवा ’रस्त्यात खड्डा, खड्ड्यात पाय, खिशात झंडु बाम, घाबरतो काय’ असं काहितरी ब्रीदवाक्य बनवलं असणार. अ‍ॅड एजन्सीमध्ये लोक इक्वेशन्सना कवितेत मांडत असावेत काय? संदीपला विचारायला पाहिजे. कारण त्याची गाणी आणि तो - हल्ली जाहिराती वाटायला लागलेत.
एनीवे.
तर हे असं अती होतं.
मानदुखीवर डॉक्टरने काल नारकॉटिक्स सबस्क्राईब केली.
त्याला म्हटलं च्यायला असलं डेंजर मी कधी काही घेतलं नाही.
सतीश म्हणे अरे लग्न होऊन सहा वर्षं झाली ना?
मग नारकॉटिक्सनेही फरक पडणार नाही.
चमच्या चमच्याने बधीरपणा तुला भरवण्यात आल्याने तु संत झालायस!
त्याला जाम हसलो.
आज एकापाठोपाठ एक तीन गोळ्या घेउनही ढिम्म परिणाम नाही.
उद्या आपण नारकॉटिक्सची भाजी करु.
आज बास.

12 comments:

  1. Bhaji kashi zali?
    Kahar aahes tu! Pan khup hasale post wachoon!! Aata Kanula ganpatichi gosht edit ani revise karoon sangavi lagel... Haha
    Swapna

    ReplyDelete
    Replies
    1. स्वप्ना - नारकॉटिक्स इतक्या होत्या कि भाजी करावी का हा विचार करत होतो, पण मान एवढी दुखली कि त्या आश्चर्यकारक वेगाने संपल्या!
      बाकी मुक्ताने हे एलिफंट हेड प्रकरण जास्तच मनावर घेतलंय. बरं एका गोष्टीची भिती वाटली कि आपण मोठे लोकही शॉर्टकट काढतो. आज ती मागे लागली कि माझ्या
      सोबत हॉस्पिटल मध्ये यायचंय म्हणुन - तेव्हा परत बाबाला एलिफंट हेड लावतीलची भिती घालण्यात आली.
      एनीवे - बघुयात हे फॅसिनेशन किती दिवस टिकतंय.
      But I have a feeling that she looks at Bappa a bit more sympathetically as if I feel for
      you dude - it was not your fault! :))

      Delete
  2. Bhaji kashi zali?
    Kahar aahes tu!! Pan post wachoon jaam hasale!!!keep it up...
    BTW, aata Kanula ganapati chi story edit and revise karoon sangavi lagel hehe
    Swapna

    ReplyDelete
  3. खूप दिवसांनी पोस्ट पाहून बरं वाटलं. तू संदीप खरेला शिव्या घालायला इतका वेळ लावलास, म्हणजे तू खरंच संत झालायस.

    ReplyDelete
  4. masta re.. jawal-jawal sagalya goshti "identify" kelya.

    shankar-ganapati chi goshta.
    speed limit.
    stock market investments.
    ani,
    aDachaNit dev athavane, kimva baki sagale tyach sequence madhye!

    bara vaTala vachun!

    ReplyDelete
    Replies
    1. अभ्या या निमित्ताने घरी आहे आणि त्यामुळे बाबाशी टायमिंग जुळतंय - च्यायला रोज तो घरी भेटायला येतो असं वाटतं.
      It's priceless!

      Delete
  5. Narcotics chi bhaji karu. Hahaha.
    Mendu atishay Numb zalay lagna nantar.
    Satishche mhanane ekdam patle.

    ReplyDelete
    Replies
    1. महेश - जरा मला फेसबुक वर सर्च मारुन नाहीतर bathe.abhijit@gmail.com वर मेल करुन परिचय दे ना. म्हणजे कमेंट्स आणि त्यावरचे रिप्लाय
      पर्सनल होतात आणि लिखाण ब्लॉगपोस्ट न रहाता गप्पा बनतात.
      BTW - Thank you for the comment.

      Delete
  6. Khup chidchid jhaleli aahe. :) Comment takun post karayla gele tar login nahi mhanun comment gayab. Anyway, parat lihite aata. Feels so refreshing to read a post from you. You have no idea. It reminds me of lot of old memories( just 3 yrs old but still ) :) Feels long after 2 kids. :)
    Anyway Ganapati chi goshta aikun hasu aala. Aata Saanu la kashi sangu ha vichar karat hote, pan maybe should just wait another year. :D
    Baki tu mhanala te khar, khup vichar kartoy asa vatat. Last signal 8.26 la milala tar office la on time pochnar (8.30 la) 8.28 cha milala tar 8.32 la pochnar ani 8.30 cha milala tar late ch. Aaila chidchid hote ka vichar kartoy mhanun, pan yetoch vichar. :)
    Anyway, keep writing, maybe Meghna will also get motivated to write and I'll get more to read. :D. For me to write, I guess just comments writing is enough for now. :)

    ReplyDelete
    Replies
    1. विद्या - कमेंट तर कमेंट, लिहितिएस ही चांगली गोष्ट झाली.
      गणपतीची गोष्ट तरी युनिक आहे, पण हळुहळू पुराणं वाचावी लागणार आहेत कि शिवाच्या गळ्यात साप का आणि who is the greatest god वगैरे.
      शिवाय सॅन्टा म्हणजे गॉड का? आणि ही कन्सेप्ट कुठुन आली वगैरे. Man - ही पोरं कारणं विचारायला लागतात आणि आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन भरवतात. बरं
      त्यांच्याकडे सोयिस्कर उत्तरं ही असतात!
      म्हणजे असं कि एकदा एक हत्ती फ्रीज मध्ये जाऊन बसला - कसा काय?
      मग आपण विचार करुन म्हणायचं कि माहित नाही.
      मग ती म्हणणार - सोप्पं आहे - तो खोटं बोलत होता.
      मग पुढचा प्रश्न - एकदा एक हत्ती फ्रिजमध्ये जाऊन बसला - कसा काय?
      मग आपण खुप विचार करायचं नाटक करुन म्हणणार कि - सोप्पं आहे - तो खोटं बोलत होता.
      तर ती म्हणणार - ह्या, नाहीच मुळी - कारण तो प्लॅस्टिकचा छोटा हत्ती होता!

      मुक्ता ने असं बौद्धिक अजुन तरी घेतलेलं नाहिए, पण I dread the day.
      बाकी माझ्या लिहिण्याने इतर किती लिहितात याबद्दल मला शंका आहे. एकतर usual suspects नी एक लेख लिहायला सांगितलाय आणि मी म्हणजे -
      PhD करणाऱ्याचं घर कसं - सगळ्यात स्वच्छ असतं (म्हनजे थिसिस न लिहिण्यासाठी काहिही कारणं) तसं रोज एक लेख पाडतोय वेळ नाही म्हणत.
      हे लोक लिहीत नाहीत म्हणजे हे लोक नक्कीच कुठल्यातरी प्रक्षोभक विषयावर लिहीत असणार. ;) (हे विंक विंक इथे चालत नाही बहुतेक).

      Delete
  7. post chhane! narcotics chi bhaji far funny.. :)
    you might not know me, but I have been reading your blogs since 2006.. itakya diwasanni the fountainhead blog var ala mhanun mast vatla!

    ReplyDelete
  8. भाग्यश्री - माझेे वाचक इतके गण्य आहेत कि मी बहुतेक प्रत्येकाला नावानिशी ओलखतो! :)) पण आज फायनली कललं कि LA मधुन कोण वाचतंय! BTW - I am designing one of the runways for LAX!!

    ReplyDelete